धचामा
धचामा"
" हा बघ, हाच तो शनिवार वाडा."
ओह, नारायण राव पेशवे युस्ड टू स्टे हिअर, ते?"
" हं .."
"अच्छा, सॅटर्डे अपार्टमेंट.. ओके..
अरे ते अपार्टमेंट नाही बेटा, इट इज या टाईप ऑफ कॅसल."
" ओह बेटा?.. मी डॅड चा बेटा व्हर्जन का..? ...."
" हाहाहा.."
"नाही.. पण तो शनिवार किल्ला नाही. वाडा असंच म्हणायचं. किल्ला जनरली डोंगरावर असतो .
"अरे वाड्याच्या भिंती तर बघ.. फोर्ट्रेस से कम नही.."
"यप... अँड नारायण वॉज ऑर्डर्ड टू किल्ल बाय हिज अंकल. हो ना डॅड?
"होय "
अँड हिज घोस्ट स्टील हॉन्ट्स धिस प्लेस. हो ना ?
" येस, असं म्हणतात."
" तसं तर किल्ल्यात भुतं असतातच. स्कॉटलंडमध्ये भुतांचं पॉप्युलेशनच जास्त आहे. सगळ्या किल्ल्यात भुतं आहेत. मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स भूत आहे. नो, व्हॅम्पायर."
" व्हाईट हाऊस मध्ये लिंकनचं भूत आहेच की. शिवाय ट्रान्ससिल्वेनियाला काऊंट ड्रॅक्युला आहे."
" डॅड..? लिंकन वॉज किल्ड इन थिएटर. मग भूत व्हाईट हाऊस मध्ये कसं? त्या हिशोबाने केनेडी पण भूत असायला पाहिजे व्हाईट हाऊस मध्ये.. केनेडी अँड लिंकन यांच्यात बरंच साम्य होतं."
" यू हॅव अ पॉईंट देअर ."
" एनीवेज, कुठल्या साली नारायणरावांचा खून झाला गं?"
"१७७३."
'ओ माय गॉड! आता सव्वा चारशे वर्षानंतर सुद्धा हीज घोस्ट एग्झिस्ट्स...! "
"मेनी घोस्टस... . नारायणराव आणि अनेक लोक मारले गेले. इट वोज अ मॅसाकर"
" शिकागोचा वॅलेन्टाईन डे मॅसाकर तसा? "
"होय. इट वोज अ फेस्टिवल. अनंत चतुर्दशीला झाली ही कत्तल ."
" इन्डीड!!! टेल मी स्टोरी..! ."
" पेशवे बाळाजी बाजीराव, एकेए नानासाहेब, यांचा धाकटा मुलगा नारायणराव. याचा थोरला भाऊ विश्वासराव, ऍन एअर टू द थ्रोन डाईड इन पानिपत बॅटल ऑफ १७६१. "
" वेट.. वेट.. वेट .... हे किंग्डम मराठा असताना पेशवे, हू वेर ब्राह्मीन्स, ज्यांनी फक्त कर्मकांड करायला हवे, लढाईवर कसे काय जायचे? मराठा किंग्स का जात नव्हते?"
" अरे तसं नाही. पेशवे पंतप्रधान होते. प्राईम मिनिस्टर. संपूर्ण ऍडमिन,आर्मी सकट त्यांच्याकडे होतं शिवाय ते स्वतःचं सैन्य बाळगून होते."
"अच्छा, म्हणजे पुतीन कडे जसं वॅग्नर ग्रुप आहे तसं .."
' हा हा हा . पण प्रिगोझिन रशियाचा पी.एम.नव्हता."
" यस यस... ओके मग काय झालं ?"
" मधला भाऊ माधवराव बिकेम पेशवा. मृत्यूपूर्वी माधवराव अँपॉईंटेड नारायणराव ऍज नेक्स्ट पेशवा जे अंकल रघुनाथरावांना आवडले नाही. एकदा नारायणराव नाशिकला गेले तेंव्हा काकांनी कूदेता केले पेशवा होण्यासाठी आणि हैदर अलीला, जो कर्नाटकात राजा होता त्याला मदत करायला बोलवले. वेन नारायण न्यू धिस ही हाऊस अर्रेस्टेड अंकल."
" मग ?"
"अंकल्स वाइफ आनंदीबाई अँड देअर शार्ज-द-अफेअर तुळाजी पवार हॅच्ड. कोंस्पिरसि."
" नाव आनंदीबाई? पण नवऱ्याला पेशवेपद मिळालं नाही म्हणून दुःखी बाई.. नाव सोनुबाई ...... बरं.. मग?"
" त्यांनी सुमेरसिंग, हू वोज चीफ सेक्युरिटी ऑफिसर आणि इतर लोकांना लाच दिली. तुळाजी पवारनं सुमेरसिंगला फितवला. सुमेर म्हणाला कि नारायणरावांची धरपकड करायची असेल तर आय वॉन्ट लेटर साईन्ड बाय अंकल अँड हॅन्ड डिलिव्हर्ड. मग तसं पत्र तयार केलं आणि ते घेऊन तुळाजी सुमेरकडे निघाला तेंव्हा हॅपी वूमन इंटरसेप्टेड आणि मग "धरा" या शब्दातला "ध" खोडून "मा" केला. धरा चे मारा झाले."
" ओ माय गॉड !!!"
"१७७३ च्या अनंत चतुर्दशीला सुमेरसिंग,द आर्म्ड सेक्युरिटी चीफ त्याच्या स्टाफ सकट वाड्यात घुसला आणि सगळे गोंधळ करायला लागले . पे अवर पेंडिंग सॅलरी असा गलका करत नारायणरावाच्या दालनात आले . नारायणराव जिवाच्या भीतीने त्यांची दुसरी काकू, सदाशिवरावज वाइफ , पार्वतीबाई यांच्या दालनात गेले . पार्वती बाईंनी त्यांना रघुनाथराव यांच्याकडे जायला सांगितले. ते रघुनाथरावांकडे, "काका मला वाचवा" असे ओरडत पळत आले पण सगळे गारदी, द सेक्युरिटीज्, नारायणरावांच्या मागोमाग काकांच्या दालनात घुसले, तुळाजी पवारने त्यांना खेचले तर सुमेरसिंगने त्यांचे तुकडे तुकडे केले."
" अरेरे .. असं वाटतं २२-११-६३ मधल्या जेम्स फ्रँको सारखं टाईम मशीन मध्ये बसून तो जसा केनेडी मर्डर टाळायला जातो तसं जावं आणि अव्हॉइड नारायण किलिंग.."
" अरे किती जणांना वाचवणार? या कापाकापीत नारायणरावांसह सात ब्राह्मीन्स ,दोन मराठा नोकर आणि दोन दासी यांनाही मारले . धिस मॅसाकर वोज डन इन हाफ अवर. दुपारी एकला. नारायणरावांच्या शरीराचे तुकडे एका मातीच्या घड्यात भरले. वाड्याच्या नारायण दरवाज्यातून बाहेर आणून इथल्या मुठानदीच्या काठावर लास्ट राईट्स वेर परफॉर्मड इन द मिडनाईट . द कलप्रिट्स इन धिस क्राईम वेर चोवीस ब्राह्मण, दोन सारस्वत, तीन प्रभु, सहा मराठा, एक मराठा दासी, पाच मुस्लिम आणि आठ नॉर्थ इंडियन हिंदुज."
"त्याना मुक्ती द्यायला कुणीच कसा प्रयत्न केला नाही?"
" केला ना ..., दुसऱ्या बाजीरावाने अरोऊंड द सिटी हजारो आंब्याची झाडे लावली आणि ब्राह्मण आणि धार्मिक संस्थांना देणग्या दिल्या विथ द होप दॅट द घोस्टस वुड फाईन्ड सोलेस अँड बी सॅटिसफायीड."
" ओहो,.. पण हे सगळं करणारे त्याचे अंकल, ऑन्टी, दे वेन्ट स्कॉट फ्री ऑर व्हॉट?"
" नाही. रामशास्त्री प्रभुणे, द चीफ जस्टीस अवार्डेड डेथ सेन्टेन्स बट हि वोज डिसमिस्ड बाय अंकल . लॅटर व्हेन नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव, विथ द हेल्प ऑफ नाना फडणवीस आणि सखाराम बोकील पेशवा झाला तेंव्हा दे रिइन्स्टिटेड चीफ जस्टीस. अंकल मग इंग्रज लोकांच्या आश्रयाला गेले. नंतर द कपल रॅन अवे."
" थांब.... मी माझा सेल्फी काढून राघवेंद्र अंकलला पाठवतो आणि सेव्ह मी म्हणतो. बघू काय रिप्लाय देतात ते."
"हाहाहा ... ओके...."
