पाणिनी नेमका कोण, कुठला व कधीचा?

पाणिनी हा अभिजात संस्कृतचा पहिला व श्रेष्ठ व्याकरणकार मानला जातो. हा नेमका कोणत्या काळात झाला याबाबत मतभेद आहेत. एवढेच नव्हे तर पाणिनी हे गोत्रनाम आहे कि व्यक्तिनाम याबाबतही विद्वानांमद्धे एकमत नाही. बौधायनाच्या मते पाणिनी हे गोत्रनाम असावे. परंतु भट्टोजी दीक्षित यांच्या मते "पणीचे पुरुष अपत्य तो पाणिन तर त्याचा नातु तो पाणिनी." पाणिनीला वाहिक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशाही संद्न्या आहेत. यावरुन पाणिनी हा वाहिक या गांधार देशातील प्रदेशात रहात होता व शालातुरीय हे नांव त्याच्या गांवावरुन पडले असावे असाही अंदाज आहे. शलातुर गांव सध्या लहुर (लाहोर) नांवाने ओळखले जाते असाही विद्वानांचा कयास आहे.
इसवी सनाच्या सातव्या शतकात चिनी प्रवासी युवान श्वांग याने शलातुर गांवाला भेट दिली होती. त्याने तेथे पाणिनीविषयक ज्या दंतकथा ऐकल्या त्या अशा:
"अतिप्राचीन काळी सहित्याचा विस्तार मोठा होत. कालक्रमाने त्यांचा -हास झाला. देवांनी मग अवतार घेवून व्याकरण व साहित्य जन्माला घातले. पुढे व्याकरणाचा विस्तार होवू लागला व ते खुप वाढले म्हणुन ब्रह्मदेव व इंद्र यांनी लोकांच्या गरजेला अनुसरुन व्याकरणाचे काही नियम बनवले व शब्दांची रुपे स्थिर केली. पुढे वेगवेगळ्या व्याकरणकारांनी आपापल्या मतांना अनुसरुन वेगवेगळी व्याकरणे रचली. पण त्यांचे सर्वांना आकलन होईना त्याच काळात पाणिनीचा जन्म झाला. ईश्वरदेव नामक प्रकांड पंडिताच्या मार्गदर्शनाने त्याने अभ्यास करुन अष्टाध्यायी हा व्याकरणावरील ग्रंथ लिहिला व पाटलीपुत्र येथील नंद राजाकडे पाठवला."
ही दंतकथा असली तरी नंद राजाच्या नांवाच्या निर्देशामुळे इसपु ४५० (महापद्म नंद) ते सनपुर्व ३०० मधील धनानंद यापैकी तो कोणत्यातरी नंद वंशीय राजाच्या समकालीन असावा असा अंदाज बांधला गेलेला दिसतो.
कथासरित्सागर (मुळचे गुणाढ्याचे पैशाची भाषेत लिहिले गेलेले "बृहत्कथा." ) या ग्रंथात येणारी माहिती खालीलप्रमाणे...
" हर्ष नावाच्या एका आचार्याकडे कात्यायन व पाणिनी शिकत होते. कात्यायन हा कुशाग्र बुद्धीचा तर पाणिनी हा मंदबुद्धीचा होता. यामुळे पाणिनी मागे पडे. याला कंटाळुन पाणिनी हिमालयात निघुन गेला. तेथे त्याने शिवाची घोर तपस्या केली. तपाने प्रसन्न होवून शिवाने त्याला प्रतिभाशाली बुद्धी दिली. पाणिनीसमोर न्रुत्य करत शिवाने चौदा वेळा डमरु वाजवून जे ध्वनी निर्माण केले त्यांना अनुसरुन पाणिनीने चौदा प्रत्याहार सुत्रे लिहिली व त्यांनाच आधार घेत अष्टाध्यायीची निर्मिती केली." (कथासरित्सागर १.४)
बृहत्कथेची निर्मिती ही गुणाढ्याने पैशाची या प्राक्रुत भाषेत सातवाहन काळात इसपु पहिले ते इसचे पहिले शतक या कालात कधीतरी केली याबाबत विद्वानांच्या मनात शंका नाही. हा ग्रंथ विंध्य पर्वतराजीत त्याने लिहिला. हा ग्रंथ महाभारतापेक्षा श्रेष्ट असुन मुळ ग्रंथ आज उपलब्ध नाही हा भारतीय साहित्यातील एक फार मोठा अनर्थ आहे असे मत आर्थर ब्यरिडेल कीथ यांनी आपल्या "A History of Indian Literature: Volume 3 -( Page 346) ग्रंथात नोंदवुन ठेवलेले आहे.
येथे मी ब्रुहत्कथेच्या निर्मितीच्या खोलात आताच न जाता, पाणिनीचा कालखंड ठरवण्यावर जास्त भर देवुयात.
वर आपण पाणिनीबाबतच्या दंतकथा पाहिल्या आहेत. स्वत: पाणिनी स्वत:बद्दल कोठेच माहिती देत नाही. पाणिनीबाबत आपल्याला दोनच मुळ स्त्रोत उपलब्ध आहेत ते म्हनजे युवान श्वांगने सातव्या शतकात ऐकलेल्या दंतकथा व इसपु पहिले ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कधीतरी लिहिली गेलेली बृहत्कथा.
कात्यायन व वररुची हे एकच आहेत असे मानण्याचा प्रघात आहे. कात्यायन व पाणिनी एकाच काळातील होते कि वेगवेगळ्या हेही येथे तपासायला हवे. परंतु इतिहासात अनेक कात्यायन व वररुची होवून गेले आहेत. बृहत्कथेमुळे कात्यायन व वररुची एकच मानण्याचा प्रघात पडला असला तरी ते वास्तव नाही. कात्यायनाची "सर्वानुक्रमणि" ही वररुचीच्याही नांवावर आढलते असे प्रतिपादन फ्रेडरिक म्यक्सम्युल्लर या विद्वानाने आपल्या "हिस्टरी ओफ अन्शंट संस्क्रुत लिटरेचर" या १८६० मद्धे प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात केले आहे. याच ग्रंथात म्यक्समुल्लर म्हणतात कि हेमचंद्रांनी आपल्या कोषात कात्यायन व वररुची ही एकाच व्यक्तीची नांवे आहेत असे लिहिले आहे. पण लक्षात घ्यायची महत्वाची बाब म्हणजे जेंव्ह हेमचंद्र प्राकृत्प्रकाशचा उल्लेख करतात तेंव्हा ते कटाक्षाने वररुची हे नांव वापरतात तर जेंव्हा वार्तिकांचा प्रश्न येतो तेथे ते कात्यायन हे नांव वापरतात, सबब म्यक्समुल्लर यांचा गैरसमज झालेला दिसतो.
येथे हे लक्षात घ्यायला हवे कि राजतंगिणिचा लेखक कल्हन कात्यायन व पाणिनी हे नंदाच्या समकालीन असल्याचे नमुद करतो.
येथे नंद हा नेमका कोणत्या राजघराण्याचा या प्रश्नात फारसे जावुन उपयोग नाही कारण समान नांवाचे अनेक राजे होवून गेले आहेत. परंतु कात्यायन तथा वररुची व पाणिनी समकालीन होते याबाबत म्यक्समुल्लरला तरी शंका नाही. आणि आपण वर पाहिलेल्या दंतकथा हीच बाब सुचीत करतात.
आता वररुची आणि कात्यायन या व्यक्ती एकच नाहीत याबाबत शंका नाही. पण वररुची तथा कात्यायन हे ब्रुहत्कथेतील महत्वाचे पात्र आहे. गुणाढ्य हा सातवाहनाच्या दरबारातील महत्वाचा कवि होता. त्याने आपला ग्रंथ पैशाची भाषेत सिद्ध केला. पण सोमदेवाने त्याचे कथासरित्सागरात रुपांतर केले तेच मुळात अकराव्या शतकात. (तत्पुर्वी क्षेमेंद्रानेही बृहत्कथामंजिरी सिद्ध केला होता.) त्यामुळे त्याला हा अनुवाद करतांना मुळ ग्रंथ उपलब्ध होता कि त्याने स्मृतीनिहाय संकलन केले याबाबत विद्वानांत मतैक्य नाही. बृहत्कथेलाही शैव पार्श्वभुमी आहे. शिवाने पार्वतीला एकांतात सांगितलेली व कोणीही न ऐकलेली कथा एका विद्याधराने ऐकली व ते शिवाला समजल्यावर त्याला जो शाप दिला त्यातुन त्याचा मानवी अवतार (वररुची तथा कात्यायन) व त्याने शिवाकडुन ऐकलेल्या कथा कानभुती या पिशाच्च्याला सांगितल्या व तो उत्तरेत निघुन गेला. पुढे गुणाढ्याने या कथा ऐकुन पैशाची भाषेत त्या उतरवुन काढल्या अशी ही एकुणातील दंतकथा आहे.
आपण युवान श्वागने सागितलेली दंतकथा पाहिलीच आहे. त्याच्या मतानुसार गांधार प्रांतातील शलातुर या गांवी पाणिनीचा जन्म झाला. ही दंतकथा श्वांगने सातव्या शतकात ऐकलेली आहे. म्हनजे तिला फारसे विश्वसनीय मानता येत नाही. पाणिनी जर इसपुच्या पाचव्या वा चवथ्या शतकात जन्माला आला होता असे ग्रुहित धरले तर किमान हजार वर्षांनी श्वांगने ही कथा ऐकलेली आहे. पाणिनी समजा दुस-या शतकातील असला तरी त्याने ही कथा किमान सहाशे वर्षांनी ऐकलेली आहे. भारतात दंतकथांची व स्थानमाहात्म्य वाढवण्याची एकुणातील प्रव्रुत्ती पाहिली तर जसे पांडव जवळपास सर्वच गांवांत येवुन गेल्याच्या दंतकथा असतात तशीच दंतकथा पाणिनीबाबत असंभाव्य म्हणता येत नाही.
त्यामुळे बृहत्कथा वा श्वांगची मते विश्वासार्ह मानता येत नाहीत. वररुची व कात्यायन हे मुलत: भिन्न व्यक्ती असुन बृहत्कथेमुळे विद्वानांतही अलीकडच्या शतकापर्यंत दोन्ही व्यक्ती एक असा संभ्रम होता. स्कंदपुराणानुसार वररुची हा कात्यायनाचा पुत्र होय असेही एक मत आहे, परंतु त्यावर नंतर विचार करुयात. मात्र पाणिनी व कात्यायन हे समकालीन असून पाणिनीच्या व्याकरणातील दोष कात्यायनाने दुर केले असे म्हणता येते. कात्यायनाने पाणिनीच्या व्याकरणात जवळपास हजारो दोष काढले असल्याने दोघे मित्र वा गुरु-शिष्यही असु शकत नाहीत असे गोल्डस्टकर म्हणतो हेही मी येथे नोंदवुन ठेवतो.
दुसरे असे कि, "एखाद्या भाषेचे व्याकरण रचण्याचा प्रयत्न करणे ही एक अयोग्य गोष्ट आहे. जी जीवंत भाषा असते तिचे वेगवान स्त्रोत हे ग्रंथांच्या बाहेरच आढळतात. गांवे, जनपदे, नगरे, राजदरबार, शासन व्यवहार, सैन्याची विविध क्षेत्रे, व्यापारी श्रेण्या व निगम, श्रमिकांच्या कर्मशाला ई. क्षेत्रांत नित्य नवे शब्द, लोकोक्ति व म्हणी, वाक्यप्रयोग जन्माला येत असतात व ती तोंडो-तोंडी त्या-त्या प्रदेशात प्रसार पावत असतात. नवे व्याकरण लिहायचे असेल तर त्या सर्व शब्दांचा संग्रह करने आणि व्याकरणद्रुष्ट्या त्या सर्व शब्दांना नियमबद्ध करणे आवश्यक आहे. ( भारतीय संस्क्रुती कोश, संपादक पं. महादेव शास्त्री जोशी, खंड पाचवा प्रुष्ठ ५०३) पाणिनीने उत्तर भारतात सर्वत्र विहार करुन स्थानिक भाषाभेदही विचारात घेत व्याकरण सिद्ध केले अशी आपली परंपरा मानते हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
कात्यायन हा दक्षीण देशी विद्वान होता अशीही मान्यता आहे, असे असेल तर मग पाणिनी नेमका कोठला होता हेही येथे तपासुन पहाणे उचित ठरेल. (प्रत्यक्षात इतिहासात अनेक वररुची व कात्यायन होवुन गेले आहेत) पाणिनी हा गांधार प्रांतातील शलातुर गांवचा निवासी होता हे युवान श्वांगचे मत आपण पाहिले आहेच. प्रश्न असा पडतो कि त्या काळी (इसवीसनाचे दुसरे शतक असो कि इसपुचे पाचवे शतक) गांधार प्रांताची नेमकी भाषा काय होती? जोही ज्या प्रदेशात जन्म घेतो तेथील प्रचलित भाषा हीच प्रत्येकाची मातृभाषा असते. मग या प्रांताची या कोणत्याही निर्दिष्ट काळी नेमकी काय भाषा होती? समजा त्याकाळी या प्रदेशातील भाषा संस्कृतच होती तर आता तेथे ती भाषा अवशिष्ट तरी आहे काय? असल्यास कोणत्या स्वरुपात?
प्राचीन बुद्धीष्ट ग्रंथ हे गांधार प्रांतातील प्राकृत भाषेला "गांधारी" भाषा असे उल्लेखतात. ही भाषा खरोश्टी लिपीत लिहिली जात असे. या प्रांतात बुद्धिझम इसपु ३०० च्या आसपासच पसरला होता. आजही या भाषेची अवशिष्ट रुपे हिंदको वा कोहिस्तानी या भाषांच्या रुपात अवशिष्ट आहेत. संस्कृतचे मात्र अस्तित्व नाही. समजा पाणिनी हा इसपु च्या चवथ्या वा पाचव्या शतकात जरी झाला असता तरी त्याने जे व्याकरण लिहिले असते ते अस्तित्वातील भाषेचे. समजा तेंव्हा संस्क्रुत हीच महत्वाची भाषा होती तर केवळ दोनशे वर्षांत संस्क्रुत त्या भागातुन कशी नामशेष झाली याचे उत्तर यातुन मिळत नाही. बरे, गांधारी भाषेची अवशिष्टे पाणिनीच्या व्याकरणात आहेत हेही खरे आहे. परंतु गांधार प्रांताला लागुन असलेल्या, व ऋग्वेद ज्या मुळ भाषेत लिहिला गेला होता त्या व्रचदा प्राकृताचा तो खरा प्रभाव आहे. सिंध प्रांत आणि गांधारच्या सीमा लागुन असल्याने अनेक भाषिक साधर्म्ये या भाषांत असणे स्वाभाविक आहे, जसे हे जगभर आढळते.
पाणिनी हा मुळचा गांधार प्रांतातील असुच शकत नाही हे त्याच्याच शिवसुत्रांवरुन सिद्ध होते. शिवसुत्रांना महेश्वर सुत्रे असेही म्हणतात. उलट तो दक्षीणेतीलच होता असे सिद्ध करणारी अनेक ग्रंथार्गत प्रमाणे आपल्याला उपलब्ध आहेत. व त्याचा काळ इसपुच्या पहिल्या शतकापार जावु शकत नाही हे सिद्ध होते. अर्थात त्याबाबत पुढील प्रकरणात.

