बिती विभावरी जाग री - जयशंकर प्रसाद

एक सखी आपल्या प्राणप्रिय सखीला जागी करते आहे.
बिती विभावरी जाग री| विभावरीम्हणजे रात्र - ‘ रात्र सरली आहेआणि तू अजुन निद्राधीन ! अगं उठ आणि बघ तरी - तेजोनिधी सूर्यनारायण सप्ताश्व रथावरती स्वार होउन निघाले. ऊषारुपी वधु तारकारुपी रजत घट , आकाशाच्या तेज-गंगेमध्ये ओतु लागली आणि तुझ्या डोळ्यावरील झोप काहीउडत नाही. अशी कशी ग तू, मी केव्हाची उठवते आहे, पण तू काही जागे व्हायचेनाव घेशील तर शपथ. पक्षीसुध्दा जागे होउन किलबिल करु लागले आहेत. नव्या पालवीने तरारलेल्या तरुवेलींचे पदर वार्यावर डोलत आहेत, कळ्याफुलांच्या अंगोपांगी मधुघट भरुन ओसंडत आहेत. हे सारे सृष्टीसौंदर्य वाया चालले आहे; उठून बघ तरी.

पहाटेच चित्रमय तसेच काव्यमय वर्णन कवि जयशंकर प्रसाद यांनी केलेले आहे. ते जेव्हा पहाटेच्या लालिम्याला पाणवठ्याचीउपमा देतात तेव्हा सहजच सुधीर मोघे यांच्या ‘फिटे अंधाराचे जाळे’ कवितेतील वाहणारा प्रकाश आठवतो.

तर ‘बीती विभावरी जाग री’ याकवितेतील नायिका कशी आहे तर ती निद्रीस्त आहेच पण तिने केसांत मलय पर्वतावरून येणारा सुगंधमाळला आहे. कवितेच्या शेवटच्या कडव्यात हे वर्णन येते आणि रसिकांना उलगडा होतो की नायिका अन्य कोणी नसून, भारतमाता आहे. ही सरलेली रात्र आहे परकीय राजवटीतील पराधीनतेची. आणि ही नितांत सुंदर कविता , वेगळ्याच विलक्षण उंचीवर जाउन पोचते. कविरुपी सखी भारतमातेला जागृत करत आहे - उठ पारतंत्र्याची रात्र सरली आणि उज्वल भविष्याची पहाट उमलली आहे.

बीती विभावरी जाग री!
अम्बर पनघट में डुबो रही
तारा घट ऊषा नागरी।
.
खग कुल-कुल सा बोल रहा
किसलय का अंचल डोल रहा
लो यह लतिका भी भर ला‌ई
मधु मुकुल नवल रस गागरी।
अधरों में राग अमंद पिये
अलकों में मलयज बंद किये
तू अब तक सो‌ई है आली
आँखों में भरे विहाग री।

विलक्षण सुन्दर कविता आहे.
------------------------------------------------------------

दुसरी, भा रा तांबे यांच्या 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' कवितेची आठवण करुन देणारी बावरा अहेरीही कविता मध्यंतरी वाचनात आली. मनावरील निराशेची पुटे झाडून मनास उभारी देणाऱ्या कवितेतील शुक्राची आठवण का आली हे पुढे येइलच.

भोर का बावरा अहेरी
पहले बिछाता है आलोक की
लाल-लाल कनियाँ
पर जब खींचता है जाल को
बाँध लेता है सभी को साथः

पहटेला कोणी एक शिकारी पावले न वाजवता हळूच येतो आणि काय करतो आहे तर - जगावरती आपल्या रक्तिम किरणांचे जाळे पसरतो आहे. आणि हे जाळे तरी कसे तर सर्व प्राणीमात्र काय वस्तुदेखील या जाळ्यात एकेक करत अडकत जातात. मग त्याच्या शिकारीमध्ये ना फक्त मध्यम आकाराचे पारवेच येतात तर मोठे मोठे पक्षीदेखील अडकतात.

छोटी-छोटी चिड़ियाँ
मँझोले परेवे
बड़े-बड़े पंखी
डैनों वाले डील वाले
डौल के बैडौल
उड़ने जहाज़
कलस-तिसूल वाले मंदिर-शिखर से ले
तारघर की नाटी मोटी चिपटी गोल घुस्सों वाली
उपयोग-सुंदरी

पहील्यांदा आकाशातील वस्तू मोजता मोजता आता कवि खालती पृथ्वीवरती येतो.निव्वळ पशुपक्षीच नाही तर स्थावर जंगम, विमाने, त्रिशूळ ध्वजवाले मंदीरांचे कळस या किरणांच्या जाळ्यात हळूहळू येत जातात. गोरज मुहूर्तावरील गाईंच्या खुरांनी उडणारी धूळ, बागेमध्ये कमानाकार रचलेल्या वेलींची सिलहाउटी, कार-मोटार बसचा धुराळा, धूर सुद्धा. अर्थात धूर सूर्यप्रकाशाला अडथळा करेल असे आपल्याला वाटते पण नाही हा शिकारी त्यांचेही भक्ष्य करतो आहे, त्यांनाही आपल्या पकडीत बंदिस्त करत चालला आहे. कारखान्यांच्या धुराड्यातून उठणाऱ्या काळ्याकुट्ट धूरांच्या ढगांनाही त्याने आपल्या चपेटमध्ये घेतलेले आहे.

बेपनाह कायों कोः
गोधूली की धूल को, मोटरों के धुँए को भी
पार्क के किनारे पुष्पिताग्र कर्णिकार की आलोक-खची तन्वि
रूप-रेखा को
और दूर कचरा जलाने वाली कल की उद्दण्ड चिमनियों को, जो
धुआँ यों उगलती हैं मानो उसी मात्र से अहेरी को
हरा देगी !

आणि मग अशा काळोख्या धूराच्या वर्णनानंतर कवि म्हणतात - हे समर्थ, ताकदवान अशा शिकाऱ्या तुझ्या सद्दीपलीकडे कोणताच काळोख नाही. तुझे जाळे पोचत नाही असा कोणताही जळमटवाला कोपरा नाही असे असताना, तू ये आणि माझ्या मनातील काळोखाचे साम्राज्यदेखील तुझ्या किरणांच्या जाळ्यामध्ये ओढून घे. माझ्या मनाच्या प्रांगणात असा एकही कानाकोपरा सोडू नको जो की अंध:कारमय आहे. तुला हे सहज शक्य आहे. तुझ्या ज्योतिर्मय प्रकाश जाळ्याच्या कृतद्न्यतेने माझे मन ओसंडून भरुन वाहू देत.

बावरे अहेरी रे
कुछ भी अवध्य नहीं तुझे, सब आखेट हैः
एक बस मेरे मन-विवर में दुबकी कलौंस को
दुबकी ही छोड़ कर क्या तू चला जाएगा ?
ले, मैं खोल देता हूँ कपाट सारे
मेरे इस खँढर की शिरा-शिरा छेद के
आलोक की अनी से अपनी,
गढ़ सारा ढाह कर ढूह भर कर देः
विफल दिनों की तू कलौंस पर माँज जा
मेरी आँखे आँज जा
कि तुझे देखूँ
देखूँ और मन में कृतज्ञता उमड़ आये
पहनूँ सिरोपे-से ये कनक-तार तेरे –
बावरे अहेरी

कोणी कधी शिकाऱ्याला आमंत्रण, आवताण देते का तर नाही पण हा सृष्टीतील अनवट शिकारी - सूर्यनारायण मात्र हवाहवासा आहे, कवि त्याच्या जाळ्यात आपले तन मन गुरफटू देण्याकरता तयार आहे. हा कवितेचा परमोच्च बिंदू आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

-

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

इतका निवांतपणा फक्त मध्य प्रदेशात उरला असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद च्रट्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0