" पण मॉम, वेर वोज नारायणस् मदर ऑल धिस टाइम?"
" जगातली सर्वात दुःखी बाई तीच असावी. गोपिकाबाई, अ क्वीन वन्स, आऊटलिव्हड हर हजबंड, थ्री सन्स, एक युद्धात मेला, दुसरा क्षय रोगाने आणि तिसऱ्याचे तुकडे झाले, अँड बिफोर डेथ शी वेन्ट ऑन बेगिंग हाऊस टू हाऊस."
" व्हॉट अ ट्रॅजेडी .... मला असं वाटतं की शनिवार वाड्याचं नाव मंगळवार वाडा ठेवायला हवं होतं. सगळं मंगल झालं असतं.."
"१० जानेवारी १७३० ला जेंव्हा भूमिपूजा झाली त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा नाव ठेवलं असं म्हणतात."
" हे लेट मेडीवियल पिरिअड म्हणजे भारतात खरंच अंधारयुग. नुसत्या लढाया, ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच, ब्रिटिश विरुद्ध मुघल, ब्रिटिश विरुद्ध मराठा, ब्रिटिश विरुद्ध टिपू सुलतान, त्याचा बाप हैदर अली..... मुघल- मराठा, मराठा-टिपू, कत्तली आणि अंधारकोठडी."
" हो ना....आधुनिक युग तर १८५७ पासून पुढेच."
" लुक, राघवेंद्र अंकल म्हणतात पीएनजीत सेव्ह करतो. "
" फोन आण, मी पीएन चं जेपी करते.
"किंडा धचामा?"
धचामा? हाहाहा...चांगला शब्द आहे रे.. होय, धचामाच, पण चांगल्या कामासाठी....! जेपी त डेटा कमी लागतो."
.....
प्रतिक्रिया
पास.
स्वारी - पण मराठीत लिहिलेलं इंग्रजी वाचताना प्रचंड कष्ट होतात - तेव्हा सलग वाचता आला नाही हा धागा.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
.
हे मराठीचेच नवे (कदाचित प्रादेशिक?) रूप आहे, असा काहीसा दावा असावा, अशी शंका येते.
ते जर खरे असेल, तर,
हे असे मराठी बोलणाऱ्या जमातीला (तथा पिढीला), नारायणराव पेशवा म्हणून कोणीतरी अस्तित्वात होते, आणि ते शनवारवाड्यात राहात होते, हे मूलभूत ज्ञान असण्याची शक्यता शून्यवत् वाटते. तसेच, ही जमात आणि/किंवा पिढी शनवारवाड्याचे भाषांतर 'सॅटर्डे अपार्टमेंट' वगैरे करण्याच्या भानगडीत पडेल, असे वाटत नाही; अगदी 'शनवारवाडा' नाही, तरी गेला बाजार 'शनिवारवाडा'च म्हणेल. ('सॅटर्डे अपार्टमेंट' वगैरे करण्याची मुळात गरजच कोणाला नि काय म्हणून पडली असेल? लेकीचे बाळंतपण करण्यासाठी पुण्यातून वाशिंटनला गेलेल्या (आणि तेवढ्या भांडवलावरून नि तज्जन्य अपुऱ्या माहितीच्या आधारावर 'मुक्तपीठा'त अमेरिकेविषयी भरभरून लेख पाडणाऱ्या) पुणेरी काकू, वाशिंटनात लेकीजावयासोबत व्हाइट हाउस पाहताना "अच्छा, 'पांढरा वाडा'... ठीक आहे..." वगैरे म्हणतात का? नि त्यांची लेकसुद्धा "अग आई तो वाडा नाही काही... घर... एका प्रकारचे मोठे घर..." म्हणून लगेच दुरुस्ती करते का?)
थोडक्यात, लेख केवळ एका ठराविक (नक्की कोणत्या, परमेश्वर जाणे!) डेमोग्राफिकची खिल्ली उडविण्यासाठी ओढूनताणून लिहिलेला असून, (त्यातसुद्धा) प्रचंड गंडलेला आहे.
लेख तसा चांगला आहे. देवनागरी
लेख तसा चांगला आहे. देवनागरी इंग्रजी टंक लेखन व वाचन दोन्ही कठिण आहे, पुढे the potato society (बटाट्याची चाळ) घ्या
लेख आवडला. जैसी दृष्टी तैसी
लेख आवडला. जैसी दृष्टी तैसी सृष्टी. त्यात काही गैर नाही.