Skip to main content

एका खडूस फॅशनिस्टेचे स्मरणरंजन

फॅशन फक्त तथाकथित ‘नटमोगऱ्या’ बायकांचा प्रांत आहे, आणि त्याबद्दल बुद्धिमान स्त्रीपुरुषांनी बोलू नये असा एक समज रूढ आहे. कॉलेजात जाताच 'फॅशनी' करण्याऱ्या मुली, लग्नकार्यात मेकअप आणि दागिन्यांचे थर चढवलेल्या बायका, उच्चभ्रू लोकांची थेरं ते नव्वदच्या दशकात केबलवर येणारा एफटीव्ही (जो आता चाळीशीत असलेले पुरुष आईबाबा घरी नसताना चोरून बघायचे) – यांपैकी काहीही फॅशन म्हणल्यावर मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या डोक्यात येईल.

पाकिस्तान-९

.
“काश्मिरी कॅसेट ऐकत असत. मग कंटाळून किंवा भारतीय गस्तीपथकाला घाबरून ते कॅसेट फेकून देत. तो टेपरेकोर्डर ताब्यात घेत नी पर्यटकांना विकत.” - एका काश्मिरीचं विधान.

गर्वहरण

सुश्रुतला रोज रोज सांगून आता गोष्टींचा ऐवज संपायला आला आहे. ‘एकीचे बळ’, ‘जशास तसे’, ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अश्या नेहेमीच्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता कधी कधी याच अर्थाच्या नवीन गोष्टी रचाव्या लागतात. परवा ‘गर्वाचे घर खाली’ या तात्पर्याची अशीच एक नवीन गोष्ट तयार केली.

ललित लेखनाचा प्रकार

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा पूर्णपणे सावरकारमय राष्ट्रभान समृद्ध करणारा अनुभव आहे. वि. दा. सावरकर यांचा बायोपिक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याचा संकीर्ण इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील व्यवस्थेने नाकारलेला महानायक याचा कालपट असणं सहाजिकच आहे. सावरकरांचे विचार हे सहजासहजी पचत नाहीत. कारण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका ह्या अंगिकारून समाजात वावरणं राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना शक्यच नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेला अनुसरून सावरकर आपले केले आहेत.

समीक्षेचा विषय निवडा

अश्वत्थामा

रोज रात्री झोपताना गोष्टी ऐकायची सुश्रुतला सवय झालीय. किंबहुना आम्हीच ती लावलीय. रोज रोज नवनवीन गोष्टी कुठून आणायच्या हाही एक प्रश्नच असतो. यातून आमच्या कल्पनाशक्तीचा कसच लागतो. वर त्या बोधप्रद असाव्यात, त्यांचं काही तात्पर्य असावं असा आमचाच आग्रह. असंच एकदा कुठली गोष्ट सांगता येईल याचा विचार करीत असताना अश्वत्थामा आठवला.

ललित लेखनाचा प्रकार

"काला पानी" वेब सीरिजची सुखद, पण अस्वस्थ करणारी सजा

तुम्ही अंदमान बेटावर फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? करत असाल तर नक्की जा, मी कोण तुम्हाला थांबवणार? पण 2027 साली तिथे जाऊ नका. मी का म्हणतोय असे? थांबा सांगतो! आधी थोडी प्रस्तावना वाचा! लेख खूप मोठा झाला आहे, पण इलाज नाही! विषयच तसा आहे.

बरेचदा एखादी विज्ञान काल्पनिक कथा लेखक लिहितो, जी भविष्यात घडत असते, परंतु खरोखर तो काळ आल्यानंतर तशाच प्रकारच्या घटना थोड्याफार फरकाने घडताना दिसतात. याला लेखकाचा दूरदृष्टीपणा किंवा भविष्याचा पूर्वभास म्हणावा?

समीक्षेचा विषय निवडा

दही बटाटे भाजी

पूर्वतयारीचा वेळ: १० मिनिटे

प्रत्यक्षात लागणारा वेळ: २५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

दही - 350 ग्रॅम
बटाटे - 4-5
देसी तूप - 2 टी स्पून
काजू पावडर - 2 चमचे
जिरे - 1/2 टी स्पून
लाल मिरची पावडर (तिखट) - 1/2 टी स्पून
अदरक/आले बारीक चिरलेले - 1 टी स्पून
टोमॅटो चिरलेला - 1 (पर्यायी)
हिरव्या मिरच्या कापलेल्या - 2
हिरवी कोथिंबीर चिरलेली - 1 टी स्पून
सेंधव मीठ - चवीनुसार

क्रमवार पाककृती:

स्वराज्य सौदामिनी तारा राणी

2022 ते 2024 दरम्यान जसे जमेल तसे सोनी लीव्ह वर "स्वराज्य सौदामिनी तारा राणी" ही सोनी मराठी वरील सिरियल पाहून संपवली. एकूण 221 भाग आहेत. IMBD वर 10 पैकी 9.3 रेटिंग आहे. यात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरची कथा पुढे सुरु होते. झी मराठी वर "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिका मी बघितली नव्हती कारण तेव्हा जमले नाही, पण ती आत्ता बघायला सुरुवात केली. नंतरचा इतिहास आधी पाहिला गेला आणि आधीचा इतिहास आता बघायला सुरुवात केली.

समीक्षेचा विषय निवडा

रॅन्समवेअरपासून सावध रहा

अलीकडे, सायबर सुरक्षा जगतात, लॉकबिट रॅन्समवेअर समूह बातम्यामध्ये येत आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टर सीटीव्ही न्यूजनुसार, कॅनडाच्या ओन्टारियो येथील न्यायाधीशाने या समूहाशी संबंधित सायबर गुन्हेगार मिखाईल वासिलिव्ह याला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. म्हणून, आज या लेखात, मी तुम्हाला रॅन्समवेअर काय आहे आणि सायबर सुरक्षा जगाशी संबंधित गोष्टी समजून घेण्यात मदत करत आहे. हा विषय केवळ रॅन्समवेअरच्या स्पष्टीकरणापुरता मर्यादित असला तरी, आपण इतर संबंधित गोष्टी देखील थोडक्यात समजून घेऊ, परंतु तपशीलवार नाही. मी त्या गोष्टी भविष्यात स्वतंत्र समर्पित लेखांमध्ये कव्हर करेन.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

थांबा! सोरा आणि डेव्हिन आलेत!

तुम्ही विचाराल कोण हा डेव्हिन? कोण ही सोरा? आणि ते आलेत म्हणून आम्ही का थांबायचे?
या दोघांबद्दल जाणून घेण्याआधी एआय म्हणजे काय ते बघू.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स