इतर

अंतहीन काळाकुट्ट बोगदा

डिसक्लेमर - मी डॉक्टर नाही. माझ्या माहीतीप्रमाणे, डिमेन्शिया रिव्हर्स करता येत नाही. त्याच्यावरती रामबाण उपाय अजुन तरी सापडायचा आहे. याचा अर्थ प्रत्येक पेशंट मरावा अशी इच्छा करणे हा मार्ग नाही. सकारात्मक आशावाद ठेऊन, औषध सापडण्याची वाट पहाणे, सुश्रुषा करणे हे मार्गच अवलंबिणे श्रेयस्कर आहे. पण मुद्दा हा आहे की, वृद्ध आणि मनाने खचलेल्या साथीदाराच्या मनात, खालील विचारही येऊ शकतात, त्या विचारांत गैर काहीही नाही.

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी

.

ललित लेखनाचा प्रकार: 

गंनच भुत

मध्ये कामाची धांदल आणि कामवाली राहु गायब, एक दोन दिवस मी वाट पाहुन तिला फोन लावला तर पलीकडुन माणसाचा आवाज... मी बंद करुन पुन्हा लावला... परत तेच... मग विचारले... राहु..... राहुचाच नंबर ना?
हो
अहो राहु कामाला का येत नाही?
आम्ही गावाकडे आलोय... राहुचा मावसा रचना वरुन पडुन मेला...
काय, गंगामावशीचा नवरा ?
..............
काय काय...नीट ऐकु येईना...
अहो राहुबाई चा मावसा.... परत तेच..

ललित लेखनाचा प्रकार: 

ती राधा होती म्हणूनी...

कृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व! कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला

(नुकतीच बातमी वाचली, ईरोम शर्मिलाने १६ वर्षांपासून सुरु असलेले उपोषण तोडले. तिच्या घरच्यांनी आणि तिच्या चाह्त्यांनीच तिचा विरोध केला. अचानक मला गाईड सिनेमातल्या राजू गाईडची आणि भगवान बुद्धाची आठवण आली )

ललित लेखनाचा प्रकार: 

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन

------
भाग १ | भाग २ | भाग ३
------

Orpheus
( Image Courtesy : SwittersB )
ललित लेखनाचा प्रकार: 

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग

------
भाग १ | भाग २ | भाग ४
------

Pluto & Persephone
( Image Credit : WikiMedia )
ललित लेखनाचा प्रकार: 

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन

------
भाग १ | भाग ३ | भाग ४
------

Orpheus & Euridice
( Image Credit : Heidi De Vries )
ललित लेखनाचा प्रकार: 

ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा

ललित लेखनाचा प्रकार: 

प्रीती

काही महीन्यांपूर्वी प्रीती फेसबुकवरती सापडली. या पूर्वीही अनेकदा शोध घेऊनही सापडली नव्हती ती अवचित गुगलवरती पहील्यांदा सापडली. फोटोवरुन मी तिला तत्काळ ओळखले व नंतर फेसबुक रिक्वेस्ट पाठवली. तिने ती अ‍ॅक्सेप्ट केली तो दिवस अतिशय आनंदात गेला. कारण हॉस्टेलवरचे मनोरम दिवस आम्ही एकत्र एन्जॉय केलेले होते, तिला माझी सिक्रेटस जशी माहीत होती तशी मला तिची. अनेक एकत्र केलेले नाईटआऊटस व मग्गुगिरी डोळ्यांसमोर तरळून गेली. प्रीती सुंदरच दिसत होती. अंगयष्टी राखलेली, राँग साईड ऑफ ४० शी मध्ये असली तरी पस्तीशीची वाटणारी, डिझायनर कपडे व बॅकग्राऊंडला वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील फोटो.

ललित लेखनाचा प्रकार: 

बाय

"नातीगोती" या दिवाळी अंकाच्या विषयावरुन आठवले. माझ्या सासूबाईंनी (त्यांना मी आई म्हणते) लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख. अन्यत्र पूर्वप्रकाशित आहे. आज आईंना दिवळीअंकासाठी काही लिहीण्याचे सुचवेन. जमेलच असे नाही, जमले तरी निवडले जाईलच असेही नाही. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. तशाही आम्ही गप्पा मारताना स्वतःच्या वडीलांबद्दल आई भरभरुन बोलतात. अर्थात पुढील वक्तव्य त्यांच्या आईवरचे आहे. -

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर