सिंधुआज्जींच्या मिड-लाईफ क्रायसिसच्या काळातील त्यांच्या अजून एका साईड बिझनेसचा हा किस्सा.
कार्यरत आईवडिलांच्या तान्ह्या बाळांसाठी पाळणाघरे उपलब्ध आहेत. पण बाळांना संध्याकाळी पाळणाघरात सोडणे आणि सकाळी पुन्हा घरी आणणे हे रात्रपाळी करणाऱ्या पालकांना (आणि सकाळी सोडणे आणि संध्याकाळी घरी आणणे हे इतर सामान्य पालकांना) कठीण जाते, हे सिंधुआज्जींना मार्केट सर्व्हेद्वारे कळले.
या समस्येवर तोडगा म्हणून सिंधुआज्जींनी अॅप-बेसड प्रॅम-ऑन-डिमांड सेवा सुरू केली. अॅपवरील एक बटण दाबताच काही मिनिटांत सुसज्ज प्रॅम हजर होत असे आणि तान्ह्या बाळाला इप्सित स्थळी नेत असे.
अॅपमध्ये रेग्युलर, प्ले (खुळखुळा आणि फिरती खेळणी), लक्स (प्रॅममध्ये १८०° आडवे होऊन झोपायची सोय), आणि पूल (चार बाळांना एकसमयावच्छेदेकरून इप्सित स्थळी नेणारी प्रॅम) असे पर्याय होते. तसेच बीटा-टेस्टिंग तत्त्वावर स्वयंचलित टेस्ला प्रॅमचाही पर्याय नशीबवान बालकांना उपलब्ध होता.
टारगट कस्टमर्सना डोळ्यासमोर ठेवून बेबी टीव्ही, पाळणाघरांमधील आणि बालरोगतज्ञांच्या दवाखान्यातील बिलबोर्डस्, वाॅल स्ट्रीट जर्नल अशा विविध माध्यमांमध्ये सिंधुआज्जींनी दृकश्राव्य जाहिराती दिल्या. "काॅन्ग्रॅच्युलेशन्स अॅन्ड पेरॅम्ब्युलेशन्स, आय वाॅन्ट द वर्ल्ड टू नो आयॅम हॅप्पी अॅज कॅन बी" ही आकर्षक जिंगलही त्यांनी स्वतः लिहिली.
परिणामी या सेवेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रॅम-ऑन-डिमांडची चटक लागलेली बाळे इतर कोणत्याही वाहनात बसायला नाकारु लागली.
परंतु एका महिन्याचा क्रेडिटचा अवधी संपल्यानंतर ग्राहक बाळांकडून वसुली करणे सिंधुआज्जींना जमेना. एकतर संवादासाठी सामायिक भाषा उपलब्ध नव्हती, आणि कायद्यानुसार अज्ञान बालकांकडून कराराची अंमलबजावणी करवून घेणे शक्य नव्हते.
अखेरीस सिंधुआज्जींनी हा आतबट्ट्याचा व्यवहार थांबवला आणि आपल्या प्रोटेक्शन रॅकेटवर लक्ष केंद्रित केले.
मला सिंधुआजीच्या नॉर्मल
मला सिंधुआजीच्या नॉर्मल गोष्टी वाचायला आवडतील. ह्या हायटेक गोष्टी डोक्यावरून जातात. अनुवादित केलेल्या तर नाहीत ना.
चुकीची अपेक्षा!
सिंधुआज्जींमध्ये नॉर्मल असे काही नाही. सबब, सिंधुआज्जींच्या नॉर्मल गोष्टी वाचायला मिळणार नाहीत.
(तसेही, 'नॉर्मल, नॉर्मल' म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे तुम्हाला? 'पहाट झाली. सिंधुआज्जी उठल्या. चहा प्यायल्या. शी केली. ढुंगण पाण्याने धुतले. हात धुवून दात घासले.' असले काहीतरी?)
हा हाहा
स्वयंचलित प्रॅम हा प्रकार फारच आवडलाय.
अं...
आम्हाला स्वयंचलित सिंधुआज्जी (बोले तो, स्वतःच्या स्वतः टर्नऑन होणाऱ्या) असा काही प्रकार असता, तर तो अधिक बहारदार वाटला असता. पण असो. पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, त्याला काय करणार? चालायचेच!
संदर्भ हो ...
लहान पोरांचा संदर्भ नसता तर मलाही तशा सिंधुआज्जी आवडल्या असत्या.
.
(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)