साहेब

साहेब.
साहेब हेच संबोधन मी त्यांना वापरतो. साहेबांची आणि माझी पहिली भेट अजून स्मरते. मी तेव्हा कामानिमित्त कराडमध्ये रहात होतो. माझी भाड्याची खोली तळमजल्यावर होती आणि साहेब नुकतेच वरच्या मजल्यावर रहायला आले. गोरीपान, पाच फूट उंच मुर्ती आणि गोल हसतमुख चेहरा. ते आणि त्यांचा साईट सुपरवायझर भोजने असे दोघेच रहायला आले. ओळख झाली. आणि काय जादू साहेबांकडे होती की मी स्वत:हून त्यांच्याकडं गप्पा मारायला जावू लागलो. ते मला बापू म्हणून हाक मारत. ते दिवसभर साईटवर असत. मीही कामावर म्हणजे मार्केटिंग करत दिवस भर बाहेर असायचो. साहेब सिव्हिल इंजिनिअर होते. ते दोन वर्षांपूर्वी इंजिनिअर झाले होते. आणि आता तीन कोटींची साईट हॅण्डल करत होते. असंच एकदा चहाच्या टपरीवर गेलो तर मी म्हणालो साहेब मी आताच तंबाखू खाल्ली आहे. ते म्हणाले " अहो बापू, थूका ती तंबाखू. आपण नवीन पुडी घेऊ." आणि आग्रहाने चहा घ्यायला लावला. ती आग्रह करण्याची पध्दत आणि तो जिव्हाळा पाहून मी साहेबांच्या स्वभावाच्या प्रेमात पडलो. तेव्हा मी नुकताच बियर पीत होतो. साहेब बोलले काय बापू? घेता काय. मी बियर पीतो हे सांगितले. साहेब म्हणाले अहो हॉट घेऊ चला.‌ मग काय मॅगडॉल आणि ओसी हे दोन ब्रॅण्ड सुरू झाले. साहेबांच्या साईटवर ट्रकनं रेती, दगड टाकणारा इमडे शेठ आमचा दोस्त बनला. इमडेशेठची दगडाची खण होती. खणीतून दगड मोठ्या प्रमाणावर आणून टाकत साईटवर. रोजच आम्ही विकास बारमध्ये भेटून ड्रिंक्स, जेवण घेऊ लागलो. भोजने दारू घेत नसल्याने ते खानावळीत जेवत. इमडे, साहेब, मी आणि अजून एखादा जण. विकास बार मध्ये साहेबांची चांगलीच वट होती. मी जर आधी तिकडे गेलो तर मालक शेट्टी अण्णा बोलायचा तुमचे मित्र अजून नाही आले. साहेब मला कधीच बील देऊ देत नसत.
अशातच इमडे शेठनं आम्हाला एक स्वयंपाक करणारी बाई पाहून दिली. तिचं नाव विमलबाई, लोक तीला गाव इमी म्हणत. पूर्वी ती वेश्येचं काम करीत होती. आता वय झालं म्हणून आमचा स्वैपाक बनवीत होती. पण लोकांना माल पुरवत होती. आमच्याशी मात्र सरळ आणि व्यवस्थित वागत होती. माझी आणि तिची छान गट्टी जमली होती. एकदा मी दुपारी तिच्या घरी गेलो. तीनं मस्त भजी तळून खायला दिली. तेवढ्यात तिथे एक तरुण मुलगी आली. विमलबाई मला खुणावत बोलली बापू करायचं का तुम्हाला. तीची डायरेक्ट ऑफर ऐकून माझी बोबडीच वळली. माझी फजिती पाहून विमलबाई हसत सुटली. माझ्यात असे काही करायची डेरिंग अजिबात नव्हती.
साहेबांच्या कंपनीचा एक ट्रक होता. संध्याकाळी साहेब तो चालवत घेऊन येत. एमटीओ अठ्ठावनशे नंबर होता त्याचा. मला साहेबांनी एकदा बिनधास्त ट्रक हातात दिला आणि म्हणाले चालवा बापू. मी आट्यापाट्या खेळत चालवला. नंतर चांगलाच हात साफ केला. साहेब मला एक वर्षानं वडील आहेत. तेव्हा आमची वयं पंचवीस, सव्वीस असतील.
साहेबांचं गाव कोल्हापूर जवळ होते. मी कित्येकदा त्यांच्या घरी गेलो. आई, अण्णा अत्यंत साधी माणसं पण इतकी प्रेमळ की बस. त्यांचा भाऊ श्रीनिवास, साहेब ज्याला नवसा म्हणत तो साहेबांइतकाच जॉली आहे.
साहेब पगार करण्यासाठी दर आठवड्याला कराडच्या बॅंकेतून तीन चार लाखाची कॅश काढत. तिथेच बंडलं वर्तमानपत्रात बांधत. अशीच बंडलं घेऊन साईटवर. कसली भीती नाही आणि काही नाही. झोपेचं तर इतकं वरदान की पाच किलोमीटर जायचे तरी झोप काढायचे.
साहेबांचं बालपण एकदम गरिबीत गेले होते. थोडा शेतीचा तुकडा आणि एक म्हैस. बालपणी ते खूप आजारी पडले होते. तेव्हा दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते. त्यांच्या आत्यानं पन्नास रुपये दिले होते. ते दवाखान्याच्या कामी आले. टोपलीत ठेवून अण्णांनी डोक्यावरून दवाखान्यात नेले. दोन तीन वेळा बाळ जिवंत आहे का हे रस्त्यात चाचपून पाहिले होते. पण आयुष्याची दोरी बळकट होती साहेबांची.
नंतर माझी दुसरीकडे बदली झाली. साहेबांची साइट पुर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यात बांधकाम व्यवसाय सुरू केला. आता पुण्यात प्रथितयश बिल्डर आहेत. वहीनी सुध्दा खूप मनमिळाऊ स्वभावाच्या आहेत. साहेबांनी गावाला मोठं घर बांधले आहे. वाहने आहेत. छान प्रगती केली आहे. त्यांनी सांभाळलेले माणसं अजून टिकून आहेत. साहेब प्रत्येकाची अडचण जाणून होईल तेवढी मदत करतात. ते आठ दिवस साइटवर गेले नाहीत तरीही मुकादम स्वत: मालक असलेल्या सारखे काम पाहतात.
साहेब आजही कोणाजवळ हे माझे मित्र बापू अशी ओळख करून देतात तेव्हा फार समाधान वाटतं. जसं संताजवळ बसलं की अंत:करण प्रेममय होते, तसं साहेबांची आठवण झाली तरी मन स्नेहानं पाझरू लागते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडलं व्यक्तीचित्रण.

फिरतीच्या,बदलीच्या नोकरीत खूप समाजशिक्षण होतं. प्रत्येक अनपेक्षित चांगल्यावाईट प्रसंगाला सामोरं जाऊन त्वरित निर्णय करण्याची क्षमता येते ती पुस्तकांची हजारो पाने वाचून येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. आ'बाबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

म्हणजे छोटे गाव, साईट वगैरे वैयक्तिक जिव्हाळ्याच्या गोष्टी असल्याने प्रेमाने वाचले मी.
पण फार गोग्गोड झालंय का इथे ?
तुम्हाला मधे बरेच वेगळे तपशील भरायचे आहेत पण राहून गेलेत असे का वाटत आहे मला ?
गोब्रा, तपशील भरलेत तर अजून मजा येईल..
बघा म्हणजे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद अबापटजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

एखादे थोडेच दिवस/काळ भेटलेले आठवणीतील चांगले व्यक्तीमत्व गोग्गोड असणे हा अपवाद आहे।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आचरट जी आम्ही कायम फोनवरून संपर्कात असतो. एकमेकांना भेटतो अधूनमधून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

दुधात साखर!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0