सिंधुआज्जी आणि पार्टी गेम्स

एकदा सिंधुआज्जींना त्यांच्या मैत्रिणीने तिच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले. प्लसवन म्हणून स्लॉथ्याला आणायचे नाही हे मैत्रिणीने निक्षून सांगितले असल्याने सिंधुआज्जी एकट्याच पार्टीला गेल्या. केक कापणे वगैरे सोपस्कार यथासांग पार पडले. त्यानंतर एक इसम पुढे आला आणि त्याने पार्टी गेम्स सुरू करण्याची घोषणा केली.

पार्टी गेम्स हा प्रकार सिंधुआज्जींना नवा होता आणि त्यामुळे रोचक होता. पाठीवरचे फुगे फोडणारी, विविध पशु-पक्षांच्या आवाजात आपल्या चमूतील इतरांना हाक मारणारी मुले आणि मोठी माणसे बघून त्यांना महदाश्चर्य वाटले आणि परमानंद झाला. त्यानंतर पार्टी गेम्सच्या म्होरक्याने नवीन खेळाची माहिती सांगितली. तो एखादी विवक्षित वस्तूचा पुकारा करेल, आणि मुलांनी ती वस्तू आणायचा प्रयत्न करायचा. अशा आठ-दहा वस्तूंची नावे सांगितल्यावर सर्वाधिक वस्तू आणणाऱ्या मुलाला बक्षीस मिळेल, असा खेळाच्या संकल्पनेचा गोषवारा होता.

म्होरक्याने एकामागोमाग एक दहा वस्तूंची घोषणा केली: दहा रुपयाचे नाणे, हातरुमाल, रेल्वे पास, क्रेडिट कार्ड, की-चेन, हॅन्ड सॅनिटायझर, टिश्यू पेपर, कोणतेही आयकार्ड, पाण्याची बाटली, आणि बिस्किटाचा पुडा. या सर्व वस्तू कोणतेच मूल आणू शकले नाही. त्यामुळे सहा वस्तू आणणाऱ्या मुलीला बक्षीस देण्यात आले.

सिंधुआज्जी पार्टीवरून परत आल्या पण त्यांचे विचारचक्र सुरू झाले होते.

लवकरच त्यांना दुसऱ्या एका पार्टीला जाण्याचा योग्य आला. तेथे पोचल्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या मुलाचे अभिष्टचिंतन करून त्यांनी तात्काळ पार्टी गेम्सच्या म्होरक्याकडे मोर्चा वळवला, आणि वस्तू गोळा करण्याचा खेळ असल्याची खातरजमा केली. नंतर एका अकरा-बारा वर्षांच्या मुलीबरोबर गहन चर्चा करण्यात त्या गढून गेल्या.

काही काळानंतर पार्टी गेम्सच्या म्होरक्याने वस्तू गोळा करण्याच्या खेळाची घोषणा केली. सिंधुआज्जी आणि अकरा-बारा वर्षांची मुलगी यांनी एकमेकांना फिस्ट-बम्प केले.

पा. गे. म्हो. म्हणाला, "निळा हातरुमाल!"

सिंधुआज्जींनी आपल्या बॉम्बार्डियर जॅकेटवर घातलेल्या ट्रेंचकोटची बटणे उघडली. आतल्या अस्तराला बरेचसे खिसे शिवले होते. त्यातील एका खिशात गुलाबी, पोपटी, निळे, पांढरे, सप्तरंगी असे अनेकविध रंगांचे हातरुमाल होते. त्यातील निळा हातरुमाल त्यांनी चपळाईने त्या मुलीला दिला आणि तिने धावत जाऊन तो हातरुमाल पा. गे. म्हो. कडे सुपूर्द केला.

पा. गे. म्हो. ने आवंढा गिळला आणि पुढील घोषणा केली, "रेल्वे पास!"

सिंधुआज्जींनी विजयी मुद्रेने दुसऱ्या एका खिशातून पश्चिम आणि मध्य रेल्वेचे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचे मासिक आणि त्रैमासिक पास काढले आणि आपल्या बालमैत्रिणीकडे दिले. तिनेही विजयी मुद्रेने ते पास पा. गे. म्हो. कडे दिले.

अशाच रीतीने सिंधुआज्जींनी सर्व वस्तू दिल्या व त्यांच्या बालमैत्रिणीने दहापैकी दहा गुण मिळवून पारितोषिक प्राप्त केले. जे काही पारितोषिक मिळेल ते प्रत्येकी सहा-सहा महिने वापरायचे असा तिचा व सिंधुआज्जींचा करार झाला होताच.

आपल्या वस्तू ताब्यात घेऊन सिंधुआज्जी गाणे गुणगुणत घरी गेल्या. असाच प्रकार इतर दोन पार्टींना झाला, आणि सिंधुआज्जींना वाढदिवसाच्या पार्ट्यांची निमंत्रणे मिळणे बंद झाले.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सिंधुआज्जींनी विजयी मुद्रेने दुसऱ्या एका खिशातून पश्चिम आणि मध्य रेल्वेचे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाचे मासिक आणि त्रैमासिक पास काढले

सिंधुआज्जी मुंबईत राहतायत ते बरंय, नाही तर पुण्यात पीएमटीचा पास शोधायचा म्हणजे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जे काही पारितोषिक मिळेल ते प्रत्येकी सहा-सहा महिने वापरायचे असा तिचा व सिंधुआज्जींचा करार झाला होताच.

असली पारितोषिके टिपिकली गेला बाजार सहा महिने तरी टिकतात काय?

'प्रत्येकी सहा-सहा महिने' बोले तो, त्या मुलीची पाळी (ॲज़ इन, टर्न) अगोदर असेल, तर सिंधुआज्जी गॉट अ रॉ डील. उलटपक्षी, सिंधुआज्जींची पाळी अगोदर असेल, तर त्यांनी त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला फसविले. (शोभत नाही त्यांना!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकंदरीत सिंधुआज्जींचा ट्रेंचकोट हा गा.च्या गां.ला कॉम्पिटीशन आहे म्हणायचा. काय वाट्टेल ते घ्या, तेथे हमखास सापडतेच! (कारण कोणी ना कोणी - येथे बहुधा खुद्द सिंधुआज्जींनीच - कधी ना कधी तेथे ते धाडलेलेच असते.)

बाकी, वाढदिवसाच्या पार्टीला ट्रेंचकोट घालून सिंधुआज्जींना उकडत नसेल? आधीच त्या केकवरच्या मेणबत्त्यांची उष्णता असताना...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अचाट आणि अतर्क्य आहे! Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता सिंधुआज्जींना एखाद्या ड्रिंक्स पार्टीला बोलवा म्हणजे त्यांनी पहिला घोट घेतल्यावर सुधाकराच्या आत्म्याला मुक्ति मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

छान

रेल्वेचाच काय, म्युन्सीपालिटीचा पास आणा म्हटलं तरी सिंधुआज्जी दहा पास ताबडतोब आणून हजर करतील. त्यांना काय अशक्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0