आता महत्वाचे प्रश्न म्हनजे पाणिनी नेमका कोण होता व नेमक्या कोणत्या काळात झाला हा.
पाणिनीचा नेमका काळ ठरवण्यासाठी पाश्चात्य विद्वानांनी भरपुर प्रयत्न केलेले आहेत. त्यात फ़्रेडरिक म्यक्समुल्लर, प्रो. वेबर, थियोडोर गोल्डस्टकर, जेम्स अल्विस हे प्रमुख आहेत. या विद्वानांच्या प्रकांड पांडित्याबद्दल शंका घेत येत नाही. परंतु दुर्दैवाने या विद्वानांचेही पाणिनीच्या काळाबाबत एकमत होवू शकलेले नाही. प्रो. वेबर हे पाणिनीचा काळ इसवी सन १४० हा मान्य करतात तर गोल्डस्टकर यांच्या मते पाणिनीचा काळ हा निश्चयाने बुद्धपुर्व, म्हणजे इसपु आठव्या शतकाच्या आसपास जावु शकतो. म्यक्समुल्लर हाच काळ सनपुर्व ३५० मानतात. ही मतांतरे होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील मुख्य म्हणजे संस्क्रुत साहित्यात कालोल्लेख व तेही बरोबर असे जवळपास नाहीतच. त्यामुळे ग्रंथार्गत प्रमाणे व पुर्वाचार्यांचे केलेले नामोल्लेख यावरुन हे काळ अंदाजावे लागतात. दुसरे असे कि अनेक लेखकांची नांवे समान आहेत. उदा आपल्याला इतिहासातील किमान तीन कात्यायन माहित आहेत. वार्तिका लिहिणारा कात्यायन, शुल्बसुत्रे लिहिणारा एक तर श्रौतसुत्रे लिहिणारा अजुन एक. ही वेगवेगळी तीन स्वतंत्र व वेगवेगळ्या काळात झालेली व्यक्तिमत्वे आहेत. यासंदर्भात अनेकांची अर्थात वेगवेगळी मते आहेत. हीच बाब पतंजलीची. महाभाष्य लिहिणारा पतंजली, योगदर्शन लिहिणारा पतंजलि व आयुर्वेदाचार्य पतंजलि हेही वेगळे कि एकच याबाबतही विवाद आहेत. एवढेच नव्हे तर अनेक लेखकांनी आपल्या क्रुती पुर्वी होवून गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या नांवावर खपवली गेल्याची अनेक उदाहरणे असल्याने असा विवाद उत्पन्न होणे स्वाभाविक आहे.
पाणिनीच्या काळाचा विचार करतांना पाणिनीला उत्तरकालीन वा पुरातन मानणा-या विद्वानांनी नेमका काय विचार केला आहे हे आपण आधी पाहुयात.
१. प्रो. अल्ब्रेख्त वेबर: उनादी सुत्रांचा थेर कच्छायनाने आपल्या "संधीकप्प" या इसपुच्या सहाव्या शतकातील पाली व्याकरणात उपयोग केला व नंतर पाणिनीने अष्टाध्यायीत उनादी व्याकरणीय सुत्रे घेतली आहेत यावरुन पाणिनी हा कच्छायनाच्या उत्तरकालीन ठरतो. पाणिनीच्या व्याकरणात "यवनानी" लिपीचा उल्लेख आहे, तसेच स्तुप, स्थविर, चीवर यांचाही उल्लेख आहे. ह्यु-एन-त्संगची कथा (जी मी आधी दिलेली आहे.) तिचा आधार घेत व कथासरित्सागरचा हवाला देत वेबर यांना पाणिनी हा बुद्धानंतर ५०० वर्षांनी झाला असावा असे अनुमान काढले आहे. म्हणजे हा काळ इसवी सन १४० हा येतो.
२. थियोडोर गोल्डस्टकर: यांनी आपल्या "Panini: His Place in Sanskrit Literature" या ग्रंथात पणिनीने आपल्या अष्टाध्यायीत शाक्यमुनीचा उल्लेख केलेला नाही. स्थविर, चीवर हे शब्द त्याने श्रमणांसाठी वापरले असून ती परंपरा बुद्धपुर्वकालीन आहे. स्तुप हा शब्द त्याने बुद्धिष्ट स्तुपांसाठी वापरला नसून वैदिक अर्थाचा "मातीचा ढीगारा" (प्रेत पुरल्यावत त्याच्यावर रचलेला) या अर्थाने वापरलेला असू शकतो. "यवन" हे भारताला प्राचीन काळापासुन माहित असुन पाणिनी हा मुळात गांधार देशातला असल्याने त्याचा यवनांशी व त्यांच्या लिपीशी परिचय असने स्वाभाविक आहे. यवन शब्द बुद्ध साहित्यातही येतो तसेच तो अशोकाच्या शिलालेखांतही येतो. त्यामुळे यवन शब्द आला म्हणुन त्याला बुद्धोत्तर कालात ढकलता येत नाही. पातंजलीच्या महाभाष्यात मौर्य राजाचा उल्लेख आलेला आहे. "यवनांनी अयोध्या जिंकले" अशा अर्थाचे एक विधान व्याकरणाचा एक नियम समजावुन सांगतांना केलेले आहे. ग्रीक राजा मिन्यंडर हा एकमेव ग्रीक राजा होता जो अयोध्येपर्यंत पोहोचला होता,. यावरुन पतंजली हा इसपु १८० मद्धे झाला असुन पाणिनी त्याच्याही आधी झाला असल्याने व स्थविर, चीवर, भिक्षुणी ज्या बुद्धकाळपुर्वीही अस्तित्वात होत्या व तो शाक्यमुनीचा उल्लेख करत नसल्याने पाणिनीचा काळ हा सनपुर्व आठवे शतक हा असू शकतो.
३. म्यक्समुल्लर" म्यक्समुल्लर यांनी पाणिनीचा काळ हा साधारणत" इसपु ३५० ते ४५० असा ठरवला असुन त्यांनी स्तुपादिंचा उल्लेख महत्वाचा धरला असुन पाणिनी हा नि:संशय बुद्धोत्तर असला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. (History of Sanskrit Literature)
जवळपास ३२ विद्वानांनी आजवर विविधांगांनी पाणिनीचा काL थरवायचा प्रयत्न केला आहे. मी येथे फक्त जुन्यात जुना काळ कोणता दिला गेला आहे व अर्वाचीन काळ कोनता दिला आहे याबाबतची विवेचनेच येथे वाचकांच्या सोयीसाठी घेतली आहेत. अन्य विद्वानांनीही चर्चेसाठी वरीलच बव्हंशी मुद्दे घेतले असून प्रत्येकाने काढलेल्या काळात थोडफार फरक आहे. उदा. म्यक्समुल्लर पाणिनीचा काळ इसपु ३५० हा घेतात. असो. आपण या व त्या अनुषंगाने येणा-या मुद्द्यांवर चर्चा करुयात.
१. थेर कच्छायन हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. याने बुद्धाच्या आद्न्येवरुन पालीचे व्याकरण लिहिले. याचा काळ निश्चित असुन तो सरासरी इसपु. ६०० हा येतो. त्याचे "संधीकप्प: हे व्याकरण आठ अध्यायात रचले आहे. या व्याकरणावर आधारीत पुढे ४१ पाली व्याकरणे रचली गेली. या व्याकरणात कोठेही पाणिनीचा उल्लेख येत नाही, तसेच पाणिनीच्याही व्याकरणात शाक्यमुनीचा उल्लेख येत नाही. परंतु केवळ यावरुन कोणाचेही पौर्वापौर्व ठरवणे धाडसाचे आहे. कारण कच्छायन हा बुद्धाचा प्रमुख शिष्य होता तर पाणिनी हा वैधर्मी, म्हणजे शैव संप्रदायी होता. त्यामुळे एकमेकांचा उल्लेख न करणे हे स्वाभाविक असेच मानता येईल.
२. परंतु स्थविर, भिक्षुणी, स्तुप हे शब्द मात्र विचारात घ्यायला हवेत. हे खरे आहे कि बुद्धापुर्वीही श्रमण धर्म अस्तित्वात होता. त्यामुळे अष्टाध्यायीत स्थविर, चीवर, ई. शब्द डोकावले म्हणजे ती बुद्धाच्या पुर्वकालीन, समकालीन वा उत्तरकालीन रचना आहे असे मानता येत नाही.
परंतु स्तुपाचा उल्लेख झटकावुन लावता येत नाही. वैदिक संस्कृतानुसार स्तुप म्हणजे केवळ मातीचा ढीगारा. या शब्दाचा वैदिक वाड:मयात क्वचित उल्लेख आहे. परंतु व्याकरणात हा शब्द जेंव्हा येतो तेंव्हा तो बराच प्रचलित असला पाहिजे. त्यामुळे पाणिनी हा बुद्धोत्तर काळातील आहे असे म्हणता येवू शकते. परंतु हा ठाम निष्कर्ष देणारा पुरावा नव्हे. म्हणजे स्तुपांची निर्मिती बुद्धोत्तर काळात मोठ्या प्रमाणवर झाली असली तरी त्याआधी "स्तुप" ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती असे असेही विधान करता येत नाही. शिवाय "स्तुप" हा शब्द नवनिर्मित नाही हेही उघड आहे.
३. पाणिनी यवनानी लिपीचा उल्लेख करतो तसेच लिपिकार अशा शब्दाचाही प्रयोग करतो त्यावरुन पणिनीला लेखनाची कला माहित असावी असे गोल्डस्टकर यांचे मत आहे. पाणिनी हा गांधार देशातील शलातुर गांवचा (आधुनिक लाहोर) निवासी होता असे मानले जाते. ते खरे आहे असे मानले तर गांधार हा सीमावर्ती प्रदेश असल्याने त्याचा यवनांशी संबंध येणे स्वाभाविक आहे. जेम्स अल्विस यांच्या मते राजा दारियसच्या समकालात कधीतरी पाणिनी होवून गेला असावा. पर्शियनांनाही तेंव्हा यवनच संबोधले जात असे. पर्शियन लोकांना लेखनाची कला अवगत होती. इसपु सहाव्या शतकातील दारियसचा लेख प्रसिद्धच आहे. त्यामुळे पाणिनीचा परिचय यवनी लिपीशी होणे स्वाभाविक आहे असे मानता येउ शकते. परंतु याचा दुसरा अर्थ मग असा होतो कि भारतात तेंव्हा कोणतीही लिपीच अस्तित्वात नव्हती...किंवा ज्या लिप्या होत्या त्या पाणिनीय संस्क्रुत लिप्यांकित करण्याएवढ्या समर्थ नव्हत्या. अल्विस यांच्या मते पाणिनीने आपले व्याकरण लिहुनच काढले असले पाहिजे. म्यक्स्मुल्लर या मताला दुजोरा देत नाही. त्याच्या मते भारतीयांना लिप्याच माहित नव्हत्या. असो.
यवनानी या शब्दावरुन जास्तच चर्चा झडली आहे हे मात्र खरे. यवन, यवनानी, योन हे शब्द पाली साहित्यात जसे येतात तसेच उत्तरकालात सिद्ध झालेल्या महाभारतातही येतात. त्यामुळे यवनी लिपीशी भारतीयांचा (व्यापार व भौगोलिक सन्निध्याच्या कारणाने) परिचय झाला असने स्वाभाविक मानता येते. त्यासाठी पाणिनीचा जन्म शलातुरलाच झाला असला पाहिजे असे मानण्याचे खरे तर कारण नाही. आणि ज्याही कोणत्या काळात पाणिनी झाला त्या काळात एतद्देशीय लिपीच नव्हती या मतातही अर्थ नाही. भारतीयांना लिपी ही सिंधु संस्क्रुतीच्या काळापासुन माहिती आहे. त्यामुळे "यवनानी" या शब्दावरुन पाणिनीचा काळ ठरवता येत नाही.
४. कथा सरित्सागरात येणारी कथा (मुळ ब्रुहत्कथा आज संपुर्ण उपलब्ध तर नाहीच पण त्यातील कथांचे ब-यापैकी संकलन सोमदेवाने इसच्या अकराव्या- बाराव्या शतकात केलेले आहे.) त्यामुळे त्याने उल्लेखित केलेली कात्यायन-वररुचीची कथा नेमकी कधी लिहिली गेली याचा अदमास लागत नाही. मुळ बृहत्कथा आज उपलब्धच नाही. त्यामुळे या कथेतील जरी वररुची तथा कात्यायन हा जरी सातवाहनाच्या समकालीन असला तरी प्राक्रुत प्रकाश लिहिणारा वररुची व वार्तिका लिहिणारा कात्यायन एकच व्यक्ती होत असे मानता येत नाही. या मताला एकही विद्वानाचे समर्थन नाही. सोमदेवाने आपल्या कथा संकलित करतांना वेगवेगळ्या व्यक्तींचे साधर्म्य कल्पिले व त्यांना एकच व्यक्ती मानले आहे असेच स्पष्ट दिसते.

५. पाणिनीचा काळ ठरवण्यासाठी विद्वानांनी कात्यायन व पतंजलि यांच्याही काळाची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यात पाणिनी व कात्यायन हे समकालीन होते काय हा मुख्य प्रश्न चर्चीला गेला आहे. कात्यायनाच्या वार्तिका म्हणजे पाणिनीचेच व्याकरण दुरुस्त करत त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कात्यायन हा पाणिनीनंतर झाला असावा असेही मत व्यक्त केले जाते. पतंजलीच्या महाभाष्यात अष्टाध्यायीबरोबरच वार्तिकांवरही भाष्य असल्याने तो अर्थातच उत्तरकालीन ठरतो. पतंजलीचा काळ हा इसपु १८० असावा हे गोल्डस्टकर यांचे मत आपण पाहिलेच आहे. येथे विचारात घ्यायची बाब अशी कि कथासरित्सागरानुसार कात्यायन व पाणिनी समकालीन होते. या कथेतील (शिवाचे वरदान) ही भाकडकथा वा वेबर म्हणतात तशी (Ghost story) जरी मानली तरी समकालीन व्यक्तींनी त्यांच्या लेखनावर टीका करणे वा त्याच्या विचाराचे पुढे प्रवाहन करणे अशक्य नाही. अर्थात हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा दोघे नुसते समकालीन नव्हेत तर निकट परिचित असायला हवेत. कथा सरित्सागरानुसार पाणिनी व कात्यायन हे दोघे एकाच गुरुचे शिष्य होते. त्यामुळे त्या कथेतील दंतकथा वगळत पाणिनी व कात्यायन हे समकालीन होते असे म्हणता येते.
६. पातंजलीच्या महाभाष्यात मौर्य राजाचा उल्लेख येतो हे खरेच आहे. परंतु तो राजा नेमका कोण हे नांव येत नाही कारण व्याकरणाचा एक नियम निरुपित करण्यासाठी त्याने ते विधान सिद्ध केले आहे. त्यात कोणाचे नांव असण्याची आवश्यकता नाही. परंतु अल्विस मात्र त्यावरुन असे निश्चित करण्याचा प्रयत्न करतात कि शेवटच्या मौर्य राजाचा पतंजली हा समकालीन होता. (इसपु १८०) हा तर्क "कुतर्क" म्हणावा एवढा चुकीचा आहे. तेच विधान "यवनांनी अयोध्या जिंकली" या विधानाबाबत म्हणता येते, कारण मग पातंजलीने आपले नियम सिद्ध करण्यासाठी पुरातनही उदाहरणे घेतली आहेत. त्यावरुन पतंजलीलाही मग पुरातन ठरवावे लागेल. थोडक्यात पतंजलीने केलेले हे फक्त दोन ऐतिहासिक उल्लेख पतंजली त्यांच्या समकालीन होता हे सिद्ध करत नाही.
७. वेबर यांनी ज्या तर्कावर पाणिनीचा काळ सन १४० काढला आहे त्यावर तर अल्विस यांनी हल्लाच चढवला आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कारण युवान श्वांगने दिलेली पाणिनीची कथा, जी त्याने सहाव्या शतकात शलातुर येथे ऐकली, तिचा पाणिनीच्या कालनिश्चितीसाठी काही उपयोग नाही असे त्यांचे मत आहे. या संपुर्ण कथेचे परिशिलन केल्यानंतर माझेही मत तसेच बनले आहे. परंतु पाणिनी, जरी गांधार देशाचा मुलनिवासी नसला तरी त्याने बरच काळ तेथे व्यतीत केला असावा असे फारतर म्हणता येईल.
वरील विवेचनावरुन पाणिनीचा काळ नक्की होत नाही हे तर स्पष्ट आहे. परंतु ते खरेच अशक्य आहे काय? अशा कोणत्या बाबी आहेत ज्या या सर्वच विद्वानांच्या नजरेतुन सुटल्या आहेत?
होय. सुटल्या आहेत. कदाचित भारतीय संस्क्रुती व धर्मेतिहासाचे आकलन कमी पडल्याने तसे झालेले असु शकते. असो.
अष्टाध्यायीची समग्र रचना ज्या पाणिनीच्याच १४ शिवसुत्रांवर (यांनाच महेश्वर सुत्र असेही म्हणतात) आधारीत आहे त्याचा आरंभीचा श्लोक खालीलप्रमाणे आहे.
"न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारम I
उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम II
( शिवाच्या वैश्विक न्रुत्यानंतर सनकादि ऋषिंना आशिर्वाद देण्यासाठी शिवाने १४ वेळा डमरु वाजवला व त्यातुन जे विभिन्न ध्वनी उत्पन्न झाले त्याधारित हे शिवसुत्र आहे.)
१.अ इ उ ण् |
२. ऋ ऌ क् |
३. ए ओ ङ् |
४. ऐ औ च् |
५. ह य व र ट् |
६. ल ण् |
७. ञ म ङ ण न म् |
८. झ भ ञ् |
९. घ ढ ध ष् |
१०. ज ब ग ड द श् |
११. ख फ छ ठ थ च ट त व् |
१२. क प य् |
१३. श ष स र् |
१४. ह ल् |

हे ते १४ ध्वनी होत ज्याच्या आधारावर पाणिनीय व्याकरणाची रचना झाली आहे.
पणिनीचा काळ ठरवण्यासाठी व तो मुळचा कोठला होता हे शोधण्यासाठी हे सुत्र अत्यंत महत्वाचे आहे. ते कसे हे आपण आता पाहुयात.
आपण पाणिनीसंबधातील दंतकथा तसेच पाश्चात्य तद्न्यांची मते संक्षेपात पाहिली आहेत. त्यावरुन तरी पाणिनीची निश्चित अशी कालनिश्चिती करता आलेली नाही हेही आपण पाहिले आहे. पाणिनीचा काळ जितक्या मागे नेता येतो तेवढा मागे नेण्यात भारतीय विद्वानांना अधिक रुची असल्याने त्यांनी पाणिनी हा सनपुर्व आठव्या शतकात वा त्याहीपुर्वी झाला असल्याचेच मत डा. वासुदेवशरण अग्रवालांसारख्या विद्वानांनी साधारणपणे मान्य केल्याचे दिसते. पाणिनीसारख्या महान व्याकरणकाराच्या काळाबाबत एवढा (किमान एक हजार वर्षांच्या काळाचा) गोंधळ असावा ही बाब नक्कीच भुषणावह नाही.
महत्वाची बाब म्हणजे पाणिनीचा व्याकरणकार म्हणुन वा अन्य कोणत्याही संदर्भातील उल्लेख ब्रुहत्कथा (कथासरित्सागर व ब्रुहत्कथामंजिरी) व ह्यु-एन-त्संग याच्या प्रवासवर्णनाखेरीज अन्य अभिजात म्हटल्या जाणा-या साहित्यात येत नाही ही सुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे. कात्यायन, पतंजली, भट्टोजी दीक्षित यांनी पाणिनीच्याच व्याकरणाचा भाष्य/वार्तिकाच्या माध्यमातुन विस्तार केला असल्याने त्यांच्या लेखनात मात्र अपरिहार्यपणे पाणिनीचा उल्लेख मिळतो.
कात्यायन व पतंजलीचे मात्र तसे नाही. पतंजलीचा भर्तुर्हरीच्या "वाक्पदीय" ग्रंथाच्या प्रारंभीच्याच श्लोकात पतंजलीचा आदरपुर्वक निर्देश केला आहे. कात्यायनाचा उल्लेख स्कंदपुराणात आला आहे. (या पुराणात कात्यायनाच्या पित्याचे नांव याद्न्यवक्ल्य व पुत्राचे नांव "वररुची" असे दिले आहे, हे मी येथे नमुद करुन ठेवतो, कारण कात्यायनावरील पुढील लेखात यावर चर्चा करायची आहे.)
असे का झाले असावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मुळात भारतात पाणिनी नांवाच्या अन्य कोणी व्यक्ति झाल्याचे एकही उदाहरण नाही जसे ते आपल्याला वररुची-कात्यायन-पतंजलि नांवाबाबत दिसुन येते. प्रसिद्ध माणसांच्या नांवांवांच्या असंख्य पुनरावृत्त्या झाल्या आहेत, पण "पाणिनी" या नांवाबाबत तसे झाल्याचे दिसुन येत नाही. पाणिनी हे गोत्रनाम असावे असे बौधायन म्हनतो. परंतु या नांवाचे गोत्रही अस्तित्वात नाही हे आपण "गोत्र-रन्तावली" या ग्रंथावरुनही स्पष्टपणे पाहु शकतो.
भट्टोजी दीक्षीतांनी दिलेली व्युत्पत्ती आपण पहिल्या भागात पाहिली आहेच. "पणीचे पुरुषापत्य तो पाणिन व त्याचा नातु जो तो पाणिनी" अशी ही व्युत्पत्ती आहे. ही व्युत्पत्ती ग्राह्य धरायची तर "पणी" ही कोणी इतिहासप्रसिद्ध "व्यक्ती" असायला हवी, कि ज्यामुळे एक वंशनामच सुरु होईल...पण तसेही नाही.
मग पणी कोण ह प्रश्न उपस्थित होतो व पाणिनीचा काळ ठरवण्याआधी हे कोडे उलगडायला हवे असे मला वाटते.
आपल्याला "पणी" कोण हे शोधायला फार दुर जाण्याची खरे तर आवश्यकता नाही. पणी हे गोत्रनाम नसुन ते सिंधुकाळापासुन अस्तित्वात असलेल्या एका अवैदिक समाजसमुहाचे नाव होते. या समुहाला आर्येतर समुह मानले असुन हा समुह वैदिक समाजाचा अन्य असुरादि समुहांप्रमानेच शत्रु होता हे ऋग्वेदातील असंख्य ऋचांवरुन स्पष्ट होते. उदा.
"जही न्यत्त्रिणं पणिं हि ष: I-(. ६.५१.१४)
(खादाड, कंजुस व दुष्ट अशा पणींचा तुम्ही नाश करा.)
"परि त्रुंधि पणीनामारया ह्रुदया कवे I अथेमस्मभ्यं रंधय:I (. ६.५३.५)
(हे पुषा कवे, तु आपल्या आरीच्या टोकाने पणींची ह्रुदये टोचुन विंधुन काढ आणि अशा प्रकारे त्यांना तु आमच्या अधीन कर.)
वरील निर्देशांवरुन वैदिकजन पणींचा द्वेष करत होते, प्रखर शत्रुत्व पाळत होते हे स्पष्ट होते. ऋग्वेदातुनच मिळणा-या माहितीनुसार पणी हे व्यापारी व्रुत्तीचे होते. यास्काने आपल्या निरुक्तात "पणिर्वणिग्भवति" -पण म्हणजे व्यापार करणारा...पणी म्हणजे वाणी अशी उकल केलेली आहे. पण व वण हे शब्द मुळात जलवाचक असल्याने त्यांचा सागरमार्गे व्यापार होत असे असे अनुमान निघते. पणी हे बलाढ्य नगरांत रहात, ते धनाढ्य असुन विपुल पशुधन त्यांच्याकडे असे अशा अर्थाचे असंख्य उल्लेख पणींच्या संदर्भात मिळतात. ऋग्वेदात "पणी-सरमा"संवाद दहाव्या मंडलातील १०८व्या सुक्तात येतो. ऋग्वेद पणींना असुर संबोधले आहे. युरोपातील सागरी व्यापारातील बलाढ्य असा जो फोनिशियन समाज होता तो समाज भारतीय पणींचेच वंशज होत असेही मानण्याचा एक प्रघात आहे. पणी लोक लिंगपुजक होते हेही ऋग्वेदावरुन स्पष्ट दिसते असे डा. अ.स. आळतेकर यांचे स्पष्ट अनुमान आहे.
ऋग्वेदिक जन पुर्वी जरी पणींचा द्वेष करत असले तरी यद्न्य धर्माच्या अपकर्ष काळात त्यांना पणींकडुन दान घेण्याचीही वेळ आली होती. दानस्तुती सुक्तांत असे अनेक दाखले मिळतात. बुबु नांवाच्या गंगेकाठावरच्या उदारह्रुदयी पणीकुलाचा शिरोभागी असलेल्याने हजारो प्रकारची कल्याणकारी औदार्यव्रुत्ती दाखवली असे (६.४५.३१-३२) मद्धे आवर्जुन नमुदही केलेले आहे.
पणी वंशात जन्माला आला म्हणुन पाणिनी हीच व्युत्पत्ती वरील विवरणावरुन निघते आणि तीच स्वीकारार्ह अशी आहे कारण पाणिनी या नांवाची समाधानकारक व्युत्पत्ती देवु शकेल असा अन्य एकही पुरावा उपलब्ध नाही. म्हणजेच बौधायन म्हणतो त्याप्रमाणे पाणिनी हे गोत्रनाम नसुन वंश अथवा कुळनाम आहे. हे व्यक्तिनाम नाही. पणी लोक सिंधु नदीचे खोरे ते गंगेच्या खो-यापर्यंत पसरले होते हेही वरील पुराव्यांवरुन सिद्ध होते. पुढे हे देशभर पसरले असणे सहज शक्य आहे...कारण पणी लोक हे मुळचे व्यापारी व्रुत्तीचे लोक होते.
मग पाणिनीचे नांव काय?
पाणिनीला वाहीक, शालंकी, दाक्षीपुत्र व शालातुरीय अशा संद्न्या आहेत. या संद्न्यांत त्याचे कोठे व्यक्तिनाम सापडते काय हे आपण तपासुन पाहुयात.
वाहीक म्हणजे वाहीक (बाल्हीक) प्रदेशात राहणारा. वाहीक हा एके काळी गांधार प्रदेशाचा भाग होता. पाणिनी मुळचा त्या प्रदेशातील म्हणुन त्याला बाहीक म्हणने स्वाभाविक आहे, परंतु ते व्यक्तिनाम नाही.
दाक्षीपुत्र या संद्न्येवरुन पाणिनी दाक्षी/दक्षी या स्त्रीचा पुत्र असा अर्थ निघतो. यावरुन आपण पाणिनीच्या आईचे नांव दाक्षी होते असे म्हणु शकतो.
शालातुरीय म्हणजे शलातुर गांवचा निवासी. पाणिनी शलातुर येथे बराच काळ होता हे अष्टाध्यायीवरुनच स्पष्ट होते. पण यातुन व्यक्तिनामाचा बोध होत नाही.
मग शेवटचे उरते व ते म्हणजे "शालंकी".
या नांवाची व्युत्पत्ती लागत नाही असा विद्वानांचा निर्वाळा आहे. परंतु येथे हे लक्षात घ्यायला हवे कि भारतातील अनेक व्यक्तिनामांची व्युत्पत्ती साधता येत नाही. उदा. अत्री, गर्ग, वशिष्ठ, पुरु इ. व्यक्तिनामे ही प्राय: अर्थनिष्पादकच असतात असे नाही. पण तसे असले तरी शालंकी हा शब्द निरर्थक आहे असे मात्र म्हनता येत नाही. हा शब्द मुळच्या प्राकृताचे संस्कृतीकरण आहे हे उघड आहे. ते मुळचे "सालंकी" असे असायला हवे असे माझे मत आहे. समज तसे नाही असे जरी गृहीत धरले तरी "शाल+अंकि" म्हणजे शाल व्रुक्षांच्या सोबतीतील, वा शालांची गणना करणारा अशी या शब्दाची व्युत्पत्ती लागते. शालंकी शब्दाचे कठपुतळी...बाव्हले असेही अर्थ परिभाषाकोषात येतात.
शालंकी हे एके काळी व्यक्तीनाम म्हणुन प्रसिद्ध होते हेही खालील उदाहरणांवरुन स्पष्ट होईल...
शालंकी हे नंदीचे एक नांव आहे.
विश्वामित्राच्या १०० पुत्रांपैकी एकाचे नांव शालंकायन होते.
शालंकायनजा हे व्यासमाता सत्यवतीचे एक नांव. तिच्या पित्याचे एक नांव शालंकायन असे होते.
शालंकायनी हा एक गोत्रप्रवर्तक ऋषीही मानला गेलेला आहे.
पाणिनीला "शालंकी" ही संद्न्या नसुन तेच त्याचे व्यक्तीनाम असावे असाच नि:श्कर्ष या विवेचनावरुन निघतो. शालंकाचा पुत्र म्हणुन शालंकी असेही ते व्युत्पादिता येवु शकते. गुजरातेतील सोळंकी घराणे या द्रुष्टीने पहायला हवे. व्यक्तिनामे कधी आडनांवे बनतात ही भारतीय परंपराही येथे लक्षात घ्यायला हवी.
थोडक्यात आपण पाणिनीच्या कुळाचा येथवर नुसता शोधच घेतला असे नसुन त्याचे व्यक्तीनामही उपलब्ध पुराव्यांच्या प्रकाशात शोधले आहे आणि ही आपल्या सांस्क्रुतीक इतिहासातील एक अत्यंत महत्वाची बाब आहे.
(पाणिनीला दिलेल्या सर्व संद्न्या...ज्यांचा आपण वर विचार केला त्या कात्यायनाच्या वार्तिका व पतंजलीच्या महाभाष्यातील आहेत.)
आता आपल्याला पाणिनीचा काळ निश्चित करावयाचा आहे. गोल्डस्टकर यांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीत शाक्यमुनीचा उल्लेख नाही यावरुन पाणिनी हा बुद्धपुर्व काळातील असला पाहिजे असा नि:ष्कर्ष काढला आहे हे आपण दुस-या भागात पाहिले आहे. पण हे खरे नाही. ते कसे हे पाहण्यासाठी अष्टाध्यायीतील खालील उल्लेख पाहुयात.
१.१.१६ : संबुद्धौ शाकल्यस्येतावनार्षे I
१.२.३३: एकश्रुति दुरात सम्बुद्धौ !
वरील दोन्ही सुत्रांत पाणिनीने संबुद्ध व सम्बुद्ध हे शब्द योजिले आहेत. हे दोन्ही शब्द बौद्ध वाड्मयात फक्त गौतम बुद्धाला उद्देशुन विपुल प्रमानात येतात. उदा.
"९९४: संबुद्धो ति वचो सुत्वा उदग्गो बावरि अहु।
सोकस्स तनुको आसि पीतिं च विपुलं लभि।।१९।।

९९५: सो बावरि अत्तमनो उदग्गो। तं देवतं पुच्छति वेदजातो।
कतमम्हि गामे निगमम्हि वा पुन। कतमम्हि वा जनपदे लोकनाथो
यत्थ गन्त्वा नमस्सेमु१(१म.-नमस्सेम.) संबुद्धं दिपदुत्तमं२(२म.-द्वि.)।।२०।।

९९६: सावत्थियं कोसलमन्दिरे जिनो। पहूतपञ्ञो वरभूरिमेधसो।
सो सक्यपुत्तो विधुरो अनासवो। मुद्धाधिपातस्स विदू नरासभो।।२१।।

मराठीत अनुवाद :-

९९४. संबुद्ध हा शब्द ऐकल्याबरोबर बावरि हर्षित झाला, त्याचा शोक कमी झाला, आणि त्याला अत्यन्त आनंद वाटला. (१९)

९९५ त्या हर्षित, आनंदित आणि सन्तुष्ट बावरीनें त्या देवतेला विचारलें, ‘तो लोकनायक कोणत्या गांवांत, शहरांत किंवा प्रदेशांत राहतो कीं, जेथें जाऊन त्या द्विपदोत्तम संबुद्धाला आम्ही नमस्कार करूं शकूं? (२०)

९९६ तो विपुलप्रज्ञ, विपुलश्रेष्ठबुद्धि, अप्रतिम धुरीण, अनाश्रव, मूर्धाधिपात जाणणारा, मनुष्यर्षभ, शाक्यपुत्र, जिन कोसल देशांतील पवित्र ठिकाणीं श्रावस्ती येथें राहतो.(२१) - (सुत्तनिपात)
मुळात "बुद्ध" हा शब्द ही बौद्ध ध्रर्माची देणगी आहे. "संबुद्ध" ही बुद्धाची विशेष अशी उपाधी आहे जी अन्य कोणासाठीही वापरली गेलेली नाही. असे असतांना गोल्डस्टकर यांच्या नजरेतुन ही दोन सुत्रे कशी सुटली याचे आश्चर्य वाटते. या सुत्रांवरुन पाणिनीचा काळ निश्चयाने बुद्धोत्तर ठरतो व तो ज्या स्तुपांचा उल्लेख करतो तो उल्लेख बौद्ध स्तुपांना उद्देशुनच आहे हेही येथे स्पष्ट होते. म्हणजे गोल्डस्टकर, म्यक्समुल्लर, अल्विस प्रभुतींनी अनुमानिलेला काळ चुकीचा आहे हे स्पष्ट आहे.
प्रो. वेबर यांनी ह्यु-एन-त्संगच्या विवरणाच्या आधारे इ.स. १४० हा पाणिनीचा काळ अनुमानिला आहे हे आपण पाहिले आहेच. वेबर यांचे काळाचे अनुमान जवळपास बरोबर आहे, परंतु त्यांनी फक्त ह्यु-एन-त्संगवरच अवलंबुन हा काळ काढला आहे, ते मात्र योग्य वाटत नाही. ह्यु-एन-त्संग ज्या पद्धतीने पाणिनीची कथा वर्णितो ती मित्थकथेच्या स्वरुपातील आहे. मित्थकथा या सर्वस्वी फेटाळता येत नसल्या तरी एकाच पुराव्यावर अवलंबुन अनुमान काढणे हे धाडसाचेच कार्य ठरेल यात शंका नाही.
आत येथे आपण कथासरित्सागराच्या अधाराने पाणिनीचा काळ निश्चित करता येतो काय हेही सकारात्मक द्रुष्टीने तपासुन पाहुयात. कथासरित्सागरात पाणिनी व कात्यायनाचे एकत्र नांव येते. कथासरित्सागर हे मुळ गुणाढ्याच्या ब्रुहत्कथेचे संस्कृत रुपांतर असले तरी गुणाढ्य, वररुची व पाणिनीची माहिती कथासरित्सागराच्या पहिल्याच कथापीठात येते व हा भाग गुणाढ्याने रचलेला नसुन ती सोमदेवाची निर्मिती आहे. कथापीठात सोमदेव आपल्याला गुणाढ्यासंबंधीच्या (आणि वररुची व पाणिनीच्या) ज्याही दंतकथा ऐकल्या वा मिळवल्या त्या येथे मांडत त्याने ब्रुहत्कथेची निर्मिती कशी झाली हे सांगितले आहे. सोमदेवाने कथासरित्सागर लिहिला तो अकराव्या-बाराव्या शतकात. त्यानुसार पाणिनी व वररुची (कात्यायन) हे एकाच हर्ष नामक गुरुचे शिष्य होते व दोघेही नंदकाळातील होते. पण येथेच सोमदेव सांगतो कि वररुचीच्या मृत्युनंतर लगेच गुणाढ्याचा जन्म झाला व तो सातवाहन राजसभेतील महत्वाचा कवि होता. सातवाहन घराण्यात सुनंदन नामक एक सातवाहन राजा होवून गेलेला आहे. समजा हाच तो नंद राजा सोमदेवाला अभिप्रेत असेल तर पुढील चर्चा करता येवू शकते.
सातवाहन काळ हा इसपु २२० ते इसवी सन २३० असा आहे. गुणाढ्य नेमक्या कोणत्या सातवाहन राजाच्या कालातील होता हे सोमदेवाने उल्लेखिलेले नाही त्यामुळे हा सातवाहन राजा नेमका कोण याबाबत निश्चयाने सांगता येत नाही, पण तो हाल सातवाहनाच्या दरबारातील कवि असावा असे एक अनुमान आहे, कारण स्वत: हाल हा काव्यप्रेमी होता. हाल सातवाहन हा सातवाहन राजघराण्यातील सतरावा राजा होता. त्याचा काळ हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या आधी ९ वर्ष एवढा येतो, म्हणजे हाल सातवाहन हा इस. ५०च्या आसपास सत्तेत आला. त्याने पाच वर्ष राज्य केले असे मत्स्यपुराण म्हणते. कथासरित्सागरातील माहिती पाहता गुणाढ्य हासुद्धा पाणिनीच्या जवळपास समकालीन ठरतो, वा फारतर एका पिढीचे अंतर असू शकते. परंतु कात्यायन व वररुची हे एकच असेही कथासरित्सागरवरुन दिसते, पण हे इतिहासाला धरुन नाही.
.वर वर पाहता कात्यायन व वररुची हे एकच आहेत असे कथासरित्सागरावरुन दिसते. प्रत्यक्षात प्राक्रुत प्रकाश रचणारा वररुची तर पाणिनीच्या सुत्रांवर "वार्तिका" लिहिणारा कात्यायन अशी विभागणी पाश्चात्य विद्वानांनी केलेली आहे. ही विभाजणी करण्याचे कारण म्हनजे हेमचंद्राने नवव्या शतकात जेथे जेथे प्राक्रुत प्रकाशचा उल्लेख केला आहे तेथे तेथे त्याचे श्रेय वररुचीला तर जेथे जेथे वार्तिकांचा प्रश्न येतो तेथेतेथे कात्यायनाला त्याचा कर्ता मानले आहे. सबब या दोन व्यक्ती भिन्न आहेत असे गोल्डस्टकर यांचे मत आहे, आणि ते मान्य करण्यासारखेच आहे.
गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक क्षत्रपाचा पराभव केला हा इतिहास आपल्याला माहितच आहे. याच नहपानाला जैन साहित्यात "नरवाहन" व कोठे "नहवाहन" असेही संबोधले गेले आहे. (संदर्भासाठी पहा: "Problems of Shak satvahana's History" by Dr. K.P. Jayaswal) "दत्त" ही उपाधी क्षत्रपच घेत असत. उदा. वृषभदत्त हे नहपानाच्या जावयाचे नांव होते. "अधुदक इयन" हा क्षहरात वंशाचा संस्थापक मानला जातो. अधुदक इयन या नांवाचे संस्कृतीकरण म्हणजे उदयन असे होवू शकते. कथासरित्सागराच्या संपुर्ण कथेचा डोलारा हा राजा उदयनाचा पुत्र नरवाहनदत्तावर उभा आहे. नहपान आपल्या हयातीत अत्यंत पराक्रमी राजा म्हणुन प्रसिद्ध असून त्याने सातवाहनांचे जवळपास सर्वच साम्राज्य गिळंकृत केले होते जे गौतमीपुत्राने पुन्हा जिंकुन घेतले. प्रत्यक्ष इतिहासावरुन अधुदक इयन हा नहपानाचा पिता अथवा (जर अधुदक इयन नंतर त्याचाच धाकटा भाऊ प्रथम सत्तेवर आला नसेल तर) आजोबा होता. परंतु यावरुन कथासरित्सागराचे नायक हे नहपान तथा नरवाहनदत्त व अधुदक इयन तथा उदयन होते व ही ऐतिहासिक पात्रे होती हे दुर्दैवाने सिद्ध होत नाही. याचे कारण म्हणजे नहपान हा क्षत्रप उज्जैनीचा राजा होता तर ब्रुहत्कथेचा नायक नरवाहनदत्त हा वत्स देशाचा राजा होता. योगंधरायन हा नरवाहनदत्ताचा आजोबा होय. वत्सराज उदयन, योगंधरायन व नरवाहन दत्तावर अनेक नाटके तसेच अन्य कल्पनारम्य लेखन झालेले आहे.
त्यामुळे आपल्याला कथासरित्सागराचा उपयोग पाणिनीचा काळ निश्चित करण्यासाठी होत नाही हे उघड आहे. आता पाणिनीचा काळ निश्चित करण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे ग्रंथार्गत प्रमाणे आणि दुसरा म्हणजे बाह्य प्रमाणे.
ग्रंथार्गत प्रमाणांवरुन एक बाब आपण सिद्ध केली आहे व ती म्हणजे पाणिनी हा निश्चितपणे बुद्धोत्तर काळातील आहे. बौद्ध स्तुपांची निर्मिती ही अशोकाच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली हे आपणास माहित आहेच. अशोकाचा काळ हा सनपुर्व ३०४ ते २३२ असा मानला गेला आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो कि स्तुपांची निर्मिती ही अशोक सत्तेवर आल्यानंतर व बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सनपुर्व २७० ते २५० च्या आसपास सुरु झाली असावी. यावरुन पाणिनी हा त्या काळात...म्हणजे इसपु २५० ते त्यानंतर कधीही झालेला असू शकतो हे उघड आहे.
आता सर्वात महत्वाचे बाह्य प्रमाण विचारात घेवू. (ग्रंथार्गत अजुन काही महत्वाची प्रमाणे आहेत, पण त्याबद्दल पुढे.)
पाणिनीपुर्व मानले जाणारे ग्रंथ व पाणिनीय व्याकरणावर आधारीत अभिजात ग्रंथ आपण येथे विचारात घेवुयात. पाणिनी जर सनपुर्व ८००, ४५० वा २५० मद्धे झाला असेल तर त्या काळानंतरच्या साहित्यावर पाणिनीय व्याकरणाचाच प्रभाव असला पाहिजे हे उघड आहे. पाणिनीय व्याकरण सिद्ध होण्यापुर्वीच्या साहित्याला वैदिक, ब्राह्मणकाळ अशा संद्न्या आहेत. महाकाव्य काळाला आर्षकाळ मानण्याची प्रथा आहे. रामायण-महाभारताला आर्ष साहित्य मानले जात असुन त्यावर पाणिनीय व्याकरणाचा प्रभाव नाही, उलट या दोन्ही महाकाव्यांवर प्राक्रुत भाषांचा व व्याकरणाचाही प्रभाव मोठा असल्यानचे स्पष्ट दिसते. रामायण-महाभारतावर प्राकृताचा एवढा प्रभाव का, याबद्दल आपण पुढे स्वतंत्र चर्चा करणार असल्याने येथे एवढेच पुरेसे आहे. पाणिनीय व्याकरणाधारित साहित्य निर्मितीचा काळ हा "अभिजात संस्कृत" चा काळ मानला जातो.
अभिजात संस्कृतमधील साहित्याची निर्मिती गुप्तकाळात सुरु झाली, हे सर्वमान्य मत आहे. हा काळ इसवी सनाचे तिसरे ते सहावे शतक असा आहे. याच काळात पाणिनीय संस्क्रुताधारित नाटके, शास्त्रीय, गणीतीय, तंत्रद्न्याने, आयुर्वेद आदि विविध क्षेत्रातील विषयांना वाहिलेले असंख्य ग्रंथ निर्माण होवू लागले भास, कालिदास, आर्यभट्ट, वराहमिहिर, विष्णु शर्मा, वात्स्यायन आदि दिग्गज लेखकांनी पाणिनीय संस्कृतमद्धे विविधांगी रचना केल्या वा त्या मुळच्या प्राकृत कृती अभिजात संस्कृतात अनुवादित करण्यात आल्या. याच काळात ब्रह्मसुत्रे, कल्पसुत्रे आदि सुत्र-साहित्यही निर्माण झाले.
पाणिनी हा "सुत्र" या शैलीचा संस्कृत भाषेतील आद्य प्रणेता होय. तत्पुर्वी कच्छायनाने पाली भाषेचे व्याकरण सुत्र शैलीत लिहिले होते. "अष्टाध्यायी" हा सुत्रप्रकाराचा सर्वश्रेष्ठ व आद्य ग्रंथ होय. "सुत्र" म्हणजे अत्यंत अल्पाक्षरी, अक्षरश: गणिती पद्धतीने मांडलेले सुत्ररुपी सिद्धांत होत. दोन ते चार-सहा शब्दांत विपुल अर्थ-विस्तार होईल अशा पद्धतीने सुत्ररचना केलेली असते. यातुन अवाढव्य साहित्य अत्यंत थोडक्यात शब्दबद्ध होते. असे असले तरी सर्वसामान्य वाचकांना ती समजणे जवळपास अशक्य असेच असल्याने भाष्यांच्या मदतीखेरीज त्यांचा अर्थ लागत नाही. त्यामुळेच कात्यायनाने "वार्तिका" व पतंजलीने "महाभाष्य" व सतराव्या शतकातील भट्टॊजी दीक्षितांनी "सिद्धांतकौमुदी" लिहुन पाणीनीय व्याकरण सुलभपणे समजावे यासाठी भाष्ये लिहिली. ब्रह्मसुत्रांवरचे पहिले भाष्य सातव्या शतकात आदि शंकराचार्य यांनी लिहिले. असो.
पाणिनीचा काळ सनपुर्व कोणत्याही शतकातील असता तरी त्या व्याकरणाधारित साहित्यसृजन किमान शतकभराच्या काळात सुरू व्हायला हवे होते. पण आपण कालिदासाच्या नाटकांचा काळ विचारात घेतला तर तसे झाल्याचे दिसुन येत नाही.
ऐहोळे प्रशस्तीवरुन कालिदास सन ६३४ पुर्वीचा आहे हे सिद्ध झालेले आहे. त्याच्या नाटकांतील भाषेवरुन व क्षुल्लक पात्रे जी प्राकृत बोलतात त्यावरुन कालिदासाचा काळ इसपु तिस-या शतकापार जावु शकत नाही हे श्री ए.ए. म्यक्डोनेल यांनी आपल्या कालिदासावरील ब्रिटानिका द्न्यानकोशात लिहिलेल्या लेखात स्पष्ट केले आहे. संस्कृतचे तद्न्य डा. रामचंद्र तिवारी यांनी शेकडो पुरावे (भाषाशास्त्रीय, पुरातत्वीय व तत्कालीन सामाजिक) अभ्यासुन कालिदासाचा काळ सन ३०० ते ४७० असा अंदाजिला आहे. थोडक्यात कालिदासाचा काळ हा कसल्याही स्थितीत इसवी सनाच्या तिस-या शतकाच्या पलीकडे जावु शकत नाही हे उघड आहे. उलट तो सन ४०० ते ५०० यामधील काळात झाला असावा असे माझे अनुमान आहे. अभिजात संस्क्रुतचा आद्य नाटककार भास हा इसच्या तिस-या शतकात झाला. त्यामुळे कालिदासाच्या क्रुतींचा काळ हा किमान शंभर वर्षांनी अर्वाचीन ठरतो. म्हणजेच कालिदासक्रुतींचा काळ इसचे चवथे ते पाचवे शतक हाच बरोबर आहे.
परंतु तो समजा तिस-या शतकातच झाला असे मानले तरी पाणिनी त्याच्यापुर्वी चार-पाचशे वर्ष आधी होवून गेला हे मत टिकत नाही, कारण या मधल्या काळात पाणिनीय संस्कृताधरीत एकही रचना, धार्मिक असो कि तत्वद्न्यानात्मक, मिळत नाही. रामायण व महाभारताचे शेवटचे संस्कृत संस्करण हे इसवी सनाच्या दुस-या ते चवथ्या शतकातील मानले जाते. (संदर्भ: भारतीय संस्क्रुती कोश, संपादक-पं. महादेवशास्त्री जोशी) परंतु व्याकरणकारांची जी नांवे महाभारतात येतात त्यात पाणिनीचे नांव येत नाही. याचाच अर्थ असा कि महाभारत कर्त्याला पाणिनी माहित नव्हता, कारण तो तोवर झालेलाच नव्हता.
याचाच अर्थ असा कि पाणिनीचा काळ हा सरासरी दुसरे शतक एवढा येतो. पुढच्या शंभर वर्षांत कात्यायनाच्या वार्तिकांमुळे पाणिनीय व्याकरणाचा प्रसार झाला व सरासरी तिस-या शतकापासून पणिनीय व्याकरणावर आधारीत सहित्यसृजन होवू लागले असे स्पष्ट दिसते.
अर्थात एवढाच पुरावा पुरेसा नाही याची मला पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे अष्टाध्यायीतीलच काही अंतर्गत प्रमाणे आपण तपासुन पाहुयात.
१. 1.2.37: न सुब्रह्मण्यायां स्वरितस्य तूदात्त: I हे सुत्र आपल्याला तपासून पहायचे आहे. "सुब्रह्मण्य" ही निविद कुमार कार्तिकेयाची आहे हे जगप्रसिद्धच आहे. कार्तिकेयाला "सुब्रह्मण्य" हा शब्द फक्त दक्षीण भारतातच वापरला जातो. सुब्बर (सर्प)+मणि या शब्दांची जोड होवून सुब्रह्मण्य हा शब्द निर्माण झाला आहे हे डा. रा. चिं. ढेरे यांनी मार्च १९७४ च्या आनंदवन मासिकाच्या अंकात लिहिलेल्या निबंधात स्पष्ट केले आहे. दक्षीणेत सुब्रह्मण्याची पुजा नागरुपातच केली जाते असेही त्यांनी नमुद केले आहे.
आता सुब्रह्मण्य ही देवता दक्षीणेत कधी लोकप्रिय झाली कि पाणिनीने तिचा उल्लेख अष्टाध्यायीत करावा? सुब्रह्मण्य म्हनजे स्कंद कार्तिकेय असे मानण्याची प्रथा असली तरी कार्तिकेय हा अविवाहित आहे अशी उत्तरेतील परंपरागत समजुत आहे. परंतु दक्षीणेतील सुब्रह्मण्य हा मात्र विवाहित असुन वल्लियम्म ही त्याची पत्नी आहे. सुब्रह्मण्य ही देवता दक्षीणेत सरासरी इसपुचे पहिले शतक ते इसचे दुसरे शतक या काळात लोकप्रिय झाली असे सुब्रह्मण्य या देवतेच्या इतिहासावरुन व शिल्पसार या ग्रंथावरुन दिसते. सुब्रह्मण्याचे वाहन कार्तिकेयाप्रमनेच मयुर मानले गेले असले तरी कुशाणकालीन यौधेय गणाच्या नाण्यांवर कार्तिकेयाचे वाहन कोंबडा दर्शवले आहे. महाभारतातील वनपर्वातही कार्तिकेयाचे वाहन म्हणुन कुक्कुटाचाच उल्लेख केला गेलेला आहे. (वनपर्व-२२९). म्हणजे इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत कार्तिकेय हा कुक्कुटवाहन असावा असा तर्क करता येतो. कार्तिकेय व सुब्रह्मण्य देवतांत बरेच साम्य असले तरी दोन्ही देवता एकच नव्हेत. मुळ सुब्रह्मण्य ही क्षेत्रपाल श्रेणीतील देवता असावी असा डा. रा. चिं. ढेरे यांचा तर्क आहे. आता सुब्रह्मण्य आणि कार्तिकेयाचे तादात्म्य दक्षीणेत साधले गेले ते इसपुच्या दुस-या शतकाच्या आसपास. दक्षीणेत सुब्रह्मण्य हा मयुरवाहनच मानला गेलेला आहे हेही येथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सुब्रह्मण्याचा पाणिनीच्या व्याकरणातील उल्लेख हा दोन बाबी स्पष्ट करतो. पहिली म्हनजे पाणिनी हा मुळचा दाक्षीणात्यच होता ही. आणि दुसरी बाब म्हणजे पाणिनी हा दुस-या शतकाच्या मध्यात कधीतरी होवुन गेला असणार ही. कारण याच कालात सुब्रह्मण्य देवतेची प्रतिष्ठा अलौकिकपणे, पण फक्त दक्षिणेत वाढलेली होती. तसे नसते तर सुब्रह्मण्याचा उल्लेख पाणिनीने केला नसता.
२. ४.१.११४: ऋष्यन्धकवृष्णिकुरुभ्यश्च!
४.१.१७६: स्त्रियामवन्तिकुन्तिकुरुभ्यश्च ! (अष्टाध्यायी)
आता ही वरील सुत्रे पाहिली असता व अन्य सर्वच सुत्रांशी तुलना केली असता एक बाब स्पष्ट होते ती ही कि जरी पाणिनीने महाभारतातील व्यक्तींचा उल्लेख केला असला तरी रामायणातील एकाही व्यक्तीरेखेचा विचार वा नामोल्लेख कोठेही केलेला दिसून येत नाही. रामायनाची जुन्यातील जुनी प्रत ही अकराव्या शतकातील आहे. रामायणाचे शेवटचे संस्करण (संस्कृत) इसवी सनाच्या तिस-या वा चवथ्या शतकात झाले अशी मान्यता आहे. याचा अर्थ असा नव्हे कि रामायण कथा कोणत्या ना कोणत्या रुपात प्रचलित नव्हती. परंतु आर्ष संस्क्रुतमद्धे महाभारत आधी अनुवादित झाले असल्याने व ते पाणिनीपुर्व असल्याने भाषेचे नियम बनवतांना पाणिनीने महाभारतीय संद्न्या घेतल्या असने स्वाभाविक आहे. यावरुनही पाणिनीचा काळ हा इसच्या दुस-या शतकानंतरचाच येतो.
३. "न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारम I
उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम II
अष्टाध्यायीतील हे शिवसुत्र आहे. (यालाच महेश्वर सूत्र असेही म्हणतात.) पाणिनी हा शैव होता हे अष्टाध्यायीतील काही सुत्रांवरुनही स्पष्ट होते. उदा. शिवादिभ्योSण !( ४.१.११२). वरील श्लोकात पाणिनीला शिवाने केलेल्या तांडव नृत्यानंतर जो चवदा वेळा डमरु वाजवला त्यातुन जे ध्वनी निघाले त्यावर आधारीत पाणिनीचे समग्र व्याकरण अवलंबुन आहे. आता आपण या श्लोकाचे परिशिलन करूयात.
शिवाला नटराज स्वरुपात भजले जाते ते फक्त दक्षीणेत हे सर्वांना माहितच आहे. शिवाला नृत्याचा जनक व सम्राट मानले जाते. पाणिनीय व्याकरणानुसार खरे तर हे रुप "नटराज" न होता "नृत्तराज" असे व्हायला हवे. परंतु पाणिनीने तत्कालीन दक्षीणेत प्रचलित असलेला "नटराज" हाच शब्द कटाक्षाने वापरलेला आहे, असे स्पष्ट दिसते.
आता दक्षीणेत नटराज स्वरुपात शिवपुजा कधी सुरु झाली हे तपासुन पहायला हवे. दक्षीणेत शिवाच्या नटराज स्वरुपातील विपुल मुर्ती बनु लागल्या त्या नवव्या शतकात चोल राजघराण्याच्या काळात. शिवाचे नटराज रुप ही खास दक्षीणी देणगी आहे. या संकल्पनेचा उदय संगम साहित्य काळात (इसपु ३०० ते इस. ३००) झाला. पाणिनी हा नटराजाची संकल्पना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याच्या, म्हनजे इस. दुसरे ते तिसरे शतक याच काळात झाला असावा असे याही पुराव्यावरुन अनुमानिता येते.
नटराजाने आपले तांडव नृत्य तमिळनाडु येथील चिदंबरम या ठिकाणी केले अशी मान्यता आहे. पतंजलीनेही आपले महाभाष्य चिदंबरम येथेच लिहिले. हे वास्तव लक्षात घेता पाणिनीही मुळचा दाक्षीणात्यच होता असे अनुमानिता येते.
थोडक्यात आपण जी ग्रंथार्गतची आणि बाह्य प्रमाने तपासली असता खालील बाबी स्पष्ट होतात.
१. पाणिनीय व्याकरणाधारित अभिजात साहित्याची निर्मिती ही तिस-या शतकानंतर सुरु झालेली आहे, म्हणजेच त्याचा काळ हा दुस-या शतकाची सुरुवात ते दुस-या शतकाचा मध्य यापेक्षा अधिक मागे जावु शकत नाही.
२. पाणिनी हा मुळचा दाक्षिणात्य व शैव होता.
३. पाणिनी व कात्यायन समकालीन असल्याने त्याचाही काळ तोच अनुमानिता येतो. तक्षशिला येथे पाणिनी पुढील अध्ययनासाठी गेला असण्याची शक्यता ह्यु-एन-त्संगाच्या वर्णनावरुन ग्रुहीत धरता येते. तेथेच त्याची व कात्यायनाची भेट होवून अष्टाध्यायीची रचना होताच कात्यायनाने वार्तिका लिहिल्या असाव्यात. तक्षशिलेचे विद्यापीठ हे इस. ४७० मद्धे ते हेफालिट्सने उद्ध्वस्त करेपर्यंत आस्तित्वात होते.
४. पाणिनी हे त्याचे कुलनाम असून त्याचे मुळ नांव शालंकी असे होते.
५. तक्षशिलेला असतांनाच कच्छायनाच्या पाली व्याकरणाशी पाणिनी परिचित झाला असावा व त्याचाच आदर्श घेत पाणिनीने नुकताच आकार घेत असलेल्या संस्कृतचे व्याकरण लिहिण्याचा विचार केला असावा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अभ्यासपूर्ण लेख. एका विषयाचा सांगोपांग अभ्यास करून तुम्ही निष्कर्ष काढलेले आहेत. भाषाशास्त्रात मला फारशी गती नसल्याने इतर जाणकारांच्या प्रतिसादांची वाट बघतो.

मात्र एक वाक्य वाचून गोंधळ झाला.

उलट तो सन ४०० ते ५०० यामधील काळात झाला असावा असे माझे अनुमान आहे. अभिजात संस्क्रुतचा आद्य नाटककार भास हा इसच्या तिस-या शतकात झाला. त्यामुळे कालिदासाच्या क्रुतींचा काळ हा किमान शंभर वर्षांनी अर्वाचीन ठरतो. म्हणजेच कालिदासक्रुतींचा काळ इसचे चवथे ते पाचवे शतक हाच बरोबर आहे.

चौथं शतक म्हणजे ३०१ ते ४०० आणि पाचवं शतक म्हणजे ४०१ ते ५०० असा माझा समज आहे. तुमच्या 'चौथं ते पाचवं शतक म्हणजे ४०० ते ५००' हे वाचून मी लावलेला अर्थ बरोबर आहे का अशी शंका यायला लागली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालिदासाच्या काळाबाबतही खुप विवाद असल्याने मी तो चवथे ते पाचवे शतक असा घेतला आहे. भासाचा काळ अंतर्गत प्रमाणांमुळे तिसरे शतक असा मानला गेला आहे. कालीदास हा कधीही या कालात (चवथे ते पाच्वे शतक) या काळात होउन गेला असु शकतो, महत्वाची बाब म्हणजे "विक्रमोर्वशीय" या कालीदासाच्या नाटकात ७०% प्राकृत असुन या नाटकाला मग संस्कृत कसे म्हणायचे हाही एक प्रश्न आहे. उर्वशी ते अन्य सर्वच पात्रे (विक्रम व त्याचा साथीदार सोडुन) सर्वच पात्रे महाराष्ट्री प्राकृतात बोलतात. क्वचित शौरसेनीही येते...

पाणिनीय व्याकरणाचा उपयोग करनारा भास ह आद्य नाटककार आहे याबाबत मात्र शंका नाही. असल्यास कृपया कळवावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुश्श
दमले वाचून

पाणिनीबाबत माझ्या संस्कृताच्या बाईनी सांगितलेली कथा अशी की
हा पाणिनी अत्यंत ढ होता
त्याचे शिक्षक त्यामुळे चिडत
एकदा भयंकर चिरडीस आल्यानंतर त्यांनी मार देण्याकरता पाणिनीचा हात पुढे करण्यास फर्मावले
त्याचा हात बघताच अरे तुझ्या हातावर शिक्षणाची रेषाच नाही तू काय डोँबल शिकणार असे उद्गार काढले
तेव्हा पाणिनीने अणुकुचीदार दगडाने हातावर रक्ताळलेली रेशा काढली आणि रेषा माझी मीच निर्माण करेन असे ऊत्तर दिले
व व्याकरणाची निर्मिती केली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

एकदा भयंकर चिरडीस आल्यानंतर त्यांनी मार देण्याकरता पाणिनीचा हात पुढे करण्यास फर्मावले

पाणिनीच्या काळातले शिक्षकसुद्धा आमच्या वेळच्या शिक्षकांसारखे अगदी तश्शीच शिक्षा करत, हे वाचून डोळे पाणावले.

त्याचा हात बघताच अरे तुझ्या हातावर शिक्षणाची रेषाच नाही तू काय डोँबल शिकणार असे उद्गार काढले

हे मात्र जरा अतीच झाले हं. आमचे शिक्षक आमच्या हातावरच्या रेषांमध्ये इतके बारीक लक्ष घालून नसत. त्यांना मतलब फक्त हातावर जोरदार छडी मारण्यात असे. तेवढा नेम बरोबर जमण्याइतपत जे काही लक्ष घालत असतील, तेवढेच.

आमचे शिक्षक पाणिनीच्या काळातल्या शिक्षकांच्या मानाने बरेच प्रोग्रेसिव होते, म्हणायचे. हातावरच्या रेषा काय? अंधश्रद्धा नुसती!

तेव्हा पाणिनीने अणुकुचीदार दगडाने हातावर रक्ताळलेली रेशा काढली

येडाच आहे! काही स्केचपेन, गेला बाजार बॉलपेन तरी मिळाले नाही काय हाताशी?

(छ्या:! साध्या लायनी कशा मारायच्या, ते कळत नाही. आणि निघालेत व्याकरण लिहायला!)

रेषा माझी मीच निर्माण करेन असे ऊत्तर दिले
व्याकरणाची निर्मिती केली

लीनियर आलजिब्रा वगैरेंबद्दल ऐकले होते, पण ही रेषीय व्याकरणाची ('लीनियर ग्रामर') संकल्पना (जी काही असेल ती) अभिनव वाटते. रोचक असावी बहुधा.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील माहिती बाईनी सांगितल्याप्रमाणे आहे. मला जशी आठवली तशी लिहिली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

> दुसरे असे कि, "एखाद्या भाषेचे व्याकरण रचण्याचा प्रयत्न करणे ही एक अयोग्य गोष्ट आहे. जी जीवंत भाषा असते तिचे वेगवान स्त्रोत हे ग्रंथांच्या बाहेरच आढळतात. (text omitted)
> पाणिनीने उत्तर भारतात सर्वत्र विहार करुन स्थानिक भाषाभेदही विचारात घेत व्याकरण सिद्ध केले अशी आपली परंपरा मानते हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

> कात्यायन हा दक्षीण देशी विद्वान होता अशीही मान्यता आहे, असे असेल तर मग पाणिनी नेमका कोठला होता हेही येथे > तपासुन पहाणे उचित ठरेल. (प्रत्यक्षात इतिहासात अनेक वररुची व कात्यायन होवुन गेले आहेत) पाणिनी हा गांधार प्रांतातील > शलातुर गांवचा निवासी होता हे युवान श्वांगचे मत आपण पाहिले आहेच. प्रश्न असा पडतो कि त्या काळी (इसवीसनाचे दुसरे शतक असो कि इसपुचे पाचवे शतक) गांधार प्रांताची नेमकी भाषा काय होती? जोही ज्या प्रदेशात जन्म घेतो तेथील प्रचलित > भाषा हीच प्रत्येकाची मातृभाषा असते. मग या प्रांताची या कोणत्याही निर्दिष्ट काळी नेमकी काय भाषा होती? समजा त्याकाळी या प्रदेशातील भाषा संस्कृतच होती तर आता तेथे ती भाषा अवशिष्ट तरी आहे काय? असल्यास कोणत्या स्वरुपात?

लेखामागे अभ्यास (किंवा निदान वाचन) खूप अाहे हे उघडच अाहे. पण माझा अाक्षेप असा की लिखाण इतकं विस्कळित अाहे, की काहीही हाती लागत नाही. निदान मला तरी लेख वाचत असताना मुद्दा काय अाहे याचा धागा एका वाक्यापासून दुसऱ्या वाक्यापर्यंत धरून ठेवणं अशक्य झालं. वर मी लेखातला एक लहानसा भाग उद्धृत केलेला अाहे, तो पुन्हा पहा.
१. पहिल्या वाक्यात अापण भाषेचं व्याकरण रचणं हे योग्य की अयोग्य हा रंजक मुद्दा अाणलेला अाहे, पण मग तो लगेच तसाच सोडून दिलेला अाहे.
२. पाणिनीचा काळ ठरवायचा असेल, तर तो उत्तर भारतात हिंडला की नाही याला इथे काही महत्व नाही.
३. तुम्ही एकाच वाक्यात कात्यायन अाणि पाणिनी अाणले अाहेत, पण मग कंसात अनेक वररुची अाणि कात्यायन अाणून वाचकाला बुचकळ्यात पाडलेलं अाहे. कात्यायन अाणि वररुची प्रत्येकी डझनभर जरी असले तरी त्याचा इथे काय संबंध?
४. पाणिनी शलातुरचा होता हे श्वांगचं मत विश्वासार्ह नाही असं तुम्ही वर म्हणता, पण मग शलातुरची भाषा कुठली होती या प्रश्नात शिरता. ज्या प्रश्नाच्या उत्तरावर काही अवलंबून नाही, त्याची इतकी चर्चा कशाला?
५. शलातुरची भाषा तेव्हा काहीही असली, तरी अात्ता ती तिथे अाहे का याला काय महत्व अाहे?
६. माणूस ज्या प्रांतात जन्मतो तिथलीच भाषा त्याची मातृभाषा असली पाहिजे असं नाही. (काफ्काची मातृभाषा जर्मन होती कारण अाईबाप जर्मन होते, पण तो जन्मला अाणि राहिला प्रागमध्ये.) दुसरं म्हणजे व्याकरण लिहायचं तर ते अापल्या मातृभाषेचंच लिहिलं पाहिजे असाही काही दंडक नाही. अाणि ते काही असलं तरी हे मुद्दे अाणून त्यांचं तुम्ही पुढे काहीच केलेलं नाही.

हे असंच अख्ख्या लेखभर चालू राहतं, त्यामुळे शेवटी वैतागून वाचक तो सोडून देण्याची शक्यताच जास्त. जर अापण लिखाणात शिस्त अाणलीत अाणि फापटपसारा टाळलात तर ते जास्त परिणामकारक होईल असं वाटतं. अौद्धत्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अगदी नेमके. मी कसाबसा लेख वाचून पूर्ण केला. काही कळले नाही.
मग 'वाचता येणे म्हणजे अर्थ कळणे नव्हे...' वगैरे विचार करून गप्प बसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयदीप आणि श्रामोंशी सहमत. लेख बराच विस्कळीत वाटतो. जरा अधिक विचार केला तर असे वाटते की, अभिजात संस्कृत ही प्राकृतोत्भव आहे हे सिद्ध करण्यासाठी लेख लिहिला असावा.

आता हे मत अगदीच चूक नाही. त्यात थोडे तथ्यदेखिल आहे. पण ते सांगण्यासाठी एवढ्या लंब्याचवड्या आणि विस्कळीत लेखाची आवश्यकता नव्हती.

माझे अनुमान चुकीचे असल्यास क्षमस्व!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिक्रिया दात्यांचे आभार. हा लेख नसुन मी सध्या लिहित असलेल्या पुस्तकातील एक प्रकरण आहे. त्यात विस्कळीतपणा जाणवला असल्यास तो दोष माझा आहे. यात मी काही संदर्भ घेवुन त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा पुढे गेलो आहे कारण त्यांचा उहापोह अन्य प्रकरणांत आहे. हे प्रकरण येथे टाकण्यामागील उद्देश्य हा कि पाणिनीसंदर्भात माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती व माझे नि:ष्कर्ष यांना तडा जाईल अशी नवी माहिती कोणाकडे आहे काय हे पाहणे. कात्यायन-वररुची यांचे उल्लेख वारंवार येणे स्वाभाविक आहे कारण ते एकच असे मानण्याचा आपल्याकडेही प्रघात आहे. या नांवाच्या अनेक व्यक्ती झाल्या असल्या तरी त्यांनाही एकच, असे अगदी आपला भारतीय संस्कृती कोशही, मानतो, त्यामुळे इतिहासात एकाच नांवाच्या अनेक व्यक्ती होवुन गेल्या आहेत हेही सांगणे मला महत्वाचे वाटते. शलातुरची भाषा काहीही ॑असली तरी फरक पडतो कारण पाणिनी तेथे बराच काळ वास्त्॑अव्यास असावा हे स्पष्ट आहे. तो मुळचा दाक्षीणात्य असल्याने त्याचे मातृभाषा जरी तेथील नसली तरी त्याच्या व्याकरणावर तेथील स्थानिक भाषेचा प्रभाव आहे...ती नेमकी कोनती व आज अवशिष्ट आहे काय हेही तपासुन पाहणे आवश्यक आहे. भाषा सहजी मरत नसतात. बदल स्वीकारत पुढे जात राहतात हेही लक्षात घ्यावे लागते. अजुनही काही प्रकरणे मी येथे प्रसिद्ध करेन. त्यात भर घालण्यासारखी माहिती असल्यास अवश्य शेयर करावी. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीने ओतप्रोत भरलेले हे लिखाण संग्रही ठेवावे इतके मोलाचे आहे असे मला वाटते. वर काही प्रतिसादक म्हणतात त्याप्रमाणे लेख मोठा झाला आहे यात दुमत नाही (तो क्रमशः येणे गरजेचे होते), पण म्हणून लेखाचे आणि त्यातील विवेचनाचे महत्व बिलकुल कमी मानू नये. लेखक श्री.संजय सोनवणी यानी या विषयाबाबत केलेला अभ्यास थक्क करणारा असाच आहे. त्याबद्दल एक सामान्य वाचक या नात्याने मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो संजयजी.

मागे कुठल्यातरी संदर्भाचा पाठपुरावा करीत असताना शंकराचार्यांनीय पाणिनीचा उल्लेख "भगवान" पाणिनी असा केलेला आढळला. तत्पूर्वी मी पाणिनी म्हणजे व्याकरणाला वेदांत मानणारी एक अधिकारी व्यक्ती असेच ओळखत होतो. पण शंकराचार्यांनी त्याना भगवान पाणिनी केल्याचे वाचल्यावर मग त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा किती भव्य होत्या त्याचा थोडाफार अंदाज आला. तपोवनात व्याकरण शिकवित त्यांचे ते प्रसिद्ध वचन “व्याजिघ्रति स व्याघ्र:” वाचनात आले आणि त्याच्याबरोबरची ती वाघाची "दंतकथा"ही. तीवर विश्वास ठेवण्याची काही गरज नसली तरी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकविण्यामध्ये ते किती दंग होत असत याची प्रचिती घेणे इतकेच अभ्यासकाच्या हाती होते. आता लेख वाचल्यानंतर लक्षात येते की तुम्ही त्यासंदर्भात किती वाचन केले असावे.

पतंजलिचा उल्लेख वर लेखात आहे. या विषयावरील माझ्या अल्प वाचनात पतंजलि स्वतःला व्याकरणकार पाणिनीचा शिष्य मानत असे. मला वाटते त्यानीच पुढे पाणिनी व्याकरणाचा प्रसार केला (नक्की खात्री नाही). याबाबत खुद्द श्री.सोनवणीच अधिकारवाणीने लिहू शकतील.

बर्‍याच दिवसांनी अशा एका विषयावर इतके सकस वाचन मिळाले.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हुश्श! तिसर्‍या बैठकीत पूर्ण वाचून झाले. Smile
बरीच नवी माहिती मिळाली. अनेक आभार!

मात्र जर हे पुस्तकातील प्रकरण असेल तर यावर संपादकीय संस्कार होणे बाकी असावे असा कयास लावतो. लेखन एका विषयातून दुसरी कडे अचानक जाते, परिच्छेद अधिक सुयोग्य ठिकाणी पाडायची गरज, योग्य शीर्षकांचा अभाव आदि तृटीही जाणवल्या. पुस्तक कच्चे असेल असे अध्यारुत धरून या सुचवण्या केल्या आहेत. राग नसावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संपादकीय संस्कार करायचेच आहेत. अजुन मी या प्रकरणाला अंतिम लेखन मानत नाही कारण पाणिनीसंदर्भात मला अजुन काही नवीन माहिती मिळण्याची वा नवा विचार सुचण्याची आशा आहे. पाणिनीचा काळ हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. त्यात विविध तज्ञांच्या असंख्य मतमतांतरांच्या गुंत्यातुनही जावे लागते आहे. पाणिनीचा मी काढलेला काळ हा ब-यापैकी सत्त्याच्या जवळपास जाणारा आहे असे मला वाटते तरी अजुन समर्थनीय व ठोस पुरावे मिळाले तर हवेच आहेत. त्याउलट कच्छायनाचा इतिहास महावंससारख्या पुरातन व तेही सिलोनमद्धे लिहिल्या गेलेल्या ग्रंथत जपला गेला असल्याने त्याच्याबाबत असा गोंधळ होत नाही.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.
पुनरावृत्ती, विस्कळीतपणा, टंकलेखनदोष, संदर्भ-तळटीपांची उणीव आणि लेखनामागच्या उद्दिष्टाबाबतचा संभ्रम हे दोष टाळता येण्यासारखे आहेत. माहितीपूर्ण लेख आहे. किंबहुना एका उत्कृष्ट अभ्यासलेखाचा कच्चा आराखडा म्हणून या लेखाकडे पहायला हरकत नाही.
हा लेख अधिक वाचनीय-मननीय व्हावा म्हणून जितके होईल तितके सुस्पष्ट पुनर्लेखन करणे जरूरीचे वाटते. शिवाय प्रत्येक संदर्भाला अंकित करून त्याबाबत तळटीपाही असाव्यात असे वाटले.

