rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही फसलात का?
rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही फसलात का?
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)
RTPCR तपासणी फ्लू आणि कोविड यातील भेद ओळखू शकत नाही म्हणून CDCने ही तपासणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपल्या सर्वांची भली मोठी फसवणूक होत आहे आणि आपल्याला गुलाम बनवत आहेत अश्या अर्थाचा मेसेज WA ने तुमच्यापर्यंत पोचवला असेलच ना?
वाचला का? पटला का? किती जणांनी मूळ पत्र वाचून समजून घेतले, किती जणांनी ते पत्र खरे आहे का याची पडताळणी केली? किती जणांनी त्या पत्रातील लिंक्स उघडून अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न केला? किती जणांनी मेसेजमधील पडताळण्याजोगे मुद्दे पडताळले? किती जणांनी असे काहीच न करता विश्वास ठेवला? आणि किती जणांनी ही खोटी माहिती इतरांपर्यंत पोचवून त्यांचे जीवदेखील धोक्यात आणले? तुम्ही नक्की कोणत्या गटामध्ये आहात?
आज पोस्टमधील काही मुद्दे बघूया.
१. CDC ने असे काही पत्र जुलै मध्ये प्रसिद्ध केले आहे का?
होय. पत्राची CDCच्या वेबसाईटमधील लिंक खाली दिली आहे. पत्र मुळातून नक्की वाचा.
२. या पत्रामध्ये ही चाचणी कोविड आणि फ्लू यातील भेद ओळखू शकत नाही असे म्हटले आहे का?
असा कोणताही उल्लेख या पत्रामध्ये नाही. कारण तशी अपेक्षाच नाहीये.
प्रत्येक RTPCR तपासणीसाठी जे प्रायमर वापरले जाते, त्यावरून त्या विशिष्ट आजाराचे RNA किंवा DNA शोधता येतात.
समजा एका HIV बाधित व्यक्तीला कोविड झाला तर त्याला कोविडची RTPCR करावी लागेल. जर त्याने नेहमीप्रमाणे HIVची RTPCR केली तर फक्त HIVची बाधा सापडेल. दोन्ही आजारासाठी RTPCR तपासणी उपलब्ध आहे. हे एक तंत्रज्ञान आहे आणि आपण ज्या आजाराचे प्रायमर वापरू त्यावरून केवळ तो एकच आजार शोधता येईल.
पत्रामधील फ्लूचा उल्लेख वेगळ्या कारणासाठी आहे. अमेरिकेमध्ये हिवाळा सुरु होणार आहे आणि हा फ्लूचा सिझन असतो. अश्यावेळी एका वेळी केवळ कोविडची तपासणी करू शकणारी RTPCR करण्याऐवजी डिसेंबरनंतर एकाच sampleमध्ये एकाच वेळी कोविड आणि फ्लूचीदेखील तपासणी करू शकणारी Multiplex PCR तपासणी वापरायची असा आदेश या पत्राद्वारे देण्यात आलेला आहे. जेणेकरून निकाल कमी वेळेमध्ये मिळेल व आजारी व्यक्ती संसर्ग अधिक काळ फैलावणार नाही. असे केले नाही तर लोक आधी फ्लू आहे का तपासतील. त्याचा परिणाम नकारार्थी आला की मग कोविड आहे का तपासायला जातील. यामध्ये वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होणार आहे.
तसेच अमेरिकेमध्ये Monoclonal antibody उपलब्ध आहेत तसेच लवकरच Molnupiravir हे औषधदेखील उपलब्ध होईल. दोन्ही उपचार संसार्गानंतर लगेच करावयाचे असल्याने एकाच वेळी कोविड आणि फ्लू या दोन्ही आजाराचे निदान होणे महत्वाचे आहे.
multiplex PCRबाबत अधिक माहितीसाठी खाली लिंक दिली आहे. यामध्ये वापरले जाणारे primer हे एकाहून अधिक आजाराला लागू होणारे असते. एका वेळी ४-५ आजार ओळखणे या तंत्राने शक्य आहे. (फोटो पाहा.)
