बाकी - A Memorable Volume

माणूस आठवणीत खूप रमतो असं म्हणतात आणि त्याच संदर्भातली 'बाकी' नावाची ही independent film.
हारुकी मुराकामीच्या quote पासून सुरू झालेली फिल्म हा एक मुकपट आहे.
सुरुवातीलाच आपल्याला त्यातली नायिका दिसते आणि ऐकू येतात ते वेगवेगळे आवाज, त्यात शाब्दिक संवाद नाहीयेत तर आहे ते फक्त कॅमेरामधून केलेलं चित्रण. तिच्या डायरीतून, काळ्या - पांढऱ्या फोटोमधून तिला तिची भूतकाळाची चावी मिळाली आहे.
आणि त्या चाळीत जाताना तिचं पाऊल थबकलंय. तिथे आत गेल्यावर ती चाळ आणि तिचा भूतकाळ दोघांच्या आत शिरलीये. बॅकग्राऊंडला असलेल्या प्रत्येक आवाजाबरोबर तिची भावावस्था बदलतेय.
तिथे सगळं आहे, रंग उडालेल्या भिंती, तिच्या भूतकाळाचे अवशेष आणि त्यातले आवाजपण. वर गेल्यावर चालत असताना तिथे तिला आणि आपल्याला वेगवेगळे witness दिसतात गतकाळाचे. गंजलेलं कुलूप त्या चावीने उघडून आपणही आत जातो तिच्याबरोबर.
चाळीतल्या त्या खोलीत आल्यावर तिला तिचं जुनं असणं परत भेटलंय कारण तिथे ती एकदम स्तब्ध होते आणि मग असतं ते तिचं डोळे मिटून त्या खोलीतल्या आठवणींशी, श्वासांशी, गात्रांशी एक होणं.
संपूर्ण film मध्ये अनेक रूपकं आहेत अगदी पापुद्रा पडलेल्या भिंतीपासून ते बंद असलेली खिडकी उघडण्यापर्यंत. त्या प्रत्येक वस्तुपाशी ती थांबतेय त्यांचा फील घेत आणि अनेक क्षणी screen वर घडणाऱ्या गोष्टींशी आपण relate करत गुंतत जातोय.
असं भूतकाळात गुंतत असतानाच तिला तिची अजून एक आठवण सापडलीये जी बंद आहे आणि म्हणूनच तशीच दिसतेय .
नायिकेला तिच्या विचारांमध्ये असताना तिचं बालपण आठवतंय , त्यात ती रमलीये आणि भावनिक सुद्धा झालीये अगदी ठिबकणाऱ्या पाण्यात, प्रकाशाच्या चौकटीत आणि जुन्या गजांमध्येही.
इतका वेळ इथे घालवून शेवटी दिवा लावताना ती ओथंबून जाते आणि नंतर दार लावूनही समोर शून्य नजरेने बघत ते पुन्हा उघडून तिचं भूतकाळातलं काहीतरी मागे राहिलेलं तिला गवसतं...
या सगळ्यात काहीकाही shots इतके सुंदर घेतलेत की सानिध्य शेट्ये याचं खूप कौतुक आणि sound डिपार्टमेंट जे खरंतर या फिल्मचा soul म्हटलं पाहिजे ते यश, अरुण आणि सिद्धार्थ, ही माणसं कमाल आहेत.
ज्ञानेश्वरी वेलणकर या मुलीचं यातलं काम इतकं अप्रतिम झालंय की काहीही संवाद नसताना फक्त expressions आणि तिच्या body language मधून ती व्यक्त झालीये. चिंतामणी अहिरे ज्याने ह्या फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय त्याला बॅकग्राऊंडला असणारे आवाज, visuals आणि रुपकांमधून गोष्ट मांडण्याचं इतकं सुरेख काम केल्याबद्दल खूप धन्यवाद !
मुळात Remnants म्हणजे अवशेष पण काहीतरी मागे राहिलेलं, उरलेलं आणि ठेवलेलं असं काहीतरी ... बाकी... हे अगदी समर्पक शीर्षक आहे.
Silent film असली तरी त्यातली नेमकी रूपकं समजली तर एक वेगळाच nonverbal असूनही verbal असा अनुभव घेता येईल आणि गतकाळाच्या क्षणांत डुंबता येईल.
अगदी दगडांपासून ते सायंकाळच्या दिव्यापर्यंत बोलकी असणारी प्रत्येक फ्रेम ही पडद्यावर घडणाऱ्या गोष्टी हा आठवणींचा कोलाज एक जिवंत अनुभव देईल हे नक्की!
#NotAReview #remnants
Link to watch the film : https://www.moviesaints.com/movie/baki

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet