करोनाच्या नानाची टांग

मुझ को तुम जो मिले सारा जहान मिल गया
तुम जो मेरे दिल मे बसे दिलका कंवल देखो खिल गया

https://www.youtube.com/watch?v=r_AKKWy4ayg
नंतर, .............

तुमने हंसी ही हंसी मे दिल क्युं चुराया जवाब दो
आंखोंसे तुमने भी कितनी नींदे चुरायी हिसाब दो ...

https://www.youtube.com/watch?v=IW86QvUY9tw
.
.
.

होले होले साजना, धीरे धीरे बालमा.....
जरा होले होले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे,
कैसी भीगी भीगी ऋत है सुहानी, कैसे प्यारे नजारे

https://www.youtube.com/watch?v=832PCXbQ37g
.
आहाहा सध्या बाहेर हवा इतकी आल्हाददायक होउ लागलेली आहे, विशेषत: रात्री गार सुगंधी वारे आणि गॅलरीतून, पोर्णीमेचा केशरी चंद्र. या करोनाच्या नानाची टांग. काय तेजायला, बंडलपणा लावलाय. पार घरात डांबून ठेवलय. पण ते असोच.

गाणी ऐकता ऐकता, आज कॉलेजच्या सोनेरी दिवसांची सफर करुन आले. केवढे मंत्रभारले, जादूचे दिवस होते ते. स्वप्नांचे, नवीन नवीन अनुभवांचे, पिसावर तरंगण्याचे दिवस. पुढे संपूर्ण आयुष्य फुलांच्या पायघड्या घालून उभे. उमेदीचे, स्वप्नभारले दिवस. अशा दिवसांशी, मधुर, सरगमी गाणी जुडलेली नसतील तरच नवल. आमच्या कॉलेजमध्येही वार्षिक संमेलनाची धामधूम होतीच. नाटके, गाणी, वक्तृत्व स्पर्धा असत. पण अजुन एक खास आकर्षण म्हणजे 'फिश्पाँडचा दिवस'. या दिवशी आपल्या आवडत्या मुलाला-मुलीला खट्याळ फिशपाँड द्यायचा. आपल्याला काय फिशपाँड मिळतो याची अतोनात हुरहुर घेउन येणारा दिवस. आपली पॉप्युलॅरिटी आपल्याला किती व कोणते फिशपाँडस मिळतात यावर ठरलेली असे. आख्ख्या कॉलेजचा नूरच पालटलेला असतो. सगळीकडे जणू रंगीबेरंगी फुले फुलपाखरे.
.
माझी एक मैत्रीण होती. खूप सुंदर व नाजूक, राजस्थानी. तिला गाण्याच्या २ ओळी मिळाल्या होत्या फिशपाँडमध्ये -
.

हुझुर इस कदर भी ना इठलाके चलिये
खुले आम आंचल ना लेहेराके चलिये ...

कसली लाजलेली ती. आणि आमची एकदम कॉलर ताठ की आपल्या मैत्रीणीला इतका गोड फिशपाँड मिळाला. पण हे तर काहीच नाही. दुसऱ्या एका वर्गात एक गोरीपान, लांब केस असलेली एक गोंडस मुलगी होती. होय गोंडसच कारण एकदम मांजर होती ती दिसायला. तिला तर एकदमच भारी फिशपाँड मिळालेला.
.

धरती है लाल आज अंबर है लाल,
उडने दे गोरी गालोंका गुलाल .....

या फिशपाँडनंतर झालेला, टाळ्यांचा कडकडाट अजुनही आठवतो.

अजुन एका गाण्याची आठवण म्हणजे

नीले नीले अंबरपर चांद जब आये, हमको तरसाये, प्यार बरसाए
ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिलकी बुझा जाये

खरच फर्ग्युसन मध्ये आम्ही ग्रुपमध्ये हिरवळीवरती बसून हे गाणे ऐकत होतो, रात्र होती आणि पोर्णिमेचा चंद्र खरच आकाशात होता. कसं वर्णन करु! गिटारीवर ते शब्द, सुरेल धून, वातावरणात निव्वळ जादू झालेली होती. मला वाटतं तेथील प्रत्येकाला ती रात्र आजही आठवत असणार.

हे असे फुलायचे आणि झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस. त्यात जुनी खट्याळ, सुरेल तर कधी हृदय विद्ध करणारी, गोड गाणी - आपलं पूर्वसंचित आहेत ही गाणी. तुमच्याही काही आठवणी असतील कॉलेजच्या, प्रेमाच्या, गाण्यांच्या, कवितांच्या... प्लीज या धाग्यावर शेअर कराल का?.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पार घरात डांबून ठेवलय.
निघालोच आता बाहेर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निघाच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिशपाँड वरून आठवलं, दोन मास्तरांसाठी फिशपॉंड होते
१) देखो मगर प्यारसे. मास्तुरेचं आडनाव होतं मगर.
२) गाणं - ये चांदसा रोशन चेहरा, जुल्फोंका रंग सुनहरा - मास्तरांच्या जुल्फे उरकत आल्या होत्या. फक्त झालर राहिली होती.

एकाला लै जाड चष्मा होता. त्याने लिहिलेलं वाचणाऱ्याला दिलं नाही, स्वत: जाऊन वाचलं. एका पोरीसाठी होतं. बरंच लै लिहिलं होतं, मला आठवत नाही, फक्त शेवटचं वाक्य आठवतं "प्रिये...प्रिये तू स्वप्नात येणार असशील, तर झोपतांनाही चष्मा घालून झोपीन म्हणतो."

एकीने तिच्या खासंखास साठी गाणं गायलं होतं - "तू, तू है वही, दिलने जिसे अपना कहा". एकदम आशा भोसलेच. अजिबात सुध्दा कमी नाही. लै भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे मस्त विकासे. केवढे विनोदी फिशपाँडस Smile
आमच्या नूमवीत (मुला-मुलींची होती ११-१२ वी) तेव्हा एका बुटक्या मुलाला कुणी ते माहीत नाही, दिला होता -

अटक मटक चवळी चटक,
उंची वाढत नसे तर खुंटीला जाउन लटक.

म्हणजे त्या वयात कधीकधी आपण नकळत क्रूरपणाही करतो Sad

एक लठ्ठ मॅम होत्या रसायनशास्त्राला त्यांना आम्रपाली म्हणुन मिळाला होता . काय चावटपणा ना Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अटक मटक वाला फिशपॉंड कोणाचा तरी होता एका काश्मिरी पोरीसाठी. तिचं नाव लव्हली. वरच्या प्रतिसादातली गाणं गाणारी होती तिचं नाव शर्मिष्ठा. ती बंगाली होती. आणि ती स्वप्नात चष्मावाली ती केतकी. ती मराठी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0