मत-मतांचा तवंग (लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित)
स्मार्टफोन आल्यामुळे आपलं वर्तन फार बदललेलं आहे, असं मला वाटत नाही.
- Read more about मत-मतांचा तवंग (लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित)
- 69 comments
- Log in or register to post comments
- 12897 views
पाकिस्तान-६
“जेव्हा काठीचा मार पडला तेव्हाच देश योग्य मार्गावर आला.” - पाकिस्तानातील एक वयस्क.
पाकिस्तानने पहिल्या दशकात सात पंतप्रधान पाहिले. लियाकत अली खान वगळता उर्वरित दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकले. कोणत्याही राष्ट्रीय निवडणुका झाल्या नाहीत. प्रांतिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. बलुचिस्तान आणि पख्तूनिस्तानला आपले स्वातंत्र्य हवे होते. पूर्व पाकिस्तानही हातातून निसटणार होता. निरक्षरता आणि गरिबी वाढत होती. अहमदिया पंथाचे मूलतत्त्ववादी सुन्नी मुस्लिमांशी भिडत होते.
- Read more about पाकिस्तान-६
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1851 views
कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५
सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता.

ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2123 views
फिरतानाच्या नोंदी
सकाळची भटकंती हो नाही म्हणता म्हणता जरा उशिराच सुरु झालेली असते एव्हाना साडेआठ वाजत आलेले असतात. पूर्वानुभव लक्षात घेता तसा अपेक्षाभंग गृहीत धरलेला असतो त्यामुळे कसल्याही अपेक्षा न बाळगता नेहमीप्रमाणे तळ्याकाठच्या बांधावर चालायला सुरुवात करतो न करतो तोच अचानक तळ्याच्या मागच्या भागात दिसतात उड्या मारत भन्नाट वेगाने पळणारी काळवीटं. एक दोन नाही तर चांगली पाच-सहा. एखाद्-दोन माद्या आणि मग काही तरुण नर आणि त्यांच्या मागून येणारा जर्द काळ्या रंगाची पाठ, पांढरे शुभ्र पोट असा थाट असणारा अन् वळणं घेत गेलेली शिंग मिरविणारा पूर्ण वाढलेला नर.
- Read more about फिरतानाच्या नोंदी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1943 views
आजोबाचे पत्र

तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा सौरमालेतील ग्रह-नक्षत्रांची एक विशिष्ट स्थिती होती. परंतु त्याचा तुझ्या भावी जीवनावर कुठलाही परिणाम होणार नाही. तुझ्या नावामधील अक्षरावरूनसुद्धा तुझ्या पुढील जीवनातील घटनांचा क्रम लावता येणार नांही. कारण त्या चार-सहा अक्षरांचा शब्द तुला हाक मारण्यासाठी आहे. तुझी ओळख करून देणारे ते एक लेबल आहे. त्या शब्दात वा जन्मवेळेत किंवा जन्मस्थळात गूढ, अतींद्रिय किंवा काही तरी महत्त्वाचे दडले आहे असा समज तू करून घेऊ नकोस .
- Read more about आजोबाचे पत्र
- Log in or register to post comments
- 1161 views
प्रेमाची गोष्ट - मांडू, मध्य प्रदेश (डिसेंम्बर २०२३)
मांडू ला गेलास की न चुकता रुपमती पॅलेस ला जा आणि राणी रुपमती ला माझा हाय सांग. असं भाच्याने सांगितल्याने आणि मी एक चांगला मामा असल्याने मध्य प्रदेश ची ट्रिप मांडू शिवाय करणार नव्हतोच. त्यातच आमच्या दोस्ताने एक दिवस राहण्यासाठी मांडू निवडलं होतं त्यामुळे मोकळ्यात वेळ होता.
तर मांडू किंवा मांडव पण त्याच्याबद्दल बोलण्या आधी आपण बोलूयात माळव्याबद्दल.
- Read more about प्रेमाची गोष्ट - मांडू, मध्य प्रदेश (डिसेंम्बर २०२३)
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1635 views
पाकिस्तान-५
लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले.
- Read more about पाकिस्तान-५
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1310 views
सॉफ्ट पॉर्न? ओके प्लिज.
"सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सॉफ्ट पॉर्न? ओके प्लिज.
- 12 comments
- Log in or register to post comments
- 5190 views
पाकिस्तान-४
पाकिस्तानला एकत्र करत होता ईस्लाम आणि त्याला तोडत होती विविधता. प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी होती. बरं, भौगोलिक अंतरही पूर्व पाकिस्तान नी पश्चीम पाकिस्तानात बरंच होतं आणी मध्यभागी होता भारत. आता दिल्लीहून ट्रेन पकडून पाकिस्तानी मुत्सद्दी किंवा सैनिक कलकत्ता आणि ढाक्याला कसे जाऊ शकनार होते? मात्र, सामान्य नागरिक भारतीय रेल्वेनेच सीमा ओलांडून पूर्व पाकिस्तानात जात असत. एका पाकिस्तानी माणसाच्या म्हणण्यानुसार, हे खूप महाग पडायचे, नी गरजही नव्हती.व्यापारी ट्रक भारतामार्गेच पाकिस्तानात जात असत.
- Read more about पाकिस्तान-४
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1647 views
पाकिस्तान-३
पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. बाकीच्या अधिकार्यांचे मत बदलण्याआधीच 'ऑपरेशन पाकिस्तान' अंतर्गत ब्रिटिश विमाने दिल्लीला पाठवण्यात आली नी त्यांना ऊचलन्यात आले.
- Read more about पाकिस्तान-३
- 8 comments
- Log in or register to post comments
- 2110 views