एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत
दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6513 views
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या- कवि बी
कवि बी यांची "गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या" ही कविता आमच्या कुमारभारती पुस्तकात होती. अतिशय उच्च कविता म्हणुन ही माझ्या लक्षात रहाण्याचे कारण आईने अतिशय रसाळ शब्दात केलेले रसग्रहण. या कवितेला एक ठाशीव पार्श्वभूमी आहे जी की कवितेतून कविने उत्तम रीत्या उलगडत नेलेली आहे. बी यांच्या "चाफा बोलेना" कवितेतील अध्यात्माची डूब या कवितेतही जाणवते. किंबहुना हे अध्यात्मिक सौंदर्यच या कवितेचे काळीज आहे.
.
- Read more about गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या- कवि बी
- 80 comments
- Log in or register to post comments
- 106059 views
कपाळावरच्या आठ्या
करियरचं इतंकं टेंशन का आलंय? नकोश्या असलेल्या या नोकरीतून बाहेर पडायचा काहिच मार्ग का दिसत नाही? नुसतं जर्मन येतं म्हणून या लोकांनी मला नोकरी दिली. टेक्निकल गोष्टी झेपणार आहेत का, किंवा या प्रोफाईलचा आवाका इतका मोठा असेल अशी आयडिया यांनी अगोदर का दिली नाही? किंवा आपल्याही लक्षात हे कसं आलं नाही? पाण्यात पडल्यावर पोहता येतं म्हणतात, मग मला साध्या साध्या गोष्टी शिकण्यात इताका त्रास का होतोय? कोरा कॅनवास मधे लिहीलंय तसं आपल्या मर्यादा ओळखुन नवी सुरुवात करेनही, पण मग पूढे काय? हा मार्ग सोडून दिला म्हणजे ही नोकरी सोडून दिली तर पगाराचं आणि महिन्यांच्या बिलांचं काय?
- Read more about कपाळावरच्या आठ्या
- 29 comments
- Log in or register to post comments
- 15316 views
सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ८
Taxonomy upgrade extras
मागे कुठल्या तरी धाग्यावर लताबाईंच्या जुन्या कोवळ्या आवाजाचा विषय निघाला होता. कालच अनिल बिस्वासचं 'तराना'मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा त्याची आठवण झाली. 'सीने मे सुलगते है अरमान' किंवा 'नैन मिले नैन हुए बावरे'च्या मानानं हे गाणं क्वचितच ऐकायला मिळतं. मधुबालाप्रेमींसाठीही ती एक पर्वणी ठरावी.
- Read more about सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ८
- 107 comments
- Log in or register to post comments
- 141948 views
बेरंग - भाग ३
फोनवर चंद्या असतो. कुठे गायब होतोस रे तू ?लवकर पोडीयमजवळ ये. साहेब भलताच कावलाहे. आपण उसासा टाकत काहीसे वैतागूनच पोडीयमच्या दिशेने चालू लागतो. काय झालं असेल? साहेबाला नक्की कशाचा राग आला असेल याचा विचार करत. आणि आला तरी ही काय वेळ झाली. जवळपास मध्यरात्र. शेवटचा कार्यक्रम संपून गेलेला. लोक आपापल्या घरांच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेले. पोचतो तर बघतो साहेब क्लास फोरना झापतोय. पोडीयम जवळ काही कचरा आहे जो उचलण्याची कुणी तसदी घेतलेली नाही. काही प्रेसवाले फोटो काढून, शुटींग करून गेलेत. कर्मचारी आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करतात. साहेब, ही जवाबदारी कंत्राटदाराची आहे. आम्ही काय करणार.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बेरंग - भाग ३
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4770 views
इतिहासाच्या पलीकडे (चल रे सख्या)
मुंबई-नूवर्क-USA एकाच झेपेत इतिहास ओलांडून
पलीकडे गेलेले
कमलेश आणि कौसा, अमित आणि अमिता फिरतायेत
"एडिसन" गावात, कमरेत हात घालून: ("आज रात्री ही कंबर माझी आहे!").
पितळी विष्णू आणि चांदीचे गणपती चमकतायत
शिसवी शेल्फात,
आणि पोलादी प्लेट वर लालभडक तंदुरी
चिकन चर्र चर्र करून म्हणत आहे
इतिहास संपला रे संपला
आता फक्त मजा करा! तुमची मुले
आणि त्यांची मुले रोज
तंदुरी चिकन खाऊ शकतील,
उंची वाईन पिऊ शकतील किंवा
चैनीची पुढची व्याख्या करत
हार्वर्ड मध्ये शिकायला जाऊ शकतील, जिथे
त्यांना लिहून ठेवलेले
सापडेल की तुमच्या खापर-खापर पणजोबांना
ब्रिटीश जेलर
- Read more about इतिहासाच्या पलीकडे (चल रे सख्या)
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3415 views
नको भुलू जाहिरातींना !
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते. जाहिरात कंपन्यांनी ही कला धनप्राप्तीसाठी अवगत करून घेतली आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about नको भुलू जाहिरातींना !
- 26 comments
- Log in or register to post comments
- 9533 views
लस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास
लस्ट फ़ॉर लालबाग: विश्वास पाटील (राजहंस प्रकाशन २०१५)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about लस्ट फ़ॉर लालबाग - १९८२ च्या संपाचा इतिहास
- 9 comments
- Log in or register to post comments
- 16970 views
ही बातमी समजली का? - १२०
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
- Read more about ही बातमी समजली का? - १२०
- 108 comments
- Log in or register to post comments
- 42895 views
मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६८
Taxonomy upgrade extras
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

- Read more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६८
- 102 comments
- Log in or register to post comments
- 117503 views