याबाबत काही ठोस माहीती (संदर्भ ग्रंथांवरून) असेल तर आपल्या उत्तराची अपेक्षा आहे...

खूप दिवसांपासून काही शंका मनात बागडतात आणि त्या इथे चर्चेला मांडाव्यात असा विचार मनी डोकावून गेल्याने हा धागा चर्चे साठी सोडत आहे...

कृष्ण, नंदबाबा, यशोदा मय्या यांच्याबद्दल मागे मी काही वर्षा पूर्वी एका दूरदर्शन मालिकेत काही भाग पाहीले होते. त्यात असे दाखवलेले की यशोदेने एका मुलीला जन्म दिलेला असतो त्याच रात्री वासूदेव बाळ कृष्णाला घेऊन येतो आणि आपली अडचण (?) नंद बाबाला सांगतो. नंद बाबा त्या बाळ कृष्णाला गाढ झोपलेल्या यशोधेच्या कुशीत झोपवतो व तिथे आधी झोपलेली तिची त्याच रात्री जन्मलेली मुलगी वासूदेवाच्या हवाली करून त्याला त्याच रात्री रवाना करतो...

(ही मालिका सोडली तर मी या संदर्भात कुठलेही संदर्भ ग्रंथ वाचलेले नाहीत)...
त्यात दाखवल्या प्रमाणे त्या दिवसापासून यशोधा मय्या कृष्णाला आपलाच जन्माचा मुलगा समजून वाढवते. माझ्या मनातल्या शंका अशा आहेत की जर तिला ते सत्य दूस-याच दिवशी माहीत झाले असते तर तिच्या मनाने किंवा तिच्यातल्या आईच्या मनाने ते वास्तव सहजासहजी स्विकारले असते का? तिने ज्या पद्धतीने कृष्णाला वाढवले ते त्याच पद्धतीने झाले असते का की त्यात अजून काही बदल झाले असते?

ज्यावेळी तिला समजले (मला खात्रीने माहीत नाही नेमके केंव्हा समजले ते) की हा आपला जन्म घातलेला बाळ नाही त्यावेळी तिची प्रतीक्रिया किंवा मानसीक अवस्था काय होती? (या बद्दल कुठल्या संदर्भ ग्रंथात काही माहीती लिहीलेली असेल तर कृपया त्या संदर्भ ग्रंथा बद्दल कळवा)... ज्यावेळी कृष्ण कंसाच्या (त्यावेळी कंस आपला मामा आहे हे त्याला माहीत होते की नव्हते या बद्दल कल्पना नसल्याने कंस मामा म्हणाले नाही) निमंत्रणावरूण गोकूळ सोडून जायला निघतो त्यावेळी तिला हे वास्तव ज्ञात होते असे वाटते... (मग आधी समजले की त्यावेळीच समजले माहीत नाही.)... कृष्ण गोकूळ सोडून जाताना आईला वाटतो तो वियोग यशोदेलाही होता... सगळ्या गोकुळाला होता....

पण जेंव्हा कृष्ण कंस वध करतो व त्याच्याच गावी रहातो (मालीका पहाताना असेच वाटले)... त्या नंतरचे कृष्ण व यशोदा मय्याच्या नात्याबद्दल कुठे लिहून ठेवलेले आहे का? किंवा तो कायमचाच गोकूळ, यशोदा मय्या यांना सोडून गेल्या नंतर यशोदा मय्याचे आयुष्य कशा प्रकारे गेले असेल? याबद्दल कोणाचा अभ्यास असेल तर ते यावर प्रकाश टाकू शकतील का? (किंवा संदर्भ ग्रंथांची माहीतीही चालेल...)

