कादंबरी

सर आणि मी

परवा crossword मध्ये फेरफटका मारला , तशीही चांगली मराठी पुस्तके मिळण्याची शक्यता तिथे कमीच असते पण घरापासून जवळ म्हणून बरेचदा जाणं होतं . सहजच ह्या कपाटातून त्या कपाटाकडे जाताना "सर आणि मी " हे पुस्तक दिसले. खुप दिवसापूर्वी त्याची लोकसत्तेत (चु. भू . माफ असावी ) समीक्षा वाचलेली . तेंव्हापासून ते वाचायचं आहे हे मनात होतं . पन्नास वर्षाचे सर आणि त्यांची २५ वर्षाची विद्यार्थिनी लग्न करतात आणि ते संसार करतात हे नक्कीच विचार करायला लावणारे काहीतरी असावे असे वाटले म्हणून ...

समीक्षेचा विषय निवडा: 

'राब' - मराठी साहित्यातील एक उपेक्षित मानदंड

'राब' ही अनंत मनोहर यांची कादंबरी. मराठी साहित्याचा एक मानदंड ठरावा अशी. पण दुर्दैवाने आतापर्यंत उपेक्षित राहिलेली. "मराठी साहित्य तोकडे / थिटे / कमअस्सल आहे का?" या सदाबहार विषयावर इरेसरीने चर्चा करताना जे 'अपवाद' झळाळून डोळे दिपवतात त्यापैकी एक.
कथानक तसे सरळधोट आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी.

उद्धव शेळके, "धग"

उद्धव शेळक्यांची "धग" कादंबरी काल वाचून पूर्ण झाली. मराठी साहित्यातली एक क्लासिक असे मी ऐकले होते. क्लासिक म्हणून गाजावाजा झालेल्या कादंबर्‍या प्रकाशनकालाच्या खूप नंतर वाचल्या की बरेचदा विरस होतो; यात काय एवढ असं तरी वाटतं, किंवा अनेकांनी नंतर अनुकरण केले असल्यामुळे जुन्या कलाकृतीतही तोचतोचपणा जाणवतो. यात एखादी आवडली की सुखद धक्काच बसतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी

Five point someone,Three mistakes of my life,2 states यासरख्या मनोरंजक कादांबर्‍या वाचल्यानंतर प्रकाशना पुर्वीपासुन गाजत असलेले आणि प्रकाशनानंतर best seller असलेले Half girlfriend कसे असेल याबद्दल उत्सुकता होती.चेतन भगतच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गोष्ट सांगतो ती तुमच्या आमच्या सारख्याच एखाद्या मुलाची,म्हणजे त्याच्या कथेतील नायक हा काही फार मोठा तीर मारणाराही नसतो आणि दुखः,दैन्य,दारिद्र्याने ग्रासलेला-अन्याय सहन करणारा बिचारा वैगेरे ही नसतो.म्ह्णुनच त्याच्या गोष्टींशी आपण सहजपणे जोडले जातो.

समीक्षेचा विषय निवडा: 

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’.....

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’..... लेखक: अवधूत डोंगरे - अक्षरमानव प्रकाशन - ऑगस्ट २०१२ - मूल्य: रु.८०/-

समीक्षेचा विषय निवडा: 

शिक्षणाच्या कक्षा रुंदावणारी काटेमुंढरीची शाळा

“I have never let my school interfere with my education!”- मी आणि माझं शिक्षण यात मी शाळेला ढवळाढवळ करु दिली नाही ! सुप्रसिध्द विचारवंत मार्क व्टेन याचे हे वाक्य. मार्क व्टेन याचे हे वाक्य पारंपरिक शिक्षणपध्दत अवलंबणा-या चार भिंतीत कोंदटलेल्या शाळांसाठी मार्मिक आहे;पण शाळाच बिनभिंतीची असेल तर…!

समीक्षेचा विषय निवडा: 

'अ‍ॅटलास श्रग्ग्ड'चा मराठी अनुवाद

सध्या गेले काही दिवस मुग्धा कर्णिक यांनी अनुवादित केलेलं आयन रँड या लेखिकेचं 'अ‍ॅटलास श्रग्ग्ड' हे पुस्तक वाचते आहे. मोठ्या आकाराच्या ११७९ पानांचं हे पुस्तक. हे राक्षसी आवाक्याचं काम ही बाई तीन वर्षं करत होती, त्याबद्दल तिच्या चिकाटीला प्रथम दंडवत. कथांमध्ये पाणी घालून फुळकवणी बारक्या कादंबर्‍यांची सवय झालेल्या अनेक प्रकाशकांनी हा अनुवाद नाकारला, पण अखेरीस तो छापला डायमंड प्रकाशनाने... त्याबद्दल डायमंडच्या निलेश पाष्टे यांचे आभार. यानंतर या बाईनं याच लेखिकेचं 'फाउंटनहेड'ही मराठीत आणलंय आणि तेही डायमंडनेच प्रकाशित केलंय. जिगर लागते राव अशा पुस्तकांचं काम करायला...

समीक्षेचा विषय निवडा: 

हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला “हाजार चुराशीर मा” पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरुन गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभुती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही. अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकर यांचा प्रत्यक्ष परिचय असल्याने आणि त्यांचा बंगाली भाषेचा प्रदीर्घ व्यासंग माहित असल्याने अनुवाद उत्तम असणारच याची खात्री होती.

समीक्षेचा विषय निवडा: 

खेळघर - रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

(समीक्षेत याची जिम्मा होईल का, याबद्दल किंतू आहे. जर होत नसेल, तर सरळ 'सध्या काय वाचताय?'मधे घालून टाकावे.)

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - कादंबरी