इतर

आतां आमोद सुनांस जाले

अंदाजे सात आठ वर्षांपूर्वी घरच्यांबरोबर आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली.

ललित लेखनाचा प्रकार: 

तंबाखू ,सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा
काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी
पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला
गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या
सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू
लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे
त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता.
पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना
कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी
करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली
व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप

ललित लेखनाचा प्रकार: 

चवथ्या घरातील प्लूटो

http://i2.wp.com/1.bp.blogspot.com/-6OG97DdJlvU/VEMqze9nHwI/AAAAAAAARJs/fwUbZ45HJi8/s1600/tumblr_maklsqqnly1qbsjqno1_500.png?resize=312%2C400
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

मी आणि टीपू सुल्तान - एक आठवण

मी १०-११ वर्षांचा असेल, तेंव्हाची गोष्ट, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी अर्थात भंडारा येथे आलो होतो. आजोबा वैद्य होते. त्यांचे पूर्वज तीन-चार पिढ्यांपूर्वी आंध्र प्रदेशाहून भंडारा येथे आले होते. भंडार्याच्या नवाबाने त्यांना एक वाडा बांधून दिला आणि काही शेती हि त्यांच्या नावे केली होती. वाडा मोठा आणि दुमंजली होता.

ललित लेखनाचा प्रकार: 

चिअर्स सुंदरीची व्यथा कथा

(या लेखाचा उद्देश्य कुणाची भावना दुखविण्याचा नाही. आधीच क्षमा मागतो).

ललित लेखनाचा प्रकार: 

दुपार

आमच्या गावात आज, आत्ता कुठे पहीली टळटळीत दुपार एक वर्षानंतर उगवली आहे. इतके दिवस बर्फ, पाऊस, ढगाळ हवाच होती. खरच खूप मस्त वाटते आहे, अशा उन्हामध्ये, गरम हवेत, चित्तवृत्ती उत्साहीत झालेल्या वेळी, ती दुपार आठवली नसती तरच नवल.

~ One day you will take my heart completely and make it more fiery than a dragon.
Your eyelashes will write on my heart the poem that could never come from the pen of a poet. ~

.

ललित लेखनाचा प्रकार: 

जगाचं असंच असतं!!

(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम लिहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!)

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय.
मला सर्वांचंच म्हणणं पटतं.
आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.
तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत.
जगाचं असंच असतं!!

आता हेच बघा ना!

* मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.

* श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं?

ललित लेखनाचा प्रकार: 

नटसम्राट आणि कथासम्राट!

नटसम्राट हा एक अप्रतिम चित्रपट आहे. कालच बघितला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आणि तितकेच महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन सुद्धा उत्तम!

मी नटसम्राट नाटक बघितलेले नाही आणि नाटक वाचलेले सुद्धा नाही. म्हणून मनात कसलीही तुलना न करता हा चित्रपट मी बघू शकलो. अशा प्रकारच्या कथा असलेले इतर अनेक मराठी हिंदी चित्रपट येऊन गेले.

(उदा. राजेश खन्नाचा अवतार, सुलोचना चा मराठी चित्रपट एकटी, अमिताभचा बागबान, माझं घर माझा संसार, लेक चालली सासरला, माहेरची साडी वगैरे)

ललित लेखनाचा प्रकार: 

अमलतास आणि आत्महत्या करणारे

दिल्लीच्या रिज रोड वर शंकर रोड पासून बुद्ध गार्डन पर्यंत पसरलेले जंगल आहे. जंगलाचा चारी बाजूला भिंत आहे. हे वेगळे, भिंतीत कित्येक ठिकाणी भगदाड आहेत. गुज्जर लोक आपली जनावरे जंगलात चरविण्यासाठी या भगदाडांचा वापर करतात. रिजच्या बस स्टैंड वर तो उतरला. त्याच्या हातात एक पिशवी होती. पिशवीत बायकोची एक जुनी साडी होती. भिंतीत पडलेल्या एका भगदाडातून आत जंगलात शिरला. दुपारचे १२ वाजलेले होते, त्यात मईचा महिना. ऊन मी-मी म्हणत होते. त्याचे सर्वांग घामाने भिजलेले होते. त्याच्या मनात विचारांचा काहूर माजलेला होता. आपल्या माथ्यावरचा घाम पुसत त्याने दूरवर पसरलेल्या जंगलावर एक नजर टाकली.

ललित लेखनाचा प्रकार: 

बचपन के दिन भुला न देना - उत्तरार्ध

मागील भागात प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणी झाल्या. आता त्यानंतरचा भाग

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर