रहस्य कशात असतं?

अाज एक अनपेक्षित अनुभव अाला. टेलिव्हिजनवर मी टेनिस मॅचेस अनेकदा बघतो. २२ एप्रिलला मोनॅकोमध्ये दुपारी दोन वाजता Monte-Carlo Rolex Masters या स्पर्धेची final match राफाएल नदाल अाणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यामध्ये होती. मोनॅको इथल्या (म्हणजे विनिपेगच्या) सात तास पुढे असल्यामुळे मॅच सकाळी होऊन गेली, पण ती तेव्हा इथे टेलिव्हिजनवर live दाखवलेली नव्हती. पण त्याच मॅचचं रॅकॉर्डिंग इथल्या संध्याकाळी सात वाजता टेलिव्हिजनवर दाखवणार होते, ते मी पाहिलं.

मॅचचा निकाल इंटरनेटवर अाधी बघायचा नाही असं मी ठरवलेलं होतं, त्यामुळे प्रत्यक्ष मॅच पाहताना पुढे काय होतं ते मला माहित नव्हतं. पण तरीदेखील केवळ 'मॅच अाधीच होऊन गेलेली अाहे' हे मला माहित असल्यामुळे, ती बघताना कमी मजा अाली अाणि निर्णयाबद्दल उत्सुकता कमी झाली असं मला वाटलं.

रहस्यकथा वाचताना किंवा रहस्य असलेले सिनेमे बघताना असं कधी वाटत नाही. तेव्हाही 'जे काही व्हायचं ते होऊन गेलेलं अाहे' हे बौद्धिक पातळीवर माहित असतंच. पण तरीही त्यामुळे मनोरंजनात मिठाचा खडा पडतो, असं वाटत नाही.

या दोन्ही अनुभवांत का फरक असावा? हा 'वास्तवात घडणारी घटना' अाणि 'fiction मध्ये घडणारी घटना' यातला फरक अाहे असं कदाचित काहीजण म्हणतील. पण या फरकाला काय महत्त्व अाहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

मला वाटतं आपल्याला आस्वाद नेमका कशाचा घ्यायचा आहे यावरून अनुभवांत फरक पडतो. म्हणजे रहस्यकथा वाचताना किंवा रहस्यपूर्ण चित्रपट पाहताना कथा कशी खुलवली आहे हे पाहण्यात रस असेल तर आपण मुळात शेवट आधी वाचत नाही. पण टेनिस मॅच पाहताना कोण कधी, किती आणि कसं चांगलं खेळलं यापेक्षा 'कोण जिंकलं' हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो म्हणून फरक पडतो का? कथा/चित्रपट हे काल्पनिक असतात पण टेनिस मॅच मात्र तुलनेने वास्तवात असते (तुलनेने यासाठी की तीही थेट आपल्या आयुष्यातली गोष्ट नसतेच!) - म्हणून फरक पडतो का? कधी विचार केला नव्हता मीही यावर. आता करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोष्ट ही (सुरुवात-मध्य-शेवट या) क्रमानं सलग वाचण्याची रीत असते, पण मॅच ही अखेर एक निकाली घटना असते. एकदा तिचा निकाल जाहीर झाला की कोण जिंकलं/हरलं ही बातमी जगजाहीर होते. एकदा ती तशी सार्वजनिक झाल्यानंतर ती माहीत करून घेणं (रस असेल तर, अर्थात) हीच रीत ठरते; त्याउलट मनाला आवर घालून ती तशी (सार्वजनिक) झालेली नाहीच असं मनाला सांगणं ही एक प्रकारची आपल्या मनाची फसवणूक म्हणता येईल. याउलट गोष्ट वाचताना मध्येच शेवटचं पान वाचून रहस्य काय आहे हे माहीत करून घेणं ही मनाची फसवणूक म्हणता येईल. थोडक्यात काय, तर कोणती रीत मेंदूला योग्य वाटते त्यावर कोणती गोष्ट मेंदूची फसवणूक करणारी ठरते हे तुमच्या मेंदूत आधी ठरलेलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अतिवास आणि चिंतातुर जंतू दोहोंच्या प्रतिसादास सहमत.

रहस्यकथा/चित्रपट अनुभवताना त्यातिल रहस्याच्या प्रवासाची मजा वाचक/प्रेक्षक अनुभवतो, पण "काही" गोष्टींचा निर्णय त्यातिल प्रवासापेक्षा अधिक महत्वाच्या असल्याने निर्णय लागला असेल तर मजा कमी होऊ शकते, अर्थात बर्‍याचाजणांनां क्रिकेट मॅचच्या रिझल्टएवढेच सचिनच्या फटक्यांचे महत्व वाटते, त्यामुळे मॅच बघितलेले अनेक लोक हायलाईट्स देखील तितक्याच आनंदाने पहातात, हा आनंद अनुभवण्याचा प्रकार सापेक्ष असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणता तो टेनिसचा सामना मी पाहिलेला नाही, त्यामुळे नक्की कारण सांगता येणार नाही परंतु सामना किती अटीतटीचा आहे त्यावर त्याच्या निकालाची उत्सुकता अवलंबून असते असं मला वाटतं. जर सामना अगदीच एकतर्फी असेल तर निकाल आधी ठाऊक नसला तरी त्याचा अंदाज येतो आणि उत्सुकता संपते. याउलट निकाल आधीच ठाऊक असला तरी सामना अगदीच चुरशीचा असेल तर आपल्या मनात खळबळ माजते. माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट व्हावा याकरिता एक उदाहरण देतो.

मन्सूर हुसैन खान चा जो जीता वही सिकंदर हा चित्रपट मी १९९२ मध्ये चित्रपटगृहात पाहिला होता. शेवटची सायकलशर्यत अतिशय थरारक दाखवली आहे. शर्यत अगदी शेवटाकडे आली असता शेखर (दीपक तिजोरी) गियर बदलून संजय (अमिर खान) च्या पुढे जातो. ते पाहून संजयचे वडील (कुलभूषण खरबंदा) मान फिरवतात. संजय हरणार असे आपल्याला वाटते तितक्यात तो पूर्ण बळानिशी पायडल फिरवुन शेखरच्या पुढे जातो आणि सामना जिंकतो.

पुन्हा हा चित्रपट मी १९९३ साली चित्रपटगृहात पाहिला (माझ्या उभ्या आयुष्यात एकच चित्रपट दोन वेळा चित्रपटगृहात पाहिला जाण्याचं हे एकमेव उदाहरण आहे). आता मला शेवट ठाऊक होता तरी शेवटच्या दृश्यात कुलभूषण खरबंदा निराशेने मान फिरवितात त्याक्षणी असं वाटून गेलं की संजय सामना हरणार बहुदा. पुन्हा बर्‍याच वर्षांनी हा चित्रपट तबकडीवर पाहिला तेव्हाही असंच वाटून गेलं. शर्यत ज्या अटीतटीने रंगविली आहे त्या दिग्दर्शकीय कौशल्याचे हे यश आहे.

गाईड चित्रपट तर मी आठ वेळा पाहिलाय. प्रत्येक वेळी असंच वाटून जातं की यावेळी तरी शेवटी राजू गाईड मरणार नाही. असंच काहीसं तीन वेळा पाहिलेल्या गझिनी चित्रपटाविषयी वाटून जातं. त्याचा शेवट नाही तर मध्य अतिशय रहस्यमय वाटतो. कल्पना (असिन) मरणार नाही असं प्रकर्षानं वाटत राहतं आणि दरेकवेळी ती मरतेच.

निकाल ठाऊक असूनही रहस्य कायम राहिल्याची अशी अनेक उदाहरणं देता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

हा हा हा.

आजतरी गाडी लेट होईल म्हणून रोज सिनेमा पाहणार्‍याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जरा सविस्तर सांगु शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

लगान बघताना प्रत्येक वेळी काय होणार माहीत असूनही कंटाळा येत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आतिवास आणि जंतूचे प्रतिसाद पटले. मला चांगलं टेनिस बघायला आवडतं. नादाल आणि जोकोविच हे तुल्यबळ खेळाडू (मला वाटतात). पण दोघांच्या खेळांपैकी (मला) जोकोविचचा गेम अधिक सुंदर वाटतो. त्यामुळे मॅचचा शेवटचा निकाल काहीही असला तरी सुंदर खेळ बघायला मला आवडतो. याउलट एखाद दिवशी जोकोविच, फेडरर (हे माझे आवडते हे खेळाडू) खराब खेळून जिंकले तरीही बघताना मजा येत नाही.

तसंच रहस्यपटाचं रहस्य माहित असेल आणि चित्रपट सुंदर असेल तर तो ही पुन्हा पहाताना मजाच येते. किंबहुना एकदा रहस्य समजलेलं असलं की चित्रपटाचा इतर भाग किती चांगला आहे याची चिकीत्सा सुरू होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जेव्हा मी हा धागा सुरू केला, तेव्हा माझ्या मनात काही निश्चित अपेक्षा नव्हत्या. पण फार विचार करायला लावणाऱ्या प्रतिक्रिया अाल्या.

या विषयावर मानसशास्त्रामध्ये पेपर लिहिता येईल असं वाटतं. उदाहरणार्थ, असा एक Controlled Experiment करता येईल: 'अ विरुद्ध ब' अशा एका सामन्याचं रेकॉर्डिंग घेऊन ते वेगवेगळ्या चार गटांना दाखवता येईल. ते दाखवण्याअाधी,
गट १ ला सामन्याचा खरा निकाल सांगायचा.
गट २ ला सामन्याचा खोटा निकाल सांगायचा.
गट ३ ला निकाल सांगायचा नाही, पण सामना होऊन गेलेला अाहे असं सांगायचं.
गट ४ ला सामना live चालू अाहे अशी थाप मारायची.

चारी गटांना रेकॉर्डिंग दाखवण्याच्या अाधी, ते चालू असताना, अाणि नंतर questionnaires देऊन त्यांची उत्तरं ताडून पाहता येतील. मला वाटतं की कुणी जर असा प्रयोग काळजीपूर्वक केला तर बरंच काही शिकायला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

आणखी एक प्रयोग म्हणजे एका गटाला सामना पहायला द्यायचा, दुस-या गटाला रहस्यकथा वाचायला द्यायची आणि तिस-या गटाला रहस्यपट अथवा ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट पाहायला द्यायचा आणि त्यांची आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेची नोंद घ्यायची/ त्यात पुन्हा प्रत्येक गटात वेगवेगळे उपगटांना वेगवेगळे पर्याय समोर ठेवून (तुम्ही टेनिसच्या सामन्याबाबत सुचवले आहेत त्या धर्तीचे) वेगवेगळे प्रयोग करता येतील. वय, शिक्षण, आर्थिक स्तर .. अशा घटकांमुळे फरक पडतो का असेही पाहता येईल.

कोणीतरी कदाचित केलाही असेल असा अभ्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0