ऍक्टर्सच्या लहानपणचे व्हिडीओ (ऊर्फ फालतू क्लिकबेट) (ऊर्फ मर्यादित कल्पनाशक्ती)

डिसेंबरमधली स्टोरी. नाताळच्या आसपासची.

मह्या आणि मी नेटफ्लिक्सवर कोणतीतरी फिल्म बघत होतो. कोणाच्यातरी डोळ्यांसमोर अख्खं आयुष्य तरळतं असा सीन होता. अगदी बालपणापासून वगैरे.

"भेंजो हा लहान पोरगा वेगळा आहे. त्या अॅक्टरच्या लहानपणचा नाहीये तो व्हिडिओ!" मह्या एकदम बोलला. "त्या अॅक्टरला जन्मखूण आहे बघ डाव्या कोपरावर. पोराला नाहीये तशी खूण." फिल्म रिवाईंड करत मह्या डिटेल्स दाखवू लागला.

"त्या अॅक्टरच्या आईबाबांना काय स्वप्न पडलं होतं का, तुमचा मुलगा मोठेपणी अॅक्टर होणारेय म्हणून? त्याचा व्हिडिओ कशाला काढतील लहानपणी? आता फिल्म बनवताना जरासा तसा दिसणारा पोरगा शोधला आणि केलं शूटिंग." मी बोललो.

"भेंजो पण अॅक्टरच्या लहानपणचे व्हिडिओ असते तर जास्त मजा आली असती." मह्या पाॅईंट सोडत नव्हता.

तेवढ्यात स्विगीचा हंगर सेव्हियर कांदाभजी घेऊन आला. तोच होता - कांद्याच्या स्टोरीतला. तर त्याला दहा रुपये टिप दिली. मग भजी खात फिल्म बघायला लागलो आणि तो पाॅईंट विसरून गेलो.

म्हणजे मीतरी विसरलो. मह्या नाय विसरला.

पुढच्या शनिवारी सकाळी तो एकदम हायपर होऊन आला. "भेंजो तुझा डीएसेलार काढ. बॅटऱ्या वगैरे घे भरपूर. बाकी सेटींग केलीय मी. चल लवकर."

मग काय करणार? सगळं घेतलं आणि निघालो.

तर मह्या कोणत्यातरी बालनाट्य शिबिरात घेऊन गेला. "बंटीने वाजवली झिंबोची घंटी" टायटलच्या नाटकाचे बोर्ड लागले होते. तिथली एक सात्विक टाईप बाई मह्याला बघून लगबगीने आली. "आलात का? चला चला. मुलं वाट बघतायेत केव्हापासून! आणि पालकांनाही तुमची कल्पना खूप आवडलीय हो!"

दहाबारा मुलंमुली रांग लाऊन उभी होती. मग सात्विक बाई, एक असिस्टंटसारखी दिसणारी दुसरी बाई, रांगेतली मुलं, आणि मी सगळेजण मह्याच्या मागोमाग एका पार्कमध्ये गेलो.

तिथे एक मुलगा झोपाळ्यावर उभा राहून झोके घ्यायला लागला. "कर रे सुरू" मह्या म्हणाला आणि मी शूटिंग सुरू केलं. मग एकेक करून किंवा गटागटाने सगळ्या मुलामुलींचं झोपाळा, सीसाॅ, मेरीगोराऊंड सगळ्यावर शूटिंग केलं. पोरंपण कॅमेराशाय नव्हती, रिटेक मागत होती. दोनतीन तास गेले पण झालं सगळं.

मग मह्या आणि मी हाॅटेलात गेलो आणि पावभाजी मागवली. "फिल्म कट करून प्रत्येक मुलाच्या शाॅटसची वेगवेगळी पेनड्राईव्ह करून दे रे. उद्यापर्यंत." मह्या म्हणाला.

"मला दुसरे धंदे नाय काय भेंजो विकेंडला?" मी उचकलो.

मह्या शांतपणे म्हणाला. "बारा मुलं गुणिले दीड हजार. काय वाईट डील नाही. सत्तर टक्के तुझे."

"सत्तर नाही. साठ बरोबर आहे. आयडिया तुझी आहे रे भेंजो." मी म्हणालो.

आम्ही साठवर डन केलं. पावभाजी संपवली, फालुदा खाल्ला. मग घरी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मह्याच्या बिझनेस आयडियाज सॉलिड असतात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुसखशीत मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोबाइलमधल्या विडिओजच्या फिल्म कशा बनवायच्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लास Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मह्याला एखादी IoT कंपनी काढायला सांगा - Idea of Things!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"बंटीने वाजवली झिंबोची घंटी"

हे जबरदस्त.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लै भारी लिवलय !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0