टोपणनावे!

इथली एकेक भन्नाट टोपणनावे, स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, ते टोपणनाव का घेतलेले आहे ह्याविषयीची माहिती मात्र भरभरुन देणे...
हे सगळे वाचून-बघून गंमत वाटली.
‘इतरांनी केवळ लिखाणातून आपल्याला जाणून घ्यावे, व्यक्तिगत माहितीच्या फंदात पडू नये’ असे का वाटत असावे? स्वत:ची माहिती इतरांना न देण्यामागे काय हेतू असतात?
आजवर खरी माहिती दिल्याचा पश्चात्ताप करण्याची पाळी माझ्यावर अजून तरी आलेली नाही!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

आमच्याबद्दलची खरी माहिती इंटरपोलकडे वगैरे असल्यामुळे येथे देणं गरजेचं वाटत नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चित्राताई,

अनेकदा समाजाच्या/रितीभातींच्या दबावामुळे म्हणा की आपल्याला ओळखत असलेल्यांच्या विरूध्द आपली मते असली तर "त्यांना काय वाटेल" (विशेषतः "ते" म्हणजे आपले वडिलधारे असतील तर) या भिडेखातर आपली मते आपण आपल्याकडेच ठेवतो आणि ती मांडत नाही. निदान माझ्या बाबतीत तरी असेच घडलेले आहे. माझी मते विचार न करता बनविलेली आहेत असे अजिबात नाही पण माझी मते मांडली तर त्यातून माझ्याच माणसांबरोबर खटके उडावेत असे मला तरी वाटत नाही. ऐसीअक्षरे किंवा मिसळपाव यासारख्या संकेतस्थळावर टोपणनावे घेऊन वावरले म्हणजे मला माझे मत तर मांडता येतेच आणि परत पूर्णपणे गोपनीयताही राखली जाते.

म्हणूनच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वेळा प्रत्यक्षातले आपण आणि आपल्याला आवडणारे आपण यात अंतर असले तर असे होत असावे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंमत म्हणून! खरी माहिती देण्याची आवश्यकता नसते म्हणून! स्वतःची खरी माहिती न देताही स्वतःबद्दल बरंच काही सांगता येतं म्हणून. "शाकाहारी आहे" हे सांगण्यासाठी "मी गवत खाते" असंही म्हणता येतं, ते कधीमधी कोणालातरी मजेशीर वाटतं. आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. मग काय फरक पडतो खरी माहिती सांगितली काय आणि स्वतःचीच थोडी टोपी उडवली काय!
त्यातून मुक्तसुनीत यांच्या उदाहरणावरून इथले बरेच लोकं शहाणे झाले आहेत. त्यांची माहिती इंटरपोलपर्यंत पोहोचली, आपली कशाला पोहोचू द्या. म्हणून मग मी टोपणनाव वापरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कृपया खालील माहिती तुम्हाला या धाग्यावर जाहीरपणे द्यावीशी वाटते की नाही ते सांगा. त्यावरून काही हेतू तर लक्षात येतील.

१. तुमचं संपूर्ण नाव
२. आधी दुसरं कुठचं नाव वापरत असाल तर ते
३. तुमचा फोन नंबर
४. तुमचं वय
५. तुमची जन्मतारीख
६. तुमचा घरचा पत्ता
७. तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर, एक्स्पायरेशन डेट आणि सिक्युरिटी कोड
८. तुमच्या बॅंकचा अकाउंट नंबर आणि पासवर्ड
९. तुमचा पॅन कार्ड नंबर
१०. तुमचा सोशल सिक्युरिटी कार्ड नंबर
११. तुम्हाला कुठचेकुठचे आजार आहेत याची माहिती

(ही माहिती प्रत्यक्षात देणं धोकादायक आहे, तेव्हा इथे लिहू नये ही विनंती. ही यादी देणं म्हणजे ती माहिती मागणं नसून, व्यक्तिगत जपून ठेवण्याजोगी माहिती म्हणजे काय हे लक्षात यावं यासाठीची यादी आहे)

इतरही हेतू असतात, ज्यांचा पैशांशी किंवा सुरक्षिततेसी संबंध येत नाही. सर्व जण - जालावरच नव्हे तर प्रत्यक्ष जगातही - स्वतःविषयी काही खास गोष्टी लपवून ठेवतात. बिली जोएलचं स्ट्रेंजर हे गाणं इथे पहायला मिळेल.

त्या गाण्याचे सुरूवातीचे शब्द असे..

Well we all have a face
That we hide away forever
And we take them out and
Show ourselves
When everyone has gone
Some are satin some are steel
Some are silk and some are leather
They're the faces of the stranger
But we love to try them on

Well we all fall in love
But we disregard the danger
Though we share so many secrets
There are some we never tell
Why were you so surprised
That you never saw the stranger
Did you ever let your lover see
The stranger in yourself?

संपूर्ण कविता इथे वाचायला मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोपणनावा आडून काहीही लिहिता येते आणि त्याचा झालेला परिणाम तुमच्या नावाला चिकटत नाही. अगदीच हकाल पट्टी झाली तर दुसऱ्या टोपणनावाने परत हजर Wink असं आपलं मला वाटतं.
आणि नावे निवडताना आपली क्रियेटीवीटीही दाखवता येते. पिसाळलेल्या हत्तींची सगळीच नावे आपल्याला आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजवर खरी माहिती दिल्याचा पश्चात्ताप करण्याची पाळी माझ्यावर अजून तरी आलेली नाही!

हे तुम्ही धाग्यात लिहिले आहेत, मात्र तुमच्या सदस्य परिचयात :-

स्वतःबद्दल काही
मी एक पक्षीण...

हे दिसले.

विज्ञानवाद्यांनी हे शक्य आहे का ह्यावरती प्रकाश टाकावा.

तसेच तुमच्याकडून नलाने पाठवलेल्या 'हंसा' विषयी अधिक वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्‍यास बहाल करण्यासारखे आहे. मला स्वतःला ते कधीच पटले / पटत नाही. स्वतःचे नाव, छायाचित्र, संपर्क क्रमांक व इतर अनेक प्रकारची वास्तव माहिती जालावर प्रसिद्ध केल्याचा मला निदान आजवर तरी फायदाच झाला आहे. श्री. रामदास, श्री. संजय सोनवणी, श्री. संजय क्षीरसागर यांसारखे दिग्गज तसेच अनेक अप्रसिद्ध तरीही गुणवान लेखक / रसिक वाचक यांनी स्वतःहून माझ्याशी संपर्क साधला याचे कारण माझे संपर्क तपशील जालावर सहजरीत्या उपलब्ध आहेत.

हल्ली आयपी अ‍ॅड्रेस, मोबाईल नंबर इत्यादी गोष्टी ट्रेसेबल असल्याने सहसा कोणी आपणांस त्रास देण्यास धजावत नाही असा माझा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

खरं नाव आडनाव दिलं की लोक जातपातधर्म आशा गोष्टीवरून आडाखे बांधतात.
खरं रहायचं ठिकाण दिलं की लगेच हिरवा माज, पुणे-मुंबई-अनुशेषित महाराष्ट्र वगैरे सुरु होतं.
खरा धंदा सांगितला की लगेच प्रा.डॉ., आयटी हमाल वगैरे सुरु होतं.
तात्पर्य - माणसांना पिजनहोल करण्याची माणसांची वृत्ती म्हणजे एक नंबरची कटकट असते.
पालथे धंदे नुसते.
म्हणून टोपणनाव.

शिवाय खरं नाव आईबापाची आवड वगैरेमुळे येतं.
टोपणनाव आपण निवडतो. स्वतंत्रपणे.
आणि थोडी मजा पण येते.
खरंय न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

<< शिवाय खरं नाव आईबापाची आवड वगैरेमुळे येतं.
टोपणनाव आपण निवडतो. स्वतंत्रपणे. >>

हे काही तितकंसं पटलं नाही. स्वतःचं नाव (इतकंच काय आडनाव देखील) बदलायची कायद्याने सोय आहेच की.

तसंही आपल्या निवडीने तर आपल्याला आपलं आयुष्यही मिळत नाही. अमूक एका खानदानात, अमूक एका तारखेला, अमूक एक चेहरा / वर्ण घेऊन किंवा अगदी स्त्री की पुरुष म्हणून जन्मायचं याबाबतीतही निवड स्वातंत्र्य आपल्याला कुठे आहे? मग एक आपलं नाव तेवढं आपल्या आवडीचं / निवडीचं नाही याचं दु:ख कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

घेण्यात आलेली आहे.
यथावकाश यथाशक्ती उत्तर लिहीण्यात येइल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-