अवांतर :
संस्कृत भाषा म्हणजे प्राकृत भाषेचेच परिष्कृत रूप आहे असा एक मतप्रवाह आहेच. शिवाय तमिळ भाषा ही संस्कृतापेक्षाही पुरातन आहे असेही एक मत आहे. अर्थात भाषा अस्तित्त्वात असूनही तिचे (लिखित/स्थायी/विद्वज्जनमान्य) व्याकरण उपलब्ध नसणे हा काही ती भाषाच अस्तित्त्वात नसल्याचा पुरावा होऊ शकत नाही. इ.स. १०००च्या आसपास ज्या मराठी भाषेत लेखन झालेले आढळते तिचे व्याकरण मात्र दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी सन १८३५च्या आसपास लिहीले. (त्यापूर्वी विल्यम केरीने ते १८०५मध्ये लिहिले होते.) म्हणजे लिखित व्याकरण सापडत नाही ती भाषा इ.स. १८०० पूर्वी अस्तित्वातच नव्हती असे म्हणता येईल काय? त्याचप्रमाणे पाणिनीचा काळ कोणताही निश्चित होवो, त्याच्यापूर्वी किमान १००० वर्षेतरी संस्कृत भाषा अस्तित्वात होती आणि तिचा बोली/लेखी भाषा म्हणून तत्कालीन भारतीय उपखंडात इतका प्रचार-प्रसार झालेला होता की तिचे एक सर्व(सा)मान्य रूप निश्चित करणे गरजेचे झालेले होते. त्यातूनच पाणिनीच्या सूत्रांची निर्मिती झाली असावी. अर्थातच समकालीन आणि कदाचित एकाच बौद्धिक पातळीच्या विद्वानांना त्यात चुका आहेत असे जाणवले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना, मनःपुर्वक धन्यवाद. पाणिनीपुर्व अनेक व्याकरणकार होवून गेले आहेत. उदा. शकटायन. परंतु अभिजात संस्कृतची सुरुवात पाणिनीपासुन होते म्हणुन आधी त्याचा काळ नक्की करणे मला गरजेचे वाटले. इंडो-युरोपियन भाषासिद्धांत हा मुळात आर्य बाहेरुन आले या गृहितकावर होता. आता ते असिद्ध झाले असल्याने वैदिक भाषेचे जनक येतद्देशीयच होते असे म्हणने क्रमप्राप्त आहे. असे असेल तर ज्या भुभागात वेद लिहिले गेले (सरस्वती) त्या भागातील अशी कोणती मुळ भाषा आहे कि ज्यावर संस्कार करत वैदिक भाषा (छंदस) निर्माण झाली हा प्रश्न मला या पुस्तकात सोडवत न्यायचा आहे. कारण वैदिकजनांचा भुगोल (वेदकाळी) अत्यंत मर्यादित होता. संस्कृत व पाली भाषा या कृत्रीम भाषा आहेत याबाबत विद्वानांत दुमत नाही. इंडो-युरोपियन भाषाकुळाचा सिद्धांतही त्यामुळे पुन्हा नव्याने तपासुन पहावा लागनार आहे. त्याविरोधात जाणारी अनेक प्रमाने-पुरावे उपलब्ध आहेत.

व्याकरण असणे हेच भाषेच्या अस्तित्वाचे लक्षण होय असे नक्कीच नाही. भाषाव्यवहार गुंतागुंतीचे होवु लागतात तेंव्हाच व्याकरणाची आवश्यकता भासते व तशी ती वेळोवेळी लिहिलीही जातात. उदा. कात्यायनाने पाणिनीच्या शेकडो चुका काढतच वार्तिका लिहिल्या आहेत. गार्ग्य व शकटायनातही वैदिक शब्दांचे अर्थ व धातुंसदर्भात अनेक मतभेद होतेच. प्राच्य-उदीच्य संस्कृताच्या श्रेष्ठ्-कनिष्ठतेचाही वाद होताच. असो. हा लेख म्हणजे माझ्या नियोजित पुस्तकातील एका प्रकरणाचा कच्चा मसुदाच आहे. मी अद्जुनही काही पुरावे शोधत आहे. मिळाले कि अंतिम रुप देइनच. आपल्या प्रतिक्रियेबद्दल पुनश्च आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही गणितावरची एक प्रमाण मानली गेलेली वेबसाईट पाणिनीबद्दल काय म्हणते ते बघा.
http://www-history.mcs.st-and.ac.uk/Biographies/Panini.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद त्रिशंकुजी. मी आपण दिलेल्या धाग्यावरील लेख वाचला. छान आहे. पाणिनी हा जगातील एक श्रेष्ठ प्रतिभाशाली होता याबाबत शंकाच नाही. पण त्याच्याबद्दल एवढी अत्यल्प माहिती असावी याचा खरेच खेद वाटतो. अर्थात असे आपल्याकडे जवळपास सर्वच पुरातन ज्ञानवंतांबाबत झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजय सोनवणी ह्यांच्या वरील लेखावर ज्या बहुतांशी कौतुकभरल्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर उलटा सूर लावणे धार्ष्ट्याचे आहे तरीहि न राहवल्यामुळे मी ते करण्यास उद्युक्त झालो आहे. जयदीप चिपलकट्टींनीहि थोडा विसंगत सूर लावला आहे. मी त्याच्याशी सहमत आहेच पण माझा अभिप्राय काही अन्यहि विचार उपस्थित करेल.

ह्या विस्कळित मांडणीतून मी खालील ठोस विधाने शोधू शकलो.

पाणिनि हा म्हाणतात तितका प्राचीन नसून इसवी सनाच्या पहिल्या दुसर्‍या शतकातील असावा कारण

अ) तो बुद्धोत्तर आहे. त्याच्या १.१.१६: संबुद्धौ शाकल्यस्येतावनार्षे। आणि
१.२.३३: एकश्रुति दुरात सम्बुद्धौ। (sic) ह्या दोन सूत्रांत बुद्ध म्हणजे गौतम बुद्धाचा उल्लेख आहे.

ब) पाणिनीय व्याकरणाधारित अभिजात संस्कृत वाङ्मयाची निर्मिति गुप्त काळात (इसवी तिसरे ते सहावे शतक) झाली. पाणिनि जर म्हणतात तितका जुना असता तर त्याच्यानंतर चारपाचशे वर्षे त्याच्या व्याकरणावर आधारित साहित्य निर्मिति का झाली नाही? महाभारतात पाणिनीचा उल्लेख नाही. म्हणजेच पाणिनीचा काळ इसवी सनाचे दुसरे शतक ठरावा.

क) 1.2.37: न सुब्रह्मण्यायां स्वरितस्य तूदात्त: ह्या सूत्रातील सुब्रह्मण्य हा दक्षिण भारतातील सुब्रह्मण्य आहे आणि त्या देवतेची कार्तिकेय-साम्याधारित निर्मिति ही इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात पडते. म्हणून तोच काळ पाणिनीचा. ( ह्याच सूत्राच्या आधारे पाणिनि हा दाक्षिणात्य होता असेहि विधान सोनवणी करतात पण आपल्या पाणिनीच्या कालनिर्णयाच्या प्रमुख विषयापासून तो विचार अलग असल्याने तो मि ह्या लिखाणापुरता बाजूस ठेवतो.)

ड) ४.१.११४: ऋष्यन्धकवृष्णिकुरुभ्यश्च! ४.१.१७६: स्त्रियामवन्तिकुन्तिकुरुभ्यश्च ह्या दोन सूत्रांमध्ये महाभारतातील व्यक्तींचा उल्लेख आहे पण रामायणातील कोणाचाच नाही. ह्याचा अर्थ असा की जुने महाकाव्य महाभारत आणि त्याच्या तुलनेने नवे महाकाव्य रामायण ह्यांच्या मधोमध कोठेतरी पाणिनीचा काळ पडतो. रामायणाची शेवटची आवृत्ति इसवी सनाच्या तिसर्‍या वा चौथ्या शतकात झाली मणुन पाणिनि दुसर्‍या शतकातील असावा. (वरील दोन सूत्रांमध्ये महाभारतकालीन ’व्यक्तींचा’ (अनेकवचन) उल्लेख आहे असे सोनवणी म्हणतात. मला तरी ह्या सूत्रांत ज्याला दूरान्वयाने व्यक्तिनाम म्हणता येईल असा एकच शब्द दिसतो आणि तो म्हणजे कुन्ति - खरे तर कुन्ती - आणि तो व्यक्तिवाचक नाही, तसेच अन्य शब्दहि व्यक्तिवाचक नाहीत हे मी खाली दाखविणार आहेच.)

इ) न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारमI उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम। ह्या माहेश्वरसूत्रांच्या वर्णनात्मक श्लोकावरून, तसेच ४.१.११२ शिवादिभ्योSण अशा सूत्रांवरून असे दिसते की पाणिनि हा शैवपन्थीय होता. इतकेच नव्हे तर त्यातील नटराजाच्या उल्लेखावरून तो दाक्षिणात्यहि होता. नटराजाची संकल्पना ही शिखरावर पोहोचली इसवी सनाच्या दुसर्‍या वा तिसर्‍या शतकात. म्हणजे पाणिनीहि त्याच काळातील.

वरील विचारांपलीकडे पाणिनि हा पणि (सरमा-पणि कथेतील) वंशाचा होता, कालिदासाचे विक्रमोर्वशीय नाटक हे प्राकृतच मानले पाहिजे अशी काही विधाने इकडेतिकडे सापडतात पण त्यांना येथे बाजूस ठेवतो कारण मुख्य धारेशी त्यांचा संबंध नाही.

आता वरील अ) ते इ) ह्या विधानांचा विचार करू.

अ) १.१.१६: संबुद्धौ शाकल्यस्येतावनार्षे। आणि १.२.३३: एकश्रुति दूरात संबुद्धौ। ह्यात गौतम बुद्ध कोठे दिसतो काय ह्या प्रश्नाचे उत्तर ’कोठेच नाही’ असे आहे. येथील ’स्ंबुद्धि’ हा शब्द ’संबोधन’ (शाळेत शिकलेली आठवी विभक्ति) अशा अर्थाने आलेला आहे आणि त्याचा गौतम बुद्धाशी काडीचाहि संबंध नाही. (गौतम) बुद्ध, बुद्धि, संबुद्धि, संबोधन ह्या सर्वांच्या मुळाशी ’बुध्’ हा धातु असल्याने ते कानाला एकसारखेच वाटतात पण म्हणून सर्वांचा अर्थहि एकच आहे असे नाही. माझाहि पाणिनीचा खोल अभ्यास आहे असे मुळीच नाही पण थोडा प्रयत्न केल्यावर मला जालावरच ’संबुद्धौ शाकल्यस्येतावनार्षे’ ह्यावरची काशिकावृत्ति सापडली. असे दिसते की पाणिनि असे सांगत आहे की संबुद्धि किंवा संबोधनाच्या वेळी - सोप्या मराठीत म्हणजे हाक मारतांना किंवा एखाद्याला उद्देशून बोलतांना - येणारा ’ओ’कार (हे बिष्णो, हे प्रभो असा) शाकल्यमतानुसार पुढील स्वरामध्ये सन्धि होऊन बदलत नाही (विष्णो इति हे तसेच राहते, त्याचे दोन स्वरांच्या सन्धिनियमांनुसार विष्णविति होत नाही. इतरांच्या मतानुसार असा सन्धि होतो. (ह्याच सूत्राचा संदर्भात येथील संबुद्धि हा शब्द संबोधन अशा अर्थाने वापरला गेला आहे हे मोनियर विल्यम्सनेहि नमूद केले आहे. पहा पृष्ठ ११७८ मोतीराम बनारसीदास आवृत्ति. काशिकावृत्ति येथे पहा. (सम्बुद्धिनिमित्तो य ओकारः स शाकल्यस्य आचार्यस्य मतेन प्रगृह्यसंज्ञो भवति, इतिशब्दे अनार्षे अवैदिके परतः। वायो इति, वायविति। भानो इति, भानविति।)

१.२.३३: एकश्रुति दूरात संबुद्धौ। येथील ’संबुद्धि’ हा शब्दहि संबोधनवाचक आहे आणि त्याचा (गौतम) बुद्धाशी दूरान्वयानेहि संबंध नाही. (ह्याच्या अधिक खोलात जात नाही. अधिक जाणण्याची इच्छा असेल तर काशिकावृत्ति येथे पहा.)

गेली दोन हजार वर्षे भारतीय पंडित आणि गेली दोनशे वर्षे पाश्चात्य पंडित अष्टाध्यायीचा अभ्यास करीत आहेत आणि त्यांच्यामध्ये पाणिनिसंबधात अनेक मतमतान्तरे आहेत हे सोनवणींनीच म्हटले आहे पण त्यांपैकी एकानेहि पाणिनिकालनिर्णयासाठी गौतम बुद्धाला अष्टाध्यायीमध्ये आणलेले दिसत नाही. इतक्या विद्वानांच्या नजरेतून सुटलेले सोनवणींना दिसले कारण ’संबुद्धि’चा अश्रुतपूर्व आणि चुकीचा अर्थ ते लावत आहेत. खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी ’शोधलेला’ अर्थ गोल्डस्टकरला दिसला नाही ह्याबाबत अचंबाहि व्यक्त करीत आहेत ही मोठीच मौज आहे!

ब) पाणिनि जर प्राचीन असला तर त्याच्यानंतर अभिजात संस्कृत वाङ्मय रचले जाण्यास चारपाचशे वर्षे का लागावीत असे सोनवणी विचारतात. कालिदास आणि भासापूर्वीचे काहीच संस्कृत वाङ्मय उपलब्ध नाही असे ते सुचवितात.

असे वाङ्मय बिलकुलच नाही असे नाही. बहुसंख्य अभ्यासकांच्या मते सौन्दरानन्द आणि बुद्धचरित ह्यांचा लेखक अश्वघोष हा इ.स. १५० सुमारास म्रुत्यु पावला म्हणजे ह्या कृति भासाच्याहि आधीच्या असल्या पाहिजेत. महाभारताचे टप्प्याटप्प्याने लिखाण इसवीसनपूर्व दोनतीनशे वर्षे चालू होते हे बहुमान्य आहे आणि महाभारताची भाषा काही अपाणिनीय वाटत नाही, अन्य तथाकथित अभिजात ग्रंथांसारखीच वाटते. औपनिषदीय लिखाणाविषयी तेच म्हणता येईल. मनुस्मृतीचाहि काळ इसवीसनाचे पहिले शतक मानला जातो. त्यातील भाषाहि अन्य संस्कृत ग्रंथांहून निराळी भासत नाही. अर्थशास्त्राचा निर्माता चाणक्य जर खरोखरचा चन्द्र्गुप्ताचा शिक्षक असेल तर अर्थशास्त्र इसवीसनपूर्व काळातील मानायला हवे पण त्याची भाषा अन्य ग्रंथांइतकीच पाणिनीय वाटते. भास तिसर्‍या शतकात होऊन गेला असावा हे सोनवणींना मान्य आहे. त्यामागची वस्तुस्थिति अशी आहे की म.म. गणपति शास्त्रींना १९१२ साली भासाची नाटके केरळमध्ये सापडेपर्यंत भास आपणास त्याच्या नावाच्या अन्य ठिकाणच्या उल्लेखांमुळेच माहीत होता. कालिदासाने आपल्या मालविकाग्निमित्रम् नाटकात ’भाससौमिल्लकविपुत्रादीनां प्रबन्धानतिक्रम्य वर्तमानकवे: कालिदासस्य क्रियायां कथं बहुमान:’ असा त्याचा उल्लेख केलेला दिसत होता. ’भासो हासः’ ही उक्तीहि माहीत होती पण त्याचे एकहि काव्य उपलब्ध नव्हते. कालिदासनेच उल्लेखिलेल्या सौमिल्ल, कविपुत्र आणि अन्यांचेहि आपल्यापुढे आजमितीस काय आहे? पण असे काहीतरी होते हे नि:संशय कारण ते कालिदासासमोर होतेच. म्हणून इसवी सन दुसर्‍या शतकाआधी संस्कृत निर्मितीच झाली नाही हे विधान निराधार वाटते. रचना चालू होती पण त्यातील पुष्कळशी कालौघात नाहीशी झाली असे म्हणता येईल. नाहीतरी काळ जितका जुना तितक्या प्रमाणात त्या काळात निर्माण झालेल्या सामग्रीचा विनाश अधिक हे स्वत:सिद्ध तत्त्व अन्य देशांत आणि संस्कृतींमध्येहि दिसते.

क) १. २. ३७ न सुब्रह्मण्यायां स्वरितस्य तूदात्तः ह्या सूत्रात दक्षिण भारतातील सुब्रह्मण्य सोनवणींना दिसतो. खरी स्थिति अशी आहे की सुब्रह्मण्य हे ’उद्गातृ’ ह्या यज्ञविधीमधील एका मंत्रपाठकाच्या तीन साहाय्यक मंत्रपाठकांपैकी पैकी एकाचे नाव आहे, तसेच ते विष्णूचेहि एक वैदिक नाव आहे. (मोनियर विल्यम्स पृ. १२२९.) सुब्रह्मण्य ह्या मंत्रपाठकाच्या त्या प्रत्येक मन्त्राला ’सुब्रह्मण्या ऋक्’ असे स्त्रीलिंगी नाव आहे त्या ’सुब्रह्मण्या ऋक्’ मध्ये (सुब्रह्मण्यायां - सप्तमी विभक्ति) स्वरोच्चरण कसे करायचे ह्याबाबतचे हे सूत्र आहे. त्याचा सुब्रह्मण्य-कार्तिकेयाशी दूरान्वयानेहि संबंध नाही. अर्थात सोनवणींचे पुढील सर्व विवरण आता अधिक विस्ताराने खोडत बसण्याची आवश्यकता उरत नाही. (काशिकावृत्ति येथे पहा.)

ड) ४.१.११४: ऋष्यन्धकवृष्णिकुरुभ्यश्च ४.१.१७६: स्त्रियामवन्तिकुन्तिकुरुभ्यश्च. ह्यांपैकी पहिले सूत्र वसिष्ठादि ऋषिनामांपासून आणि अन्धकादि कुलनामांपासून वंशजांची नावे कशी होतात हे सांगते. अन्धक, वृष्णि, कुरु ह्या आर्यांच्या गटांची नावे प्रसिद्धच आहेत. पुढील सूत्र अवन्ति देशाची (राज)कन्या ती अवन्ती, कुन्तिदेशाची ती कुन्ती अशा प्रकारचा नियम घालून देते. तो महभारतातील कुन्तीबाबत ते सूत्र काहीहि सांगत नाही आणि तिला येथे ओढून आणण्याचे काही प्रयोजन नाही. हे शब्द महाभारतातील म्हणून उपयोजिलेले नसल्यामुळे पाणिनि हा निश्चितीने महाभारतोत्तरकालीन आहे असे म्हणण्यास येथे आधार घेता येत नाही. अधिक माहितीसाठी येथे आणि येथे पहा.

(हे वर दिलेले संदर्भ शोधायला मला मुळीच कष्ट पडले नाहीत. सूत्र क्रमांक आणि सूत्र गूगलमध्ये घातले की ते लगेच दिसतात. सोनवणींनी आपले लिखाण करण्यापूर्वी असे काही केले होते काय?)

इ) न्रुत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपंचवारमI उध्वर्त्त्वुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमशें शिवसुत्रजालम।। हा श्लोक सोनवणींनी चुकीचा उद्धृत केला आहे. शुद्ध लिहायचे तर तो असा हवा: नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्। उद्धर्तुकामः सनकादिसिद्धानेतद्विमर्षे शिवसूत्रजालम्।
हा श्लोक कोणाचा आहे हे सांगता येत नाही कारण तो अष्टाध्यायीमध्ये मिळत नाही. उदाहरणार्थ भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धान्तकौमुदीत तो नाही. बहुतांशी पाणिनि होऊन गेल्यानंतरच्या काळात अष्टाध्यायीचे महत्त्व वाढविण्यासाठी आणि तिचा उद्गम शंकरापासून आहे असे सूचित करण्यासाठी कोणीतरी तो प्रक्षिप्त श्लोक निर्माण केला असे दिसते. संस्कृत वाङ्मयात हे अनेकदा बफ्घायला मिळते. उदाहरणार्थ प्रसिद्ध रामरक्षास्तोत्राचा निर्माता जो कोण बुधकौशिक होऊन गेला त्याने ’आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:। तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः॥ असे म्हणून रामरक्षेचे कर्तृत्व शंकरावर टाकले आहे. वेद हे कोणा मानवी ऋषींनी रचलेले नसून ईश्वराने ते त्यांना स्फुरविले हा तसाच विचार. तेव्हा उपरिनिर्दिष्ट श्लोकाचे कवित्व पाणिनीवर बळेबळेच लादून त्यातून त्याची नटराजभक्ति सुचविण्यामागे काही आधार आहे असे वाटत नाही.

ह्या सर्वाचा सारांश असा की सोनवणींचे हे सगळे लिखाण त्यांच्याच स्वनिर्मित कल्पनांचा खेळ आहे असे मला वाटते.

कोठल्याहि गहन विषयावर जेव्हा कोणी काही लिहावयास आणि ते इतरांसमोर मांडण्यास बाहेर पडतो तेव्हा त्या लेखकाचा ते लिखाण करण्याचा अधिकार कितपत आहे असा प्रश्न वाचकांसमोर उभा राहतो. हा प्रश्न औद्धत्यपूर्ण वाटू शकेल हे मी जाणतो पण ज्यावर सोनवणी लिहिण्यास पुढे झाले आहेत त्याचे मुळातील (म्हणजे संस्कृतमधील) कसलेच वाचन त्यांनी केलेले नसावे असे मला वाटते. असे वाचन अजिबात न केलेल्याचे लिखाण कितपत गंभीरपणे घ्यायचे हे वाचणार्‍याने ठरवावे कारण ’कापा-चिकटवा’ अशा संगणकी लेखनसुविधेमुळे ’विकिपंडित’ आणि ’गूगलविदग्ध’ होणे अगदी सोपे झालेले आहे. हे मी अशासाठी म्हणतो की सोनवणींच्या लिखाणात अमर्याद प्रमाणात चुका आहेत आणि त्या केवळ टंकनाच्या आणि शुद्धलेखनाच्या नसून अज्ञानजन्य आहेत असे मला वाटते.

त्या चुकांमध्ये पुष्कळशा मराठी शुद्धलेखनाच्या आहेत पण आपण त्या बाजूस ठेऊ कारण मराठी शुद्धलेखन म्हणजे नक्की कॊणॊ ठरवलेले ह्या विषयी मतमतान्तरे आहेत आणि ’पंडिती’ प्रकारचे शुद्धलेखन सोनवणी मानत नसले तर त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण मुख्य विषयाच्या संदर्भातच जेव्हा चुका आढळतात तेव्हा काय म्हणायचे?

ह्याची काही उदाहरणे देतो. ’पाणिनि’ हा शब्द सोनवणींच्या लेखात ’पाणिनी’ असा १६२ वेळा आलेला आहे. पैकी ६४ वेळा तो ’पाणिनीचा’, पाणिनीला’ इत्यादि शब्दात बिभक्तिप्रत्ययासाठीचे सामान्यरूप म्हणून आला आहे म्हणून ते शब्द बाजूस ठेऊ. पण कमीअधिक ९८ वेळा तो ’पाणिनी’ असा प्रथमा विभक्तीत आलेला आहे. ’पाणिनि’ हा मूळ शब्द ’इ’कारान्त पुल्लिंगी आहे. (पहा श्लोक -
नपुंसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितं मनः | रमते तच्च तत्रैव हताः पाणिनिना वयम् ॥
शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी। विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह॥)
हे विशेषनाम असून त्यात बदल करण्याची कोणासहि मुभा नाही - शुद्धलेखनाचे नियम काहीहि मानले तरी, आणि पाणिनीवर लिखाण करू पाहणार्‍यास तर नाहीच नाही. त्यामुळे पाणिनि हा शब्द मू्ळ संस्कृतमध्ये कसा लिहितात हे सोनवणींना ठाऊक आहे काय ह्याबद्दल संभ्रम निर्माण होतो. ’उनादी सुत्रे’ असा शब्दप्रयोग सोनावणी करतात. ह्या सूत्रांचे मूळ नाव ’उणादि सूत्रे’ असे आहे आणि त्याची मुळातून जाण असलेला कोणीहि त्यांना ’उनादी’ सूत्रे म्हणणार नाही. जो म्हणेल त्याच्याबद्दल अशी शंका साहजिकच उत्पन्न होते की त्याने हा शब्द मुळात पाहिलेलाच नाही. त्याने तो कोठल्यातरी इंग्रजी पुस्तकातून उचललेला आहे जेथे तो 'Unadi' असा बहुश: लिहिला जाईल आणि वाचणार्‍याला मूळ उच्चार माहीत नसला तर त्याच्याकडून तो ’उनादी’ असा लिहिला जाईल. असल्या प्रकारच्या संस्कृतसंबंधी लेखनातील अन्य काही चुका पुढीलप्रमाणे आहेत. कात्यायनाची ’सर्वानुक्रमणी’ सोनवणींच्या लिखाणात ’सर्वानुक्रमणि’ होते आणि ही केवळ टंकनाची चूक आहे असे वाटत नाही, ती मुळातून वाचनाचा अभाव असल्याचे दाखवते. ह्याखेरीज पुर्व (पूर्व) ११ वेळा, इसपु (इसपू) १६ वेळा, सुत्र सुत्रे (सूत्र सूत्रे) २० वेळा, न्रुत्य (नृत्य) २ वेळा, वररुची (वररुचि) ३८ वेळा, ब्रुहत्कथा (बृहत्कथा) ३ वेळा, संस्क्रुत (संस्कृत) ५ वेळा अशा अज्ञानजन्य वाटणार्‍या चुका आढळतात. (आणखीहि आहेत पण मला जे म्हणायचे आहे ते मी मांडले आहे असे वाटते आणि म्हणून थांबतो.)

गाण्याच्या बैठकीत एखादा उत्साही गायक गायला बसला आणि पहिल्या आलापापासून तो बेसूर गाऊ लागला आणि तालात चुकू लागला तर त्याला ’बाबा, तू काही गायन शिकला आहेस काय? का रेडिओवरचे ऐकून गातो आहेस?’ हा प्रश्न विचारण्याचा श्रोत्यांना अधिकार आहे. शेक्स्पिअरवर प्रबंध लिहिणार्‍याने जर इंग्रजी स्पेलिंगच्याच खंडीभर चुका केल्या तर त्याचा प्रबंध कोणी हातातहि धरणार नाही. त्याच प्रकारे वरील सर्व लिखाणातील कितपत सामग्री सोनवणींनी स्वत: मुळातून वाचली आहे आणि स्वत:च्या विचाराने लिहिली आहे असे मी त्यांना विचारतो. ते जे उत्तर देतील ते मी शब्दश: मानायला तयार आहे, त्यावर मी प्रतिप्रश्न करणार नाही एव्हढे वचन देतो. अर्थातच वर उल्लेखिलेल्या ढोबळ चुका एव्हढ्या मोठ्या संख्येने का झाल्या ह्याचे उत्तरहि त्यातून मिळावे अशी अपेक्षा आहे.

पाणिनि फार प्राचीन अथवा त्यामानाने अलीकडचा असा कसाहि असो पण सोनवणींचे वरचे लिखाण वाचून केवळ त्या आधारावर तो इसवी सनोत्तर आहे हे म्हणणे मला सयुक्तिक वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंदराव! कुर्निसात स्वीकारावा! __/\__
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरविंदजी, आपल्या अत्यंत अभ्यासपुर्ण प्रतिक्रियेबद्दल नितांत आभार. मला अशाच प्रतिक्रियांची गरज होती ज्यामुळे मी माझ्या लेखनातील दोष सुधारु शकेल. जी गृहिते वा संदर्भ चुकीचे आहेत ते सोडुन देण्यास प्रत्यवाय असु शकत नाही. आपण दिलेले संदर्भ मी तपासुन पहातो. मी जेवढे संदर्भ दिले आहेत ते मुळातुनच वाचले आहेत. इंटरनेटचा येथे उपयोग होईल असा माझा कसलाही तर्क नव्हता. तुमच्यामुळे एवढी सामग्री उपलब्ध आहे हे समजले. (उदा. मला प्रयत्न करुनही काशिका उपलब्ध झाल्या नाहीत, त्यामुळे संदर्भांत मी त्यांचा कोठेही उल्लेख केलेला नाही.) पाश्चात्य विद्वानांची साधने अर्थातच इंग्रजीतुनच वाचली आहेत. उणादि सूत्रांना भारतीय संस्कृती कोशातही उनादी असेच म्हटले गेले असल्याने उणादि चा उच्चार मी उनादी असाच केला आहे.) मुळ उणादि सुत्रे मला उपलब्ध झालेली नाहीत. माझ्या या प्रस्तुत प्रकरण लेखनाचा मुख्य हेतु पाणिनीचा काळ ठरवणे हा आहे आणि तुमची मते/माहिती ग्राह्य धरली तरी मुळ नि:ष्कर्षाला बाधा येईल असे वाटत नाही, मला अजुन पुरावे जमा करावे लागतील, व ही जाणीव मला होतीच हे मी आधी दिलेल्या काही प्रतिसादांवरुन लक्षात आले असेलच.

शुद्ध्लेखनाच्या बाबतीत आपले म्हणणे रास्त आहे, पण हा कच्चा ड्राफ्ट आहे व त्यातीत संदर्भ त्रुटी दुर करण्यास सहाय्य व्हावे याच अपेक्षेने मी ते लेखन येथे प्रसिद्ध केले. माझा हेतु पुर्ण नसला तरी काही अंशी आपल्यमुळे सफल झाला आहे हे मी आवर्जुन नमुद करतो. अजुनही बाकी जे मुद्दे आहेत त्याबाबतही आपण विचार मांडले असते तर बरे झाले असते. अर्थात " ह्या सर्वाचा सारांश असा की सोनवणींचे हे सगळे लिखाण त्यांच्याच स्वनिर्मित कल्पनांचा खेळ आहे असे मला वाटते.कारण ’कापा-चिकटवा’ अशा संगणकी लेखनसुविधेमुळे ’विकिपंडित’ आणि ’गूगलविदग्ध’ होणे अगदी सोपे झालेले आहे." असे विधान माझ्याबाबत करत आहात ते नक्कीच चुकीचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंदजी, माझे मित्र डा. आनंद दाबक यांच्या आर्यभट हा सुर्यकेंद्रीत सिद्धांत मांडत होता, हे सिद्ध करण्यासाठी संशोधन करत असुन मी त्यांना काही मदत करत आहे. ब्रह्मगुप्त वा परमादीश्वर इ. उत्तरकालीन खगोलद्न्यांनी आर्यभटाचा सूर्यकेंद्रित सिद्धांत अमान्य केला असुन गोलाध्यायातील दहाव्य श्लोकाचा वेगळा अर्थ घेतला आहे त्यामुळे आर्यभट परस्परविरोधी विधाने करत असल्याचे वरकरणी दिसते. प्रा. आपटे यांचे या दोन्ही श्लोकांचे भाषांतर मला डा. दाबक यांनी पाठवले होते. मी त्यांना जे उत्तर पाठवले ते तसेच्या तसे खाली देत आहे. ते वाचुन माझा नि:ष्कर्ष बरोबर आहे काय हे सांगावे व दुरुस्त्या सुचवाव्यात ही विनंती म्हणजे दाबकांचे संशोधन पुढे जाईल.)

अनुलोमगतिर्निस्थौ पश्च्यत्यचलं विलोमगं यद्वत
अचलानि भानि तद्वत समपिश्च्मगानि लङ्कायां ॥९॥
उदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवव्हेण वायुना क्षिप्तः ।
लङ्कासमपिश्चमगो भपञ्जरः समहो भ्रमति ॥१०॥ ( आर्यभटीय-गोलाध्याय)

(दहाव्या श्लोकाचा अर्थ खालील पद्धतीने लावला तर ९व्या श्लोकाची सुटका होवु शकते. (श्लोक आहे तसाचा तसा स्वीकारला तर...)
" उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा भ्रम (निरीक्षकासाठी) निर्माण होतो. "
"पश्चिमेला फिरतो" असा भ्रमतिचा अर्थ घेतला तर ते तसेही असु शकत नही. श्लोकार्थात आपटे यांनी "वाहुन नेला जातो" हा शब्द गाळला आहे.
आता श्री आपटे यांचा श्लोकाच्या प्रत्येक ओळीचा (त्यांनी दिलेला) शब्दार्थ घेवून अर्थ लावून पाहू.
१. उदय अस्तासाठी प्रहव वायुमुळे नित्य वाहून नेला जातो.
२. लंकेच्या बरोबर पश्चिमेला ग्रहांसहित नक्षत्रांचा पिंजरा फिरतो आहे.
यातील दोष (मला वाटतो तो असा...)
उदय आणि अस्तासाठी नक्षत्राचा पिंजरा (ग्रह-गोलांसहित) फिरत असेल तर तो फक्त पश्चिमेकडे फिरतो असे ठाम विधान कसे केले?
पहिल्या ओळीत नित्य काय वाहून नेले जाते हे खालील ओळीच्या अर्थाने घ्यावे लागते.
दुस-या ओळीत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे असे असायला हवे होते पण ते विधान ठाम म्हणते कि "बरोबर पश्चिमेकडे" फिरतो.
पहिली ओळ स्पष्ट आहे. "उदय आणि अस्तासाठी" हा शब्दप्रयोग यथार्थ आहे.
दुसर्या ओळीत मात्र "फक्त पश्चिम" दिसते. येथे मग "भ्रमति" चा अर्थ जर आपण "फिरतो" असा घेतला तर अर्थदोष निर्माण होतो व आर्यभट स्वत:चेच नवव्या श्लोकातील विधान खोडुन काढतो आहे असे दिसते जे मला संभवनीय वाटत नाही. त्यामुळे "भ्रमति" हा शब्द "भ्रम होतो" या अर्थानेच घेतला जायला हवा असे मला वाटते.
त्यामुळे माझ्या अल्प ज्ञानानुसार खालील अर्थ योग्य आहे आणि तो ९व्या श्लोकाशी सुसंगत आहे, तो असा:
" उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा भ्रम (निरीक्षकासाठी) निर्माण होतो. "

यामुळे नववा श्लोक व दहाव्या श्लोकात सुसंगती येईल व आर्यभट सुर्यकेंद्रित सिद्धांतच मांडत आहे हे स्पष्ट होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण घेतलेला अर्थ योग्य मानला तरी त्याने आर्यभट सुर्यकेंद्रित सिद्धांतच मांडत आहे हे कसे सिद्ध होते ते समजले नाही. त्या अर्थानुसार पृथ्वी स्थिर नसुन स्वतःभोवती फिरते हे आर्यभटाला माहीत होते (अथवा अंदाज/तर्क होता) असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक.
- - -

"न सुब्रह्मण्यायां स्वरितस्य तूदात्तः । १.२.३७" सूत्राबाबत चर्चा झालेली दिसते. दक्षिण भारतात "मुरुगन" नावाचा देव आहे, त्याचा "सुब्रह्मण्यन्" असा उल्लेख होतो, त्याच्याशी संबंध सांगितलेला आहे. वस्तुतः सूत्राचा संबंध त्या दैवताशी नाही.

"सुब्रह्मण्या" नावाने ज्यांचा उल्लेख होतो, असे वैदिक-व्यवहारातील मंत्र आहेत, त्यांच्याबाबत हे सूत्र आहे. या व्याकरणनियमाचे उदाहरण म्हणून शतपथ ब्राह्मणातील पुढील मंत्र देतात :
"सुब्रह्मण्यो३मिन्द्रागच्छ ... मघवन् ।" श.ब्रा. ३.३.१.१९
येथे "सुब्रह्मण्य!" हे संबोधन "इन्द्र!, मघवन्!" या संबोधनांसह दैवताला "ये रे (आगच्छ!) असे आवाहन करताना वापरलेले आहे. येथे सुब्रह्मण्य म्हणजे इंद्रच आहे.

- - -

(तर्क पटलेले नाहीत हे सांगणे नलगे. वरील मुद्द्याचे उदाहरण वानगीदाखल आहे. कोल्हटकरांनी तर सांगोपांग उच्छेदन केलेले आहे. त्यांचे सर्व मुद्दे योग्य आहेत. त्यांच्या एका पृच्छेला पुरवणी : "नृत्तावसाने" श्लोक नंदिकेश्वरकृत काशिकेतला आहे. या श्लोकावेगळे नंदिकेश्वराबाबत मला काहीही ठाऊक नाही आणि त्याच्या काशिकेबाबतही*. प्रसिद्ध काशिका ही वामन-जयादित्यांची - त्या पुस्तकाचा दुवा कोल्हटकरांनी दिलेलाच आहे.)

(*ही सापडली नन्दिकेश्वराची काशिका [शिवसूत्रांचा कल्पनारम्य आध्यात्मिक अर्थ लावणारी लहानशीच टीका आहे]: दुवा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजयजी, आपण दिलेल्या विकीलिंकबद्दल धन्यवाद. पण या लिंकवरुन एक स्पष्ट होत नाही ते म्हणजे मी उद्घृत केलेला श्लोक हा नंदिकेश्वराचा कि पाणिनीचा. आपण दिलेल्या लिंकवरुनही तो नंदिकेश्वराचा नाही असेच दिसते. माझ्याकडील साधनांत तो पाणिनीचा म्हणुनच दिला गेला आहे. कथासरित्सागरातही (तो दुय्यम पुरावा असला तरी) या श्लोकानुरुपच कथा आली आहे व ती माझ्या लेखात मी दिलीच आहे.

"सुब्रह्मण्यो३मिन्द्रागच्छ ... मघवन् ।" श.ब्रा. ३.३.१.१९

हे आपण दिलेले सूक्त. वैदिक भाषेत "ब्रह्म" आणि औपनिषदिक भाषेतील "ब्रह्म" यात एक मोठा फरक आहे. ऋग्वेदिक ब्रह्म म्हणजे मंत्र तर औपनिषदिक ब्रह्म म्हणजे विश्वकारण. मी सुब्बर+मणी= सुब्रह्मण्य ही व्युत्पत्ती स्वीकारली होती. ऋग्वेदाचे पहिले लिपिबद्ध लेखन दक्षीणेतच झाले आहे. (इ.स. सहावे शतक्)ते पातंजलीनेही आपले महाभाष्य चिदंबरम येथेच लिहिले या वस्तुस्थित्या पाहता व सुब्रह्मण्याची लोकप्रियता दक्षीणेतच आहे हेही पाहता व इंद्र हा सुब्रह्मण्य म्हणुन भारतात कधीच प्रसिद्धीस नसता पाणिनि सुब्रह्मण्य म्हणुन दक्षीणेतील प्रसिद्ध सुब्रह्मण्याचाच उल्लेख करत असेल असा माझा तर्क होता. समजा हा तर्क चुकीचा असुन पाणिनी इंद्राचाच उल्लेख करत आहे असे मानले तर माझा तर्क हा कुतर्क ठरेल. पएरंतु पाणिनि व्याकरणाचे नियम सांगत असुन धर्मशास्त्रांचे (वेदांचे) निरुपण करत नाहीये. ऋग्वेदात इंद्राला कोठेही सुब्रह्मण्य म्हटल्याचे मला आढळले नाही. आपणास कोठे सापडले तर अवश्य कळवावे ही विनंती.

पाणिनीवर कात्यायनाने वार्तिकांत भरपुर टीका केलेली आहे. (सं. जेम्स अल्विस) अल्विस म्हणतात कि हा पाणिनीचा मित्र नसुन कठोर टीकाकार असला पाहिजे एवढ्या पाणिनीच्या चुका त्याने दाखवलेल्या आहेत. पुर्वाचार्यांच्या चुका पाणिनीनेही दाखवलेल्या आहेत. थोडक्यात वैदिक मंत्रांचे (शब्दांचे) अर्थ कसे लावायचे याबाबत आजही विवाद आहेत. अनेक तज्ञ आजही ऋग्वेदातील अनेक ऋचांचा वेगवेगळा अर्थ काढत त्यातील विज्ञान समजावुन सांगायचा प्रयत्न करत असतात.

अलीकडेच डा. सुभाष काक यांनी आर्यभटाच्या सुर्यकेंद्रित सिद्धांताला पाठिंबा देणारा २.७ हा ऐतरेय ब्राह्मणातला पुरावा दिला. मी तो व त्याचे इंग्रजी भाषांतर पाहिले असता दुरान्वयाने हा अध्याय सुर्यकेंद्रितच काय, सुर्याचे नांव घेतांनाही दिसला नाही. मी काक यांना दोष देत नसुन अनेकदा प्रत्येकाचे इंटरप्रेटेशन वेगळे असु शकते वा वैय्याकरणी अर्थ भिन्न निघु शकतात हे दाखवण्यासाठी हे सांगत आहे. मी कोल्हटकर सरांना एक मदत मागितली आहे ती याच संदर्भातील आहे. आपणही त्याबाबत काही विचार मांडु शकलात तर आभारी राहील.

हा सारा किचकट विषय आहे याची मला जाणीव आहे. जगातील आदर्शभुत, उत्क्रुष्ठ व्याकरण रचणारा पाणिनीचा काळ, स्थळ व मुळ नाम माहित असु नये हे दुर्दैवी आहे. मी जर त्या दिशेने प्रयत्न करत असेल तर त्याकडे उपहासाने न पाहाता य॑थाशक्ती मदतच केली पाहिजे. (मला शंका आहे...कदाचित ती चुकीचीही असेल्...ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वादातुन तर माझ्या लेखनाकडे पाहिले जात नाहीहे ना? तसे असेल तर मी येथे हे मलाही किचकट वाटलेले व काही मदत मिळेल व ते दुरुस्त करत पुढे जाता येईल म्हणुन प्रकरण टाकले ही चुकच झाली असे म्हणायला हवे. कारण पाणिनीला अर्वाचीन वा प्राचीन ठरवण्यात माझा काहीएक हेतु नाही. खरे तर तो प्राचीन ठरला तर मला आनंदच वाटेल. पण त्यासाठीही सबळ पुरावे हवेत.)

आपल्या इतिहासात इतिहास लिहिण्याची, जतन करण्याची घोर अनास्था असल्याने, शब्दांचे अर्थ कालौघात बदलत जातात याचे भान न ठेवता शब्दाचा नेमका कोनता अर्थ कोणी कसा घ्यायचा याबाबतही दुमते असल्याने आपण इतिहासाला मुकत आहोत. उदा. १९व्या शतकातील मराठे कादंब-यांत कारस्थानी हा शब्द अत्यंत चांगल्या अर्थाने घेतला जायचा. आता तो अर्थ बदलला आहे. तीच बाब असुर शब्दाची ऋग्वेदात अनेकदा वरुण, इंद्र ते मित्राला गौरवाने "असुर" असे संबोधले गेले आहे. उत्तरकाळात असुर शब्दाचा अर्थ कसा उलटा झाला हे मी आपणासारख्या भाषाविदांना सांगायला नको.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजय,

<मला शंका आहे...कदाचित ती चुकीचीही असेल्...ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वादातुन तर माझ्या लेखनाकडे पाहिले जात नाहीहे ना?>

माझ्यापुरते तरी मी निश्चित म्हणू शकतो की जातीपातीचा विचार माझ्या मनात कधीहि येत नाही कारण ज्ञानाला जात वा वंश नसतो. जातिश्रेष्ठता आणि वंशश्रेष्ठता हे विचार कालबाह्य झालेले असून त्यांना आधुनिक जगात स्थान नाही असे मी मानतो.

माझी खात्री आहे की येथील अन्य प्रगल्भ सदस्य ह्याच विचाराचे आहेत. तुम्ही नि:शंकपणे येथे चर्चेत भाग घेत राहावे असे मी तुम्हांस कळकळीने सांगतो.

तुमच्या आर्यभटाविषयीच्या प्रश्नाला मी यावच्छक्य उत्तर थोडा अभ्यास केल्यानंतर देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी एक स्पष्टीकरण : येथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा काहीही संबंध नाही.
- - -

विकिलिंक केवळ पूर्ण काशिकेच्या पाठाकरिता दिलेली आहे.

ही काशिका नन्दिकेश्वराचीच आहे. हिचा पहिला उल्लेख मी सिद्धान्त्कौमुदीच्या बालमनोरमा टीकेत वाचला :
"एतच्चतुर्दशसूत्रव्याख्यायां नन्दिकेश्वरकृतायां काशिकायामप्युक्तं - 'नृत्तावसाने...' "
सूत्रावरील हिंदी टीकेत श्लोकाचा तोच स्रोत दिलेला आहे.
(सिद्धान्तकौमुदीची प्रत : चौखम्बा सुरभारती ग्रंथमाला ४६)

या सूत्रांचा शिवसूत्र किंवा माहेश्वरसूत्र असा उल्लेख करण्यात येतो. पण पतंजलि मात्र तसा उल्लेख करत नाही. (आणि कात्यायनाचा सर्व पाठ आपल्याकडे पतंजलिमार्फतच आल्यामुळे, कात्ययनही करत नाही, हे वेगळे सांगत नाही.) तो या सूत्रांना "वर्णानामुपदेशः" इतकेच म्हणतो. यातील "ऋलृक" सूत्रातील "लृ" गाळले पाहिजे, वगैरे चर्चा करतो. त्यामुळे या सूत्रांचे कुठलेही अतिमानवी (किंवा मानवी) मांगल्य पतंजलि मानत नाही.

(मात्र पाणिनीचे पहिले सूत्र "वृद्धिरादैच् । १.१.१" यातील "वृद्धि"शब्द, कात्यायनाचे पहिले वार्तिक "सिद्धे शब्दार्थसम्बन्धे ।" यातील "सिद्धे" शब्द, हे त्या-त्या लेखकांनी मंगल म्हणून निवडले, ही बाब मात्र पतंजलि सांगतो. शिवसूत्रांच्या बाबतीत पतंजलीच्या काळी कुठलेही अतिमानवी-कथानक नव्हते.)

- - -
मला वाटते, की येथे मी थांबवतो :

समजा हा तर्क चुकीचा असुन पाणिनी इंद्राचाच उल्लेख करत आहे असे मानले तर माझा तर्क हा कुतर्क ठरेल. पएरंतु पाणिनि व्याकरणाचे नियम सांगत असुन धर्मशास्त्रांचे (वेदांचे) निरुपण करत नाहीये.

पाणिनि इन्द्राचाही उल्लेख करत नाही, की मुरुगनचाही. तो "सुब्रह्मण्या" (आकारान्त स्त्रीलिंगी शब्द लक्षात घ्यावा) मंत्रपठनाचा उल्लेख करत आहे. ते सूत्र लागू असलेल्या एका मंत्रात "सुब्रह्मण्य" हे संबोधन इंद्राला वापरलेले आहे. (वरील मंत्राचे उद्धरण शतपथ ब्राह्मणातील आहे, वेदांच्या मंत्रपाठातील नव्हे.)

वेदांच्या मंत्रसंहितेच शोध घेता "सुब्रम्ह-"सारखे शब्द येणेप्रमाणे :
सुब्रह्मा यज्ञः ... ऋग्वेद ७.१६.२
येथे अग्नीसाठी नाव आहे.

सुब्रह्माणं देवतानां बृहन्तम् उरुम् गभीरं पृथुबध्नाम् इन्द्र ॥ ऋग्वेद १०.४७.३
येथे "सुब्रह्मन्" हा उल्लेख इंद्राकरिता आहे.

सुब्रह्मण्यम् अङ्गिरसो वो अस्तु प्रति गृभ्णीत मानवं सुमेधसः ॥ ऋग्वेद १०.६२.४
येथे निर्देश "विश्वे देव = सर्व देव" किंवा "अङ्गिरस" यांच्याकडे आहे.

- - -
कात्यायनाने पाणिनीच्या व्याकरणात सुधारणा सुचवल्या आहेत. (याला आपण भरपूर टीका म्हणू शकतो, वाटल्यास.) परंतु त्याचे येथे काय देणेघेणे? वैदिक मंत्रांचे अर्थ लावण्याबाबत विवाद आहेत, हे खरे. परंतु वैदिक मंत्रांचे अर्थ लावण्याबाबत कात्यायनाने पाणिनीची टीका केल्याचे ठाऊक नाही. कात्यायनाच्या बहुतेक सर्व सुचवण्या/सुधारणा लौकिक भाषेबाबत आहेत.

पतंजलि चिदंबरमातला असणे ... (अपूर्ण परिच्छेद. येथे पतंजलिने "मध्यभारतातल्या शिष्ट लोकांची तितकी आपोआप शुद्ध भाषा" असे वर्नन केले आहे. आणि स्वतःची भाषा आपोआप शुद्ध मानतो. वगैरे. वेळ मिळाल्यास लिहेन.)

- - -
प्रयत्न करावेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला शंका आहे...कदाचित ती चुकीचीही असेल्...ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वादातुन तर माझ्या लेखनाकडे पाहिले जात नाहीहे ना?

निश्चिंत रहा. तसे, सध्याच्या घडीला तरी येथे कोणी पहात नाही. उद्या कोणी पाहतेय असे वाटले तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुमचा अभ्यास त्यामुळं थांबणार नाही. कारण तुम्हाला हवी असणारी मदत कदाचित येथे मिळू शकेल. फक्त, ती शंका बाजूला ठेवून ती मिळवा.
मला तो लेख जालावर सापडत नाही. तुम्हाला कोठे मिळाला तर जरूर मिळवा. कॉम्रेड शरद् पाटील यांनी संस्कृतचा अभ्यास ज्यांच्याकडे केला त्या गुरूंविषयी त्यांनी एक लेख लिहिला आहे. एकदा त्याचा (किमान आरंभ) वाचून घ्या. अशा अभ्यासातील खाचखळगे किंवा डोंगरप्राय अडथळे दिसतील. त्यांनी मांडले ते अडथळे तर त्यांच्या अंतरंगातले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मला शंका आहे...कदाचित ती चुकीचीही असेल्...ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वादातुन तर माझ्या लेखनाकडे पाहिले जात नाहीहे ना?"

~ संजयजी...

वरील शंकेबद्दल (जी अस्थानीच आहे) सर्वश्री कोल्हटकर, धनंजय आणि श्रावण मोडक यानी तुम्हाला दिलेल्या आश्वासनावर तुम्ही जरूर विश्वास दाखवा. या सदस्यांना तसे वाटत असते तर इतके अभ्यासपूर्ण प्रतिसाद इथे अवतरलेच नसते. तुमचे याच नव्हे तर अनेक विषयाचे अफाट वाचन आहे, लिखाणही आहे, हे मी तुमचा एक सामान्य मित्र या नात्याने जाणतोच. तुमच्या इथल्या सातत्यपूर्ण लिखाणामुळे किंबहुना तुम्हालाच उलट जास्त प्रोत्साहन मिळत जाईल जे तुमच्या अभ्यासूवृत्तीला पोषकच ठरेल.

वाचकांचीही दर्जेदार वाचनाची भूक या निमित्ताने भागेल.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही तो लेख मिळुन आला नाही. पण अलीकडेच त्यांच्या "दास-शूद्रांची गुलामगिरी" -भाग दोन वाचण्यात आला. त्यात "दास-शूद्रांची गुलामगिरी" च्या डा. एम. ए. मेहेंदळेकृत परिक्षणावर..." असा प्रतिक्रियात्मक प्रदिर्घ लेख लिहिला आहे. त्यात मेहेंदळे आणि पाटील यांच्यातील संकृतातील अनेक शब्दांच्या अर्थांबाबत मोठाच विवाद ग्रथित झाला आहे. दोघांची मते अर्थातच अत्यंत भिन्न आहेत. उदा. शकटायन नावाच्या व्युत्पत्तीबाबत.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना इतका वेळ कसा काय मिळतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

मला शंका आहे...कदाचित ती चुकीचीही असेल्...ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वादातुन तर माझ्या लेखनाकडे पाहिले जात नाहीहे ना?

अशी शंका लेखकांना कुठल्या प्रतिसादातील कुठल्या टोनवरुन की वाक्यांवरुन आली हे ध्यानात आले नाही. पाणिनि चा एका तथाकथित अनार्य समूहाशी काही बादरायण संबंध जोडला जाऊ शकतो, हा ब्राह्मणेतरी विचार तर या लेखामागे नसावा, अशी शंका मनात येऊन गेली. कदाचित ती चुकीचीही असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच तुमची शंका चुकीची आहे. आर्य नांवाचा वंशच कधी अस्तित्वात नसल्याने आर्य-अनार्य भेदविचार माझ्या मनात येणे शक्य नाही. पणी व वैदिक धर्मियांमद्धे पुरातन काळी संघर्ष असला तरी पुढे त्यांच्यात सख्यही झाले हे मी लिहिलेलेच आहे.

माझीही शंका चुकीचीच होती, त्यामुळे आता माझा कसलाही गैरसमज नाही.

मी सर्वांचाच आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाहून एक माहितीपूर्ण प्रतिसादांना कारणीभूत झालेल्या लेखाचे आभार....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars