इकडचं-तिकडचं

इकडचं-तिकडचं

भारतात गोरक्षण हा सध्या कळीचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच माझ्या आवडत्या DW-TV
वर एक बातमी येऊन थडकली आहे.

डेन्मार्क या छोट्या देशातील शेतकर्‍यानी गाईंच्या ढेकरातून होणार्‍या मिथेन वायूच्या प्रदूषणासाठी कर देणे मान्य केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=_s0dBrXJXuo

भारतामध्ये ही कल्पना रूजेल का?

मग मिथेन वाय़ू आणि हवामानबदल यात भारत कुठे आहे हे शोधण्यासाठी नासाचे हे कल्पनाचित्र बघितले आणि भारताचं गोवंशाकडून होणारं योगदान लक्षणीय आहे असे कळले.

https://www.youtube.com/watch?v=74_8SIkx3nA

कालच आणखी एक माहितीपट बघत असताना एक गोष्ट ठळकपणे जाणवली. भारतात कधी पर्यावरण, प्रदूषण यावर मोठी जन-आंदोलने होताना दिसत नाहीत.

https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-chi...

आणखी एक अचंबित करणारी बातमी. भारतात दक्षिणेत प्रजननाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. वास्तविक ज्या प्रदेशात आणि ज्या समाजामुळे हे शक्य झालं आहे, त्यांना पाठीवर थाप देऊन, शक्य असल्यास कर सवलती देऊन कौतूक केलं पाहिजे. पण इथे चंद्राबाबू नायडू वेगळाच सूर आळवत आहेत आणि मला ते चिंताजनक वाटते.

"Nara Chandrababu Naidu, the chief minister of the southern state of Andhra Pradesh, recently shifted his focus from promoting population control to encouraging families to have more children.

He even proposed a law that would allow only those with two or more children to run for local elections.

A few days later, another chief minister, M.K. Stalin, from the neighboring state of Tamil Nadu, echoed similar thoughts and also urged people there to have more children. "

https://www.dw.com/en/india-why-some-states-want-people-to-have-more-chi...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१) गाई,म्हैशी रवंथ करताना मिथेन वायू निर्माण होतो असे काही संशोधक म्हणत आहेत .
हल्ली paid संशोधक आणि प्रामाणिक हाडाचे संशोधक असे दोन प्रकार करावेच लागतात.
कारण paid संशोधक अस्तित्वात आहेत..
गाई म्हशी पाळणाऱ्या लोकांना कर लावला योग्य केले.

२) शहर सर्वात जास्त पाणी प्रदूषण,वायू प्रदूषण, ध्वनी प्रदुषण करतात त्या मुळे शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती वर प्रदूषण कर लावलाच पाहिजे.
३) गाड्या,विमान ,रॉकेट वायू प्रदूषण ,ध्वनी प्रदुषण करतात त्या मुळे त्यांच्यावर पण प्रदूषण कर लागलाच पाहिजे.
३) कंडक्टर निर्माण करणारे,विविध रसायन तयार करणारे,वीज निर्मिती करणारे,औषध निर्माण करणारे .
प्रचंड प्रमाणात.
वायू प्रदूषण,जल प्रदूषण करतात .
त्यांच्या वर पण प्रदूषण कर लावलाच पाहिजे.
४)माणूस ऑक्सिजन घेतो co 2 हवेत सोडतो .
म्हणजे कार्बन चे प्रमाण माणसामुळे हवेत वाढते .
त्या मुळे प्रती माणूस प्रदूषण कर पण देशांवर लागू झाला पाहिजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर लावून गायींच्या ढेकरा कमी होतात ? की त्यातील मिथेन कमी होतो? की गायीच कमी होतात की मिथेनचे हरितगृह गुण कमी होतात?

किंवा त्या करातून हवेत काही फवारणी केल्यास मिथेन नष्ट होतो का?

की फक्त दूध महाग होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कर बसविल्यास लोक अशी वाहने कमी प्रमाणात विकत घेतील (आणि लोक कमी प्रमाणात विकत घेतील म्हटल्यावर उत्पादकही त्यांचे उत्पादन कमीकमी करत जाऊन एके दिवशी कदाचित बंदसुद्धा करतील), आणि त्यामुळे प्रदूषण थांबेल (किंवा गेला बाजार कमी होईल), हा तर्क एक वेळ पटण्यासारखा आहे.

गायींना हा तर्क कसा काय लागू होऊ शकतो, हे मात्र समजले नाही.

बोले तो, कर बशिवला, तरी, गायी आपले प्रजनन थांबविणार आहेत काय? की शेतकरी/दूधउत्पादक/खाटीक गायींची पैदास कमी करणार? (हा दुसरा पर्याय कदाचित शक्य असेलही.) अरे, पण मग ते खातील काय? आणि जग खाईल काय? किंवा मग, दूध/मांस यांच्या किमती अवाच्या सवा वाढतील, त्याचे काय? (हा व्हेगनांचा कावा असावा काय? सगळ्या जगाला जबरदस्तीने व्हेगन बनविण्याचा?) आणि, तेसुद्धा मरो, परंतु, जैववैविध्याचे काय?

की, या कराच्या पैशांतून, गायींच्या उदरातील मिथेनमधून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय योजले जातील? (म्हणजे कसे? गायींच्या ढुंगणांत – आणि कदाचित तोंडांतसुद्धा – catalytic converterसारखे काही बशिवणार काय?) की, भावी उपायांवरील संशोधनावर ते पैसे खर्ची केले जातील?

(भारत-स्पेसिफिक गोगर्भमिथेनप्रदूषणसमस्येच्या निवारणार्थ भारतात गोमांसभक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा, जेणेकरून भारतीय लोक जर मोठ्या प्रमाणावर गोमांसभक्षण करू लागले, तर मग गायींची संख्या आपोआप कमी होऊन हा प्रश्न सुटेल, अशी एक सूचना करण्याचे मनात आले होते, परंतु लगेच त्याची दुसरी बाजूही लक्षात आली. बोले तो, भारतीय लोक जर मोठ्या प्रमाणात गोमांसभक्षण करू लागले, तर या नव्याने वृद्धिंगत झालेल्या मार्केटास केटर करण्यासाठी लोक गायींची पैदास अधिकच जोराने करू लागतील, जेणेकरून प्रश्न सुटण्याऐवजी फक्त वाढीस लागेल. ('आमच्या येथे फक्त झटका गोमांस मिळते', अशासारख्या पाट्या हिंदू खाटकांच्या दुकानी अभिमानाने झळकू लागतील, वगैरेवगैरे कल्पनाविलास तूर्तास आवरता घेतो.) शिवाय, इतक्या भारतीयांच्या पचनसंस्थांमध्ये जर गोमांस जाऊ लागले, तर, गायींच्या संख्येचे काय वाटेल ते होवो, परंतु, भारतीयांच्या जठरातील मिथेनच्या समस्येचा पुन्हा विचार करावा लागेल. आणि, त्यावरील उपाययोजना ही तितकीशी वांच्छनीय नसेल. (आफ्टर ऑल, आपल्या पचनसंस्थेच्या कोठल्याही टोकास कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बशिवणे हे कोठल्या भारतीयास रुचेल?) त्यापेक्षा, नकोच ते!

----------

(स्वयंस्पष्ट नसल्यास, /s. या किंवा अशासारख्या योजनांना माझा विरोध नाही. या योजनेमागील लॉजिक ज्याअर्थी मला कळलेले नाही, त्याअर्थी त्यामागे काही लॉजिक अस्तित्वात नाही, असा माझा दावा नाही. कोणीतरी त्यामागे काही विचार केला असला पाहिजे, एवढीच मला आशा आहे. तो विचार, ते लॉजिक पुढेमागे कधीतरी समजल्यास निश्चित आवडेल. मात्र, तूर्तास ते समजलेले नाही, हे मान्य करायला मला काहीही प्रत्यवाय नाही.)

----------

की फक्त दूध महाग होते?

कोठल्याही समस्येवर उपाय अमलात आणायचा, तर त्याची किंमत कोठे ना कोठे मोजावी लागणारच. त्यामुळे, दूध महाग झाल्यास नवल नाही, नि दु:खही नाही.

मात्र, या वाढीव किमतीतून (अल्पकाळात नाही तरी दीर्घकाळात) काही फायदा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे.

(तूर्तास ते गणित मला कळलेले नाही. (कदाचित, माझ्या आकलनशक्तीच्या मर्यादा लक्षात घेता, मला ते कधीही कळणार नाही, असेही होऊ शकते.) मात्र, याचा अर्थ, ते कोणालाच कळलेले नाही, अथवा मुदलात असे काही गणित नाहीच, असा होऊ नये, इतकेच.)

इत्यलम्।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक अचंबित करणारी बातमी. भारतात दक्षिणेत प्रजननाचा दर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. वास्तविक ज्या प्रदेशात आणि ज्या समाजामुळे हे शक्य झालं आहे, त्यांना पाठीवर थाप देऊन, शक्य असल्यास कर सवलती देऊन कौतूक केलं पाहिजे. पण इथे चंद्राबाबू नायडू वेगळाच सूर आळवत आहेत आणि मला ते चिंताजनक वाटते.

वाढती लोकसंख्या ही सदासर्वकाळ समस्याजनकच असते, किंवा घटता जननदर हा नेहमी चांगलाच असतो, ही समजूत बरोबर नाही. अतिवाढत्या लोकसंख्येचे जसे दुष्परिणाम असतात, तसेच अतिघटत्या लोकसंख्येचेसुद्धा असू शकतात.

'दो या तीन बस' किंवा 'हम दो, हमारे दो' हे (भारताकरिता) १९७०च्या दशकात योग्यच होते. (नव्हे, तेव्हा ते अत्यावश्यक होते.) याचा अर्थ आजही ते योग्य असेलच, असे नाही.

जननदर जर replacement rateपेक्षा खाली जाऊ लागला, तर त्याच्या वेगळ्या समस्या असतात. (काही उत्तर युरोपीय देशांना त्या आज भेडसावीत आहेत.) यात (विशेषेकरून वाढत्या आयुर्मानाबरोबर) समाजातील वृद्धांचे प्रमाण वाढत जाते, तर तरुणांचे प्रमाण कमी होत जाते. परिणामी, वाढत्या वृद्धसंख्येला अधिकाधिक सामाजिक सेवा तर लागत जातात, परंतु, त्यांना offset करायला, workforceमधील कार्यक्षम सदस्यांची (विशेषेकरून तरुणांची) संख्या घटल्याने, समाजाची एकंदरीत उत्पादकता कमी होत जाते. मग एक तर वृद्धांना तरी योग्य वेळी निवृत्त होता येत नाही (नि म्हातारपणी काम करावे लागते), किंवा workforceमध्ये बाहेरून तरुण आयात करावे लागतात. (Immigration.)

सांगण्याचा मतलब, घटती लोकसंख्या ही एका मर्यादेपलिकडे चांगली असतेच, असे नाही, तर उलट हानिकारकसुद्धा असू शकते.

(किंबहुना, 'दॉइशऽवेलऽ'च्या आपण उद्धृत केलेल्या आर्टिकलातच हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेले आहे, असे लक्षात आले.)

आता, आंध्रप्रदेशातील प्रत्यक्ष परिस्थिती (ground situation) नक्की काय आहे, याबद्दल मला कल्पना नाही. कदाचित चंद्राबाबू नायडूंना ती माझ्याहून अधिक चांगली माहीत असू शकेल, असा कयास बांधायला जागा आहे. मात्र, आजमितीस आंध्रप्रदेशातले (झालेच तर तेलंगणातलेसुद्धा) तेलुगू लोक नोकरीनिमित्ताने जेथे जगभर जात आहेत (ते ठीकच आहे; जमत असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे.), त्याबरोबर आंध्रप्रदेशात बाहेरून लोक आणावे लागू नयेत, या दृष्टीने जर त्यांनी ते विधान केलेले असेल, तर त्यात गैर असे मला काहीच वाटत नाही.

(हं, अर्थात, 'आंध्रप्रदेशातील "त्या" लोकांचा (पक्षी: मुसलमानांचा) प्रजननदर वाढतो आहे, त्याच्यावर मात करायला "आपला" प्रजननदर वाढविला पाहिजे' असले काही जर त्यांचे लॉजिक असते, तर ते अर्थातच गर्हणीय असते. परंतु, तसे काही दिसले नाही. आंध्रप्रदेशातील लोकांनी धर्मनिरपेक्षत: जननदर वाढविण्यास त्यांना काही प्रत्यवाय आहे, असे (निदान वरकरणी तरी) आढळले नाही. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५ ट्रिलीअन इकॉनॉमीची पर्यावरणीय किंमत काय याचा विचार करायची क्षमता कुणामध्येच नाहीये. हा खरा दूर्दैवाचा भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हत्ती हा बलवान प्राणी आहे आणि बुध्दीमान पण आहे पण त्याला ताब्यात घेण्यासाठी खोल खड्डा खोदला जातो.
आणि त्या खड्ड्या कडे जाणारा रस्ता बनवला जातो .

