किराणा ,आई आणि लॉकडाऊन

मी नेहमी लिहीत नाही. माझ्या आईची आठवण आली आणि सुचेल ते लिहिले.. मला प्रतिक्रिया आणि गरज वाटल्यास बदल सुचवा. धन्यवाद.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लॉकडाऊन चालू झाला.. लवकरच दुकान बंद होतील म्हणून किराणा दुकानात गर्दी होऊ लागली.. मिशिगन मध्ये २ केसेस सापडताच मीही गेले... एरवी ४ डॉलर ला मिळणारी तूरडाळ १० डॉलर ला मिळाली.. अडला हरी म्हणत ती हि कार्ट मध्ये टाकली.. मग दुकानात जे जे दिसेल ते कधी ना कधी लागेल च.. लॉकडाऊन कधी संपेल माहित नाही.. न भूतो ना भविष्यती अशी परिस्थिती समोर येऊन ठेपली होती... मनात लाखो बेघर लोक आणि मजूर यांचा विचार येत होता... आपल्याला परवडतंय म्हणून सुचतंय असही वाटत होत.. गोष्टी दिसेल तश्या रेसिपी सुचत होत्या आणि मनातलया सैरभैर विचारांवर, आता तोंडाला पाणी सुटतील अशा पदार्थांनी मात केली होती.

ज्वारीचं पीठ, गुलाबजाम मिक्स, मन्चुरिअन करायचं म्हणून कॉर्न स्टार्च, मॅग्गी (मी वर्षातून दोनदा खाते तरीही ), घरात आहे त्याचा वापर होतो म्हणून त्या गोष्टी म्हणजे रवा, पोहे, बेसन अशा एक ना अनेक गोष्टी घेऊन मी घरी आले... विचारचक्र थांबत नव्हतं.. मला स्वतःला अन्न वाया घालवायला आजिबात आवडत नाही.. फोडणीची पोळी, उरलेल्या भाताचे डोसे, जमेल त्या गोष्टी फ्रीझ करून ठेवायच्या असं सगळं नेहमी करणारी मी.. आज मी इतकं सामान का घेतलं?? खरच गरजेचं आहे का हे सगळं??

साधारण वर्षांपूर्वी घरीच कोथिंबीर लावू म्हणून घेतलेले अर्धा किलो धणे आठवले.. एकदा वापरले आणि वरच्या कप्प्यात तसेच ठेऊन दिले.. मग आठवण आली आई ची गेले ३०-३५ वर्ष ती रोज ३-४ वेळा वेग-वेगळे पदार्थ बनवत आलीये... भाजी पोळी वरण भात नेहमीच तर झालंच, पण कधी तांदळाची.. कधी मक्याची भाकरी... कधी आमटी, कधी कढी, कधी सांबर, कधी टोमॅटो सार... भातांचेही वेगवेगळे प्रकार... अगणित भाज्या आणि त्यांना बनवायच्या तेवढ्याच नानाविध पद्धती.. मग तोंडी लावायला कोशिंबीर, लोणचं, पापड, चटण्या. अधून मधून खायला चिवडा, भडंग, लाडू, शेव. उन्हाळ्यात उन्हाळकाम करून बनवलेले सांडगे, कुरडया, चिप्स, सरबतं... चहा सोबत खायला खारी टोस्ट नानकटाई
जेवायला बसल्यावर नावडती भाजी ताटात दिसल्यावर.. मला नाही जेवायचं म्हणल्यावर.. किचन मध्ये जाऊन २ मिनिटात काही ना काही बनून ताटात यायचं... २-३ दिवसानंतर तीच भाजी ताटात बघून "आज परत कोबी " असं आपण सगळेच कधी ना कधी बोललो आहे...
आता स्वतः किचन मध्ये पाऊल टाकल्यावर कित्येक गोष्टी समजायला लागल्या... कुठे गेल्या त्या शिळ्या भाज्या.. ज्या दिवशी पाव भाजी चे पाव संपले.. त्या दिवशी आई काय जेवली होती?? रोज आम्ही सगळे तिला म्हणतो कि सगळ्यान सोबत जेवायला बस.. ती नेहमी ५ मिनिट लेट.. आता समजतंय ती अंदाज घेत असे.. कशासाठी? तिनेच कष्ट करून सगळं बनवलय.. तिला सगळ्यात जास्त मिळायला हवं.. असं आत्ता वाटत.. तेव्हा वाटायचं आईला तर किती बनवायचं काळत च नाही.. स्वयंपाक कमी किंवा जास्त रोज होत नसे.. कधीतरी.. अगदी क्वचित.. पण तरीही.. लहान असताना ते शाहणपण नव्हतं कि असं का होतंय? फ्रिज आणि फ्रीझर मधल सामान तर मोज़ल च नाही.

कस आई?? असं सगळं छान मॅनेज करतेस? इतकी वर्ष आमचे हट्ट पुरवतेस.. सर्दी झालेली असताना रात्री १२ पर्यंत लोणी कढवत बसली होतीस मी अमेरिकेला येताना घरच तूप मला देण्यासाठी. खरच तुला सलाम.. कधी काढलास वेळ आमचा अभ्यास घ्यायला, आम्हाला बागेत न्यायला, पुस्तक वाचायला, टीव्ही बघायला , वाढदिवस लग्न कार्यहि आलेच. इथे दोन व्यक्तींच्या कुटुंबात सगळं सोप्प वाटत.. पण एकत्र कुटुंबात कशी करायचास तू १०-१२ लोकांचा स्वयंपाक? म्हणजे पीठ संपायच्या आत दळण करून आणायचं, गव्हाचं पीठ लौकर संपत पण प्रत्येक वेळी तांदळाचं पीठ नाही आणाव लागत किंवा भाजी एक किलो.. मिरच्या पण एक किलो.. अशी खरेदी नसते करायची.. आता तुम्ही हसाल.. हा कॉमन सेन्स आहे आणि हे असं नसत करायचं हे सगळ्यांना माहित असत असं मलाही वाटायचं पण मी माझ्या मित्रांना हे करताना प्रत्यक्ष पाहिलंय.. हे मॅनेजमेंट नाहीतर काय आहे.. आणि किती कमाल आहे या बायकांची.. पूर्वी तर कामवाल्या बायकाही नव्हत्या. धन्य हो माते धन्य हो
आज मला खूप कौतुक वाटतंय सगळ्या आयांचं.. तुम्ही सगळ्या ग्रेट आहात. सगळ्या आयांना मास्टर्स ऑफ होम मॅनेजमेंट अशी पदवी देण्यात यावी असं मी जाहीर करते आणि वरच्या कप्प्यातल्या धण्यांची पूड बनवायला घेते

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाहा छान अर्नेस्ट लिहिलंय.

हाउसवाइव्ह्ज खरंच कमाल असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणीतरी वाचाल याचा आनंद Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अजूनही कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं आहे. तुम्ही फेसबुकवर पण हे लिहिलं आहे का? इफ आय ॲम नॉट रॉन्ग? बहुतेक अंगतपंगत मध्ये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मी फेसबुक वापरात नाही. कुठे पाहिलं आणि कोणी कॉपी केलं असेल तर कळवा. मी हे ऐसी अक्षरे या ठिकाणी प्रसिद्ध केले आहे. बाकी कुठे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या मातोश्री अजिबात त्यागमूर्ती नव्हत्या. स्वयंपाकाच्या संदर्भात. आठवतंय तेव्हापासून आम्ही सगळे एकत्रच जेवायचो. आपण किती जेवणार हे वेळेत सांगायचं; आपल्या वाटणीचं उरलं तर आपणच शिळं संपवायचं. जास्त भूक लागल्यामुळे कमी पडल्याचं आठवत नाही. जेवताना सांडलं तर आपणच नंतर सफाई करायची. मी तीन वर्षं माणसांबाहेर राहिले, तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. ह्या मोजून जेवण्याच्या शिस्तीचा तेव्हा फारच उपयोग झाला. आता करोनाकाळात, घरातून बाहेर पडणं मर्यादित झाल्यावरही त्याचा फायदा वाटतो. मी तर आता वरणभातच जेवणार असेन तर तोही वजन करून, शब्दशः मोजूनमापून शिजवते.

सणासुदीला आई हौसेनं स्वयंपाक करून खायला घालायची. मी तिथेसुद्धा रटाळपणा निवडला आहे. तिला पन्नाशीत वजन कमी करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं; मला ती आफत ओढवून घ्यायची नाही.

पण आईचं वेळेच्या बाबतीत उलट. घरावर नाव वडलांचं; आमच्या नावांत वडलांचं नाव आडनाव. पण आई असेस्तोवर, अगदी मोजके अपवाद वगळता, आम्ही फक्त आईची जबाबदारी होतो. तिला स्वतःसाठी वेळच नसायचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी आत्ता भरभरून लिहिलंय. पण आई फार शिस्तप्रिय. बऱ्याचदा मला ती आवडत हि नाही. म्हणजे खायचे प्यायचे लाड सोडलं तर मला ती फार विशेष आवडत नाही. नेहमी अपेक्षांचे ओझे. इंजिनीरिंग ला फर्स्ट क्लास मिळालेल्या वर्गातल्या इतर लोकांना घरून गाडी घड्याळ मिळत होती. आमच्या कडे डिस्टींकशन मिळूनही फार कौतुक नाही. रोज भांडी घासायला लागायची, पोळ्या भाजून घेणे, बाकी मदत. हे सगळं करून ४ वर्ष अभ्यास केला. परिस्थिती असून हि कामवाली बाई नव्हती. ते कधी समजलं नाही. मार हि भरपूर खाल्ला. अचिएव्हमेन्ट च रेकग्निशन नाही. तिने सहन केलय आणि ती ज्या मनस्थितीत असते. तिच्या जागी ती योग्य असेल हि. आमच्या बाल मनावर झालेले परिणाम, अजूनही पुसता येत नाही. कोणी लाड केलेच नाहीत, स्वतःची काम स्वतः करायला लागायची, तो इंडिपेन्डन्स आता कमी येतो. कोणी मदत केली तर अवघडल्यासारखं वाटत. आमची आई अजून हि आम्हाला प्रेमाने जवळ घेऊन मिठी मारत नाही. सासू जवळ घेते. गालावरून हात फिरवते. आई पेक्षा जास्त सासू आवडते. सगळ्यांच्या तऱ्हा वेगळ्या.. अजून काय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व नात्यात आई आणि मुल हे नात खूप वेगळे असते.
मुलांसाठी किती ही मोठा त्याग फक्त आई च करू शकते .
बाकी कोण्ही ही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0