(मला वाटते हा धागा तरी सोप्या भाषेत तेही विस्तृत स्वरूपात असावा आणि ऐसी अक्षरे च्या वाचकांच्या नियमात बसणारा असावा...)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

>(ही मालिका सोडली तर मी या संदर्भात कुठलेही संदर्भ ग्रंथ वाचलेले नाहीत)...
>त्यात दाखवल्या प्रमाणे त्या दिवसापासून यशोधा मय्या कृष्णाला आपलाच जन्माचा मुलगा समजून वाढवते. माझ्या मनातल्या >शंका अशा आहेत की जर तिला ते सत्य दूस-याच दिवशी माहीत झाले असते तर तिच्या मनाने किंवा तिच्यातल्या आईच्या >मनाने ते वास्तव सहजासहजी स्विकारले असते का?

अापल्या प्रश्नांचा रोख ऐकून काहीसा बुचकळ्यात पडलो. कृष्ण, नंद, यशोदा या (अात्ता माहित अाहेत त्या स्वरूपात) ऐतिहासिक व्यक्ती होत्या असे मला वाटत नाही. त्यांच्यामागे 'काहीतरी' ऐतिहासिक बीज असणं अशक्य नाही. उदाहरणार्थ, गाई पाळणाऱ्या एका जमातीचा राजा होता, त्याला त्याच्या अाईने न वाढवता दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीने वाढवलं होतं, असं काहीतरी कदाचित कुठेतरी घडलं असूही शकेल, पण ते काय याबद््दल निश्चित पुरावा मिळणं अशक्यच दिसतं. पण एकूणच तो पूर, तुरुंगाचे दरवाजे अापोअाप उघडणं, अाठ ठिकाणी व्यंग असलेली स्त्री पुन्हा सरळ होणं ह्या अतिरंजित कल्पना अाहेत. त्या ऐतिहासिक सत्य म्हणून स्वीकारायला मी (तरी) मुळीच तयार नाही.

माझ्या मते महाभारत अाणि कृष्णाची कथा ही अनेक माणसांनी अनेक शतकांच्या काळात रचलेली एक प्रचंड मोठी अाणि कमालीची विस्कळित कादंबरी अाहे. या कादंबरीत काही पूर्ण काल्पनिक गोष्टी असू शकतील, तशा काही खऱ्या व काही काल्पनिक गोष्टींची सरमिसळ असू शकेल. (प्रत्यक्षात कुठलं काय अाहे हा भयंकर गुंतागुंतीचा प्रश्न अाहे.) हे जर एकदा मान्य केलं तर कुठल्याही कादंबरीबद्दल counterfactual (मराठी शब्द सुचवा) प्रश्न हे नेहमीच अडचणीचे असतात. समजा 'यमीचा नवरा जर मेला नसता तर पुढे तिचं काय झालं असतं?' असा प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार? हरिभाऊ अापट्यांनी त्याला मारायचा कलात्मक निर्णय घेतला एवढ्यावर थांबावं लागतं. 'संदर्भग्रंथ' वाचून अशा प्रकारचा प्रश्न सुटेल असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

धन्यवाद जयदीप..
कृष्ण, नंदबाबा, यशोदा ही पात्रे कल्पनीक असतील किंवा खरोखरीच ऐतीहासीक असतील हा वेगळा मुद्दा... तुर्तास असे समजू की हे सगळे काल्पणीक आहे व आपण येका काल्पणीक कथेबद्दल किंवा त्याताल्या पात्रांबद्दल चर्चा करतो आहोत असे माणून जरी विचार केला तरी त्या काल्पनीक कथेत देखील कृष्ण कंसाच्या गवात कायमचे रहायला जातो त्या नंतर त्याचे व यशोदेच्या नात्याबद्दल किंवा तिच्या मानसीकते बद्दल कुठेच कोणी प्रकाश टाकला नाही... तसे पाहीले तर यशोदेच्या बाजूने विचार केला तर ती येवढी साधीही बाब नाही असे मला तरी वाटते...
आणि हो... आज तरी "पूर, तुरुंगाचे दरवाजे अापोअाप उघडणं, अाठ ठिकाणी व्यंग असलेली स्त्री पुन्हा सरळ होणं" या बाबी कोणीच माणनार नाही... मीही मानत नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

मालिकेचे माहीत नाही पण कृष्णाचे आयुष्य भागवतपुराणात वर्णिले आहे. आपल्या शंकानिरसनासाठी ते वाचा.

जालावर त्याच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत. उदा. http://vedabase.net/sb/en येथे अध्याय १०, ११, १२ आणि १३ येथे कृष्णजन्मापासून त्याच्या देहत्यागापर्यंत आणि कलियुगप्रारंभापर्यंत कथानक इंग्रजी भाषेत श्लोकक्रमाने सांगितले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अरविंदजी,
मी नक्कीच तुम्ही दिलेल्या आवृत्त्या वाचूना अपेक्षीत माहीती मिळवायचा प्रयत्न करेल...
परत येकदा धन्यवाद...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

प्राण्यांमधे अशा प्रकारच्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसतात. काही ठिकाणी विजातीय (वेगळ्या प्रकारच्या) प्राण्याच्या पिल्लांचीही मादी काळजी घेते. आणि काही ठिकाणी सजातीय पण दुसर्‍या मादीचे पिल्लू असेल तर दुर्लक्ष करते.
यशोदेने काय केलं असतं हे आपण कसे सांगणार? आपण तिच्या जागी असतो तर काय केलं असतं हे फारतर सांगता येईल.

पण एकूणच तो पूर, तुरुंगाचे दरवाजे अापोअाप उघडणं, अाठ ठिकाणी व्यंग असलेली स्त्री पुन्हा सरळ होणं ह्या अतिरंजित कल्पना अाहेत. त्या ऐतिहासिक सत्य म्हणून स्वीकारायला मी (तरी) मुळीच तयार नाही.

+१
कवीकल्पनेला इतिहास म्हणत महत्त्व देण्याची माझीही तयारी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदिती, धन्यवाद...
खरय आपले...
"यशोदेने काय केलं असतं हे आपण कसे सांगणार? आपण तिच्या जागी असतो तर काय केलं असतं हे फारतर सांगता येईल."
यशोदेने काय केले असते असे विचारण्याच्या मागचा हेतू असाच होता की तिच्या जागी जावून प्रतेकजन आपापल्या कल्पना विस्तारा प्रमाने विचार करेल की मी तिच्या जागी असतो तर काय केले असते.. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती नूसार प्रतेकाचे अनूभव वेगवेगळेच असतील...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

आपापल्या कल्पनेप्रमाणे विस्तारच करायचा असेल तर मग संदर्भग्रंथ वाचण्याची आवश्यकताच नाही. महाभारतात काही का लिहीले असेना, प्रत्येक व्यक्ती आपापल्या धारणेप्रमाणे दत्तकपुत्राला आपले मानेल, किंवा मानणार नाही किंवा कसेही!

कृष्ण-यशोदा नात्यासंदर्भातल्या गोष्टी पहाता तिथे फक्त दत्तकाचा संबंध येत नाही. यशोदेच्या पोटी जन्माला आलेली मुलगी म्हणे कंसाच्या हातून सुटून आकाशात गेली. (आणि चोप्रांच्या महाभारताप्रमाणे आकाशात जाऊन हिडीस हसली.) आपलं स्वतःचं मूल उडत गेलं आणि दुसर्‍याचं मूल सांभाळावं लागणं असाही एक पदर या नात्याला आहे.

तुम्हाला नक्की काय माहिती हवी आहे हे मलाही समजलेलं नाही. उगाच हवेत तीर मारते आहे, तेवढंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती..

म्हणजे तू फास्टर फेणेलाही काल्पनिक मानतेस की काय..

त्याच्या कथेत तर पुणे या खरोखर अस्तित्वात असलेल्या शहराची वर्णनं आहेत. कित्येक ठिकाणी सारसबाग, जंगली महाराज मठ, बिबवेवाडी अशा ठिकाणांचे उल्लेख आहेत.. मी स्वत: ही ठिकाणं पाहिली आहेत.. कोणीही स्वतः जाऊन डोळ्यांनी खात्री करु शकतो.

इतकं अचूक वर्णन आहे आणि काही चमत्कारही नाहीत..

याउप्पर जाऊन सांगतो.. फास्टर फेणेचं फुरसुंगी नावाचं गावही पुण्याजवळ अस्तित्वात आहे, आता तिथे आयटी पार्कही झाले आहे.

प्रतापगडावर फास्टर फेणे हा पूर्ण खंड प्रतापगड या विषयाला वाहिला आहे. प्रतापगडाविषयी तर कोणी काही शंका घेऊच नये.. तपशीलवार वर्णन आहे..

बनेश फेणे हे त्याचं मूळ नाव.

तो फुरसुंगी सोडून विद्याभुवनात पुण्याला शिकायला आला तेव्हा त्याच्या आईला काय वाटलं असेल याचा ऊहापोह मात्र श्री. भागवत यांच्या मूळ ग्रंथमालेत आढळत नाही. लेखकाचे या पैलूकडे दुर्लक्ष झाले आहे.

तेव्हा काल्पनिक म्हणून एखादी गोष्ट उडवून लावण्याची तुमची प्रवृत्ती मला खटकली आहे.. हां आता फाफे दोन हजार वर्षांपूर्वीचा नाही हा भाग वेगळा, पण दोन हजार वर्षे काय, हां हां म्हणता पूर्ण होतील..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण आपल्याला पडत असलेले प्रश्न थेट मांडले तर बरे होईल. (आपले आधीचे धागे पाहता) मला वाटते आपल्याला "दत्तक" या विषयावर काही शंका आहेत.

पौराणिक कथांचा आधार घेऊन मांडण्यापेक्षा थेट चर्चा केली तर काही फलनिष्पत्ती होईल. वर सदस्यांनी प्रतिसाद दिल्याप्रमाणे पौराणिक पात्रांचे त्या त्या कथेतील वागणे हे कथेच्या पुढील वाटचालीस सोयीचे असेल असे दाखवलेले असते. खरी माणसे तशी वागतात असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कृष्ण हा यशोदेकडे दत्तक गेला होता हे मी तरी वयक्तीक माणायला तयार नाही... कारण पारिस्थीतीनूसार (असे त्या कल्पनीक / ऐतीहासीक कथांवरून वाटते) तो यशोदेच्या पदरात आलेला होता... आणि बहुतेक तिला ते माहीतही नसावे (???)... ती त्याला आपलाच पुत्र समजून वाढवत असली तरीही ती वास्तवाबद्दल अद्न्यानात असल्या कारणाने त्याला मी तरी 'यशोदेने कृष्णाला दत्तक घेतले होते' किंवा 'कृष्ण हा यशोदचा दत्तक पुत्र' म्हणू शकत नाही... यावर प्रतेकांची आपापली मते वेगवेगळी असू शकतात...

कृष्ण-यशोदे च्या नात्याच्या थोरव्या गायल्या जातात पण जे ‘अज्ञानात’ होवून गेले त्या बाजूबाबतच झाले ना ते... मी फकत विचार केला की ते जर ‘ज्ञात’ असते तर काय पारिस्थीती असली असती त्याबद्दल फक्त कल्पना करायाचीय...
किंवा जेवढ्या चवीने या कथा ऐकल्या, ऐकवल्या जातात तिथे यशोदेच्या नंतरच्या आयुष्याबद्दल काहीच बोलले जात नाही म्हणून केवळ हा माहीती मिळवण्याचा प्रयत्न..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

एक विनंती.
धाग्याच्या शीर्षकात चर्चेचा विषय नेमका काय आहे हे सांगितलंत तर अधिक सोयीच होईल. इथं 'याबाबत काही ठोस माहिती...' यावरून माझ्यासारख्या सामान्य वाचकाला काही कळत नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा वाचून अंमळ मौज वाटली.

महत्वाचा प्रश्न म्हणजे, यशोदेने वाढवलेला आणि कंसाचा वध करणारा कॄष्ण हे एकच होते का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २