कथा

धचामा

धचामा"

ललित लेखनाचा प्रकार: 

पीएनामा : झाडाची फांदी आणि एसीआर

(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे)

(ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा)

ललित लेखनाचा प्रकार: 

१४ मे.--२

१४ मे.
१४ मे रात्र
रात्री त्याला स्वप्न पडले होते. कोणतरी दरवाजा ठोठावत होते. कुलकर्णी स्वप्नात जागा झाला. साले झोपूनसुद्धा देत नाहीत नीट. कोण असणार ह्यावेळी. शिव्या देत देत त्यांनी दार उघडले. बघतो तर शेजारचे डोईफोडे.
“अहो, केव्हढ्याने दार वाजवता.”
डोईफोड्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले, “खिडकीतून जरा बाहेर डोकवा.”
“काय बाहेर काय आहे?”
पण स्वप्न तिथेच थांबले. कुलकर्णी स्वप्नातून सत्यतेत जागे झाले.
१४ मे

ललित लेखनाचा प्रकार: 

१४ मे --१

१४ मे.
सब तीरथ एक बार. लेकीन १४ मे बार बार!
आज काय तारीख आहे? १६ जुलै. कशावरून? कारण काल १५ जुलै होती. हा तुमचा निव्वळ भ्रम आहे. मी तुम्हाला सांगतो आज १४ मे आहे. काही दिवसांनी लोक म्हणतील आज १८ सप्टेंबर आहे. मग म्हणतील आज २० डिसेंबर आहे. तुम्ही कुणा कुणावर विश्वास ठेवणार? ही मिस्टर कुलकर्णीची कथा वाचा. मग मी काय सांगतो आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल.
संध्याकाळचे सात वाजण्याची वेळ असावी. कुलकर्णी हॉटेलमध्ये आला तेव्हा फक्त एकजण शेवटच्या टेबलापाशी बसला होता. हे सद् गृहस्थ नेहमीच्यातले नव्हते. त्याच्याच वयाचे असावेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

वैशालीतला "कार्यक्रम."

वैशालीतली भेट!
मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या सुलतानाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे सुलतानाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगमकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? आज कुणाचे डोके उडवायचे आहे? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

लग्न झाले नी अंकल झालो

गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते. त्यादिवशी:

ललित लेखनाचा प्रकार: 

छंद बायकोचा

(काल्पनिक कथा)

मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात:
बायकोने छंद जोपासला.
नवऱ्याला हिरा सापडला.
अंगणी वर्षाव झाला
नोटांचा.

ललित लेखनाचा प्रकार: 

मी अमुक अमुक--१

‘What we think is impossible happens all the time.’

ललित लेखनाचा प्रकार: 

कोकाटेंंचा रोबोट --२

त्यांनी माझा दंड पकडून मला पलीकडच्या खोलीत नेले आणि झटकन दरवाज्याची खिट्टी लावून दरवाजा बंद केला. खोलीत अंधार होता. दिव्याचा स्विच ओंन केल्यावर खोली प्रकाशाने उजळली.

ललित लेखनाचा प्रकार: 

कोकाटेंंचा रोबोट --३

रात्रीचे दहा वाजले असावेत. झोप येणे अवघड होते. कोकाट्यांचा तो बुजगावण्यासारखा सारखा दिसणारा रोबोट सारखा डोळ्यासमोर येत होता. शपथेवर सांगतो, मी आजवर कुणालाही जाणूनबुजून फसवलं नव्हतं. पण आज मी त्या “यंत्र मानवाला” फसवलं होतं. त्याची मनाला चुटपूट लागून राहिली. एका परीने कोकाटेंच्या घरातले वातावरण त्याला कारणीभूत असावे. असं पण असेल की मला कोकाटेंच्या हव्यासातला फोलपणा दाखवून द्यायचा असेल. पहा बघता बघता मी देखील त्या चक्रात ओढला गेलो होतो. एका निर्जीव यंत्राला कळत नकळत सजीव मानायला लागलो होतो. अशा विचारांच्या धुंदीत झोपेतही मला रॉबी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर ते मिश्कील हसू नव्हते.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा