मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (9)

संगणकं आपला ताबा घेतील का?

आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदूच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोंची रचना – थोडक्यात एआय (Artificial Intelligence) – आघाडीवर आहे.

एआय आज ज्या पातळीवर आहे त्याच पातळीवर पुढील काळातही राहील याची खात्री नाही. 2050 पर्यंत एआय मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकून पुढे जाणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यातील काही तज्ज्ञ तर ही तारीख 2030 सुद्धा असू शकेल, असे म्हणत आहेत.

सर्वांत प्रथम आपण आपल्याला जितके बुद्धिमान समजत होतो तेवढे नाही, हे मान्य करायला हवे. हेच जर खरे असेल तर त्याचे अनेक परिणाम होतील. मानवाच्या एकल अवस्थेचा (singularity) पडदा केव्हाच फाडला गेला आहे. मानवाचे ‘एकमेवाद्वितीयते’चे आसन डळमळीत झालेले आहे. परंतु यामुळे नेमके काय होईल, याची मात्र कुणालाच कल्पना नाही. हे म्हणजे झुरळांनी वा मांजरानी मानवी तंत्रज्ञानाचे भविष्य वर्तविल्यासारखे होईल. अशी स्थिती असली तरी भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेणे थांबलेले नाही.

एका तज्ञांच्या मते, चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एखाद्या गुप्त प्रयोगशाळेतील मॉन्स्टरसदृश एआय भस्मासुर आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला भस्मीभूत करण्याआधीच एआयशी दोस्तीचा हात मिळवून मानवाच्या सर्व व्यवहारांत त्याचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे अर्थातच सोपे नाही. तरी कल्पना करू, हे जरी शक्य झाले तरी आठवड्यातील सातही दिवस व दिवसातील २४ तास अव्याहतपणे न चुकता कार्य करू शकणाऱ्या एआय बरोबर आपण कसे काय स्पर्धा करू शकतो? या पुढील पिढीतील एआयची उडी फार मोठी असणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व ललितकला, साहित्य इत्यादी क्षेत्रातील त्यांचे प्रावीण्य आपल्यापेक्षा कित्येक पट जास्त होणार असल्यामुळे ते आपल्याला सहजपणे मागे टाकतील.

आपणच जन्माला घातलेल्या या बाहुल्या आपल्याच जिवावर उठतील आणि आपल्याला विस्थापित करतील. काही का असेना, एआय या जगावर सत्ता गाजविणार हे मात्र नक्की. यातही एक अंधुकसा आशेचा किरण आपल्याला दिसतो. रोबोंची शरीरयष्टी माणसासारखी नाजूक व कमकुवत नसल्यामुळे ते फक्त पृथ्वीवरच राहतील याची खात्री नाही. त्यांच्यासारख्यांना हजारो वर्षांचा अंतरिक्षातील प्रवास कठीण नाही. त्यामुळे स्वत:ची अक्कल वापरून दूर कुठल्यातरी ग्रहावर वा कुठल्यातरी ग्रहाच्या उपग्रहावर जाऊन राहू लागतील. तेथील प्रदूषणविरहित शांत वातावरणात ते आणखी चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील. त्याच्याशी आपले कुठलेही वैर नसल्यामुळे व आपण त्याच्याशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे एआय यंत्रमानव आपल्याला पूर्णपणे नष्ट करण्याची शक्यता कमी वाटते. आपण त्यांची बरोबरी करू करणार नाही, त्याच्यावर कुरघोडी करणार नाही. त्यामुळे आपण जसे किडा मुंग्यांना जगण्यास मुभा देतो तसे ते आपल्याला जगू देतील. कदाचित हे यंत्रमानव एका कुठल्यातरी दीर्घिकेवर स्थलांतरित होतील व या धोक्यात असलेल्या पृथ्वीवर आपल्याला आहे तसेच -आपल्या अस्तित्वाची दखल न घेता- राहू देतील. फार फार तर या पृथ्वीला मानवी अभयारण्य असे समजून केव्हातरी अधून मधून मजेखातर भेट देत राहतील. वरील वर्णनावरून उघडच आहे की अशा परिस्थितीत मानवी अस्तित्वाला काही अर्थ राहणार नाही. मुळात मानवाला इतर कुणीतरी कमी क्षमतेचा, ‘ढ’ म्हणून वागवलेले अजिबात आवडणार नाही. कदाचित कामेच्छा, व्यसनाधीनता व मनोरंजनाच्या भन्नाट कल्पना यांच्या आधारावर मानव प्राणी स्वत:ला प्राणी जगतात सर्वश्रेष्ठ मानून सत्ता गाजवीत आहे. परंतु एआय मात्र माणसाला या घमेंडीतून बाहेर काढणार आहेत. तरीसुद्धा आपल्यातील काही मोजके जण विज्ञान, तंत्रज्ञान व कला यासंबंधीचे प्रयोग करीतच राहतील. जरी त्यांची ही सर्जनशील कृती एआयपेक्षा निकृष्ट दर्जाची व टाकावू असली तरी त्यापासून आनंद मिळत असल्यास माणसे ते करीतच राहतील.

कदाचित एआय यंत्रमानव आपल्याला प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसारखे जगू देतील. शक्य झाल्यास मानवाने स्वत:च आपली बुद्धिमत्ता वाढवावी, क्षमता वाढवावी या अपेक्षेने एआय सोई सवलती देतील, प्रशिक्षणाची व्यवस्था करतील. माणसेही हळू हळू बदलत बदलत त्यांच्या इतके बुद्धिमान होण्याचा प्रयत्न करीत राहतील. त्यामुळे आता आपल्यासमोर दोन पर्याय असतील: एक माणसासारखे जगत जगत एका दिवशी मृत्यूला कवटाळणे किंवा अती बुद्धिमत्ता असलेल्या मशीनप्रमाणे जगत राहून अजरामर स्थितीस प्राप्त होणे.

क्रमशः
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1) , प्रश्न (2), प्रश्न (3), प्रश्न (4), प्रश्न (5) प्रश्न (६) , प्रश्न (7), प्रश्न (8)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काहीसे निरर्थक आणि वास्तवाला सोडून केलेलं भविष्यरंजन. लेखकाने ए०आय० ची ताकद फारशी अजमावली आहे असे वाटत नाही.

कोणतेही लोकोत्तर तंत्रज्ञान अतिशय वेगाने मानवी समाजाची दोन ढोबळ गटात विभागणी करते - तंत्रज्ञान स्वीकारून त्यावर आरूढ होऊन आपला उत्कर्ष साधणारा एक गट आणि या ना त्या कारणा तंत्रज्ञानापासून दूर राहणारा आणि नंतर स्वत:च आऊटडेट होणारा.

संगणक आणि नंतर इंटरनेट आले तेव्हा अनेक लोक आम्ही हे वापरत नाही, असं मोठ्या अभिमानाने सांगत असत. आज असंच ए०आय० बद्दल सांगता येतं.

मला स्वत:ला ए०आय० उत्पादकता आणि कल्पकता वाढविण्याचे उत्तम साधन वाटते. ओपन ए०आय० चे लोकार्पण झाल्या दिवसापासून मी ए०आय०ची घोडदौड जवळजवळ रोज बघत आहे. पैसे टाकून ए०आय० च्या सेवा वापरत आहे.

एक नक्की सांगू शकेन जे ए०आय० स्वीकारणार नाहीत त्यांच्या सारखे दूर्दैवी कोणीही नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

AI म्हणजे नेमके काय आणि त्याचा नेमका वापर कोणत्या क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे करता येतो आणि केला जातो याबद्दल एकूणच खूप गैरसमज आहेत. तो मानवांवर कब्जा करेल हे एक असेच पिल्लू खूप लोकप्रिय आहे.

शिवाय अजून एक शाप AI ला आहे तो म्हणजे आताशा सर्वच क्षेत्रांत आणि कंपन्यांत अशी काहीशी समजूत दृढ होऊ लागली आहे की AI हे सर्व समस्यांवर एक जालीम अक्सीर इलाज आहे. तो आणला की सर्व उत्कृष्ट चालणार आहे.

असे नसते. AI केवळ निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतो. कंपनीचे कल्चर, वर्क फ्लो, संरचना, तत्वे हे सर्व मुख्य असते. AI केवळ काही विशिष्ट बाबतीत मदत करतो. आणि त्यात तो अफलातून आहे. मेंदूचा वेग तितका असणे शक्य नाही म्हणून तो वापरायचा. फायदा करून घ्यायचा. भीती तर आगीपासून देखील असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1) जशी मोटार गाडी,पंखे ,ट्रॅक्टर,फॅक्टरी मधील मशनिरी तसेच Ai वर आधारित उपकरण आहेत .काही ही फरक नाही.
२) यंत्रणांचा वापर कमर्शिअल कारणासाठी च केला जातो.

यंत्र निर्माण करणारे ते यंत्र विकून पैसे कमावतात आणि यंत्र वापरून बाकी लोक पैसे कमावतात.
हेतू एक च संपत्ती निर्माण करणे.
Ai आधारित सर्व यंत्र न मागे पण तोच हेतू आहे ,पैसे कमावणे.

जे विकले जाणार नाहि ते नष्ट होणार हाच नियम AI आधारित सर्व उत्पादनाला पण लागू आहे.

३) माणसाला भावना आहेत आणि त्या नैसर्गिक पने प्रत्येकाच्या वेगळ्या असतात,.
माणसं कल्पना करू शकतात अस्तित्वात नसलेल्या वस्तू विषयी पण माणसं कल्पना करू शकतात.
तसे AI आधारित यंत्र मानव अस्तित्वात नसलेल्या कोणत्या ही गोष्टी विषयी कल्पना करू शकत नाही.
त्याला जो डेटा पुरवला आहे त्या वर आधारित च त्याच्या कल्पना असतात, त्याची बौद्धिक कुवत तितकीच आस्ते त्या पलीकडे नाही.

माणूस कल्पना करू शकतो हीच माणसाची सर्वात मोठी ताकत आहे आणि सर्वात मोठे वेगळेपण आहे .
ते AI आधारित यंत्रमानव मध्ये कधीच येणार नाही.
४) माणूस रेप्रॉडक्शन करू शकतो ,माणसाचा मृत्यू होतो .
ही दुसरी ताकत माणसात आहे (सर्व साजीवत आहे)
पण यंत्रमानव ही क्षमता नाही .
माणसाचा मृत्यू होतो आणि मुलं जन्माला येते म्हणजे .
कल्पना , शिळ्या होत नाहीत नव नवीन कल्पना काळानुसार तयार होत असतात.
त्या मुळे नवीन शोध लागत असतात.
यंत्र मानव मरणार नाही त्याला मृत्यू नाही म्हणजे त्याच्या कडे जी काही माहिती असेल तीच त्याच्या कडे असेल नवीन काही तो निर्माण करू शकणार नाही.
आणि त्याला मुलं पण होत नाही म्हणजे नावीन्य नाही.

काही ही नवीन निर्मिती होण्याची शक्यता अशा स्थिती मध्ये झीरो असते.

( जितकी जास्त लोकसंख्या तितकी नवीन अति तेज बुध्दीमत्ता असणारे मानव निर्माण होण्याची शक्यता जास्त .
हे पण सत्य च आहे)

यंत्रमानव माणसांपेक्षा वेगाने काम करू शकतील का?
तर ह्याचे उत्तर हो असेच आहे.

यंत्रमानव मानवापेक्षा जास्त बलवान असतील का?
तर त्याचे उत्तर हो असेच आहे.

यंत्र मानव माणसापेक्षा वरचढ च असतील .
काम करण्यात,लढाई करण्यात,वेगाने काम करण्यात.

यंत्रमानव च वापर करून काही माणसं च बाकी माणसांवर च सत्ता गाजवू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.
आणि सामान्य माणूस त्यांचा प्रतिकार करू शकणार नाही हे पण सत्य आहे.

पण पूर्ण मानव जात यंत्रमानव वापरून कोणीच नष्ट करणार नाहि.
अगदी साधं उदाहरण.

गुंड लोक व्यापारी जनता ह्यांना धमकी देवून हफ्ता वसूल करतात पण गुंड कधीच कोणताच व्यवसाय बंद करत नाहीत.
कारण व्यवसाय बंद करणे म्हणजे हफ्ता बंद.
ह्या उदाहरण नुसार च यंत्रमानव च वापर माणसं विरूद्ध माणसचं करतील.
मरू देणार नाहीत पण जगावे त्यांच्या नियमाने लागेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतांश मुद्दे मार्मिक. योग्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नुकतेच हरारीचे नेक्सस ऐकून संपविले. पण पुन्हा एकदा छापील पुस्तक वाचावे लागेल.

नेक्ससमुळे झालेले माझे ढोबळ आकलन असे की ए. आय. हे तंत्रज्ञान अफाट ताकदीचे आहे त्यावर नियंत्रण आणून (पॉलिसीज वा इतर मार्गाने) त्याचा वापर भल्यासाठीच कसा करता येईल हा मुख्य प्रश्न आहे. खास करून पर्यावरण बदलामुळे असलेला धोका वा विध्वंसक हत्यारे वापरली जाण्याचा धोका लक्षात घेता.

लेखकाचे मत असे आहे की, सोशल मिडिया संदर्भातले ए. आय मॉडेल्स (प्रारूप) काय करू शकतील याची कल्पना मॉडेल्स डेव्हलप करणार्‍यांना नव्हती. कंपन्यांचे उद्दिष्ट इतकेच होते की, वापरकर्ते अधिकाधिक गुंतून राहावेत (यूजर इंटरॅक्शन मॅक्झिमायझेशन) आणि त्याद्वारे कंपनीचा खप (रेव्ह्यून्यू) वाढावा. ए. आय मॉडेल्सला त्याचे उद्दिष्ट कळले पण ते साध्य करण्यासाठीचा मार्ग नैतिक आहे की नाही याच्याशी मतलब नव्हता. "लोकं सहृदयता, 'चांगली वा नॉर्मल पोस्ट' यावर जितके गुंततात त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात द्वेष वा द्वेषावर आधारीत पोस्टवर गुंततात" हे मॉडेल आपसूक शिकले. अशा पोस्ट फीड मध्ये टाकणे ओघाने आलेच मग ती पोस्ट फेक न्यूज का असेना. ए. आय. मुळे दृकश्राव्य माध्यमातून फेक न्यूज बनविणे सहज शक्य आहे. सुरुवातीला या कंपन्यांनी रेडिओ रवांडाचे उदाहरण देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. रंवाडामधील वंशहत्येसाठी रेडिओ तंत्रज्ञानाला दोष देता येत नाही तसा सोशल मिडिया तंत्रज्ञानाला म्यानमार ते ब्राझील पर्यंत घडणार्‍या घटनांना दोष देता येणार नाही. पण अलीकडे सूर बदलतो आहे. मॉडेल्स चे उद्दिष्ट हे काळजीपूर्वक बनविले गेले पाहिजे याकडे अधिकाधिक कल होत आहे. "लोकांना जास्तीत जास्त आनंदी बनविणे" अशा स्वरूपाच्या उद्दिष्टांमुळे कदाचित फेक वा अर्धवट तत्थ्यांवर आधारीत हेट पोस्टची संख्या कमी होत जाईल. आणि एकंदर सोशल मिडिया अधिका अधिक उपयोगी बनत जाईल. अर्थात हा सगळा तत्त्वज्ञानाचा भाग होतो आणि तिथेही मतभेद आहेत. (उदा. आनंदी असणे म्हणजे नेमके काय इ.)

लेखकाने अजून एक उदाहरण दिले आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेत कंपास नावाचे ए. आय मॉडेल वर आधारीत सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यात एका खटल्याचा उल्लेख त्याने केला आहे. की, एका साध्या अपराधासाठी या सॉफ्टवेअरने एका व्यक्तीला खूप कठीण शिक्षा दिली. आता मॉडेल्सने कुठल्या आधारावर ती शिक्षा सुनावली हे सांगणे मॉडेल्सच्या निर्मात्यांनाही शक्य नाही. कारण ए आय मॉडेल हे स्वतःच शिकत (सेल्फ लर्निंग) जाणारे असल्याने, हजारो फीचर्स (घटक यादी - तुम्ही कुठला फोन वापरता, तो कधी चार्ज करता या सारख्या शुल्लक गोष्टी ते तुमचे शिक्षण, पगार इ.) मधून त्याने कुठले संबंध जोडले आहेत हे सांगणे कठीण आहे. अजून एक उदाहरण आठवते ते म्हणजे कृष्णवर्णीय स्त्री बाबत त्याने केलेला भेदभाव. मॉडेल बनविणार्‍यांना तसा भेदभाव अपेक्षित नव्हता तरीही दिलेल्या "ट्रेन डेटा सेटवरून" मॉडेल आपसूक भेदभाव करायला शिकले. लेखकाने असाही दावा केला आहे की, काहीवेळा पक्षपातीपणा डेव्हलपर्स / कंपनीच्या मालकांच्या डोक्यातूनच मॉडेल मध्ये कळत नकळत उतरत असतो. आणि एकदा का अशा स्वरूपाचे मॉडेल्स वापरात आले आणि त्याच्यावरची अवलंबिता वाढत गेली की, त्यातले दोष निवारणे महाकठीण होत जाते (जसे वर म्हटल्याप्रमाणे सोशल मिडियाचे आजचे रूप, ज्यामुळे देशो देशी जी दुफळी माजलेली आहे).

हुकूमशहा (निरंकुश - totalitarian) प्रवृत्तीला गेल्या शतकात जे शक्य नव्हते (अ‍ॅब्सोल्युट कंट्रोल आणि अ‍ॅब्सोल्युट पावर) ते आता ए. आय च्या मदतीने सहज शक्य होणार आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेपुढे एक मोठी समस्या आहे.

सरते शेवटी त्याने सिलिकॉन कर्टन (शीत युद्धातल्या आर्यन कर्टन सारखी) अशी कल्पना मांडली आहे. मिळविलेल्या 'माहिती वा कल्पनेच्या' आधारावर आपापले गट बनविणे हे पूर्वापार चालूच आहे. मग भले ती माहिती सत्यापासून खूप दूरची असेल, काळाच्या कसोटीवर टिकणारी नसेल वा अगदीच कालबाह्य असेल. त्यामुळे दोन वेगळ्या उद्दिष्टांवर आधारीत असलेल्या ए. आय मॉडेल्स मधून मिळालेल्या माहितीवर हे जग दोन गटात विभागले जाईल. चीनने यापूर्वीच गुगल, फेसबुक इ. कंपन्यांना अटकाव करून ए.आय तंत्रज्ञान स्वतः विकसित केले आहेत. वा कदाचित भारत, रशिया, युरोप यांनी वेगळी मॉडेल्स विकसित केली तर अजून वेगवेगळी बेटे तयार होत जातील. पर्यावरण बदल इ. समस्यांपुढे सगळ्यांनी परस्परांमधले मतभेद फारसे न ताणता सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे पण सिलिकॉन कर्टन मुळे जग दुभंगण्याची शक्यता अधिक असेल.

प्रोलॉग मध्ये त्याने प्राचीन रोमन कथा आणि १९व्या शतकातल्या एका कादंबरीतली कथा अशा दोन गोष्टी सांगितल्या आहेत. अफाट शक्ती प्राप्त झाल्यावर त्या कथेतले नायक विध्वंसाकडे वाटचाल करू लागतात. पण त्या त्या काळातल्या समजुतीनुसार "दैवी शक्ती" सगळे पुन्हा एकदा सुरळीत करते . ए. आय च्या रूपाने मानवाला अफाट शक्ती तर मिळाली आहे. पण ही शक्ती कशी हाताळायचे हे आव्हान आहे. इथे दैवी शक्तीच्या भरवशावर राहण्या अगोदर ए. आय. च्या भल्या बुर्‍या ताकदीचा अंदाज बांधून सावध पुढली वाटचाल केली पाहिजे असे लेखकाचे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0