वार्तालाप: "वर्णानां ब्राम्हणो गुरु:"
ब्रम्हज्ञानाचा विचारू.
त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.
वर्णानां ब्राम्हणो गुरु:(14/7/30)
समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते.
महाभारतात युधिष्ठिर-सर्प संवाद आहे. नागाने युधिष्ठिराला विचारले, "ब्राह्मण कोण आहे?" युधिष्ठिर म्हणाले की ज्या व्यक्ति मध्ये सत्य, दान, क्षमा, अस्तेय,आणि दया इत्यादि सात्विक गुणांचा वास असतो. जो विद्वान तपस्वी असतो, तो ब्राम्हण". नाग म्हणाला की "शूद्रामध्येही हे गुण असू शकतात." युधिष्ठिर म्हणाले की “जर एखाद्या शूद्रा मध्ये वरील वैशिष्ट्ये असतील तो शूद्र, ब्राह्मण आणि ज्याच्यात हे गुण नाहीत तो ब्राम्हण ही शूद्र असतो.
आपल्या सनातन धर्मात अनेक मत आणि मतांतरे आहेत. अनेक देवी देवता आहेत. त्यांची पूजा उपासना आणि उत्सव करणारे सर्वच वर्णांचे पुजारी आहेत. अनेक मठ आणि महंत आहेत. भक्त त्यांना गुरु मानतात आणि ते भक्तांना उपदेश करतात. पण ते सर्वच ब्रम्हज्ञानी नसतात. अनेक फक्त महंत फक्त त्यांच्या गुरूंच्या चमत्कारांच्या गाथा सांगून भक्तांना भुलवितात. चमत्कारांच्या गाथा ऐकून भक्त ही सदा सर्वदा चिलमच्या नशेत राहणार्या ज्ञानहीन व्यक्तीला गुरुचा दर्जा देऊन त्यांच्या भक्तीत लीन होतात. अश्या चमत्कारी बाबांना गुरु मानणार्या भक्तांचा इहलोक आणि परलोक दोन्ही बिघडणारच. समर्थ म्हणतात "गुरुत्व नेले कुपात्री". गुरुच ब्रम्हज्ञानी नसतील तर ते आपल्या भक्तांना सांसारिक आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा उपदेश करूच शकणार नाही. समर्थ म्हणतात अज्ञानी आणि नीच आचार-विचार असलेल्या महंतांची महंती वाढली की देश आणि धर्म दोघांचाही नाश होतो. देशात गरीबी अराजकता, हिंसेचे साम्राज्य पसरते. याचे प्रत्यक्ष उदाहरण पाकिस्तान इत्यादि देश आहेत. समर्थांच्या काळातही हीच परिस्थिति होती. असल्या मूर्ख गुरूंमुळे राज्यावर म्लेंछ आले, असे समर्थांचे मत होते.
आपले सौभाग्य आज किमान आपला नेता तरी ब्रम्हज्ञानी आहे, त्यामुळे करोंना काळात ही आपल्या देशात कुणी उपाशी झोपले नाही किंवा ब्रिटेन अमेरिका सारख्या मोठ्या अर्थ व्यवस्थेला ही तडा गेला नाही. पण दुसरी कडे मेकाले शिक्षण पद्धतीत असलेल्या दोषांमुळे देशात ज्ञान, पुरुषार्थ आणि कर्तृत्व विहीन फक्त पुस्तकी ज्ञान असलेली एक मोठी युवा पिढी तैयार झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी देशाला ब्रम्हज्ञानी गुरूंची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
(अवांतर शंका)
गॅसेसकरिता आयुर्वेदात औषध आहे काय? ‘पतञ्जलि’ ते बनविते काय?
या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे ‘हो’ आणि ‘हो’ अशी असल्यास, पुरवणी उपप्रश्न: मग आपण ते नियमितपणे का घेत नाही?
(मुगाच्या डाळीचे सूप जर पचनास हलके असेल, तर मग इतके गॅसेस मुळात होतातच कसे?)
या धाग्याचे विडंबन पाडायचे झाल्यास...
...'अपलाप: "पादानां फुसकुली राणी"' असे शीर्षक उपलब्ध आहे. मजकुराचीच काय ती कमी (मराठीत: कमतरता) आहे.
परंतु, "योजकस्तत्र दुर्लभ:"... चालायचेच!
खुलासा…
बोले तो, तसे आम्ही कोणालाही कसलाही खुलासा करणे लागत नाही, परंतु तरीही…
विडंबनाच्या शीर्षकामागील प्रेरणा (प्रस्तुत धाग्याच्या शीर्षकाशी साधर्म्य वगळता) कोणाच्या लक्षात आली नसल्यास (वा ठाऊक नसल्यास), पुढील सुप्रसिद्ध सुडो-संस्कृत श्लोकाकडे लक्ष वेधू इच्छितो.
उत्तमे ढमढमे पादे
टाराटुरी च मध्यमे।
पादानां फुसकुली राणी
तस्य घाणीं न जायते॥
(‘थ्री इडियट्स’ चित्रपटात आमीर खानने त्या चतुर रामलिंगमच्या तोंडी एतद्सदृश सुडो-संस्कृत श्लोकावृत्ती घुसडली होती, परंतु अर्थातच याची सर तीस नव्हती. चालायचेच.)
पूर्वीचे ग्रंथ
ते (भारतवर्षातील) संस्कृत,पाली,प्राकृत,अर्धमागधि अशा बऱ्याच भाषांत आहेत. राजेलोक यांचा उपयोग दाखला/पाठींबा म्हणून करत.
जनतेने त्यांना/ग्रंथांना आधारभूत मानलेच पाहिजे असे नसते.
तुमचा देश कोणता?
तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात?
लेखक स्वतः ब्राह्मण आहे काय?
लेखक स्वतः ब्राह्मण आहे काय? किंबहुना तसा लेखकाचा समज आहे काय? नसल्यास लेखकाच्या मते तो कुठल्या वर्णात मोडतो? कागदोपत्री आणि लोकांना सांगतानाही स्वतःची जन्मजात जात सांगता की स्वतःच्या आकलनापरत्वे सांगता?
लेख तुम्हाला कळलेला नाही.
लेख तुम्हाला कळलेला नाही. प्राचीन व्यवस्था ही कर्मानुसार होती, जन्मानुसार नाही. बाकी माझ्या पटाईत परिवारात तुम्ही मानता तसे सर्व जाती समाहित आहेत. बाकी मी कर्मानुसार ब्राम्हण नाही. कर्मानुसार दरबारी कर्मचार्यांना कायस्थ म्हणता येईल.