तसेच PCR (Polymerase Chain Reaction) या तंत्रज्ञानाच्या वापराने किती विविध प्रकारच्या तपासण्या होऊ शकतात याबद्दलच्या लिंक्सदेखील सोबत दिल्या आहेत. RTPCR बाबत माहितीची लिंक देखील आहे. RTPCR आणि Multiplex PCR हे एकाच तंत्रज्ञानाचे दोन प्रकार आहेत. कोणते प्रायमर वापरले यावर प्रकार ठरतो. बाकी तंत्रज्ञान अगदी सारखे आहे. (त्याचीही लिंक दिली आहे)
३. RTPCR चे जनक डॉ. कॅरि म्युलीस यांनी rtPCR विषाणू शोधण्यासाठी करू नये असे म्हटले आहे का?
डॉ. कॅरि म्युलीस यांनी नक्की काय सांगितले हे जाणून घ्यायचे असेल तर त्यापूर्वी एक RTPCRचे प्रकार समजून घ्यायला हवेत.
तपासणीसाठी sample प्रयोगशाळेमध्ये आल्यानंतर प्रथम RT म्हणजे reverse transcriptase वापरून RNA पासून DNA तयार केला जातो.
(Reverse अश्यासाठी की निसर्गामध्ये DNA पासून RNA बनतो पण जसे RNA विषाणू स्वतःच्या प्रती बनवण्यासाठी आधी RT वापरून DNA मध्ये रूपांतरित होतात त्याप्रमाणे प्रयोगशाळेमध्येही RT वापरून DNA बनवला जातो.)
जर sampleमध्ये RNA नसेल तर DNA बनणारच नाही. आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? म्हणून RTPCR तपासणीला Gold Standard (मानक) समजले जाते. RAT तपासणी negative असेल आणि लक्षणे असतील तर RTPCR करून पुन्हा खात्री केली जाते. ही तपासणी false positive येण्याची शक्यता नगण्य असते. मात्र जर sample व्यवस्थित घेतले नसेल, व्यवस्थित साठवले नसेल, लक्षणे सुरु झाल्यानंतर खूप उशिरा घेतले असेल, किंवा नवे म्युटेशन असेल तर अश्या वेळी false negative मात्र येऊ शकते.
RT वापरून तयार झालेल्या DNA सोबत हव्या त्या आजाराचे प्रायमर मिसळून DNAच्या प्रतींची संख्या वाढवली जाते. १ DNA सापडणार नाही मात्र जर १०० / १००० DNA झाले की मशीनवर नोंद होते. वरचा तक्ता एका DNAपासून प्रत्येक सायकलमध्ये DNAची संख्या कशी वाढते हे दर्शवतो. जेवढे सायकल मशिनच्या नोंद घेण्याच्या क्षमतेपर्यंत (Detection threshold) पोचण्यासाठी लागले त्याला आपण Ct value असे म्हणतो. प्रत्येक कंपनीच्या कीटची / मशीनची नोंद घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. एक मिली sampleमध्ये किती विषाणू असल्यास अमेरिकेमध्ये विविध तपासण्या टेस्ट positive report देऊ शकतात (Detection threshold) याविषयीदेखील माहिती CDCच्या साईटवर उपलब्ध आहे.
Qualitative RTPCR ही तपासणी फक्त विषाणू सापडला की नाही असा निकाल देते. विषाणू किती आहे यावर काहीही भाष्य करीत नाही. मात्र Quantitative RTPCR (जशी HIVमध्ये केली जाते) ही तपासणी sampleमध्ये विषाणूंची संख्या किती आहे हे मोजून सांगते.
डॉ. कॅरि म्युलीस यांचे संदर्भित वाक्य HIVच्या Quantitative RTPCR या तपासणीस अनुसरून आहे.
मूळ वाक्य खालील प्रमाणे आहे.
PCR is intended to identify substances qualitatively, but by its very nature is unsuited for estimating numbers. Although there is a common misimpression that the viral load tests actually count the number of viruses in the blood, these tests cannot detect free, infectious viruses at all; they can only detect proteins that are believed, in some cases wrongly, to be unique to HIV. The tests can detect genetic sequences of viruses, but not viruses themselves.
यांचे म्हणणे आहे की *या तपासणीमध्ये विषाणू जिवंत आहे कि मृत किंवा हा विषाणू आहे क त्यातील फक्त जनुकीय भाग यातील फरक समजत नसल्याने या तपासणीचा वापर करून विषाणूंच्या संख्येचा अंदाज करणे चुकीचे ठरेल. ही तपासणी विषाणू “मोजण्यासाठी” नाही केवळ विषाणू आहे का “ओळखण्यासाठी” आहे.
(fact checkची लिंकदेखील खाली दिली आहे.)
आणि हे तर आपण जाणतोच - २०२०मध्ये १४ दिवसांनंतर rtPCR negative झाली की नाही याची खात्री करून डिस्चार्ज दिला जायचा. मात्र बऱ्याच वेळा काही लोकांची तपासणी काही आठवडे positive यायची. कारण आजार बरा झाला तरी मृत विषाणू शरीरामध्ये शिल्लक असतील तरीही ही तपासणी positive रिपोर्ट द्यायची. कारण आपण वापरतो ती तपासणी फक्त विषाणू ओळखणारी आहे - Qualitative RTPCR. म्हणून आता negative RTPCR मिळवणे बंधनकारक नाहीये.
swab मध्ये करोनाचा RNA नसेल तर टेस्ट खोट्या रीतीने positive येऊ शकत नाही. ही अतिशय विश्वासू टेस्ट आहे आणि योग्य प्रायमर असेल तर कोणत्याही विषाणूमुळे होणाऱ्या आजाराच्या निदानासाठी वापरली जाऊ शकते.
समजा तुम्हाला एक पिवळा धातू सापडला. तो धातू म्हणजे सोने आहे का साध्या पद्धतींनी पण शोधले जाते. पण याची अगदी खात्रीशीर तपासणी म्हणजे त्या धातूचा अणु नक्की कसा आहे त्यातील केंद्रामधील विविध कणांची संख्या शोधणे. हा निकाल नक्कीच खात्रीचा असेल हो ना?
त्याप्रमाणे, विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्या विषाणूच्या RNAची माहिती मिळवणे व RNA आहे का व माहितीशी जुळतोय का हे तपासणे. याहून चांगला मार्ग असू शकत नाही.
४. RTPCR मध्ये करोना-१ नोंदला जात आहे की करोना-२? यात फसवणूक झाली आहे का?
RNAची जनुकीय मांडणी म्हणजे एखादी नोट नाही. खोटी नोट देऊन एखाद्याची फसवणूक करता येते. पण करोना-२च्या RNAमध्ये ३०,००० बेस (nucleotide रेणू ) आहेत. आणि हे कोड तपासणे मानवी शक्तीला जरी शक्य नसेल तरी कम्प्युटरला सहज शक्य आहे.
प्रत्येक म्युटेशन झाल्यानंतर त्यातील नक्की कोणता बेस बदलला आणि कितव्या नंबरचा बेस बदलला हेदेखील कम्प्युटर ओळखू शकतात. अश्या कम्प्युटर्सना जुनी करोना-१ची मांडणी दिली आहे की एखाद्या नव्या विषाणूची मांडणी आहे हे ओळखता येणार नाही असे समजणे हास्यास्पद आहे.
जेव्हा मांडणी जुन्या कोणत्याही रोगजंतूशी जुळत नाही तेव्हाच आपण नवा विषाणू आला आहे हे ओळखतो.
ही सर्व माहिती जाहीररीत्या कोणासाठीही उपलब्ध आहे. अश्या पोस्ट तयार करण्याऐवजी थोडा शास्त्रीय अभ्यास केल्यास या शंकेतील फोलपणा सहज लक्षात येईल.
WA मधील पूर्ण पोस्ट चा उद्देश भीती पसरवणे व चुकीची माहिती पसरवणे असाच आहे हे यावरून दिसून येत आहे.
इतर शास्त्रज्ञांची नावे आहेत पण पाश्चात्य जगामध्ये भलीभली माणसे anti-vaxxer असतात. त्यामुळे सर्व माहिती नेहमीच विश्वासार्ह असतेच असे नाही. ज्यांना ज्यांना तुम्ही आधीचा मेसेज पाठवला असेल त्यांना हे स्पष्टीकरणदेखील पाठवा.
लक्षणे असताना गैरसमजातून RTPCR टाळणे म्हणजे जीवाशी खेळणे आहे. गैरसमज जीव घेऊ शकतात हे या महासाथी मध्ये लक्षात आले आहे.
योग्य शास्त्रीय माहिती पसरवा. गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करू नका.
विविध लिंक्स:
CDC चे मूळ पत्र
विविध तपासण्यांबाबत FDAचे पत्र ज्यामध्ये सर्व तपासण्यांची माहिती आहे.
Multiplex PCRची माहिती
PCRचे प्रकार
RTPCRची माहिती
PCR तंत्रज्ञानाची माहिती
fact checkबाबत लिंक : Fact check: Inventor of method used to test for COVID-19 didn’t say it can’t be used in virus detection
--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ, मिरज.
#Fighting_Myths_DrPriya
पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे, ऑक्टोबर २४, २०२१
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #Fighting_myths_DrPriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.
Rt pcr
Rt pcr टेस्ट चे रिझल्ट साफ चुकीचे आलेली उदाहरणे ह्या दोन वर्षात खूप बघण्यात आली.
टेस्ट निगेटिव्ह आणि सर्व लक्षण covid ची फ्लू ची नाही..
आणि टेस्ट positive काहीच बिलकुल covid ची लक्षण नाहीत..
ह्याच्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही
सांगोवांगी
तुम्ही जे सांगत आहात, त्याला मराठीत सांगोवांगी म्हणतात. इंग्रजीत anecdotes. त्यावर antidote किंवा उतारा म्हणजे विदा नाही, त्यावर उतारा म्हणजे वैज्ञानिक आणि/किंवा कार्यकारणभावाचं आकलन. तेच या लेखात आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमची काही तरी चूक होत आहे
मान्यता प्राप्त संस्था हेच करतात स्वयं सेवी लोकांवर .प्रयोग करतात आणि निष्कर्ष काढतात
ते मान्यता प्राप्त संस्था काढतात म्हणून बरोबर असतात?
स्वयंसेवी लोकांची संख्या अशा विविध प्रयोगात अत्यंत कमी असते त्या वरून जगातील विविध वांशिक लोकांना ते निष्कर्ष बिलकुल लागू होत नाहीत.
सामान्य माणूस आपल्या भोवती प्रेमाच्या लोकांच्या केस बघून निष्कर्ष काढतो.
तो चुकीचा असतो किंवा संगोपंगी असतो.
हे तुम्ही कसं ठरवलं.
माफ करा पण ठराविक ट्रॅक नी विचार करू नका
नाही आणि थ्यँक्यू!
नाही. त्यांची पद्धत शास्त्रीय असल्याचं संबंधित संशोधकांना नेहमीच, दरेक प्रयोगात सिद्ध करावं लागतं. सुरुवातीला हे प्रयोग अगदी मोजक्या लोकांवर होतात. त्यात कुणी मरणार नाही, मरणाच्या दारात जाणार नाहीत हे सिद्ध केल्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांवर प्रयोग होतात. गेल्या शतकात हे प्रयोग मोजक्या गोऱ्या पुरुषांवर होत असत, पण आता हे प्रमाण जरा सुधारायला सुरुवात झालेली आहे.
आता कोव्हिडच्या चाचण्यांचंही हेच आहे. त्या चाचण्या विषाणूचे अवशेष आहेत का, हे तपासतात.
आपल्या भोवतीच्या, प्रेमाच्या लोकांपुरतं बघून निष्कर्ष काढणं हे सांगीवांगीचं उत्तम उदाहरण आहे. कोण कुणाचे काके-मावश्या आहेत हे न पाहता शरीरात खरोखर विषाणू आहे का नाही, याची तपासणी करणं, आणि ते इतर काही (महागड्या, पण अजिबात चुका नसणाऱ्या) पद्धतीनं पडताळून पाहणं हा शास्त्रीय प्रयोग.
रॅपिड अँटिजेन चाचण्यांत अनेकदा चुकीचे, फॉल्स निगेटिव्ह्ज येतात. त्यातून आलेले पॉझिटिव्ह मात्र विश्वासार्ह असतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
?
अधोरेखित वाक्यातील ठळक केलेला शब्द 'निगेटिव्ह्ज' असा असावयास हवा काय? म्हणजे, लागण झालेली असली तरी ती न सापडण्याची शक्यता असते, मात्र, सापडल्यास ते विश्वासार्ह असते, असे काही?
वाक्य आहे त्या स्वरूपात वाचल्यास एक तर अर्थ तरी लागत नाही, किंवा नाहीतर मग वदतो व्याघाताचे उदाहरण वाटते.
थ्यँक्यू.
बरोबर, मूळ प्रतिसादातही ते दुरुस्त करत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद अदिती मॅडम
माहिती बद्धल
पण मला आजुन पण वाटत .
