Skip to main content

टोमॅटोचे भरीत

युट्यूबवर शॉर्ट्समध्ये या चटणीने धुमाकुळ घातला आहे. वांग्याच्या भरतासारखे हे टोमॅटोचे भरीत म्हणता येइल अशी चटणी करणे सोपे आहे. चव तर अप्रतीम होते. कृती तशी सोपी आहे. दोन टोमॅटो अर्धे करून घ्यायचे. एका पॅनमध्ये तेल टाकायचे. तेल थोडे गरम झाले की टोमॅटो सालीचा भाग वर येइल असे त्यावर ठेवायचे. लसूण पाकळ्या दोन ठेचून घेउन पॅनवर टाकायच्या. मध्यम आचेवर झाकण ठेवून टोमॅटो एका बाजूने मऊ होउपर्यंत भाजून घ्यायचा. साल काळपट होऊ लागली की टोमॅटोच्या फोडी पलटायच्या. आणि यातच मिठ, हिंग टाकायचे. परत झाकण ठेऊन वाफ काढून घ्यायची. चिमुटभर साखर टाकायची. व्यवस्थित तेलात भाजल्यानंतर टॉमॅटोची साल सुटू लागते. ती चमच्याने काढून टाकायची आणि बारीक चिरलेला कच्चा कांदा, थोडे शेंगदाणा कूट, तिखट हवे तितके आणि गरम मसाला(मी चिकन मसाला वापरला) टाकून गरात व्यवस्थित मिसळून घ्यायचे. आता आच बारीक करून हे मिश्रण पाच मिनिट शिजू द्यायचे. पाणी सुटू लागले की बारीक चिरली कोथिंबिर टाकून आणखी पाच मिनिट वाफ येऊ द्यायची. गॅस बंद करून आणखी पाच मिनिट तसेच ठेवायचे. पाणी आटून चटणी किंवा भरीत घट्ट्सर होते. पोळी किंवा ब्रेडबरोबर छान लागते. यात टोमॅटोची आंबट चव कायम राहते. आणि तेलात् भाजल्यामुळे खरपूस फ्लेव्हर येतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/06/2023 - 00:47

इथे आष्टिनात, फार्मर्स मार्केटात छान गोडुस टोमॅटो मिळतात. बाकी टोमॅटोंवर बंदी आणावी, किंवा त्यांना निराळं नाव द्यावं असं बऱ्या अर्ध्याचं मत आहे. हापूस आणि आंबा असं वर्गीकरण केल्यासारखं.

थंडीत ते टोमॅटो मिळेनासे झाले की दुकानातल्या टोमॅटोंचं भरीत करून बघता येईल.

'न'वी बाजू Fri, 02/06/2023 - 01:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किंवा त्यांना निराळं नाव द्यावं असं बऱ्या अर्ध्याचं मत आहे.

थंडीत ते टोमॅटो मिळेनासे झाले की दुकानातल्या टोमॅटोंचं भरीत करून बघता येईल.

दुकानातल्या टोमॅटोंना 'भरताचे टोमॅटो' असे नाव देता येईल. (फार्मर्स मार्केटातल्या टोमॅटोंना 'शत्रुघ्नाचे टोमॅटो' असे नाव देणे मग ओघानेच आले.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 03/06/2023 - 02:37

In reply to by 'न'वी बाजू

शत्रुघ्नच का? ते जुळे नसतात, एकाच आईचेही नसतात. रामलख्ख्नचे टोमॅटो म्हणता येईल. जांबुवंताचे टोमॅटोही म्हणता येतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/06/2023 - 02:23

In reply to by पुंबा

माझं पार्सिंग चुकलं.

भरत-शत्रुघ्न जुळे असले तरी टोमॅटो जुळे नसतात, असं मला म्हणायचं होतं. वेगवेगळ्या जातींचे टोमॅटो फार तर एका वंशाचे म्हणता येतील; एकाच जातीच्या दोन झाडांना आलेल्या टोमॅटोंना भावंडं म्हणता येईल. आणि एकाच झाडावर आलेले सगळे जुळे असं म्हणता येईल.

मी घरी सध्या दोन जातींचे टोमॅटो लावले आहेत. येत्या आठवड्यात बहुतेक पहिला 'अननस न्वार' टोमॅटो खायला तयार होईल.
अननस न्वार

हे खालच्या चित्रातले 'ऑरेंज हॅट' टोमॅटो गेल्या महिन्यापासून खायला मिळत आहेत. (हे थोडे आंबट आहेत; मला यापेक्षा थोडे गोड टोमॅटो आवडतात. पण ती झाडं अगदी खालच्या चित्रात आहेत तशी छोटी आहेत. कुंड्यांमध्येही सहज वाढत आहेत.)
ऑरेंज हॅट

'न'वी बाजू Thu, 11/04/2024 - 23:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भरत-शत्रुघ्न हे जुळे (आणि कैकेयीचे लाल) अशी माझीही समजूत अगदी परवापरवापर्यंत होती. (किंबहुना, त्याच समजुतीखाली (भरताचे टोमॅटो आणि शत्रुघ्नाचे टोमॅटोवाला) मूळ प्रतिसाद लिहिला होता.) परंतु, शत्रुघ्न हा भरताचा नसून लक्ष्मणाचा जुळा भाऊ (नि सुमित्रेचा पुत्र) असल्याबद्दलची एक आवृत्ती अलिकडे वाचायला मिळतेय. (विकीसुद्धा असेच काही म्हणतोय, आणि, जालावर या संदर्भात जे जे म्हणून दुवे सापडताहेत, ते झाडून सारे यालाच पुष्टी देताहेत. किंबहुना, माझ्याच समजुतीत काही गडबड होत नाहीये ना, याबद्दल खात्री करून घेण्यासाठी, माझ्या ओळखीतल्या एका साधारणत: समवयस्क व्यक्तीला (विकीचा संदर्भ अथवा संभाव्य उत्तर अगोदर न सुचविता) 'शत्रुघ्नाची आई कोण?' असा प्रश्न (केवळ cross-check करण्यासाठी म्हणून) विचारला असता, "सुमित्रा. शत्रुघ्न हा लक्ष्मणाचा जुळा भाऊ." असे उत्तर मिळाले.)

कदाचित, पुण्यामुंबईकडे/पश्चिम महाराष्ट्रात लहान मुलांना रामायणाची काही वेगळी आवृत्ती (निदान पन्नाससाठ वर्षांपूर्वी तरी) सांगितली जात असावी काय? (आणि, नक्की खरे काय आहे?)

--------------------

(या रेटने, आख्खे रामायण ऐकून झाल्यावर, "रामाची सीता नक्की कोण? आई, की बहीण?" असा प्रश्न ज्याला पडला, त्याचे अगदीच काही चुकले नसावे, असे वाटू लागते. किंबहुना, त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागते.)

anant_yaatree Fri, 12/04/2024 - 12:26

In reply to by 'न'वी बाजू

It was the time when the one year Yagna that King Dashratha was conducting for the birth of son, was in its final phase. It was the last day when the Putra-Kaama-ishti Yagna was being performed. Towards the end of the Yagna, an Agni Purush (Messenger from God for the Yagna) emerged from the Yagna Fire. He possessed a Golden Vessel with Silver Lid containing the divine dessert which had to be consumed by King Dashratha’s wives. King Dashratha had to distribute the divine dessert between three of his main consorts Kausalya, Kaikeyi and Sumitra.

But, Dashratha didn’t divide the divine dessert into three equal parts. He first divided the dessert into two parts. The first part was given to Kausalya and she consumed it. The remaining 50 % was again divided into two. One part of this 50% was given to Sumitra first. The remaining 25% of the divine dessert was again divided into two by Dashratha. The first 12.5% of the dessert was given to Kausalya and she consumed it.

Still, there remained final 12.5% of the dessert. While Dashratha was pondering upon on whom to give the remaining potion of the dessert, he noticed something. Both Kaikeyi and Kausalya, had consumed their portion once they were given. But, Sumitra waited for both of them to consume their part and then she consumed her portion. She did this because, she wanted her son to be younger than that of Kausalya’s and Kaikeyi’s son so that he could be serving and guarding them. Dashratha noticed this and understood her thoughts. He immediately realized that Sumitra was the most deserving wife of the last part of the divine dessert and gave her the last part to consume.

Thus Sumitra begot two sons one of them being devout to Kausalya’s Son Rama (Lakshmana) and the other son being devout to and serving Kaikeyi’s son Bharatha (Shatrugna).

'न'वी बाजू Sat, 20/04/2024 - 21:57

In reply to by anant_yaatree

तुमचे बरोबरच आहे, असे दिसते.

किंबहुना, या विषयावर पुंबांशी व्यनिचर्चा झाली. त्यांचीही मूळ समजूत माझ्याप्रमाणेच भरत आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ (आणि कैकेयीचे पुत्र) आहेत, अशी होती. परंतु, दाखल्यांकरिता म्हणून त्यांनी जेव्हा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वाल्मिकिरामायणापासून ते गदिमांच्या गीतरामायणापर्यंत झाडून सारे स्रोत लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ (तथा सुमित्रेचे पुत्र) असल्याची ग्वाही देत असल्याचे आढळले.

तेव्हा, तुमचे म्हणणे बरोबर आहे, असे दिसते. परंतु, प्रश्न तो नाही.

भरत आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ (तथा कैकेयीचे पुत्र) आहेत, असा माझा एकट्याचा जर गैरसमज असता, तर लहानपणी रामायणाची कथा ऐकतावाचताना तपशिलांकडे लक्ष पुरविण्यातील माझ्या हलगर्जीपणाच्या खाती तो मांडता आला असता. परंतु, येथे एकट्या ‘ऐसीअक्षरे’वर मी, पुंबा, ३_१४ विक्षिप्त अदिती, तथा विजुभाऊ, अशा चौघांचा हाच गैरसमज दिसला. (शिवाय, जालाबाहेर, माझ्या पत्नीचाही स्वतंत्रपणे हाच गैरसमज होता, असेही दिसले. म्हणजे पाचजण.) आता, पाचा जणांचा हाच गैरसमज जर असेल, तर ‘पाचांमुखी परमेश्वर’ या न्यायाने ते बरोबर ठरते, अशा प्रकारचा कोठलाही दावा करण्याचा माझा इरादा नाही; चूक ती चूकच. मात्र, पाच जणांचा स्वतंत्रपणे जर एकच गैरसमज असेल, तर there must be some method to the madness; या गैरसमजाचा काही समाईक स्रोत असला पाहिजे. (अन्यथा, उदाहरणादाखल, मी आणि विजुभाऊ यांचे कशावर तरी एकमत होणे कदापि शक्य आहे काय? तर ते एक असो.) तर, तो समाईक स्रोत धुंडाळण्याचा हा आपला एक प्रयत्न, इतकेच.

(या संदर्भात आणखीही काही कन्फ्यूजने आहेत — रादर, पुंबांबरोबर व्यनिचर्चा करताना उघडकीस आली. परंतु, त्यांचा ज़िक्र पुन्हा कधीतरी. तूर्तास इतकेच.)

विजुभाऊ Fri, 02/06/2023 - 11:44

फार्मर्स मार्केटातल्या टोमॅटोंना 'शत्रुघ्नाचे टोमॅटो' असे नाव देणे

शेवटी ते टंबाटी कुळातलेच की.
दोघेही कैकैचे लाल.