मराठी संस्थळांवर व्यनी किती सुरक्षित? (रिंगिंग द बेल)

आज एका संस्थळावर मी एका घटनेचा साक्षीदार होतो. ज्यामुळे मला माझ्याच व्यनीची यादी थेट संपादकांच्या खरडवहीत दिसू लागली. एरवी मी प्रशासनाकडे तक्रार केली असती मात्र या घटनेआधी काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्यामुळे सर्वांना सावध करणे मी माझे कर्तव्य समजतो. यात मला एका संकेतस्थळावर काही खरडवह्यांमध्ये इतरांसोबत, खुद्द माझ्या व्यक्तीगत निरोपांची यादी प्रकाशित झालेली दिसली. मी प्रशासनाकडे तक्रार करे पर्यंत ती उडालेली असली तरी मी त्यापैकी खरडीत प्रकाशित झालेल्या काही यादीचे स्क्रीन शॉट घेऊन ठेवले आहेत. याचा अर्थ किमान माझे खाते 'कोणीतरी' हॅक केले होते व माझ्या व्यनीची यादी मिळवली होती. जे माझ्यासाठी धक्कादायक आहे.
प्रश्न स्क्रिप्ट कोणी बनविली हा नसून अशी स्क्रिप्ट बनणे शक्य आहे हा आहे. जर अशी स्क्रिप्ट बनविणे एखाद्याला काही दिवसांत जमू शकते तर मराठी संस्थळाचे व्यनी कितपत सुरक्षित आहेत / राहतील असा प्रश्न मला पडला आहे.

यानिमित्ताने चर्चेसाठी पुढील प्रश्न ठेवत आहे
१. असे करणे केवळ काही संकेतस्थळांवर करणे शक्य असावे की सगळ्या मराठी संस्थळांवर हे शक्य आहे?
२. ही ड्रुपलमधील त्रुटी आहे का?
३. ड्रुपलवर हे शक्य असल्यास त्यावर काय उपाय करता येतील?
४. सर्व संस्थळांनी एकत्र येऊन या प्रश्नावर उपार शोधला पाहिजे असे वाटते का?

मी याविषयातला तंत्रज्ञ नाही. माझी भिती किती खरी होऊ शकते मी जाणत नाही. मात्र सदर प्रसंगानंतर गप्प बसून रहाणे मला धोक्याचे वाटतले. त्यामुळे माझ्यावर होऊ शकणार्‍या संभाव्य आरोपांना/व्यक्तीगत टिपण्यांना लक्षात घेऊनही मी इतरांना सावध करणे माझे कर्तव्य समजतो.

टीपः सदर धाग्याचा हेतू कोणतेही संस्थळ अथवा आयडीची बदनामी/आरोप करण्याचा नसून एकूणच ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवरच्या सदस्यांनी योग्य तो बोध घेऊन सावध राहावे म्हणून हा धागा काढला आहे. रिंगिंग द बेल इतका आणि इतकाच हेतू यामागे आहे. या घटनेमुळे जास्तीत जास्त मंडळी सावध व्हावीत म्हणून हा धागा अनेक ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवर टाकत आहे.

तरीही प्रशासनास अयोग्य वाटत असेल तर हा धागा उडवू शकतात

संपादन मंडळः इतर संस्थळांमधल्या त्रुटी जाहीर करणे, त्यांच्यावर टीका करणे इत्यांदींना ऐसी अक्षरे व्यवस्थापनाकडून प्रोत्साहन नाही. त्याचबरोबर संस्थळं, मराठी संस्थळं किंवा एकंदरीत आंतरजाल, ड्रुपलमधल्या सुविधा यांविषयी चर्चा होणं मात्र रास्त आहे. तेव्हा सदस्यांनी वैयक्तिक टिपण्या टाळून चर्चा तांत्रिक व सर्वसाधारण ठेवावी ही विनंती मान्य करून योग्य ते बदल करायची तयारी दाखवल्याने सदर सदस्याने या संस्थळापुरत्या मान्य केलेल्या बदलांसह चर्चा पुनःप्रकाशित करत आहोत
ऐसी अक्षरेवरील व्यनिंबाबत व्यवस्थापनाची भूमिका कुठच्याही पानावर तळाशी दिसणाऱ्या प्रायव्हसी पॉलिसी मध्ये मांडलेली आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

इतर संस्थळांवर चिखलफेक करण्याची ऐसी अक्षरे ही जागा नव्हे. आंतरजाल, ड्रूपॉलवरची सुरक्षितता अशा विषयांवरच इथे चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ८-१० वर्षांच्या भाच्याशी 'व्यापारी' नावाचा खेळ खेळत होते. फार कष्ट न घेता मी हरत होते. अचानक तो म्हणाला "आत्या, तू एकदम भिकारी होते आहेस." मी म्हटलं, "काय फरक पडतो? मी पूर्णच भिकारी झाले तर तू जिंकणार आणि खेळ संपणार. मग तू नवा डाव सुरू करणार." त्या बिचार्‍याची जिंकण्यातली मजाच निघून गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतर संस्थळांमधल्या त्रुटी जाहीर करणे, त्यांच्यावर टीका करणे इत्यांदींना ऐसी अक्षरे व्यवस्थापनाकडून प्रोत्साहन नाही. त्याचबरोबर संस्थळं, मराठी संस्थळं किंवा एकंदरीत आंतरजाल, ड्रुपलमधल्या सुविधा यांविषयी चर्चा होणं मात्र रास्त आहे. तेव्हा सदस्यांनी वैयक्तिक चिखलफेक टाळून चर्चा तांत्रिक व सर्वसाधारण ठेवावी ही विनंती.

ऐसी अक्षरेवरील व्यनिंबाबत व्यवस्थापनाची भूमिका कुठच्याही पानावर तळाशी दिसणाऱ्या प्रायव्हसी पॉलिसी मध्ये मांडलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वैयक्तिक चिखलफेक' नक्की कशाला म्हणावे ?

मी एका अबक बँकेचा सभासद आहे. त्या बॅंकेत माझ्या काही मित्रांची खाती आहेत, आणि काही तिथे खाती उघडण्याच्या विचारात आहेत. अशावेळी जर मी "ती अबक बॅंक भिकार आहे. कसला घाणेरडा रंग मारला आहे भिंतींना, बाहेरच्या टपरीवरती सिग्रेट पण धड मिळत नाय, त्या शिपायाचे कपडे कसले मळलेले असतात, कॅशीअर बेक्कार घामट आहे,मॅनेजरचे अवैध संबध आहेत' असले काही सार्वजनिक सांगत बसलो तर त्याला नक्कीच 'वैयक्तिक चिखलफे' म्हणायला हरकत नाही. पण मी जर 'बॅंकेचा लॉकर वापरताना मला काही एक अयोग्य अनुभव आला, बॅंकेचे ATM वापरताना पैसे न मिळणे आणी बँकेकडून ताक्रारीची टोलवा टोलवी होणे असा अनुभव आला (आणि मुख्य म्हणजे हे सर्व घडल्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत)' असे सार्वजनिक सांगीतले, तर त्याला 'वैयक्तिक चिखलफेक' म्हणावी , का सावध करण्याचा सल्ला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

एव्हरीथिंग इज पर्सनल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामोशी सहमत...
गॉडफादरमधले माझे हे सर्वात आवडते वाक्य आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या घटनेमुळे जास्तीत जास्त मंडळी सावध व्हावीत म्हणून हा धागा अनेक ड्रुपल आधारीत मराठी संस्थळांवर टाकत आहे.

धागा दिसत नाही, बहुतेक त्यांच्या धोरणात बसला नसेल. काही संस्थळांची बाकी एकदम भारी आहेत हो आणि ती कधी बदलतील त्याचा नेम नसतो.

बाकी तुम्ही नशिबवान हो ऋषिकेशराव, अहो तुम्हाला इतरांच्या खरडवह्या तरी दिसतात! इतरांच्या सोडा आम्हाला तर आमची स्वतःची खरडवही दिसत नाही की व्यनी दिसत नाही तिथे! बहुतेक असाच विशेष धोरणात बदल करून (खास आमच्यासाठी बरं का!) बंद केली असेल, कोणास ठाऊक! बंद का केली वगैरे विचारणं सुद्धा त्या संस्थळाच्या धोरणात बसत नसेल बहुतेक. म्हणूनच खरडवह्यांचं सुद्धा संपादन चालत असावं तिथे.

बाकी हे प्रकरण पहायला हवं. दुसर्‍या सदस्यांचे व्यनी अ‍ॅडमिन राईटशिवाय पाहता येण्याची सोय फोरम्सवरती असू नये असे मला वाटते. डुपल फोरम्स वरती असं काहीही अक्सेस करता येत असेल तर हा एक जोक आहे.

सॉफिस्टीकेटेड हॅकिंग असेल तर मात्र गोष्ट वेगळी, पण वरती दिलेल्या संवादावरून एखाद्या संकेतस्थळावर(किंवा ड्रुपलवर?) इतरांचे व्यनी सहजगत्या वाचता येऊ शकतात असे व्यतित होते.

तळटीपः सदर प्रतिसाद ही काही एका संस्थळावर चिखलफेक नाही. धाग्यात व्यक्त केलेल्या लेखकाच्या व्यक्तिगत अनुभवाप्रमाणेच माझा व्यक्तिगत अनुभव आहे तसा लिहलेला आहे. हाच प्रतिसाद इतर स्थळावरही दिलेला आहे. सदर प्रतिसाद उपक्रमावरही (संबंधित चर्चेत) देण्याची माझी तयारी आहे. उपक्रमावर मात्र प्रतिसाद संपादकांच्या संमतीविना देण्याची मुभा मला उपलब्ध नसल्याने देऊ शकत नाही तरीही जर इथल्या व्यवस्थापनास ही चिखलफेक वाटत असेल तर प्रतिसाद संपादीत करण्यास माझी हरकत नाही.

संपादक मंडळः मुळ लेखासोबत हा प्रतिसाददेखील संपादित केला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा' ही म्हण आठवली. एकूण करमणुकीचा एक अध्याय सुरू झाला आहे तर... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-कन्फ्यूज्ड
आडकित्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वर्ल्ड वाइड वेबवर सुरक्षीत असे काहीच नाहीये हे आपण नेहमीच ऐकत असतो. हा चर्चाप्रस्ताव वाचुन मराठी संकेतस्थळे Fool Proof नाहीयेत याची खोल जाणिव झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं