शिक्षित मध्यम वर्ग: मतदान करा
(काही सत्य, काही कल्पना)
देशात लोकशाहीला सदृढ करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. जर एक मोठा वर्ग मतदानापासून दूर राहील, तर त्यांना नको असलेले अयोग्य व्यक्ति ही सत्तेवर येतील. पण शिक्षित मध्यम वर्ग मतदान करण्यात सर्वात जास्त आळशी आहे. मतदान न करण्यासाठी त्याच्या पाशी शेकडो बहाणे आहेत.
माझे एक परिचित मित्र निवृत झाल्यावर 100 घरांच्या एका ग्रुप हाऊसिंग सोसायटी मध्ये अध्यक्ष झाले. लोकसभा निवडणूकी पूर्वी दोन की तीन महीने आधी ते एका कामासाठी स्थानीय कोर्पोरेटर कडे गेले होते. कोर्पोरेटर बोलता बोलता त्यांना म्हणाला तुमच्या सोसायटीतले लोक मतदान करत नाही. आज ईव्हीएम असल्याने प्रत्येक बूथ वर किती मतदान झाले हे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना माहीत असते. बूथ मध्ये बसलेल्या पोलिंग एजेंट जवळ मतदाता यादी असते. त्या यादीत मतदान करणार्यांची पूर्ण माहिती असते. त्याच्या मतदान यादीचा उपयोग प्रत्येक पार्टी पुढील निवडणूकीसाठी रणनीती तैयार करण्यासाठी वापरते. या शिवाय आपले मतदाता कोण आहे, कोणत्या भागातील समस्या सर्वात आधी दूर करणे गरजेचे, हे ही ठरविता येते.
या सोसायटीत सरकारी नौकरीतून निवृत पेन्शन भोगी, सरकारी कंपन्यांमध्ये काम करणारे, मोठ्या पदांवर असणारे, डॉक्टर, इंजींनियर, उद्योगपती आणि काही दुकानदार ही राहतात. सर्वच किमान स्नातक आणि अधिक शिक्षित आहेत. अध्यक्ष ही 1990 पासून तिथेच राहत होते.
येत्या लोकसभेच्या निवडणूकीत आपल्या सोसायटीतून किमान 70% टक्के मतदान झाले पाहिजे, हे मॅनिजिंग कमिटीने ठरविले. महिना भर आधी मतदान यादी ऑनलाइन तपासली. सर्वांची नावे होती. पण 290 पैकी 50 तरुण मतदाता शिकून रोजगार साठी पुणे, बंगलोर, हैदराबाद, मुंबई इत्यादि ठिकाणी स्थायी झाले होते. त्यांची नावे अजूनही इथल्या यादीत होती. काही तर दहा-पंधरा वर्षांपासून बाहेर असून ही त्यांनी तिथल्या मतदान यादीत नाव टाकले नव्हते. अध्यक्षांनी सर्वांच्या घरी जाऊन आणि फोन करून त्यांना इथल्या यादीतून नाव कापून, राहत्या जागी मतदान यादीत नावे टाकण्याची विनंती केली. दिल्लीत येऊन मतदान करण्याची ही विनंती केली. दिल्लीच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे प्रचार साहित्य ही प्रत्येक फ्लॅट मध्ये वाटू दिले. निवडणूकीच्या दिवशीही सोसायटीच्या सर्वांना मतदान करण्याची अनेक वेळा विनंती केली.
अध्यक्षांना वाटत होते यावेळी मतदान भरपूर होईल पण सोसायटीच्या उपस्थित 240 पैकी फक्त 90 मतदारांनी मतदान केले. बाहेर राहणार्यांनी न तर नाव कापले, न दिल्लीत येऊन मतदान केले. मतदानाच्या एक दिवस आधी दहा ते पंधरा परिवार दिल्लीतून बाहेर गेले. त्यांना सुट्टीचा उपयोग मौज मस्ती साठी करणे जास्ती योग्य वाटले. काहींच्या मते, मी निवृत झालो तरीही मला पेन्शन वर आयकर भरावा लागतो. तिकडे सरकार फ्री बी वाटते. कुणीही आले तरी हे बंद होणार नाही. मतदान करून फायदा काय. आम्हाला धंध्यासाठी अनेक सरकारी बाबूंना रिश्वत द्यावी लागते. मतदान करण्याचा आम्हाला काहीही फायदा नाही. सर्वच चोर आहेत, म्हणून आम्ही मतदान करणार नाही, इत्यादि इत्यादि. ही कथा एका सोसायटीची नाही तर दिल्ली, नोयडा ठिकाणच्या जवळपास सर्वच सोसायटींची आहे.
दिल्ली असो की मुंबई, शिक्षित मध्यम वर्ग सर्वात कमी मतदान करतो. पण सरकारी योजनांचा आणि नीती नियमांचा सर्वात जास्त फायदा आणि नुकसान मध्यम वर्गालाच होतो. देशात शांतता राहील, आधारभूत सुविधांचा विकास होईल तरच नौकर्या वाढतील, उद्योग धंधे वाढतील. मध्यम वर्गाची आर्थिक स्थितीत आणिक सुधारणा होईल.
महाराष्ट्रात येत्या 20 तारखेला मतदान आहे. यावेळी तरी शिक्षित मध्यम वर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सरकार निवडण्यात त्यांचे मत महत्वपूर्ण ठरले पाहिजे. बाकी एका हिन्दी कविनुसार, जे मौन राहतात, त्यांना ही काळ शिक्षा करतो.
प्रतिक्रिया
लोकशाहीच्या हिचा घो!
लोकशाहीच्या हिचा घो!
का अनास्था आहे
मतदान करून योग्य उमेदवार निवडून दिले पाहिजेत त्या साठी मतदान केले पाहिजे .
हे वाक्य फक्त वाचायला छान वाटते.
पण स्थिती काय आहे
काही वर्षा पूर्वी थोडी तरी स्थिती चांगली होती .
चांगल्या कार्यकर्त्या ल राजकीय पक्ष उमेदवारी द्यायचे .
आता तो प्रकार च बंद झाला आहे.
ज्यांच्या कडे राजकीय जहागिरी आहे त्याच घरातील व्यक्ती ल सर्व राजकीय पक्ष सर्रास उमेदवारी देतात.
निवड करायला जागाच नाही.
निवडणुका राजकीय पक्ष निवडतात त्यांच्या कडे संघटन असते, मनी आणि musles पॉवर असते,समाज माध्यमावर प्रचार करण्याची टीम असते, .
सत्ताधारी लोकांच्या हातात प्रशासन असते, .
ह्या राजकीय पक्षांच्या समोर प्रामाणिक, ज्याला खरेच निवडून दिले पाहिजे असा व्यक्ती टिकू शकत नाही.
.किती ही लोकप्रिय असला तरी त्याला हैराण केले जाईल.
सर्व च राजकीय पक्षांचे उमेदवार बघा.
जहागिरी दिल्या सारखी ठराविक च घराणी तळ ठोकून बसलेले आहेत.
बाकी कोणाला तिकीट राजकीय पक्ष देत च नाही.
बाप एका पक्षात,सून एका पक्षात मुलगा एका पक्षात सर्व घरातील च.
लोकांनी मत कोणाला द्यायची ..
एक पण खरा लोकप्रतिनिधी होण्याच्या लायकीचा नाही.
विविध पक्षांची सरकार आली पण देशाची स्थिती आहे तशीच आहे सरकार बदलतात पण फरक बिलकुल दिसत नाही.
त्या मुळे शिक्षित लोकांनी मतदान करणे च सोडून दिले आहे.
कोणी पण येवू ध्या .
स्थिती बदलणार नाहि अशी पूर्ण खात्री आहे लोकांना
विविध पक्षांची सरकार आली पण
विविध पक्षांची सरकार आली पण देशाची स्थिती आहे तशीच आहे सरकार बदलतात पण फरक बिलकुल दिसत नाही.
गेल्या दहा वर्षांत देशात सर्वच क्षेत्रांत मग ते कृषि असो, परिवहन क्षेत्र, रास्ते रेल्वे, वीज उत्पादन, आर्थिक क्षेत्र- बँकिंग उद्योग इत्यादि. दुपट्ट ते दहा पट प्रगती झाली आहे.
शिक्षित लोकांनी मतदान करणे च सोडून दिले आहे. मतदान न करणारे फक्त बिनडोक साक्षर आहेत. शिक्षित नव्हे. शिक्षित व्यक्ति नेहमी मतदान करतो.
सध्या तरी मनी आणि मसकल पावर आपल्या देशात जास्त चालत नाही. अमेरिके सारखे मतपेटी जाळल्या जात नाही. की नकली मतदान पत्र छापून वोटिंग होत नाही.
आज जो पक्ष जास्त नवीन उम्मेदवार देतो त्याची जिंकण्याची श्क्यता जास्त. नुकतेच हरियानात भाजप ने 40 पैकी 25 चे तिकीट कापले आणि निवडणूक जिंकली. दिल्लीत ही हेच केले होते. महाराष्ट्रात ही विभिन्न पक्षांचे नवीन उमेदवार या वेळी जिंकणार.
>>>गेल्या दहा वर्षांत देशात
>>>गेल्या दहा वर्षांत देशात सर्वच क्षेत्रांत मग ते कृषि असो, परिवहन क्षेत्र, रास्ते रेल्वे, वीज उत्पादन, आर्थिक क्षेत्र- बँकिंग उद्योग इत्यादि. दुपट्ट ते दहा पट प्रगती झाली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थोडा संयम,एमोशन बाजूला ठेवून लिहीत जा
मुंबई ते माझे गाव सातारा जिल्हा मध्ये .
जाण्यासाठी मोदी सरकार येण्याच्या अगोदर 4 ते पाच तास लागत होते.
एक्स्प्रेस way,पुण्यातील बायपास मुळे .
आज 7 ते 8 तास लागतात.
इतकी वाईट अवस्था झाली आहे
दुनिया प्रगती करते आपला देश अधोगती कडे जात आहे
शेती अधोगती कडे.
शहर कचरा कुंडी बनत आहेत.
ग्रामीण भाग ओसाड होत आहे .
ग्रामीण अर्थव्यवस्था जी काँग्रेस काळात महाराष्ट्र ची खूप उत्तम होती ती बलाढ्य ग्रामीण अर्थ व्यवस्था शेवटच्या घटका मोजत आहे.
इतके च खूप झाले .
मोदी काळात प्रगती नाही अधोगती तीव्र वेगाने होत आहे
प्रगती फक्त प्रिय उद्योग पती,प्रिय मीडिया घराणी ह्याचीच होत आहे.
आणि अंधभक्त ना शिल्लक राहिलेला शिंतोडा मिळत आहे
गेल्या दहा वर्षांत देशात