Skip to main content

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार.

ललित लेखनाचा प्रकार

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५
मन्याचा व्हाटसपवर मेसेज
५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या.
मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते.
.
अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे.
च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही.
खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त.
रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला.
जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण.
जास्त विचार करण्यात अर्थ नाही.
.
रात्री कन्फर्म मिळाली बातमी.
वाचून निवांत झोपलो विचार न करता.
.
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.००
पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी.
आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या.
.

ललित लेखनाचा प्रकार

छे छे छे, या अमेरिकेत असे होणे फार वाईट आहे.

लॉस एंजेलिस मध्ये एका गरीब मेक्सिकन कुटुंबाला भुकेसाठी वाळके गवत खाताना पाहून एका अमेरिकन वकिलाला फार वाईट वाटले. "छे छे छे, या अमेरिकेत असे होणे फार वाईट आहे. बसा माझ्या गाडीत."
गाडीत बसल्यावर त्या कुटुंब प्रमुखाने त्याचे आभार मानायला सुरुवात केली.
"काही काळजी करू नका आता! माझ्या घरामागे उंच, हिरवेगार गवत आहे!". वकील म्हणाला.
xxx

१४ लाख कोटींच्या नोटांचं काय करायचं?

सरकारने नुकत्याच ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या असं कळलं. आम्हासारख्या गरीबांना ५०० च्या नोटा अधूनमधून दिसल्या तरी १००० ची नोट वापरण्याची वेळ फारशी येत नाही. म्हणून वाटलं की आख्ख्या देशात मिळून काय, असतील फारतर दीडदोन लाख नोटा. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला लोक इतकं महत्त्व का देताहेत हेच कळत नव्हतं. अर्थात, हे फेसबुक-फुरोगामी आणि डावीकडे झुकलेला मीडिया काय कशालाही महत्त्व देतात. पण थोडीफार चौकशी केल्यावर कळलं ही एकंदरीत १४ लाख कोटी रुपये या नोटांमध्ये अडकलेले आहेत. शरीरात एखादा आत्मा अडकून राहावा, तसा एवढ्या मूल्याचा आत्मा अब्जावधी नोटांच्या कुडीत अडकलेला आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा

आज रात्रीपासुन ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा कॅन्सल्ड.

#नोटाबंदी #निश्चलनीकरण #demonetization

पुरोगाम्यांचा भयाण इतिहास

इस्लामबाबत पुरोगामी बोटचेपी भूमिका घेतात हा गंभीर आरोप असून त्यात तथ्य आहे असे आमचे मत होतेच. पण आता त्यात केवळ तथ्य नसून भयानक, दिल को दहला देनेवाल्या स्वरूपाचे तथ्य आहे याविषयी आमच्या मनात कुठलीही शंका नाही. हे प्रकरण वाटते तितके साधे सरळ नाही. अमेरिकेवरील हल्ल्यापूर्वी ओसामा बिन लादेन स्वतः पुण्यात येऊन गेल्याचे पुरावे अलिकडेच आढळले आहेत. इस्लामचे लांगूलचालन करणाऱ्या पुरोगाम्यांच्या मदतीनेच त्याने अमेरिकेवरील हल्ल्याची योजना आखली हे लवकरच सिद्ध होईल.

ललित लेखनाचा प्रकार

अमेरिकन निवडणूक : ट्रंपच्या विजयाचा अर्थ

Taxonomy upgrade extras

रोनाल्ड रीगन ने सुरु केलेल्या जागतिकीकरणातून गोऱ्या अर्धशिक्षित कामगारांची प्रचंड वाताहत होऊन त्यातून अखेर ट्रम्प निवडून आला आहे . सध्याचे जागतिक-भांडवलशाहीचे जन-विरोधी स्वरूप यापुढे चालवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट संदेश या विजयातून दिला गेला आहे. हिलरीला प्रत्यक्ष मतांमध्ये ट्रम्पपेक्षा सुमारे दोन लाख मते अधिक मिळाली आहेत हे इथे नोंदवितो.
ट्रम्प जिंकण्याचे इतर काही परिणाम:
१. इराण बरोबरचे "डील " रद्द होईल, आणि सुप्त मार्गाने इराण दोन-तीन वर्षात स्वतःचा अणुबॉम्ब तयार करेल ज्याने जग अधिकच अस्थिर होईल .

राधाकवितात्रयी

राधा- १

मी कधी ऐकला नाही मिथकातील कळंक पावा
वृंदावनी ना रमले, ना यमुनातीरी झुरले
मी कदंबफुलांच्या माळा, लेवून कधी ना सजले
मी वाट पाहिली नाही, मी कधीच नव्हते राधा

प्राणामध्ये होती श्वासांची दुष्कर बाधा
पावलांत वादळ घेऊन पैंजणांस भिरकावून
मी गरगरले या पृष्ठी पृथ्वीच्या कठोर वक्षी
निजताना टेकीत माथा मी कधीच नव्हते राधा

या तप्तहृदीच्या गाथा वाऱ्यासही ना मी कथिल्या
डोळ्यांच्या सीमारेखा, आसवांस रोखत गेल्या
मी नाही रचिला रास, मी पाण्यावरी ना गेले
मी घडा फुटू ना दिधला, मी कधी न झाले राधा

अवघड असते बाई, असले आपण आपण असणे
लय मुक्त अशा श्वासांची, अन् सुरात अनवट जगणे

बूट

पृथ्वी तुडवत जाणारे
उन्मत्त अत्याचारी बूट
काळेशार चमकदार चामडे, गुडघ्यापर्यंत
त्यातून उगविणारी सोलीव गोरी
प्रमाथी कांती, पुष्ट पोटऱ्या, हळूहळू
मांड्यांचा आकार घेणाऱ्या,
काळ्या तोकड्या स्कर्टखाली श्वास घेणारे
घाटदार, दुभंग नितम्ब .
संबंध वर्ग घायाळ, मुली एकमेकींकडे
बघतायत , 'शिक्षिका हे घालू शकते?
तेही शिकवताना
?'
पुरुष (स्त्रिया?) आवंढा गिळतात,
प्रयासाने नजर हटवितात,
प्लॅटफॉर्मवर चढताना ती अचानक
मागे वळून माझ्याकडे पहाते: रोखून
आणि मान हलविते
नकारार्थी !
---