खादाडीच्या जागा सुचवा

नमस्कार मंडळी,
मला सध्या मुंबईतील काही विशिष्ट प्रकारच्या खानावळींची/भोजनालयांची माहिती हवी आहे, जेथे नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ मिळतील. तुम्हाला जर अशा काही खानावळी वा भोजनालये माहीत असतील, जेथे भारतातील विविध प्रातांतील पाकसंस्कृतींतील अस्सल पदार्थ मिळू शकतील, उदा. बंगाली, काश्मिरी इ. तर कृपया अशा भोजनालयांची नावे सुचवा. भारताबाहेरील आणि अनवट अशा पाकसंस्कृतींना वाहिलेल्या भोजनालयांचीही नावे चालतील.

आगाऊ धन्यवाद.
राधिका

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

स्वतः मुंबईला असल्याने खानावळीत/भोजनालयात जायची वेळ आली नाही.
बोरीवली स्तेशन समोर पश्चिमेला गुजराती खानावळ आहे. तेशील गुजराती थळी खायला जायचो. तेव्हा आवडायची.

उपहारगृहे चालतील का? अर्थात नसतील विचारली तरी देणार आहेच Wink
प्रॉन्स बिर्याणी : बल्लव, व्हीटी (बाकी सारे पदार्थ नेहमीचेच- नेहमीच्याच नवीचे, मात्र ही बिर्याणी लाजबाब)
काश्मिरी: बर्‍याच वर्षांपूर्वी बोरीवलीला योगी नगरमधे खास काश्मिरी पदार्थ मिळणारे "योगी'ज" नावाचे रेस्टॉरन्ट होते. ते रेस्टॉरन्ट अजूनही आहे मात्र तिथे आता स्पेशल काश्मिरई पदार्थ मिळातात की नाहि कल्पना नाही.
इंडीयन चायनीजः दहिसरला लिंक रोडवर सांजी नावाचं रेस्टॉरन्ट आहे. छान इंडीयन चायनीज
कॉन्टीनेन्टलः माटुंगा सर्कलला ७ स्पाईस नावाचे रेस्टॉरन्ट आहे. अप्रतीम ऑथेंटिकेट आनि एकोनॉमिकल कॉन्टीनेन्टल

डिस्क्लेमर: सारी माहिती किमान ३ ते ५ वर्षे जुनी आहे. यातील किती गोष्ती अजून टिकल्या आहेत, वाढल्या आहेत, जागा बदलल्या आहेत याची कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

रुइया महाविद्यालयापासून माटुङ्गा (मध्य) स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर डावीकडच्या पदपथावर 'सुन्दर' नावाची दाक्षिणात्य खानावळ आहे. काही वर्षांपूर्वीपर्यन्त ४० रुपयात असीमित थाळी उपलब्ध होती. अतिशय उत्कृष्ट थाळी आणि फक्त थाळीशीच ईमान राखणारी खानावळ.
तसेच माटुङ्गा (मध्य) स्थानकाजवळ वर असलेली (रेल्वेतून जाताना पाटी दिसते) 'रमा नायक' ची दाक्षिणात्य खानावळ प्रसिद्ध आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रमा" नव्हे "रामा"!

ए रामा नायक यांनी स्थापन केलेले श्रीकृष्ण बोर्डिंग हे मुंबईतील पहिले उडुपी रेस्टॉरन्ट मानले जाते. रुचकर जेवण. एकदातरी जाण्यासारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'श्रीकृष्ण बोर्डिङ्ग' हे नाव विसरलो होतो; तसेच रमा/रामाची चूक नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद, सुनील.
(तरी बरे मी 'नायक'ऐवजी नाईक नाही लिहीले, नाहीतर खानावळीऐवजी अण्डरवर्ल्डमध्ये पाठवणी होत होती की !)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

-कोणतेही पॉप टेट्स.. (वर्ल्ड क्विझिन)
-कन्सार काठियावाडी थाळी,अहमदाबाद रोड घोडबंदर जंक्शन. गुजराथी थाळ्यांच्या गोडमिष्ट गर्दीत एक वेगळ्या प्रकारची क्विझिन असलेली काठियावाडी थाळी (शुशा)
-कोल्हापूर हॉटेल, तलावपाळी ठाणे (पुरेपूर कोल्हापूर ही ब्रँडेड चेन नव्हे.. हे नुसतेच कोल्हापूर) अस्सल मटण आणि कोल्हापुरी सर्वकाही..
-मामा काणे / तांबे दादर (प.) - डाळिंबीपुरी, फराळी मिसळ, भरली वांगी आदि मराठी चीजांसाठी खास.
- कॅफे माँडेगार - कुलाबा - वर्ल्ड क्विझिन. दणदणाटी म्युझिक आणि मुख्यतः यंग (अ‍ॅट हार्ट) काहीसा अपमार्केट क्राऊड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालवणी थाळी -
१. 'हायवे गोमान्तक' प्रसिद्ध. हे कलानगरच्या पुढ्यात असलेल्या, अनेक रस्ते एका ठिकाणी मिळतात त्या मिळणबिन्दूच्या अगदी जवळ आहे.
२. (नुसतेच) 'गोमान्तक'. हे 'शिवाजी मन्दीर'च्या समोर. (इथे रविवारी जायचे असेल तर आगोदरच्या मङ्गळवारी सिद्धीविनायकाच्या राङ्गेत उभे राहून पायदुखीचा सराव करून घ्या.)
३. ए.सी. मध्ये बसून थाळी खायची असेल तर वरील दोनही ठिकाणे गैरलागू. मग मोर्चा 'सिन्धुदुर्ग' कडे वळवावा लागेल. शिवसेनाभवनाकडून प्लाझा चित्रपटगृहाकडे जाताना उजवीकडच्या ३र्‍या गल्लीत शिरा - राम मारुती मार्ग. डावीकडच्या पदपथावर दिसेल.

(बाकी मी मालवणी थाळी/मासे चापून खाणार्‍यातला नसल्याने ही माहिती माझ्या जिभेऐवजी कानांवर विश्वास ठेवून देत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोरेगावतलं सत्कार हाँटेल हे मांसाहारी पदार्थासाठी प्रसिध्द आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मुंबईतल्या जुन्या खाणावळी आता आहेत की नाहीत? गिरगावातले अनंताश्रम,माधवाश्रम म्हणजे नानांचे,ह्यांचे ६०च्या दशकातले आवडते ठिकाण. जावून ये राधिके एकदा तेथे. ठाकुरद्वारला जुन्या गुजराती खाणावळी होत्या.उपेंद्र भोजनालयात जेवलेले आठवतेय फार पूर्वी. तुमच्या त्या उपनगरात- पार्ले पश्चिमलाही एक दोन चांगल्या खाणावळी होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0