"शनिवारचा" स्टड

प्रिल मधली शनिवार संध्याकाळ, शिवाजी पार्कचं सी सी डी तरुणाईने फुललेलं.
त्याने एन्ट्री टाकली आणि सगळ्या पोरींचं काळीज लक्कन हललं.
ट्रेंडी स्पाईक्स, "जॅक-जोन्स" ची मांडीवर फाटलेली डार्क ब्ल्यू जीन्स आणि "डिझेल"चा तलम स्लीवलेस टी शर्ट.
शिवाय कमरेवर उगीचच स्टायलीत बांधलेला लाल चेक्सचा "स्कॉच एन सोडा"चा फ्लॅनेल शर्ट.
सव्वा सहा फूट उंची, शिडशिडीत बांधा पण फोर आर्म्स आणि दंडात दिसणारी प्रचंड ताकत.

सी सी डी मधल्या विविध मुली विविध कारणांसाठी तात्काळ त्याच्या प्रेमात पडल्या:

मियाला त्याच्या वाईड नेक टी शर्ट मधून दिसणाऱ्या रुंद छातीवरला तीन मूर्तींचा एक्झॉटीक टॅटू आवडला,

सुहानीला त्याचे रुसक्या पोरासारखे किंचित फुगलेले गाल खूप क्युट वाटले,

आणि साल्साला आवडली त्याची नजर: एकाच वेळी किंचित रागीट, आश्वासक आणि निरागस,
चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

सगळ्या मुलींच्या प्रेमळ + त्यांच्या बॉय फ्रेंड्सच्या जळू नजरांना फाट्यावर मारत आपल्याच मस्तीत त्याने एक टेबल पकडलं आणि तो शांतपणे टिश्यू-पेपर्सवर काहीतरी लिहित बसला.

साल्सा तर वेडावली होती, माहित नाही किती वेळ गेला १० सेकंद? ५ मिनटं? की २ तास?

अचानक तो उठला,
हसत दाणदाण पावलं टाकत तो साल्साकडे आला, आणि त्याने तो टिश्यू-पेपर साल्साला दिला.
साल्सा थुयथुयली, नक्की त्याचा नंबर देत होता तो.
तिच्या डोक्यावर अलगद प्रेमळ हात ठेवून तो आला तसा परत फिरला आणि निघून गेला.

साल्सानी खुशीत टिश्यू उघडला आणि ती बावचळली अक्खा टिश्यू पेपर राम-नामाने भरला होता, आणि कुठेतरी हनुमान जयंतीची आरती जोरात चालू होती.
-------------------------------------------------

वाचकहो या गोष्टीला खालील श्लोकाचा आधार आहे :
अश्वथामा बळीर्व्यासो हनुमानाश्च विभिषण कृपाचार्य च परशुरामां सप्तैता चिरांजीवानाम
अर्थ : अश्वथामा, बळी, व्यास, हनुमान, विभिषण, कृपाचार्य, आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत.

(धनंजय दिवाळी अंकात पूर्वप्रसिद्ध)
-नील आर्ते

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

सगळ्या पोरी माकडांमागे धावतात.

----------

ट्रेंडी स्पाईक्स, "जॅक-जोन्स" ची मांडीवर फाटलेली डार्क ब्ल्यू जीन्स आणि "डिझेल"चा तलम स्लीवलेस टी शर्ट.
सव्वा सहा फूट उंची, शिडशिडीत बांधा पण फोर आर्म्स आणि दंडात दिसणारी प्रचंड ताकत.

सी सी डी मधल्या विविध मुली विविध कारणांसाठी तात्काळ त्याच्या प्रेमात पडल्या:

मियाला त्याच्या वाईड नेक टी शर्ट मधून दिसणाऱ्या रुंद छातीवरला तीन मूर्तींचा एक्झॉटीक टॅटू आवडला,

सुहानीला त्याचे रुसक्या पोरासारखे किंचित फुगलेले गाल खूप क्युट वाटले,

आणि साल्साला आवडली त्याची नजर: एकाच वेळी किंचित रागीट, आश्वासक आणि निरागस,
चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

एकीलाही त्याचे जीन्सना स्ट्रॅटेजिक ठिकाणी पाडलेल्या भोकातून बाहेर डोकावणारे लांबलचक शेपूट नाही दिसले???

----------

आणि पोरींची नावे काय, तर म्हणे मिया? सुहानी?? आणि, (ऑफ ऑल द थिंग्ज़) साल्सा?????? आरारारारारा!!!

आपल्या पोटच्या (रस्त्यावर सापडलेल्या नव्हे) पोरींना असली नावे देणारी आईबापे कोठे पैदा होतात, परमेश्वरच जाणे!

----------

चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

१. अहो, काहीही काय‍? ब्रह्मचारी आहे तो! तुमच्या जिभेला काही हाड?

२. आधी तसले गळ्याखालचे भाग दिसतील असले कपडे घालायचे, नि मग लोक गळ्याखाली बघतात म्हणून बोंबलायचे! गोठ्यात निजणाऱ्यान्...

(बादवे, हनुमानाचे लग्न झाले होते (परंतु तरीही तो ब्रह्मचारी होता), असा दावा या ठिकाणी आढळला. 'कुछ विशेष परिस्थितियों के कारण ही बजरंगबली को सुवर्चला के साथ विवाह बंधन में बंधना पड़ा।' बोले तो, शॉटगन वेडिंग वगैरे?)

(तसेही, ब्रह्मचारी असला, तरी हनुमानाला मुलगा आहे! त्याचा घाम कोठल्यातरी मगरीने गिळला, त्यापासून तिला दिवस जाऊन मूल झाले म्हणे. मकरध्वज नाव त्याचे. शिवाय, कोठल्याश्या स्त्रीराज्याच्या वेशीवर बसून त्याने केलेल्या नुसत्या बुभुःकारातून तिथल्या बायकांना दिवस जायचे म्हणे! बोले तो, "स्टड" हे वर्णन अगदीच चुकीचे नाही.)

(पोरींना माकडांचे एवढे आकर्षण का असते, हनुमान जाणे!)

----------

असो. कथा/संकल्पना फॉरअचेंज रोचक आहे. आवडली.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

तो ब्रह्मचारी असल्यानेच तिच्या "गळ्याखाली" नजर जात नाही.
ही चेकोव्ह गन पेरली होती मी माझ्या मते.

शेपूटचा पॉइन्ट मी गालीच्याखाली सरकवला हे मान्य!
सुधारून घेतलंय आता:

>>>
शिवाय कमरेवर उगीचच स्टायलीत बांधलेला लाल चेक्सचा "स्कॉच एन सोडा"चा फ्लॅनेल शर्ट.
>>>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर 'धनंजया'त प्रसिद्ध होत असेल तर कठीणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साल्सा नावाची मुलगी, फाटकी जीन्स घालणारा 'तो', आणि तो टिश्यूपेपरवर 'राम' लिहून देतो, आणि ती साल्साकुमारी काहीही म्हणत नाही, काही प्रतिक्रिया येत नाही. तिला ते डोक्यावर हात वगैरे विचित्र वाटत नाही.
बादवे, एकूणात असल्या जागी पीळदार पुरूष प्रचंड प्रमाणात असतात आणि मुली त्यांच्याकडे इतक्या थेटपणे पाहत नाहीत.
म्हणजे, टिश्यूपेपरवर लिहून देण्यापर्यंत 'तो' मर्त्य जगात येऊ शकतो.
पण पेक्स दाखवण्यासाठी बनलेले वाईडनेक टीशर्ट घालू शकतो.
पण टिश्यूवर रामनाम लिहीतो?
म्हणजे कल्पनाविलास किती म्हणजे किती?
शिवाय ते शेवटचं स्पष्टीकरण. देवा! (श्लेष जाणीवपूर्वक.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

बादवे, एकूणात असल्या जागी पीळदार पुरूष प्रचंड प्रमाणात असतात आणि मुली त्यांच्याकडे इतक्या थेटपणे पाहत नाहीत.

'असल्या ठिकाणी' बोले तो? सीसीडी ही स्टारबक्सची देशी आवृत्ती असल्याचे समजत होतो; एखाद्या पबची नव्हे. (अर्थात, आमचे अज्ञान.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्टारबक्स देशी.
आणि हो, असल्या ठिकाणी, आणि पब्जमध्येसुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

श्लोकाशिवाय आवडलं असतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्लोकाशी तुमचे काय हो वाकडे? (त्यातले टायपो/अशुद्धलेखन वगळल्यास?)

उलट, श्लोकामुळे कहानीमेंट्विस्ट/पंचलाइनचा संदर्भ लागायला/सस्पेन्सची उकल व्हायला मदत होते. त्याशिवाय मजा नाय.

सवांतर: ही कथा वाचा. अगोदर कथा पहिल्यापासून शेवटपर्यंत (त्या क्रमाने) पूर्ण वाचा. पूर्ण वाचून झाल्यावर मग शेवटच्या परिच्छेदाबद्दल काय वाटते ते सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह्यात किंवा वायझेड माणसांच्या गोष्टी मला आवडतात. मह्याच्या गोष्टींसारख्या.

(कथा वाचून मत लिहिते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लिंकित कथा वाह्यातही नाही, आणि वायझेडही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडण्यातला एक निकष तो आहे. आणखीही निकष आहेत;

एरवी मी ललित लेखनापासून अंमळ अंतर राखते. पण तुम्ही सुचवलीत म्हणून वाचायला भीती वाटणार नाही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उपरोल्लेखित व्यक्तीच्या अंगावर मांडीवर फाटलेली डार्क ब्ल्यू जीन्स कदाचित असेलही, पण तलम स्लीवलेस टी शर्ट? अशक्य वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||