हत्तीच्या झुंडी का पाच दहा माणसं विविध आयडिया वापरून त्या ठराविक रस्त्याने खड्डा जिथे आहे त्या दिशेला घेवून जातात.

हा बलवान बुद्धिवान प्राणी त्या चक्रात फसतो आणि खड्ड्यात पडतो.

तसेच माणसांना काहीच स्वार्थी ,हुशार लोकांनी त्यांना हव्या त्या दिशेला जाण्यास प्रवृत्त केले आहे.
आज जगाची अवस्था जी बिकट आहे .
१) प्रदूषण चरम सीमेवर आहे त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे
२) पृथ्वी आता सजीव सृष्टी साठी पोषक राहण्याच्या स्थिती मध्ये नाही ह्यांची जाणीव झाल्या मुळे तुम्ही आणि तुमच्या सारखे अनेक भीती नी घेरले गेले आहात.
पृथ्वी विनाशाच्या दिषे ने जात आहे हे माहीत असून पण स्वार्थासाठी गप्प होते

मी अनुभवलेले एकमेव उदाहरण .

कीटक नाशक,रासायनिक खत, संकरित बियाणे, ह्याचा वापर करावा म्हणून विविध देशातील सरकार नी पूर्ण ताकत लावली होती आज.त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.
राक्षस मोठा झाला आहे .
.

आज आता माग फिरणे शक्य नाही अशी अवस्था जगाची .
मोजक्याच २ ते ३ टक्के लोकांनी केली आहे.

विनाश अटळ आहे .
म्हासी वर कर लावा किंवा गाई वर
वेळ निघून गेलेली आहे.
विनाश अटळ आहे.
मी खरेच भाग्यवान आहे योग्य वेळी जन्म घेतला .
पुढच्या पिढी चे भवितव्य अत्यंत लाजिरवाणे असेल.

आणि ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त दोन तीन टक्के अति शाहणे ,अती स्वार्थी लोक आहेत
अजून पण पृथ्वी .
वनस्पती,पीक ह्यांची वाढ होवून देत आहे.
भविष्यात पूर्ण नापीक होवू शकते .
माणसं न मुळे.
आज पण आपण श्वास घेवू शकतो.
भविष्यात हवेतील ऑक्सिजन चे अस्तित्व च नष्ट होईल .
विनाश अटळ आहे .
त्या मुळे मुलं नको.त्यांचे आयुष्य धोक्यात नको.
आणि आज जे हयात आहेत त्यांनी सर्व गोष्टी विसरून लाईफ एंजॉय करा .
काय माहित तुमचीच ही शेवटची माणसाची पिढी असेल

काही हत्ती ना अजून वाटत .
विज्ञान ह्या काल्पनिक शक्ती कडे सर्व उत्तर आहेत.
साफ चूक आहे.
आज पण कॅन्सर बरा होत नाही.
नापीक जमिनी आज पण सुपीक होवू शकत नाहीत.
गंगा नदी आज पण प्रदूषित आहे विज्ञान कडे काही मार्ग नाही.
विज्ञान नावाची कथित्त कल्पना तुम्हाला कोणत्या ही संकट पासून वाचवू शकत नाही.
सुनिता विलियम अजून अवकाशात च अडकलेली आहे.
कोणताच मार्ग कोणाकडे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज पण कॅन्सर बरा होत नाही.

किंचित असहमत! प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास, जीवनशैली बदलल्यास कर्करोग बरा व्हायची शक्यता वाढली आहे.

https://youtu.be/CDBtguM7xLs?si=LTXI9Vej-jV6T8Sk

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राथमिक अवस्थेत कॅन्सर शोधून काढण्याची कोणतीच खात्रीशीर टेस्ट अस्तित्वात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्यावरण हानी वर कोणाला लेख लिहून व्यक्त व्हायचे असेल तर अगोदर पर्यावरण म्हणजे काय ह्या वर विस्तृत लेख लिहणे गरजेचे आहे .
कारण पर्यावरण म्हणजे काय हेच पर्यावरण वादी लोकांना माहित नसते.

निसर्गात निर्मिती बरोबर विघटन करण्याची आणि पर्यावरण साठी अनुकूल पदार्थ निर्माण्याची यंत्रणा नैसर्गिक रित्या असते.

आता गायी न ची जी संख्या आहे त्या पेक्षा किती तरी पट गायी न ची संख्या इंडस्ट्रिलायझेशन होण्या अगोदर होती.
तेव्हा का नाही मिथेन च प्रमाण वाढून पर्यावरण न ल धोका निर्माण झाला.

आता तर त्या तुलनेने खूप कमी गाई आहेत.
Ai साठी प्रचंड वीज लागते,इंटरनेट साठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागते, गूगल सर्च इंजिन खूप मोठ्या प्रमाणात वीज वापरते.

म्हणजे पर्यावरण हानी चे ज्ञान आपण ज्या माध्यमातून देतो तीच माध्यम पर्यावरणाची प्रचंड हानी करतात.
पण पर्यावरण वादी त्या वर मात्र एक शब्द बोलणार नाहीत.

मोबाईल,लॅपटॉप,ह्यांच्या दुर्मिळ धातू न च वापर होतो .
ते उत्खनन करून काढले जातात.
प्रचंड प्रमाणात पर्यावरण ची हानी होते त्या मुळे .
पण त्या वर आपण बोलत नाहीत.

गायी किंवा शेळ्या मेंढ्या मिथेन सोडतात त्या मुळे पृथ्वी चे पर्यावरण धोक्यात आले आहे ह्या प्रचार मागे कृत्रिम मांस निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत.
गायी आणि बाकी प्राण्यांना टार्गेट करणे हा अजेंडा आहे.

पण कृत्रिम मांस निर्मिती खूप पर्यावरण हानी करते हे उघड झाल्या मुळे .
गायी ना टार्गेट करणे कमी झाले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मुला बरोबर ह्या विषयावर चर्चा केली तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले आम्हाला जो काही त्रास सहन करावा लागत आहे तो तुमच्या पिढी मुळे.

मला माझे बालपण आठवले १९७१ जन्म.
प्राथमिक शिक्षण हसत खेळत ना पालकांचे दडपण न शिक्षकांचे.
न खासगी क्लास ,न टक्केवारी चे दडपण .
मस्त बालपण गेले .
ना हवा प्रदूषण,ना, कस असलेले दूध , कस असलेला आहार.
सामाजिक स्थिती अगदी योग्य.

आमच्या काळात जन्म झालेली सर्व पिढी.
कोण संशोधक ,कोण मोठे ऑफिसर,कोण विविध विषयातील तज्ञ,कोण अतिशय उत्तम डॉक्टर झाले.
अगदी कसलेले राजकारणी पण झाले .
बालपण फालतु मध्ये दडपण मध्ये आता जे आहे ते त्या वेळी नव्हते पण दर्जा आता पेक्षा खूप उच्च.

जग विनाश कडे जात आहे.

लहान मुलांचे बालपण चिरडले जात आहे , .
सर्व सर्व काही दिसत असून आमची पिढी खट्टा कडे जाणारे हत्ती च निघाले.
आणि पुढच्या पिढी चे भवित्व नष्ट करून टाकले.

परमेंट नोकरी ची मजा आम्ही घेतली.
स्थिर आयुष्याची मजा आम्ही घेतली.
उत्तम पर्यावरण ,सकस आहार ह्याची मजा आम्ही घेतली.
बालपण आम्ही वीणा टेन्शन फक्त खेळण्यात काढले.
कोणत्याही स्पर्धा शी आमचा संबंध आला नाही.
फालतु मार्क न ची टक्केवारी आम्हाला माहित पण नव्हती.
पण आज ची पिढी ल आपल्या पिढी ने अनंत संकटात टाकले आहे.
आणि ह्याची जाणीव पण खूप लोकांना नाही.
आता २ वर्षापासून शिक्षणाच्या नावाखाली अत्याचार करून पण .
होणारे डॉक्टर ,इंजिनीयर लो दर्जा चे आहेत,संशोधक तर निर्माण च होत नाहीत.
मी आजारी पडलो तर डॉक्टर शोधतो तो फक्त वयस्कर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"होणारे डॉक्टर ,इंजिनीयर लो दर्जा चे आहेत,संशोधक तर निर्माण च होत नाहीत."

वेगळा विचार करायला, कल्पकतेला भारतीय संस्कृती उत्तेजन देत नाही. नाहीतर आपण पण पेटंटचा डॊंगर निर्माण एव्हाना केला असता.

चर्पटपञ्जरिका" या प्रसिद्ध स्तोत्राची गोष्ट प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूला माहित असेल. गंगेच्या काठावर उतारवयात व्याकरणसूत्रांची घोकंपट्टी करणार्‍या एका वृद्धाला शंकराचार्य सल्ला देतात "भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते संनिहिते मरणे न हि न हि रक्षति डुकृञ करणे" एकेकाळी मला हे संपूर्ण स्तोत्र तोंडपाठ होतं. मरण जवळ आलेलं असताना ही घोकंपट्टी काय करत बसला आहेस असं शंकराचार्य त्या व्यक्तीला विचारतात आणि "गोविंदाला भज" असा सल्ला देतात. अचानक ते आठवलं ते एका बातमीच्या निमित्ताने.
दक्षिण कोरीयामध्ये एक ९३ वर्षीय़ व्यक्तीने पी०एच०डीसाठी आपली नोंदणी केल्याचे वृत्त वाचले. https://www.straitstimes.com/asia/east-asia/man-93-on-quest-to-become-so...?
हे वृत्त वाचून माझ्या मनात आश्चर्य, असूया अशा अनेक भावना जागा झाल्या. या बातमीच्या अनुषंगाने अधिक शोध घेतला तेव्हा आयुष्याच्या उत्तरकालात अनेकजणांनी पी०एच०डी मिळवली असल्याचे कळले. आतापर्यंतचे रेकॉर्ड जर्मनीमध्ये एका १०२ वर्षाच्या वृद्धेचे आहे.
आता मला एक प्रश्न पडला की गोविंदाला भजायचे सोडून या सर्वांनी पी०एच०डी० च्या गाईडला भजायचा उद्योग का बरे का केला असावा?
सध्या तरी मला तार्किक असे एकच उत्तर दिसते - पेटंट इकॉनॉमी पी०एच०डी० करायला प्रवृत्त करते तर टेंपल इकॉनॉमी "भज गोविंदं भज गोविंदं..." करायला सांगते.

टेंपल संस्कृतीला पेटंट संस्कृतीची बरोबरी करणे कदापिही शक्य नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अल्बर्ट नंतर कोणी संशोधक निर्माण झाल्याचे कोणाला माहित नाही .
ज्यांना माहिती आहे त्यांनी पाच संशोधकांची नाव सांगावीत.
लोकांना तर माहीत नाहीत.

Covid वरती लस कोणत्या संशोधक नी शोधली?
कोणाला माहित आहे.
हल्ली कंपन्या शोधाचे श्रेय घेतात आणि आपल्या फायद्याचेच फक्त संशोधन करतात.
९९.९९ टक्के मिळवणारे कुठे जातात.

त्याची कुवत वार्षिक मिळणाऱ्या पॅकेजेस मध्ये असते तीन करोड च वार्षिक वेतन बस .
मारिया curie ह्यांना किती च वार्षिक पॅकेज होते .
त्यांनी खूप मोठा शोध लावला हित.
महान संशोधक न्यूटन sir न पासून अल्बर्ट sir न पर्यंत जे काही संशोधक होते .
त्यांना वार्षिक किती वेतन होते.
त्यांनी बुद्धी विकली नाही.
व्यापक जनहितासाठी बुद्धी व वापर केला.
म्हणून आपण आज सर्व भौतिक सुख भोगत आहे.

आता कंपन्या संशोधक खरेदी करतात.
आणि त्यांची नाव पण प्रसिद्ध करत नाहीत.
व्यापक जनहित हा विषय व बाद आहे.

आणि तुम्ही पर्यावरण वाचवण्याचा गोष्टी करत आहात.
कोणाला वेळ नाही अशा विषयात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0