कथा

बग

फोन वाजला. उचलला. पलीकडे बॉस होता.
"अरे अमुक अमुक जरा अर्जंट सुट्टीवर गेलाय. तमुक तमुक ठिकाणी जाऊन त्याचं अर्धं राहिलेलं असं असं काम कर ना जरा"

ललित लेखनाचा प्रकार: 

कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.-२

सुशोभना - 2
संकेतस्थळी पुनवेची पूर्वसंध्या सुशोभनेचे संगीत नृत्य शास्त्र हास्य त्यात अनोखे रंग भरीत होते. हळुहळु पूर्वाकाशात पूर्णचंद्र मोहरू लागला. आणि थोडयाच वेळात धुंद चांदण्याची बरसात सुरू झाली. परिक्षिताला वेगळेच काही जाणवू लागले. आजवरून चंचल हसरी कामिनी, गहनगूढ स्त्रीत्व धारण करून त्याच्या सा-या अस्तित्वाला जणू आश्वासन देत आहे असे त्याला वाटू लागले सुशोभनेचा चेहेरा ओंजळीत घेऊन परिक्षिताने गंभीर आवाजात म्हटले , प्रिये आज तुझे नवेच रूप मला जाणवतेय. तू माझी प्रणयिनी नाहीस, तू माझी अंतरतमा. तुझ्याशिवाय मला अस्तित्व नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

कालिदासाने मनावर न घेतलेल्या काही भारतीय प्रेमकहाण्या.

सुशोभना - १
जेहेत्तेकाळाच्या ठायी, बृहदाकार वनखंडाच्या गर्भागारात एक जनपद. नांव मंडुक जनपद. नाना आकारांच्या नाना रूपांच्या जलाशयानी चितारलेल्या वनस्थलीत ते वसले आहे. मंडुक हे त्यांचे दैवत. एक महाकाय मंडुक, मानवसदृश व्यवहार, मंडुकरूप असे या दैवताचे ध्यान आहे. कधीकाळी अशाच महाकाय मंडुकापासून आपली उत्पत्ती झाली असे जनपदवासी मानतात. जळी स्थळी सारख्याच चपळतेने वावरणा-या या मानवांचा मुळपुरूष एक मंडुक असेल यावर कोणाचाही विश्वास बसतो. कारण यांचा जनवेश मंडुकासारखा, आणि गणवेशही मंडुकाचा आहे. अनायास प्राप्त झालेल्या विस्तीर्ण जलशेतीवर ते आपली उपजीविका करतात. मंडुकासारखे विहरतात.

ललित लेखनाचा प्रकार: 

रूम नंबर- 9 (गूढकथा)

आसावरी सहा महिन्यांची गर्भवती होती. आज कारने ऑफिसला जातांना तिच्या मनात कालच्या “लाईफ वेलनेस सेमिनार” चा विषय घोळत होता. त्यात एकाच गोष्टीवर वारंवार भर दिला गेला होता – “तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून! “

ललित लेखनाचा प्रकार: 

किणार्यालगतच्या कातरवेळी

ललित लेखनाचा प्रकार: 

धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम

मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे. "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तु' एक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर. मानव ऋषीने सांशक होऊन विचारले, खरंच!

ललित लेखनाचा प्रकार: 

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा.

(व्यवस्थापन : एकाच सदस्याचे खूप धागे एकाच वेळी ट्रॅकरवर दिसू नयेत म्हणून सगळे धागे एका ठिकाणी आणले आहेत.)

ललित लेखनाचा प्रकार: 

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १७ (अंतीम )

जँकला आपल्या वडीलांच अधूरं स्वप्न पूर्ण करण्याची आस लागली होती.

" एलीजाबेथ तू नार्गोला विचारशील का ?
की या बेटावर खजाण्याचा मार्ग कूठे आहे ते "
जँकने एलीजाबेथला सांगीतले.

" बरं ठीक आहे "
एलीजाबेथने नार्गोकडे पाहीलं व त्याच्याशी बोलू लागली.

" आरमरू कोल्वा बारफरबोसा "
तीने नार्गोला समजेल अशा भाषेत खजाण्याचा मार्ग विचारला.

" कोईतो वामे अालर "
त्याबरोबर नार्गोने लगेचच प्रतीऊत्तर दिले.

" नार्गो म्हणतोय की ईथून पूढे एका गूहेत कूठेतरी तो खजाणा लपवून ठेवण्यात आला होता "
एलीजाबेथने नार्गोच्या ऊत्तराचं सर्वाना स्पष्टीकरण दिलं.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १६

त्या जहाजातील जीवघेण्या संघर्षातून त्यांनी यशस्वीरीत्या स्वतःची सूटका करून घेतली होती.

" आपल्याला पाण्यात ऊड्या माराव्या लागतील. आणी ह्या बूडणाऱ्या जहाजापासून लवकरात लवकर दूर जावं लागेल.
नाहीतर आपण पून्हा या जहाजाच्या घेऱ्यात अडकून स्वतःचा जीव गमावून बसू "
कँप्टन स्मीथनी सर्वाना ओरडून सांगीतले.
मग प्रत्येकाने प्रोपेलर ट्यूबमधील तूटलेल्या फँनला बाजूला करत थंडगार पाण्यात ऊड्या घेतल्या.
त्या हाडं गोठवणाऱ्या पाण्यातून पोहत पूढे जाताना सर्वाचीच बिकट अवस्था झाली होती. पण अखेर प्रत्येकाचाच नाईलाज होता.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १५

" असो त्याच्या आत्म्याला शांती मिळो "
गॉल्टने वरती कीचनमध्ये गेलेल्या स्टीफन व ईतरांसाठी प्रार्थना केली. त्याच्या मते ते सर्वजणच आगीत जळून राख झाले होते.

थोड्य वेळाने सर्वच वातावरण शांत झाल्यावर स्टीफनने लीफ्टचा दरवाजा ऊघडला. त्याने पाहीलं बाहेरच्या ईलेव्हेटरमधील आग पूर्णपणे शमली होती.

पाने

Subscribe to RSS - कथा