सौंदर्याची नवी विशेषणे

सौंदर्याची विशेषणे

काळ जसजसा पुढे पुढे सरकत असतो तसतसा समाज उद्योग, क्रीडा, वागणूक अशा अनेक क्षेत्रात बदलत जातो. भाषेच्या पातळीवरही समाज बदलतो. सौंदर्याच्या व दमदारपणाच्या गुणवर्णनाकरता छान, सुंदर, अप्रतिम, विलोभनीय, देखणा, ललित, रमणीय, मनोहर, मनोरम, रम्य, सुरेख हे आपल्या मराठी भाषेतील पारंपरिक शब्द आहेत. ही विशेषणे अतिशय समर्थ आहेत. तरीही, समाज नवनवीन शब्द व विशेषणे वापरायला घेतो. नवीन विशेषणे प्रामुख्याने तरूण पिढी भाषेत आणत असते आणि तिथून उर्वरीत वयोगटांत शब्द पसरत जातात. अर्थात, हे शब्द केवळ तोंडी संवादात असतात. लिखित मराठीत संपादक अशा शब्दांना फारसे स्थान देत नाहीत. प्रांताप्रांतानुसार, या नव्या शब्दांमध्ये फरकही पडत जातो.
सत्तरच्या दशकात धर्मेंदला पाहून मुली तो किती 'कंडा' आहे”, असे म्हणायच्या. अर्थात, कंडा म्हणजे पारंपरीक भाषेत छान. हे मी गेल्याच्या गेल्या पिढीकडून ऐकलेले आहे. हा शब्द तेव्हा आईवडिलांसमोर उच्चारला जात नसे. ऐंशीच्या दशकात ''चिकणा'' किंवा ''चिकणी'' हे शब्दही वडीलधा-यांसमोर उच्चारले जात नसत. केवळ कॉलेजला जाणारी प्रेमाच्या क्षेत्रातील होतकरू मंडळी आपापसातच या शब्दांचा उच्चार करत असत. वडीलधा-यांसमोर असे शब्द उच्चारणे पाप असे. ''सही'' हा शब्द सौंदर्यपूजक बनला. पूर्वी सही म्हणजे फक्त स्वाक्षरी असे. सुंदर तरुणीला सही आहे असे म्हटले जाऊ लागले. चित्र छान असले तरी सही चित्र काढले असे ऐकले. उर्दूमुळे ''कातिल'' शब्द माहीत होता. हुस्न, अदा, निगाहें इत्यादींसाठी कातिल हमखास. माझा एक मित्र सुंदर दिसणा-या तरूणीला ''केवळ'' असे म्हणे. हा शब्द तो का वापरीत असे, हे केवळ त्यालाच माहीत असे. एखाद्याचा विनोद खूप छान झाला असे म्हणायचे असले तरी ''एक नंबर'' असे खूपदा ऐकू येऊ लागले. इथेही एक या मराठी शब्दाशेजारी नंबर हा इंग्रजी शब्द आला. विनोदाव्यतिरिक्तही काहीही छान असले तरी त्याला एक नंबर असे विशेषण मिळाले आहे. ''जबरा'' व ''जबरी'' हेही शब्द छान गोष्ट दाखवण्याकरता वापरलेले आहेत. नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आले व मराठीत इंग्रजी शब्दांची खूप भर पडली. जागतिकीकरणात विविध इंग्रजी वाहिन्या आल्यामुळे इंग्रजी भाषेचा डौल भारतीय लोकांना समजला. विविध विशेषणे कळली. ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर अशा दिग्गज फलंदाजांचा काळ हा जागतिकीकरणानंतरचाच आहे. त्यांच्या फलंदाजीची समीक्षा ज्याने सतत ऐकली असेल त्याला ''गॉर्जिअस'' व ''स्पेक्टाक्युलर'' ही विशेषणे माहीत असतात. भव्य व प्रेक्षणीय या अर्थाचे हे शब्द आहेत. भव्यतेत सौंदर्य दाखवायचे असेल तर गॉर्जिअस या विशेषणाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ''अट्रॅक्टिव्ह'' व ''लव्हली'' हे शब्द फलंदाजीतच बहुतांशाने वापरलेल जातात. चांगल्या गोलंदाजीचे वर्णन करताना ''ब्युटिफूल'' शब्द येतो. ''झिंगालाला'' हा असाच एक शब्द. लाईफ बनेगी झिंगालाला असे खूपदा ऐकले आहे. त्याचप्रमाणे, ही गोष्ट फारच झिंगालाला आहे असेही ऐकलेले आहे. काहीतरी खूप मजेचे घडलेले आहे, हे दाखवण्यासाठीच या शब्दाचा वापर झालेला आहे.

- केदार पाटणकर

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

मजेशीर आहे लेख.
दिल 'गार्डन गार्डन' हो गया| - हे वाक्यही तसेच.
एखादा लेख 'कडक' असतो.
पोपट करणे
काही जोक्स अगदीच 'केशव' जोक्स असतात.
गाडी 'बुंगाट' धावते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी जुन्या काळच्या लोकांकडून एकदम 'मारू' आहे असंही ऐकलेलं आहे.
'वासूनाका'मध्ये 'पणती' शब्द आहे, 'सड्डम' किंवा 'माल' पोरींसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0