लोकांच्या मताला किंमत दिली जावी
ती शास्त्रीय नसतील तर त्याची दखल घेवून योग्य रीती नी त्याचे खरे खोटे तपासावे.
त्यांच्या मताला काय किंमत द्यायची..
हा विचार नुकसान करू शकतो
पैसे देवून आपल्याला हवा तो Rtpcr रिपोर्ट दिला जातो..
हे तेव्हाच माहीत पडेल जेव्हा लोकांच्या अनुभव ला गंभीर घेतले जाईल .
आम्हाला काहीच होत नाही मग positive रिपोर्ट कसा .
ह्याचा गंभीर पने तपास होणे गरजेचे असते
तेव्हा fraud माहीत पडतात .
तंत्र अतिशय योग्य असेल पण त्याचा वापर करणारे अयोग्य असतील तर तुम्ही त्या अयोग्य लोकांची पाठ राखण करणार का?
प्रकाटाआ
प्रकाटाआ.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
.
.
जन्मजात!
मांजरी-बोके बोचकारतात त्याची गंमत वाटते. वयानं वाढलेली माणसं (विशेषतः उच्चवर्णीय, शहरी, पुरुष, वगैरे वगैरे) करतात तेव्हा ते बरं नाही दिसत.
अवांतर वाचन - प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
???
Rajesh188 हे बाकी काहीही असू शकतील, परंतु, ट्रोल असावेत, याबद्दल मी प्रचंड साशंक आहे. (अर्थात, I could be entirely, totally wrong.)
Ageism, racism, sexism, much?
('शहरी'च्या संदर्भातील शब्द आठवला नाही. असो.)
मॅन-चाईल्ड!
राजेश१८८ निरागसपणापोटी बरंच काही लिहितात याबद्दल मला खात्री आहे. उरलेल्या मॅन-चाईल्डांबद्दल बोलण्याची गरज नाही वाटत!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मॅन-चाइल्ड…
…हे आपण नक्की कोणाबद्दल लिहिलेत, हे समजू शकले नाही. माझ्याबद्दल असेल, तर अर्थातच मी ते केवळ सहर्षच नव्हे, तर साभिमान स्वीकारू इच्छितो. इतकेच नव्हे, तर ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवींचा असे’ हेदेखील वर ठेवून देऊ इच्छितो. (तसे म्हटले तर भूतकाळात कधीतरी आम्हीसुद्धा र-ला-र, झालेच तर ट-ला-टसुद्धा केलेले आहेच. होच मुळी!)
इतर कोणाबद्दल असेल, तर मात्र, कोणाचे फुकटचे वकीलपत्र घेण्यात मला अर्थातच रस नाही.
असो.
rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही
नाही.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
नाही
2019 पासून ना कधी फ्ल्यू सदृश लक्षण दिसली, ना कधी आजारी पडलो.
पण प्रवास चालू होता ओला उबर नी लॉक डाऊन मध्ये.
तेव्हा लक्षण विरहित covid असेल का असे मनात आले की.
Rt pcr टेस्ट केल्या होत्या दोन तीन वेळा.
Rt pcr बरोबर antigen टेस्ट पण करायचो क्रॉस चेकिंग साठी.
पण सर्वच वेळा निगेटिव्ह रिपोर्ट आले होते.
दहा दिवसांपुर्वी फ्लूची
दहा दिवसांपुर्वी फ्लूची लक्षणे दिसली. फॅमिली डॉक्टरांनी लांबूनच सांगितले फ्लु व कोविड सारखीच लक्षणे असतात. आरटीपीसीआर करुन घ्या. पॉझिटिव्ह आलो. मग सात दिवस आयसोलेशन व ट्रिटमेंट दुसऱ्या डॉक्टरांनी दिली. त्यांनी मात्र मला चक्क तपासले व मग औषधे दिली. आता आयसोलेशन संपले व ठीक आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com
.
.
आपण खगोलशास्त्रातील पोस्ट-डॉक
नाही
हॅ हॅ हॅ! मी सोत्ता आरटीपीसीआर केली आहे. मी सोत्ता पॉझिटिव्ह निघालो होतो. मी सोत्ता औषधे घेतली आहेत. ( डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) त्यामुळे मला स्वयंघोषित अधिकार हायेच की! हॅ हॅ हॅ
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com
.
.
ओ , न बा शेठ , तुमची माचीवरचा
ओ , न बा शेठ , तुमची माचीवरचा बुधा नावाच्या आयडी बरोबर प्रेमळ चर्चा चालते त्याने करमणूक होते इथपर्यंत ठीके.
पण मुद्दा किती ताणता ? डॉ देशपांडे वैद्यक शास्त्रात एमडी झालेल्या आहेत, त्याच्यावर टिप्पणी कशाला ?
अवांतर : खगोल शास्त्रात विद्यावाचस्पती असणाऱ्या लोकांवर तुमचा विश्वास नसेल , पण आपला आहे. उद्या केवळ खगोलशास्त्र विषयात विद्यावाचस्पती झालाय म्हणून तुम्ही ब्रायन मे बेक्कार गिटार वाजवतो म्हणणार का ? ( अति अवांतर : क्वीन ग्रुपचा लीड गिटारिस्ट ब्रायन मे आहे हे तुम्ही जाणता हे गृहीत धरतो )
तात्पर्य : किती ताणता ?
अतिअति अवांतर : बुधा साहेबांशी प्रेमळ चर्चा अशीच सुरु राहूंदेत . मजा येत आहे . ( फक्त इतरांना यात ... असो )
ठीक
तुमचे एकंदर म्हणणे मान्य.
काही नाही, अंमळ reductio ad absurdumचा माफक प्रयोग करून पाहिला, इतकेच. थेट डॉ. देशपांडे यांच्या पात्रतेबद्दल टिप्पणी करण्याचा उद्देश अर्थातच नव्हता. (तो मुद्दाही नाही, आणि डॉ. देशपांडेंच्या पात्रतेबद्दल शंका घेण्याचे काही कारण निदान मला तरी दिसत नाही. परंतु… I thought that would have been obvious. My bad!) परंतु ते काय ते तुमच्या मराठीत म्हणतात ना, अन्योक्ति की काय ते, तसल्यातला प्रकार. जाऊ द्या.
असा दावा मी केलेला नाही; सबब, ती टरफले उचलण्याचे काहीच कारण मला दृग्गोचर होत नाही. (तरीही माफक प्रयत्न करून पाहतोच. सो हेल्प मी गॉड (इफ ही एक्झिस्ट्स)!)
खगोलशास्त्रातील विद्यावाचस्पतींवर विश्वास नसण्याचा प्रश्नच नाही. त्याबद्दल (म्हणजे, त्यांच्या ख.शा.तील वि.वा. असण्याबद्दल) आदरदेखील आहे. (फार कशाला, खगोलशास्त्रातील विद्यावाचस्पतींना व्यक्तिगत पातळीवर आपला विषय सोडून इतरही विषयांचे जुजबी किंवा सखोल ज्ञान असण्याची शक्यता नाकारण्याचे काही कारणही मला दिसत नाही.)
मात्र, अमूकअमूक व्यक्ती ही ख.शा.तील वि.वा. आहे, म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे (पक्षी: इतरांना नाही), अशा प्रकारचे (दर्पोक्तियुक्त?) आर्ग्युमेंट टेनेबल वाटत नाही. (त्यातही, संबंधित व्यक्ती खगोलशास्त्राव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलत असेल, तर या आर्ग्युमेंटातील अॅब्सर्डत्व अधिकच उठून दिसू लागते. पुन्हा, टू मेक इट अॅब्सोल्यूटली क्लियर: ख.शा.तील वि.वां.ना इतर विषयांत गती अथवा सखोल ज्ञानसुद्धा असूच शकत नाही – आणि/किंवा इतर विषयांतील त्यांचे प्रतिपादन हे ग्राह्य असूच शकत नाही – असे काहीही येथे मी म्हणत नाही.)
आणि, असे आर्ग्युमेंट जर मानले, तर मग त्याच टोकनाने, डॉ. देशपांडे या भले वैद्यकशास्त्रातील एम.डी. असतीलही, परंतु त्या ख.शा.तील वि.वा. नाहीयेत ना? मग त्यांना या (त्यांच्याच!) विषयात (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोठल्याही विषयात) बोलण्याचा तरी काय अधिकार आहे, असे काहीबाही, ॲब्सर्ड (आणि कदाचित काहीसे इल्लॉजिकल) प्रश्न भेडसावू लागतात. (इल्लॉजिकल अशाकरिता, की एखादे प्रेमाइस जरी ग्राह्य मानले – इथे मुदलात त्या प्रेमाइसच्या ग्राह्यतेवरच आम्हांस संदेह आहे, ही बाब अलाहिदा! – तरी त्या प्रेमाइसचा व्यत्याससुद्धा सत्य असतोच, असे नाही. मात्र, हाच दोष बहुधा मूळ आर्ग्युमेंटासदेखील लागू व्हावा. पक्षी: एखादी व्यक्ती उच्चविद्याविभूषित आहे, म्हणून तीस बोलण्याचा अधिकार आहे, हे जरी ग्राह्य मानले (फॉर द रेकॉर्ड: हे मी मानतोच, असा माझा दावा नाही.), तरीसुद्धा, व्यत्यासाने, एखादी व्यक्ती उच्चविद्याविभूषित नाही, म्हणून तीस बोलण्याचा अधिकार नाही, हे आपोआप ग्राह्य होत नाही. फार फार तर, एखाद्या व्यक्तीस बोलण्याचा अधिकार नसेल, तर ती व्यक्ती उच्चविद्याविभूषित नाही, इतकेच म्हणता येते. परंतु ते असो.)
त्यातसुद्धा आणखी गंमत म्हणजे, प्रस्तुत आर्ग्युमेंट खुद्द संबंधित खगोलशास्त्रातील विद्यावाचस्पती व्यक्तीने केलेले नव्हते, तर तिऱ्हाइताने केलेले होते. (किंबहुना, संबंधित ख.शा.तील वि.वा. व्यक्तीशी निदान या मुद्द्यावरून तरी माझा कोणताही पंगा नाही. फार कशाला, प्रश्नांकित आर्ग्युमेंट करणाऱ्या व्यक्तीने आपले आर्ग्युमेंट आता मागे घेतलेले आहे, म्हटल्यावर, त्या व्यक्तीशीही निदान माझ्या बाजूने तरी माझा कोणताही पंगा नाही.) असो.
बाकी, या सगळ्या मारामारीत डॉ. देशपांड्यांचे निष्कारण collateral damage होऊ नये, या आपल्या भावनेशी सहानुभूत आहे. माझा तसा इरादाही नाही आणि नव्हता, आणि, डॉ. देशपांडे तसा अर्थ घेऊन मनाला लावून घेणार नाहीत, अशी आशा आहे. किंबहुना, याच कारणाकरिता (अन्यथा गरज नसतानासुद्धा) स्पष्टीकरणाचा हा आटापिटा! (फॉर द रेकॉर्ड: डॉ. देशपांडे यांच्याशी माझा कोणताही पंगा नाही.)
अर्थातच नाही. आणि, त्याच टोकनाने, तो ख.शा.तला वि.वा. आहे, सबब तो गिटार चांगलाच वाजवीत असला पाहिजे, असेही (‘दुश्मन उस के बहुत हैं, आदमी अच्छा होगा’च्या चालीवर) म्हणणार नाही.
दुर्दैवाने आपले हे गृहीतक तथ्याधारित नाही, असे सखेद सुचवू इच्छितो. हे विविध पाश्चात्त्य संगीतप्रकार माझ्याकरिता बव्हंशी रूमानी तथा यावनी असल्याकारणाने, त्यांच्या तपशिलांत मला फारशी गती नाही, हे येथे कबूल करणे प्राप्त होते. (अर्थात, श्री. ब्रायन मे, क्वीन ग्रूप, आणि/किंवा गिटार, यांपैकी कोणाशीही किंवा कशाशीही माझा पंगा नाही, हे येथे मुद्दाम सांगावयास हवेच काय?)
असो.
प्रश्न तत्वाचा आहे असं
प्रश्न तत्वाचा आहे असं म्हणताय फक्त म्हणजे.
नेहमीप्रमाणे त्याच्याशी सहमत आहेच.
नाही काही! हा प्रश्न केवळ
नाही काही! हा प्रश्न केवळ तत्वाचा नसून हिशोब चुकते करण्याचा देखील आहे. कोणाची देणी ठेउ नये ही पण एक ’न’ वी बाजू आहेच की! काही कवचे कठीण असतात त्यामुळे प्रहार करावे लागतात.तरच आपले म्हणणे समोरच्याचा मेंदुत शिरते. कसें?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.com