सेन्साॅरिंग

"त्या यांच्या पुस्तकावर टीका झाली होती. तसं परत व्हायला नको म्हणून आपण एक्स्पर्टला ड्राफ्ट वाचायला सांगितलाय."
"कोण एक्स्पर्ट?"
"ते अमुक देशाच्या सैन्यात पत्रांचं सेन्साॅरिंग करायचे. काही आक्षेपार्ह मजकूर असेल तर लगेच सांगतात."
"बरं."

-------------------------------

"तुमचा ड्राफ्ट वाचला. गोष्ट चांगली आहे पण बऱ्याच सुधारणा कराव्या लागतील."
"म्हणजे?"
"तुमचा पहिलाच परिच्छेद बघा -

सतीशने दाढी करताना आरशात पाहिले. अस्वलाने केलेल्या हल्ल्याच्या खुणा त्याच्या उजव्या खांद्यावर अजूनही दिसत होत्या. ती आठवण झटकून टाकत त्याने तोंड धुतले. त्याने झोमॅटोवरून डोसा मागवला आणि डोशाची वाट बघताना पटकन दोन कप चहा टाकला."

"बरं. यात काय प्राॅब्लेम आहे?"
"ब्रॅन्डचा उल्लेख हा सर्वात मोठा प्राॅब्लेम. चक्क झोमॅटोचं नाव लिहिलंय तुम्ही!"
"पण काही वावगं लिहिलं नाहीये त्यांच्याबद्दल."
"आता तुमची कादंबरी वाचून कोणी झोमॅटोवर ऑर्डर केलं आणि त्यांना वाईट अनुभव आला, तर तुमच्यावर खटला भरतील - झोमॅटोचा ग्राहक व्हायला उद्युक्त केल्याबद्दल."
"आणि चांगला अनुभव आला तर?"
"तर स्विगी तुमच्याविरूद्ध कॅम्पेन चालवेल - त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची सरोगेट मार्केटिंग केली म्हणून."
"बरं, अजून काही?"
"चहाचा उल्लेख केलायत तुम्ही."
"अहो चहाचा तर ब्रॅन्डसुद्धा नमूद केला नाहीये!"
"पण काॅफी बोर्डाची एनओसी घेतलीयेत का? आणि चहाचे दुष्परिणाम नसतात असं आयएमएचं सर्टिफिकेट?"
"नाही बुवा."
"आणि ते अस्वलाचं काय? तुमच्या लेखनामुळे कोणा वाचकाच्या मनात वन्यजीवांविषयी घृणा निर्माण झाली आणि त्याने एखादी खार वगैरे मारली तर त्या गुन्ह्याच्या अबेटमेंटसाठी तुम्हीही कारावासात जाल मिस्टर!"
"अजून काही?"
"दाढी करताना इजा होऊ शकते ही धोक्याची सूचना नाही. आरसा फुटून इजा होऊ शकता याचे सूतोवाचही नाही. आणि सतीश नावाच्या व्यक्तींच्या संस्थेने त्या नावाची व्यक्ती अस्वलाकडून हल्ला करून घेण्याएवढी हलगर्जी असल्याचं तुम्ही सूचित करताय असा खटला भरला तर?"
"सतीश नावाच्या व्यक्तींची संस्था आहे??"
"उद्या कोणी स्थापन केली तर?"
"."

==================================

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

संदर्भ कळला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-वाम‌न‌ देश‌मुख‌

"दाढी करताना इजा होऊ शकते ही धोक्याची सूचना नाही. आरसा फुटून इजा होऊ शकता याचे सूतोवाचही नाही. आणि सतीश नावाच्या व्यक्तींच्या संस्थेने त्या नावाची व्यक्ती अस्वलाकडून हल्ला करून घेण्याएवढी हलगर्जी असल्याचं तुम्ही सूचित करताय असा खटला भरला तर?"

मुळात अस्वलांची एखादी संस्था अस्वलांची बदनामी केल्याबद्दल आक्षेप घेणार नाही, हे गृहीत धरल्याबद्दल वैषम्य वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉलिंग अस्वल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(च्यायच्चं सॉफ्टवेअर! प्रतिसाद दोनदा आला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.