टीनेज क्रश सॉन्ग्स

आज काही गोड आणि ग्लॅमरस गाण्यांबद्दल बोलू यात म्हणजे टिनेज क्रश विषयावरती बेतलेली अगदी शुगरस्वीट गाणी. म्हणजे भर उन्हाळी दुपारी, रवाळ कलिंगडाच्या थंडगार फोडीसारखी रिफ्रेशिंग, बासुंदीतील सायीच्या लपक्यासारखी जीभेवर विरघळणारी गाणी.

'स्ट्युपिड क्युपिड' हे कॉनी फ्रान्सिसचे गाणेच घ्याना. - स्टुपिड क्युपिड हे गाणे सापडल्यानंतर मी सतत काही दिवस ते ऐकत होते. पण त्याची खुमारी काही कमी होत नव्हती. एका टीनेजर मुलीचे 'क्युपिड' बद्दलचे गोड आणि लटक्या तक्रारीचे गाणे आहे हे. हा क्युपिड कसा आहे तर खोडकर व दुष्ट आहे. याने या मुलीला प्रेमात पाडले आहे. व्हॉट अ शेम करेक्ट!! आणि आपली नायिका म्हणते आहे, मला टार्गेट करण्याच्या गुन्ह्याबद्दल खरे तर तुझे सुंदर पंखच कातरुन टाकायला हवेत ज्यायोगे ना तू उडू शकशील ना परत कोणाला तुझ्या बाणांनी विद्ध करु शकशील.

I can't do my homework and I can't think straight
I meet him every morning 'bout a half past eight (stupid Cupid)
I'm acting like a lovesick fool (stupid Cupid)
You've even got me carrying his books to school (stupid Cupid)

नायिका शाळेत जाताना रोज तिच्या क्रशला (तो ही टीनेजरच) त्याला सकाळी भेटते, आणि त्याला खूष करण्याकरता, स्वत:च्या दप्तराबरोबर, त्या मुलाचे दप्तरही वाहून नेते. शोभतं का या क्युपिडला प्रेमात असे काम करवुन घेंणे Smile रॉबिनहुडगिरी करायची असेल तर ती अन्य कोणाच्या हृदयाबरोबर का नाही करत हा क्युपिड बिचाऱ्या हिचे हृदय परस्पर त्याला देउन टाकतो हे म्हणजे आयजीच्या जीवावरती बायजी उदार झाले की नाही तुम्हीच सांगा.

अजुन एक असेच गोड , टीनेजरी गाणे म्हणजे आय विश आय न्यु व्हॉट ड्रेस टु वेअर या गाण्यातरली नायिका, कोणत्या तरी कार्यक्रमाला जाणार आहे व तिथे तो येणार आहे. भूतकाळात याने कधीतरी तिचा किस घेतलेला आहे व नंतर मैत्रीत दुरावा आला आहे. पण त्याचे लक्ष जावे म्हणुन कोण धडपड. मी कोणता ड्रेस् घालू, काय ॲक्सेसरीज मॅच करु न काय नको. त्याला काय आवडेल. हे म्हणजे ती आरशासमोर १० वेळा कपडे काढ-घाल करते आहे.

What kind of bracelet on my wrist
Which lipstick on these lips he kissed
Which shade of powder would be right?
To hide the tears that I cried each night

जॉनी वेट फॉर मी नायिका व नायक बालपणीचे मित्र आहेत. मित्र म्हणजे काय तर साडेतीन वर्षाची असल्यापासून, ही त्याचे शेपूट आहे. नायक होता ७ वर्षांचा व तो जाईल तिथे, आपल्या नायिकेलाही जायचे असायचे, तो करेल ते करायचे, त्याचेच खेळणे हवे असायचे. आणि त्याला नायिकेचे हे मध्ये मध्ये कडमडणे नको असे. पण आता ती झालीये मोठी आणि ती म्हणतेय मी पटकन मोठे व्हायचा प्रयत्न केला, आणि आता तरी तू माझ्याकडे बघ.

डम डम डीडली डम
आपली टीनेजर नायिका त्याच्या घरी अभ्यासाचे निमित्त काढून गेलेली आहे. आणि त्यांचा अभ्यास चालू आहे (?) वडीलही शेजारच्या खोलीत आहेत, कदाचित टीव्ही पहात असतील, आईची लगबग सुरू आहे. यातून काही चोरटे क्षण नायक-नायिका वेचत आहेत. स्टॉलन किसेस आर द स्वीटेस्ट म्हणतात ते काही खोटे नाही काय!!

Come on baby don't you be so shy
You know that I love you let me tell you why
You got a heart I know that it's true
I couldn't love you any more than I do

पॉल अंकाचे - ओह कॅरॉल ही असेच हार्टब्रेकचे गाणे

शुगर शुगर देखील असेच गोड , टिनेजरी कॉलेजिअन गाणे.

Honey
Ah, sugar, sugar
You are my candy girl
And you got me wanting you

नील सेडाका चे लिटल डेव्हिल

अजुन एक नील सेडाकाचेच - कॅलेन्डर गर्ल नायकाची स्वत:ची खोली आहे आणि ती त्याने बरीच पोस्टर्स लावुन सजवलेली आहे. पैकी कॅलेंडर स्प्रेड भन्नाट आहे आणि त्याची कॅलेन्डर गर्ल विषयीची फॅन्टसी या गाण्यात मस्त मांडली आहे. मजेशीर गाणे आहे.

I light the candles at your sweet sixteen
(October) Romeo and Juliet on Halloween
(November) I'll give thanks that you belong to me
(December) You're the present 'neath my Christmas tree

जिमी क्लॅनटॉन चे- व्हिनस इन ब्लु जीन्स

My Venus in blue jeans
Is everything I hoped she'd be
A teenage goddess from above
And she belongs to me....

तुम्हीदेखील पाहीली असेल कुलुप-किल्ली असलेली डायरी दुकानात मिळते. नायिकेची तशी डायरी आहे. आणि नायकाला ती हवी आहे का तर, त्यात कोण्या मुलाचे नाव ती सारखी लिहीते? आपण तिच्या खिजगणतीत तरी आहोत का? आपले नाव ती बदामात लिहीत असेल का, हे सारे सारे त्याला वाचायचे आहे. डायरी वाचणे म्हणजे तिचे मन वाचण्याचा राजमार्गच नाही का? - द डायरी

When it's late at night what is the name you write?
Oh, what I'd give if I could see
Am I the boy that you care for?
The boy who's in your diary

हॅन्डस अप गिव्ह मी युअर हार्ट -

Angel face, I love your smile
Love your ways, I like your style
What can I do to get closer to you
Don't think twice or count to ten
Don't take advice, don't ask me when
Just come my way
Simply kiss me and say

एकंदरीत हे टीनेज क्रश भलतेच गोड प्रकरण असते याबद्दल दुमत न व्हावे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet