जून दिनवैशिष्ट्य

जून

१०
११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २०
२१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०

१ जून
जन्मदिवस : कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२), जेट इंजिन शोधणारा फ्रँक व्हिटल (१९०७), नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर (१९२६), अभिनेत्री मेरिलिन मन्रो (१९२६), अभिनेत्री नर्गिस (१९२९), वास्तुविशारद नॉर्मन फॉस्टर (१९३५), अभिनेता मॉर्गन फ्रीमन (१९३७), नर्तिका व अभिनेत्री लीला गांधी (१९३८), कादंबरीकार रंगनाथ पठारे (१९५०), लेखक राजन गवस (१९५९), अभिनेता आर. माधवन (१९७०), सायकलपटू मायकेल रासमुसेन (१९७४), टेनिसपटू जस्टीन हेनिन-हार्दिन (१९८२)
पुण्यस्मरण : नाटककार व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१९३४), चित्रकार एम.व्ही.धुरंधर (१९४४), अंधत्व आणि मूकबधिरपणा या वैगुण्यांवर मात करणाऱ्या हेलन केलर (१९६८), चित्रपटनिर्माते, कथा व पटकथालेखक ख्वाजा अहमद अब्बास (१९८७), राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (१९९६), लेखक गो.नी.दांडेकर (१९९८), क्रिकेटपटू हान्सी क्रोन्ये (२००२), संपादक माधव गडकरी (२००६), फॅशन डिझायनर इव्ह सँ लोराँ (२००८)
---
आंतरराष्ट्रीय बाल दिन.
आंतरराष्ट्रीय दुग्ध दिन.
१४९५ : फ्रायर जॉन कॉरने सर्वप्रथम स्कॉच व्हिस्की तयार केली.
१८५७ : बोदलेअरच्या 'Les Fleurs du mal' काव्यसंग्रहाचे प्रकाशन.
१९१६ : लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच’ ही इतिहास प्रसिद्ध घोषणा केली.
१९२९ : प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
१९३० : मुंबई-पुणे मार्गावर 'डेक्कन क्वीन' ही आगगाडी सुरू झाली.
१९४५ : टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना.
१९६७ : 'सार्जंट पेपर्स लोनली हार्टस क्लब बँड' हा बीटल्सचा अल्बम प्रकाशित झाला.
१९८० : CNN ही २४ तास वृत्तांकन करणारी पहिली टी.व्ही. वाहिनी सुरू झाली.
१९७९ : ऱ्होडेशियातील अल्पसंख्य गोऱ्यांची सत्ता संपून कृष्णवर्णीयांचे प्रातिनिधित्व असलेले सरकार स्थापन झाले. झिम्बाब्वे-ऱ्होडेशिया असे देशाचे नामकरण झाले. हे सरकार सहा महिने टिकले. त्यानंतर देश पुन्हा ब्रिटिश वसाहत बनला.
२००१ : नेपाळच्या युवराज दिपेन्द्रने राजा बिरेन्द्रसह सगळ्या कुटुंबाला गोळ्या घातल्या व नंतर स्वतःवरही गोळी झाडली.
२००९ : 'जनरल मोटर्स'ने दिवाळखोरी जाहीर केली.

२ जून
जन्मदिवस : लेखक व विचारवंत मार्की द साद (१७४०), कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी (१८४०), जलतरणपटू व 'टारझन'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध जॉनी वेसमुलर (१९०४), लेखक वि. वि. बोकील (१९०७), सिनेअभिनेता सूर्यकांत मांढरे (१९२६), संगीतकार इलायाराजा (१९४३), सिनेदिग्दर्शक मणिरत्नम (१९५६), क्रिकेटपटू मार्क वॉ व स्टीव्ह वॉ (१९६५), बुद्धिबळपटू गाटा काम्स्की (१९७५), अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (१९८७)

पुण्यस्मरण : भूवैज्ञानिक व समन्वेषक जॉन वॉल्टर ग्रेगोरी (१९३२), सिनेअभिनेता नाना पळशीकर (१९८४), गिटारवादक आन्द्रे सेगोव्हिया (१९८७), दादासाहेब फाळके पारितोषिक विजेते सिनेअभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राजकपूर (१९८८), अभिनेता रेक्स हॅरिसन (१९९०), महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर (१९९२), 'यमुनाजळी खेळू..’ या गाण्यामुळे गाजलेल्या सिनेअभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर (१९९७), 'एक्स्टसी' मादक द्रव्याचा निर्माता साशा शल्गिन (२०१४)

---

१८६२ - अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने टेलिफोनचा शोध लावला.
१८९६ - मार्कोनीने रेडिओसाठी पेटंट अर्ज केला.
१८९७ - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले : 'माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे'.
१९२४ - अमेरिकेत राहणाऱ्या मूळनिवासींना (अमेरिकन इंडियन्स) अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले.
१९४७ – भारताची फाळणी करण्याची लॉर्ड माऊंटबॅटन यांची घोषणा.
१९४८ - शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
१९६२ - भारत-चीनमधला सिक्कीमसंदर्भातला करार भारताने रद्द केला.
१९९९ - भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
२००३ - मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीचे 'मार्स एक्स्प्रेस' प्रोब अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
२०१२ - इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना जन्मठेप.

३ जून
जन्मदिवस : लेखिका आनंदीबाई शिर्के (१८८२), प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार व 'प्रभात'च्या सुवर्णकाळातील दिग्दर्शक बाबुराव पेंटर (१८९०), सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान (१८९०), संतवाङ्मयाचे अभ्यासक आणि संपादक तुकारामतात्या पडवळ (१८९८), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळी साहित्यिक जी. शंकर कुरूप (१९०१), गायिका व नर्तिका जोसेफीन बेकर (१९०६), सिनेदिग्दर्शक आलँ रेने (१९२२), अभिनेता टोनी कर्टिस (१९२५), कवी अ‍ॅलन जिन्सबर्ग (१९२६), क्रिकेटपटू वसीम अक्रम (१९६६), टेनिसपटू राफाएल नादाल (१९८६)
पुण्यस्मरण : संगीतकार जॉर्ज बिझे (१८७५), लेखक फ्रान्झ काफ्का (१९२४), उद्योगपती सर दोराबजी टाटा (१९३२), नाटककार, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी (१९५६), सिनेदिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी (१९७७), स्नायूंमध्ये तयार होणारी उष्णता आणि यांत्रिक कार्य यांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता आर्चिबाल्ड हिल (१९७७), अभिनेता अँथनी क्विन (२००१), संपादक व लेखक राम पटवर्धन (२०१४)

---
१८१८ : पेशवे दुसरे बाजीराव यांचे इंग्रजांसमोर आत्मसमर्पण. पेशवाईचा अंत.
१९४० : दुसरे महायुद्ध - डंकर्कची माघार.
१९४७ : भारताच्या फाळणीची माउंटबँटन योजना सादर.
१९६८ : चित्रकार व माध्यम कलाकार अँडी वॉरहॉलवर खुनी हल्ला.
१९८४ : 'ऑपरेशन ब्लू-स्टार'ची सांगता.
१९८९ : थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९१ : जपानमध्ये माऊंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
२०१३ : 'विकीलीक्स'ला महत्त्वाची गुप्त कागदपत्रे पुरवल्याबद्दल अमेरिकन सैनिक ब्रॅडली मॅनिंगवर (नंतरची चेल्सी मॅनिंग) खटला सुरू.

४ जून
जन्मदिवस : हॉवरक्राफ्टचे जनक सर ख्रिस्तोफर कॉकरल (१९१०), इतिहासाभ्यासक, अनुवादक डॉ. भगवान गणेश कुंटे (१९२०), अभिनेत्री नूतन (१९३६), गायक एस्. पी. बालसुब्रह्मण्यम (१९४६), अभिनेता अशोक सराफ (१९४७), अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोली (१९७५)
पुण्यस्मरण : साहित्यिक गोविंद वासुदेव कानिटकर (१९१८), बौद्ध धर्माभ्यासक, पंडित धर्मानंद दामोदर कोसंबी (१९४७), निसर्गतज्ञ चार्ल्स विल्यम बीब (१९६२), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक व्यंकटेश अय्यंगार (१९८६), इतिहासतज्ञ, शिक्षणतज्ञ डॉ. अशिन दासगुप्ता (१९९८), अभिनेत्री सुलभा देशपांडे (२०१६), सिनेदिग्दर्शक बासू चटर्जी (२०२०), अभिनेत्री सुलोचना (२०२३)
---
राष्ट्र सेवादल दिवस.
जागतिक युद्धपीडीत बालक दिवस.
स्वातंत्र्यदिन : टोंगा (१९७०)
१८७६ - न्यू यॉर्कहून निघालेली 'ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस' ही अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी ट्रेन ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सॅन फ्रांसिस्कोला पोहोचली.
१९१३ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मागणाऱ्या चळवळीची कार्यकर्ती एमिली डेव्हिसन हिने इंग्लंडच्या राजाच्या घोड्याचा लगाम खेचला. ती टाचांनी तुडवली गेली. त्या जखमांनी तिचे दहा दिवसांनंतर निधन झाले.
१९१७ - पहिल्या पुलित्झर पुरस्कारांचे वितरण.
१९२४ - इ.एम. फॉरस्टरलिखित 'अ पॅसेज टू इंडिया' कादंबरी प्रकाशित.
१९५७ - मार्टिन ल्युथर किंगने प्रसिद्ध "पॉवर ऑफ नॉन-व्हॉयलन्स" सांगणारे भाषण दिले.
१९८७ - जाफनातल्या तमिळ लोकांना विमानांतून मदत करण्याबद्दल श्रीलंकेने भारताचा निषेध केला.
१९८९ - शेकडो लोकांची हत्या करून तिआनानमेन चौकातील आंदोलन चिनी लष्कराने संपुष्टात आणले.
१९८९ - पोलिश निवडणुकांत 'सॉलिडॅरिटी' पक्ष विजयी; पूर्व युरोपात कम्युनिस्टविरोधी निदर्शने सुरू; वर्षाअखेरपर्यंत अनेक राष्ट्रांतील कम्युनिस्ट सत्ता समाप्त.
१९९४ - वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.

५ जून
जन्मदिवस : अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ (१७२३), अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (१८८३), भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक ना. म. जोशी (१८७९), संगीतकार, पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे (१८८१), कवी व नाटककार फेदेरिको गार्सिया लॉर्का (१८९८), अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेश रंगोजी भिडे (१९०९), 'पटावरील प्यादे' या सडेतोड आत्मकथनाच्या लेखिका यमुनाबाई विनायक खाडिलकर (१९१८), कुस्तीगीर हरिश्चंद्र बिराजदार (१९५०), सॅक्सोफोनवादक केनी जी (१९५६)
पुण्यस्मरण : कृषितज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर (१९४३), इतिहास संशोधक ग. ह. खरे (१९८५), साहित्यिक आचार्य कुबेरनाथ राय (१९९६), संत साहित्याचे गाढे अभ्यासक व मराठीतील आद्य 'दिनविशेष'कार डॉ. प्र. न. जोशी (२००४), लेखक रे ब्रॅडबरी (२०१२)

---

जागतिक पर्यावरण दिन
राष्ट्रीय दिन : सेशेल्स, डेन्मार्क

१८५१ : हॅरिएट बीचर स्टो यांची गुलामगिरीच्या विरोधातील कादंबरी 'अंकल टॉम्स केबिन' वृत्तपत्रात क्रमशः प्रकाशित होण्यास सुरुवात.
१८८३ : युरोप मध्यपूर्वेला जोडणारी 'ओरिएंट एक्सप्रेस' आगगाडी सुरू.
१९१५ : डेन्मार्कच्या नव्या संविधानानुसार स्त्रियांना मतदानाचा हक्क.
१९४७ : युद्धात बेचिराख झालेल्या युरोपच्या पुनर्निर्माणासाठीचा 'मार्शल प्लॅन' जाहीर.
१९५६ : 'हाऊंड डॉग' गाण्यात एल्व्हिस प्रेस्लेने आपली विख्यात कंबरेची प्रक्षोभक हालचाल प्रथम सादर केली.
१९६७ : इस्राएलचा इजिप्तवर हल्ला; 'सहा दिवसांचे युद्ध' सुरू.
१९६८ : दिवंगत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे भाऊ व डेमोक्रॅट पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार रॉबर्ट केनेडी यांच्यावर खुनी हल्ला; एका दिवसानंतर मृत घोषित.
१९७५ : 'सहा दिवसांच्या युद्धा'मु़ळे बंद पडलेला सुएझ कालवा पुन्हा खुला.
१९८१ : अमेरिकेतील Center for Disease Controlने लॉस अँजेलीस येथे समलिंगी पुरुषांमध्ये एका दुर्मीळ न्यूमोनियाचा प्रादुर्भाव होत असल्याचे नमूद केले. 'एड्स'ची ही सुरुवात होती.
१९८४ : इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरावर हल्ल्याचे आदेश दिले.
१९८९ : जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 'त्रिशूल'ची यशस्वी चाचणी.
१९९५ : बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट प्रथम निर्मिती.
२००२ : मोझिला ब्राऊजरची प्रथम आवृत्ती उपलब्ध.

६ जून
जन्मदिवस : चित्रकार दिएगो व्हेलाझ्केझ (१५९९), नाटककार पिएर कोर्नेय (१६०६), लेखक अलेक्सांद्र पुश्कीन (१७९९), अंटार्क्टिकावर पोहोचणारे शोधक रॉबर्ट स्कॉट (१८६८), नोबेलविजेता लेखक थॉमस मान (१८७५), अभिनेते व नाट्यनिर्माते गुब्बी वीराण्णा (१८८२), लेखक मस्ती वेंकटेश अय्यंगार (१८९१), विचारवंत इसाया बर्लिन (१९०९), समीक्षक म.ना. अदवंत (१९१४), अभिनेता सुनील दत्त (१९२९), लेखक आनंद विनायक जातेगावकर (१९४५), टेनिसपटू ब्यॉर्न बोर्ग (१९५६), क्रिकेटपटू माईक गॅटिंग (१९५७), क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (१९८८)
पुण्यस्मरण : विचारवंत जेरेमी बेंथम (१८३२), मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्टाफ युंग (१९६१), कवयित्री शांता शेळके (२००२)

---

राष्ट्रीय दिन - स्वीडन

१६७४ - शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
१६८३ - ऑक्सफर्ड येथे 'अ‍ॅशमोलिअन' हे जगातले पहिले 'विद्यापीठ संग्रहालय' खुले.
१८४४ - लंडनमध्ये यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
१८५७ - कानपूरच्या लढाईला सुरुवात. त्यात नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांचा पराभव केला.
१९३० - 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स'ची स्थापना.
१९३४ - अमेरिकेत रोखे व बाजार समिती (एस.ई.सी.)ची स्थापना.
१९४४ - दुसरे महायुद्ध : 'डी डे' - १,५५,००० दोस्त राष्ट्रांचे सैनिक नॉर्मंडी येथे समुद्रकिनाऱ्यावरून फ्रान्समध्ये उतरले.
१९४६ - अमेरिकेत National Basketball Associationची ('एन.बी.ए.') स्थापना
१९६६ - कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी पदयात्रेवर असलेल्या जेम्स मेरेडिथवर मिसिसिपीमध्ये गोळ्या झाडल्या; किरकोळ उपचारांनंतर मेरेडिथने पदयात्रा पूर्ण केली.
१९८४ - 'टेट्रिस' हा लोकप्रिय व्हिडियो गेम उपलब्ध झाला.
१९८४ - ऑपरेशन 'ब्लू स्टार' समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
२००४ - माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी संयुक्त संसद सत्रात तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.

७ जून
जन्मदिवस : शिक्षणाचे पुरस्कर्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाऊ दाजी लाड (१८२२), चित्रकार पॉल गोगँ (१८४८), एस्किमोंचा अभ्यास करणारा मानववंशशास्त्रज्ञ नड रासमुसेन (१८७९), अभिनेत्री जेसिका टँडी (१९०९), लेखिका सुमती पायगावकर (१९१०), समीक्षक व लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (१९१३), लेखक भा. द. खेर (१९१७), सिनेदिग्दर्शक जेम्स आयव्हरी (१९२८), अभिनेता लिआम नीसन (१९५२), नोबेलविजेता लेखक ओरहान पामुक (१९५२), रॉक/पॉपगायक प्रिन्स (१९५८), टेनिसपटू महेश भूपती (१९७४), अ‍ॅना कुर्निकोवा (१९८१)
पुण्यस्मरण : समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर (१८९५), संगणकशास्त्रज्ञ अ‍ॅलन टय़ुरिंग (१९५४), क्रांतिकारक आशुतोष काली (१९६५), शिल्पकार जाँ आर्प (१९६६), लेखक इ. एम. फॉर्स्टर (१९७०), लेखक हेन्री मिलर (१९८०), संशोधक व समीक्षक डॉ. स. गं. मालशे (१९९२), बालसाहित्यिक व चरित्रकार गोपीनाथ तळवलकर (२०००), नर्तक नटराज रामकृष्ण (२०११), सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका मेहरुन्निसा दलवाई (२०१७)

---

स्वातंत्र्यदिन: नॉर्वे
१७४२ - गणितज्ज्ञ गोल्डबाकने नंबर थिअरीतले आपले विख्यात 'गोल्डबाक कन्जेक्चर' सादर केले.
१७९१ - शनिवारवाड्याला पहिली आग लागली.
१८६२ - अमेरिका व ब्रिटनने गुलामांचा व्यापार स्थगित करण्याचे ठरवले.
१८९३ - द. आफ्रिकेतील आगगाडीत तिकीट काढून पहिल्या वर्गात बसलेल्या गांधींजींना वंशभेदाचा कायदा मोडल्याबद्दल गाडीबाहेर काढले गेले. या घटनेतून त्यांना सविनय कायदेभंगाची प्रेरणा मिळाली.
१९४९ - सिक्कीम येथील राजाच्या विनंतीनुसार भारताने सिक्कीमचा कारभार हाती घेतला व त्याला घटक राज्याचा दर्जा दिला.
१९६५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार विवाहित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर झाले.
१९७१ - "Fuck the Draft" लिहिलेले जॅकेट घातल्याबद्दल पॉल कोहेनवर दाखल खटल्यात त्याला झालेली शिक्षा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क अबाधित राखत रद्दबातल ठरवली.
१९७५ - पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात.

८ जून
जन्मदिवस : संगीतकार तोमासो अल्बिनोनी (१६७१), संगीतकार रॉबर्ट शुमान (१८१०), चित्रकार जॉन एव्हरेट मिले (१८२९), वास्तुविशारद फ्रँक लॉईड राईट (१८६९), विचारवंत व समीक्षक दि. के. बेडेकर (१९१०), नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक (१९१६), संगीतकार गजानन वाटवे (१९१७), क्रिकेटपटू डेरेक अंडरवुड (१९३५), 'वर्ल्ड वाईड वेब' (www) चा जनक टिम बर्नर्स ली (१९५५), 'डिलबर्ट'चा निर्माता व्यंगचित्रकार स्कॉट अ‍ॅडम्स (१९५७), अभिनेत्री डिंपल कपाडिया (१९५७), अभिनेत्री शिल्पा शेट्टी (१९७५), टेनिसपटू लिंडसे डॅव्हेनपोर्ट (१९७६), टेनिसपटू किम क्लाईस्टर्स (१९८३)
पुण्यस्मरण : विचारवंत व लेखक थॉमस पेन (१८०९), अभिनेते व लेखक राम नगरकर (१९९५), संगीतकार दत्ताराम (२००७), रंगकर्मी हबीब तन्वीर (२००९)

---

आंतरराष्ट्रीय ब्रेन ट्युमर दिवस.
जागतिक महासागर दिन.

१६३७ - रने देकार्तचे 'Discourse On The Method' पुस्तक प्रकाशित झाले. आधुनिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. "I think, therefore I am" हे सुप्रसिद्ध वचन त्यात आहे.
१६९० - सिद्दी यादी सकट याने मुंबईतला माझगांव किल्ला उद्ध्वस्त केला.
१८८७ - हर्मन हॉलेरिथला पंच कार्ड कॅल्क्युलेटरसाठी पेटंट प्रदान.
१९१४ - लो. टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका.
१९१५ - लो. टिळकांचा 'गीतारहस्य' ग्रंथ प्रकाशित झाला.
१९३६ - 'भारतीय नागरी नभोवाणी'चे 'ऑल इंडिया रेडिओ' उर्फ 'आकाशवाणी' असे नामकरण.
१९४८ - 'एअर इंडिया'ची पहिली आंतरराष्ट्रीय सेवा (साप्ताहिक मुंबई-लंडन) सुरू झाली.
१९४९ - जॉर्ज ऑरवेल यांची कादंबरी '१९८४' प्रसिद्ध झाली.
१९५३ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने वॉशिंग्टन डी.सी. येथील हॉटेलांतून कृष्णवर्णीय गिऱ्हाईकांना सेवा नाकारणे बेकायदा ठरवले.
१९७२ - नापामच्या हल्ल्यात भाजल्यानंतर पळणाऱ्या व्हिएतनामी मुलीचे पुलित्झर पारितोषिक विजेते प्रख्यात छायाचित्र निक यूट याने टिपले.
२०१४ - मुंबईत मेट्रो सुरू झाली.

९ जून
जन्मदिवस : जाझ संगीतकार कोल पोर्टर (१८९३), डिटेक्टिव्हकथालेखक बाबुराव अर्नाळकर (१९०९), संगीतकार वसंत देसाई (१९२२), पहिल्या भारतीय महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९४९), अभिनेता जॉनी डेप (१९६३), अभिनेत्री अमिशा पटेल (१९७७), सतारवादक अनुष्का शंकर (१९८१), अभिनेत्री सोनम कपूर (१९८५)
पुण्यस्मरण : अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे कोशकार विल्यम कॅरी (१८३४), लेखक चार्ल्स डिकन्स (१८७०), सिनेनिर्माता व दिग्दर्शक राज खोसला (१९९१), सिनेदिग्दर्शक सत्येन बोस (१९९३), स्वातंत्र्यसैनिक एन्.जी. रंगा (१९९५), चित्रकार एम.एफ. हुसेन (२०११)
---
१९०० - आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा याचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू.
१९३४ - प्रसिद्ध अ‍ॅनिमेटेड पात्र 'डोनाल्ड डक' सर्वप्रथम पडद्यावर अवतरले.
१९९५ - पुरुषावर बलात्कार केल्याबद्दल ब्रिटनमधल्या अपराध्याला नवीन कायद्यानुसार प्रथम शिक्षा झाली.

१० जून
जन्मदिवस : चित्रकार ग्युस्ताव्ह कूर्बे (१८१९), शिकारकथालेखक विष्णू गो. चिपळूणकर (१८६२), चित्रकार आंद्रे दरँ (१८८०), वैचारिक लेखक पु. ग. सहस्त्रबुद्धे (१९०४), नाटककार टेरेन्स रॅटिगन (१९११), नोबेलविजेता लेखक सॉल बेलो (१९१५), अभिनेत्री ज्यूडी गार्लंड (१९२२), लेखक व रेखाचित्रकार मॉरिस सेंडक (१९२८), उद्योगपती राहुल बजाज (१९३८), बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (१९५५), नौकानयनपटू होमी मोतीवाला (१९५८)

पुण्यस्मरण : विद्युतसंशोधक आँद्रे मारी अँपियर (१८३६), वास्तुशिल्पकार आन्तोनी गाऊदी (१९२८), अभिनेता स्पेन्सर ट्रेसी (१९६७), सिनेदिग्दर्शक रेनर वर्नर फासबिंडर (१९८२), अभिनेता जीवन (१९८७), कथालेखिका कमलाबाई टिळक (१९८९), सामाजिक कार्यकर्त्या फुलवंताबाई झोडगे (२००१), शाहीर निवृत्ती बाबूराव पवार (२००२), शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाश खोशू (२००२), गायक व संगीतकार रे चार्ल्स (२००४), ज्ञानपीठविजेते नाटककार व रंगकर्मी गिरीश कार्नाड (२०१९)

---

जागतिक दृष्टिदान दिवस
राष्ट्रीय दिन : पोर्तुगाल
१८९० - नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्‍नांमुळे भारतीय कामगारांना रविवारची साप्ताहिक सुटी मिळू लागली.
१९३५ - 'अल्कॉहॉलिक्स अनॉनिमस'ची स्थापना.
१९६६ - नाशिकजवळ ओझर येथे मिग-२१ विमानांच्या उत्पादनास सुरुवात.
१९६७ - इस्राएलने पुकारलेले 'सहा दिवसांचे युद्ध' संपुष्टात.
१९९९ - सर्बियन सैन्याची कोसोव्होतून माघार; नेटोने कोसोव्होवरील हवाई हल्ले थांबवले.
२००२ - प्रो. वार्विक यांनी 'बायोनिक चिप'चा प्रयोग यशस्वी केला.

११ जून
जन्मदिवस : चित्रकार जॉन कॉन्स्टेबल (१७७६), संगीतकार रिचर्ड स्ट्राउस (१८६४), नोबेलविजेते मानववंशशास्त्रज्ञ अल्फ्रेड लुई क्रोबर (१८७६), क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल (१८९७), नोबेलविजेते लेखक यासुमोरी कावाबाटा (१८९९), पाणबुडीत श्वासोच्छवास घेण्याच्या अ‍ॅक्वालंग यंत्राचा शोध लावणारा समुद्रसंशोधक व ऑस्करविजेता सिनेदिग्दर्शक जॅक-इव्ह कूस्तो (१९१०), लेखक विलिअम स्टायरॉन (१९२५), संपादक व लेखक पु.वि. बेहेरे (१९३१), कवी, लेखक व समीक्षक विलास सारंग (१९४२), संगणकशास्त्रज्ञ व 'C++' भाषेचा निर्माता ब्यार्न स्ट्राउसस्ट्रूप (१९५०)

पुण्यस्मरण : ध्रुवीय प्रदेश संशोधक सर जॉन फ्रँकलिन (१८४७), इतिहासाचार्य वासुदेवशास्त्री खरे (१९२४), स्वातंत्र्यसैनिक, लेखक, समाजसुधारक, पत्रकार, संपादक व विचारवंत साने गुरूजी (१९५०), अभिनेता छबी बिस्वास (१९६२), अभिनेता जॉन वेन (१९७९), उद्योगपती घनश्यामदास बिर्ला (१९८३), इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन (१९९७), ख्रिस्ती कीर्तनकार स.ना. सूर्यवंशी (२०००)
---
१७७० - दर्यावर्दी शोधक जेम्स कूकला 'ग्रेट बॅरिअर रीफ'चा शोध लागला.
१९१३ - नॉर्वेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९३५ - एडविन आर्मस्ट्राँगने पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९३८ - दुसरे चिनी-जपानी युद्ध : चालून येणाऱ्या जपानी सैन्याला रोखण्यासाठी चीनने यांगत्से नदीला कृत्रिम पूर आणला. यात पाच ते नऊ लाख नागरिक मारले गेले.
१९६२ - अल्काट्राझ तुरुंगातून तीन कैदी पळाले. ह्या तुरुंगातून पलायनाचा हा एकमेव प्रसंग मानला जातो. ('द रॉक' चित्रपटामागील प्रेरणा).
१९६४ - डॉ. फ्रेड हॉईल व डॉ. जयंत नारळीकर यांनी विश्वाच्या स्थिरस्थिती सिद्धांत रॉयल सोसायटीच्या सभेत सादर केला.
१९८२ - 'इ.टी.' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९८७ - ब्रिटिश संसदेत पहिले कृष्णवर्णीय सदस्य निवडून आले.
१९९७ - तत्कालीन पंतप्रधान डॉ. इंदरकुमार गुजराल यांनी सुखोई-३० ही विमाने हवाई दलात दाखल केली.
१९९८ - सुदानमध्ये दहा लाखांहून अधिक लोक दुष्काळाचा सामना करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतरीत्या जाहीर केले.

१२ जून
जन्मदिवस: चित्रकार एगॉन शील (१८९०), पाली भाषाकोविद पु.वि.बापट (१८९४), लेखक भा.द.खेर (१९१७), नाझी छळछावणीत बळी गेलेली दैनंदिनीकर्ती अ‍ॅन फ्रँक (१९२९), अभिनेत्री पद्मिनी (१९३२), लेखक-कवी गुरुनाथ धुरी (१९४२), क्रिकेटपटू जावेद मियाँदाद (१९५७)
पुण्यस्मरण: मराठी भाषाशास्त्रज्ञ कृ.पां. कुलकर्णी (१९६४), म.गांधींचे चरित्रकार डी.जी. तेंडुलकर (१९७२), संस्कृतपंडित गोपीनाथ कवीराज (१९७६), अभिनेत्री नॉर्मा शिअरर (१९८३), पु.ल.देशपांडे (२०००), अभिनेता ग्रेगरी पेक (२००३)
---
जागतिक बालकामगारविरोधी दिन
राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिन - फिलीपीन्स, रशिया
१९०५ - गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
१९४२ - अ‍ॅन फ्रँकला आपल्या वाढदिवशी डायरी भेट मिळाली. ह्यातील नोंदी तिच्या मृत्यूपश्चात पुस्तकरूपात ख्यातकीर्त झाल्या.
१९६३ - 'क्लिओपात्रा' चित्रपट प्रदर्शित.
१९६४ - वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेत न्यायालयाने नेल्सन मंडेला यांना राष्ट्रविरोधी कारवायांसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. १९९० साली त्यांची सुटका झाली.
१९६७ - 'लव्हिंग विरुद्ध व्हर्जिनिया' खटल्यातल्या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालान्वये आंतरवर्णीय विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली.
१९७५ - अलाहाबाद न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली व दोन वर्षे सरकार चालवले.
१९९० - भारताच्या इन्सॅट १-डी चे फ्लोरिडा येथून यशस्वी उड्डाण.
१९९४ - बोईंग-७७७ या सर्वात मोठ्या ट्विनजेट विमानाचे पहिले उड्डाण.

१३ जून
जन्मदिवस : कवी डब्ल्यू.बी. येट्स (१८६५), क्रांतिकारक बाबाराव सावरकर (१८७९), लेखक फर्नांदो पेसोआ (१८८८),टेनिसपटू डॉन बज (१९१५), अभिनेता माल्कम मॅक्डॉवेल (१९४३), लेखक दत्ता भगत (१९४५), गणितज्ञ ग्रिगोरी पेरेलमॅन (१९६६)

पुण्यस्मरण : शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर (१९६७), वक्ते, लेखक, संपादक, सिनेदिग्दर्शक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते प्र. के. अत्रे (१९६९), वगसम्राट दादू इंदुरीकर (१९८०), गायक मेहदी हसन (२०१२)
---
१९४० - क्रांतिकारक उधमसिंग यांना फाशी.
१९५६ - फूटबॉल : पहिली युरोपियन चँपियन्स कप स्पर्धा रेआल माद्रिदने जिंकली.
१९७१ - 'न्यू यॉर्क टाइम्स'ने अमेरिकन सरकारच्या व्हिएतनाम युद्धातील कामगिरीबाबतचे गोपनीय पेंटॅगॉन पेपर्स प्रकाशित करायला सुरुवात केली.
१९९७ - दिल्लीतील 'उपहार' चित्रपटगृह आगीच्या भक्ष्यस्थानी; ५९ मृत.
२००० - स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना विश्वनाथन आनंद याने बारा लढतींत विजय मिळवला, तर तीन लढती अनिर्णित राखल्या.
२००२ - अँटिबॅलिस्टिक मिसाइल करारातून अमेरिकेची माघार. रशिया, फ्रान्स, ब्रिटन व चीन अजूनही करार पाळतात.
२००४ - भारत आणि रशियाची संयुक्त निर्मिती असलेल्या, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

१४ जून
जन्मदिवस : खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ नीलकंठ सोमयाजी (१४४४), भौतिकशास्त्रज्ञ शार्ल ओग्युस्तँ द कूलॉम्ब (१७३६), लेखिका हॅरिएट बीचर स्टो (१८११), अल्झायमर रोगाचा संशोधक आलोईस अल्झायमर (१८६४), रक्तगटाचे संशोधक नोबेलविजेते लॅन्डस्टेनर कार्ल (१८६८), छायाचित्रकार मार्गारेट बूर्क-व्हाइट (१९०४), दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक के. आसिफ (१९२२), क्रांतिकारक चे गव्हेरा (१९२८), सिनेदिग्दर्शक अलेक्सांद्र सोकुरॉव्ह (१९५१), पॉप संगीतकार व गायक बॉय जॉर्ज (१९६१), टेनिसपटू स्टेफी ग्राफ (१९६९)

पुण्यस्मरण : नाटककार आणि नाटयदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल (१९१६), समाजशास्त्रज्ञ व विचारवंत मॅक्स वेबर (१९२०), चित्रकार मारी कासाट (१९२६), लेखक जेरोम के. जेरोम (१९२७), स्त्रीवादी कार्यकर्ती एमेलीन पँकहर्स्ट (१९२८), लेखक जी.के.चेस्टरटन (१९३६), दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड (१९४६), लेखक होऱ्हे लुई बोऱ्हेस (१९८६), नाट्यअभिनेत्री व संस्कृतपंडित सुहासिनी मुळगावकर (१९८९)

---

जागतिक रक्तदान दिन.
स्वातंत्र्यदिन - मालावी.

१७७७ - अमेरिकेने 'स्टार्स अँड स्ट्राइप्स'चा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला.
१८२२ - आधुनिक संगणकाचे एक प्रारूप 'डिफरन्स इंजिन' चार्ल्स बॅबेजने सादर केले.
१८३४ - खोरकागदाचे (सँडपेपर) पेटंट प्रदान.
१८९६ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना.
१९४० - पॅरिस जर्मन सैन्याच्या ताब्यात.
१९४९ - पहिले माकड अवकाशात पाठवले गेले.
१९६६ - व्हॅटिकन सिटीने लिब्रोरम प्रोहिबिटोरम (बंदी घातलेल्या पुस्तकांची यादी) जाहीर करणे बंद केले.
१९६७ - चीनने हायड्रोजन बाँबची चाचणी केली.
१९८२ - फॉकलंड युद्धाची अखेर.
१९८५ - शेनगेन करार संमत.
१९८६ - भारतातील पहिल्या टेस्ट टयूब बेबीचा जन्म.

१५ जून
जन्मदिवस : चित्रकार निकोला पूसँ (१५९४), प्राच्यविद्यापंडित हेन्री थॉमस कोलब्रूक (१७६५), शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक डॉ.ग.श्री. खैर (१८९८), समीक्षक रा. श्री. जोग (१९०३), लेखक गं.भा. निरंतर (१९०६), स्वातंत्र्यसेनानी तसेच सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गोरे (१९०७), चित्रकार के.के. हेब्बर (१९११), संगीत दिग्दर्शक सज्जाद हुसेन (१९१७), समीक्षक व लेखक के. ज. पुरोहित (१९२३), प्रभातच्या सुवर्णकाळातले संवादलेखक, पटकथालेखक व दिग्दर्शक बापू वाटवे (१९२४), कवी शंकर वैद्य (१९२८), गायिका, अभिनेत्री सुरैया (१९२९), गायक झिया फरिदुद्दीन डागर (१९३२), लेखिका, समीक्षक, संपादिका सरोजिनी वैद्य (१९३३), समाजसेवक अण्णा हजारे (१९३८), आंबेडकरी विचारांचे अभ्यासक व लेखक अर्जुन उमाजी डेंगळे (१९४५), नाटककार प्रेमानंद गज्वी (१९४७), उद्योजक लक्ष्मी मित्तल (१९५०)

पुण्यस्मरण : पत्रकार व संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर (१९३१), चित्रकार अर्न्स्ट लुडविग किर्शनर (१९३८), कवी सूर्यकांत खांडेकर (१९७९), गायिका एला फिट्झजेराल्ड (१९९६)

---

जागतिक वारा दिन.
१६६७ - जाँ-बातिस्त दनी यांनी पहिले मानवी रक्तसंक्रामण (blood transfusion) केले.
१७५२ - बेंजामिन फ्रँकलिन यांनी पतंगाच्या साहाय्याने विद्युतप्रवाहाचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८४४ - रबर व्हल्कनायझेशनचे पेटंट चार्ल्स गुडयर यांना मिळाले.
१८७८ - एडवर्ड मयब्रिज यांनी घोड्याची धावतानाची छायाचित्रे काढून घोडा कसा धावतो ते दाखवले. सिनेमातंत्रातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१८९६ - जपानमध्ये अतिसंहारक त्सुनामी; २२,००० मृत.
१९११ - आय.बी.एम.ची पूर्वज कंपनी 'टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकॉर्डिंग कंपनी'ची स्थापना.
१९५४ - युरोपियन फूटबॉल संघटना UEFAची स्थापना.

१६ जून
जन्मदिवस : लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), 'लॉरेल अँड हार्डी'मधला अभिनेता स्टॅन लॉरेल (१८९०), छायाचित्रकार अर्व्हिंग पेन (१९१७), गायक व संगीतकार हेमंत कुमार (१९२०), क‌वी शाह‌रियार‌ (१९३६), अभिनेता मिथुन चक्रवर्ती (१९५०)
पुण्यस्मरण : लेखक, पत्रकार, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक चित्तरंजन दास (१९२५), भारतीय रसायनउद्योगाचे जनक रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), स्थापत्यविशारद चार्ल्स कोरिया (२०१५)

---

ब्लूम्सडे - जेम्स जॉईसच्या 'युलिसिस' कादंबरीतला घटनाक्रम ज्या दिवशी घडतो तो दिवस.
१८५८ - गुलामगिरीसंदर्भात अब्राहम लिंकन यांनी 'A house divided against itself cannot stand' हे प्रसिद्ध भाषण केले.
१९०३ - फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
१९२८ - शिल्पकार वि. पां. करमरकर यांनी पूर्णतः भारतात ओतकाम केलेला ब्रॉंझमधील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला. आज तो SSPMS मैदानात आहे.
१९६० - अल्फ्रेड हिचकॉक दिग्दर्शित 'सायको' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९६१ - जगप्रसिद्ध बॅले नर्तक रुडॉल्फ न्यूरेयेव्ह रशियाच्या तावडीतून सुटून फ्रान्सच्या आश्रयास गेला.
१९६३ - व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हा ही पहिली अंतराळवीर महिला अवकाशप्रवासास गेली.
१९७६ - दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार; ५६६ विद्यार्थी ठार.
१९७७ - ऑरॅकल कॉर्पोरेशनची 'सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज' या नावाने स्थापना.
१९८९ - सोव्हिएत रशियाविरुद्ध उठाव केल्यामुळे राष्ट्रद्रोही म्हणून १६ जून १९५८ला फाशी गेलेले हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष इम्रे नागी यांना मृत्यूनंतर ३१ वर्षांनी निर्दोष जाहीर केले गेले. सरकारी इतमामाने त्यांचे पुनर्दफन करण्यात आले. दोनच महिन्यांत हंगेरीने ऑस्ट्रियाशी असलेली आपली सरहद्द खुली केली आणि कम्युनिझमच्या अखेरीची सुरुवात झाली.
२०१० - तंबाखूवर पूर्णतः बंदी आणणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.

१७ जून
जन्मदिवस : चित्रकार, स्थापत्यतज्ञ जिओव्हानी पनिनी (१६११), जगातील पहिले अनाथालय स्थापन करणारा जॉन पाउंड (१७६६), लघुलेखन पद्धतीचा शोधक जॉन रॉबर्ट ग्रेग (१८६७), संगीतकार इगॉर स्ट्राव्हिन्स्की (१८८२), चित्रकार एम. सी. एशर (१८९८), नोबेलविजेता जीवशास्त्रज्ञ फ्रान्स्वा जेकब (१९२०), सिनेदिग्दर्शक क्रिस्तॉफ झानुसी (१९३९), टेनिसपटू लिअँडर पेस (१९७३), टेनिसपटू व्हीनस ‌विल्यम्स (१९८०), क्रिकेटपटू शेन वॉट्सन (१९८१)
पुण्यस्मरण : कवी, ज्ञानेश्वरांचे ज्येष्ट बंधू आणि गुरू निवृत्तिनाथ (१२९७), राजमाता जिजाबाई (१६७४), भारतात सतीबंदीचा कायदा तसेच ठगांच्या बंदोबस्तासाठी प्रसिद्ध गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंक (१८३९), झाशीची राणी लक्ष्मीबाई (१८५८), समाजसुधारक व बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर (१८९५), साखर आणि अन्य रसायनांच्या किण्वनाचा अभ्यास करणारा नोबेलविजता आर्थर हार्डन (१९४०), अभिनेता मोतीलाल (१९६५), लेखक प्रभाकर माचवे (१९९१), स्वातंत्र्यसेनानी नाना धर्माधिकारी (१९९३), सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख (२००४)

---

वाळवंटीकरण आणि दुष्काळविरोधी दिन.
स्वातंत्र्यदिन : आईसलंड (१९४४)

१६३१ : मुमताजमहल बाळंतपणात मृत्युमुखी; तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला गेला.
१८८५ : स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
१९५० : मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया जगात अमेरिकेत सर्वप्रथम यशस्वी
१९६३ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९९१ : दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
१९९४ : दूरचित्रवाणीवर लाइव्ह दाखवल्या गेलेल्या चित्तथरारक पाठलागानंतर ओ.जे. सिंपसनला पत्नी व तिच्या मित्राच्या हत्येप्रकरणी अटक.
२०१३ : उत्तराखंडात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी पाऊस; शेकडो मृत्युमुखी; हजारो यात्रेकरी अडकले.

१८ जून
जन्मदिवस : मलेरियासारख्या रोगांचे मूळ आदिजीवांत शोधणारा नोबेलविजेता चार्ल्स लाव्हारेन (१८४५), विचारवंत, लेखक व स्वातंत्र्यसैनिक आचार्य दादा धर्माधिकारी (१८९९), शास्त्रज्ञ कमला सोहनी (१९११), संगीतविषयक पुस्तकांचे लेखक व संगीत-नाट्य समीक्षक माधव कृष्ण पारधी (१९२०), लेखक श्री. बा. जोशी (१९३०), 'बीटल' गायक, वादक, संगीतरचनाकार पॉल मककार्टनी (१९४२)
पुण्यस्मरण : चित्रकार रॉजिएर व्हॅन डर वेडेन (१४६४), पहिली मराठी ऐतिहासिक कादंबरी 'मोचनगड'चे लेखक, 'विविध ज्ञानविस्तार' मासिकाचे संपादक रा. भि. गुंजीकर (१९०१), लेखक मॅक्झिम गॉर्की (१९३६), जीवनसत्त्वांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल केरर (१९७१), लेखक व संसदपटू सेठ गोविंददास (१९७४), लेखक रमेश मंत्री (१९९८), लेखक श्रीपाद काळे (१९९९), अभिनेत्री नसीमबानू (२००२), अभिनेता जानकीदास (२००३), सरोदवादक उस्ताद अली अकबर खान (२००९), नोबेलविजेता लेखक होजे सारामागो (२०१०), धावपटू मिल्खा सिंग (२०२१)

---

राष्ट्रीय दिन - सेशेल्स.
जागतिक स्वमग्नता स्वाभिमान दिन

१८१५ : वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा पराभव.
१८५८ : डार्विनने आल्फ्रेड वॉलेसचे, त्याच्या उत्क्रांतीसिद्धांताशी साधर्म्य दाखवणारे संशोधन वाचले; यामुळे त्याने त्याचा सिद्धांत प्रकाशित केला.
१८७३ : सुझन अँथनी हिला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा प्रयत्न करण्याबद्दल १०० डॉलर्सचा दंड झाला.
१९०० : चीनने देशातल्या सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकुम सोडला.
१९४० : विन्स्टन चर्चिलने आपले "Finest Hour" भाषण दिले.
१९४६ : डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील पोर्तुगीजांविरूद्ध "थेट कृती दिन" घोषित केला.
१९४८ : सीबीएस कंपनीने पहिली 'एलपी' रेकॉर्ड (व्हिनाइल डिस्क) काढली.
१९५३ : इजिप्त प्रजासत्ताक झाले.

१९ जून
जन्मदिवस : गणितज्ञ ब्लेझ पास्कल (१६२३), कृषितज्ञ, पुणे कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील (१८७७), गणितज्ञ, सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस (१९०१), लेखक सलमान रश्दी (१९४७), शांतता नोबेलविजेत्या कार्यकर्त्या आँग सान स्यू की (१९४५)
पुण्यस्मरण : पेशवाईतील एक मुत्सद्दी हरिपंत फडके (१७९४), 'पीटर पॅन'चा लेखक जे.एम. बॅरी (१९३७), तत्त्वज्ञ सईद झफरुल हसन (१९४९), 'आय.बी.एम.'चा संस्थापक टी.जे. वॉटसन (१९५६), नोबेलविजेता साहित्यिक विल्यम गोल्डिंग (१९९३), लेखक रमेश मंत्री (१९९८)

---

स्वातंत्र्यदिन : कुवेत (१९६१)

१६७६ : नेताजी पालकरांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले.
१८६२ : अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बेकायदा.
१९६४ : वंश, वर्ण, धर्म, लिंग अशा कोणत्याही घटकानुसार भेदभाव करण्याला बंदी घालणारा 'सिव्हिल राइट्स अ‍ॅक्ट' अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि सिनेटने संमत केला.
१९६६ : बाळ ठाकरे यांच्या घरी 'शिवसेना' स्थापन झाली.
१९७० : 'पेटंट कोऑपरेशन करारा'वर सह्या झाल्या.
१९७७ : झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.
१९७८ : इंग्लंडचे क्रिकेट खेळाडू इयान बोथम यांनी पाकिस्तान संघाविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर एकाच खेळीत ८ बळी घेतले आणि शतकसुद्धा काढले.
१९७८ : 'गारफील्ड' कॉमिक स्ट्रिपचे वृत्तपत्रात प्रथम प्रकाशन.
१९८१ : भूस्थिर कक्षेत फिरणारा भारताचा पहिला उपग्रह 'अ‍ॅपल' प्रक्षेपित.
१९९० : 'शेनगेन' कराराला संमती. करारात सामील युरोपियन देशांमध्ये नंतर समान व्हिसा प्रणाली सुरू झाली.
१९९० : द. आफ्रिकेत कृष्णवर्णीयांना काही सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी घालणारा कायदा रद्द.
१९९१ : हंगेरीतून सोव्हिएत सैन्य बाहेर पडले.
२००८ : गुज्जर समाजाला ५% आरक्षणाचा राजस्थान सरकारचा निर्णय; खुल्या गटातल्या गरिबांना १४% आरक्षण

२० जून
जन्मदिवस: जीवनसत्त्त्वांचा शोध लावणारा नोबेलविजेता फ्रेडरिक हॉपकिन्स (१८६१), उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर (१८६९), चित्रकार कुर्ट श्विटर्स (१८८७),अभिनेता एरॉल फ्लिन (१९०९), क्रिकेटपटू रमाकांत देसाई (१९३९), गायक लायनेल रिची (१९४९), लेखक विक्रम सेठ (१९५२), क्रिकेटपटू अ‍ॅलन लॅम्ब (१९५४), अभिनेत्री निकोल किडमन (१९६७), क्रिकेटपटू पारस म्हांब्रे (१९७२)
पुण्यस्मरण: पखवाजवादक गोविंदराव बऱ्हाणपूरकर (१९५७), महास्फोट सिद्धांताचा जनक जॉर्ज लमेत्र (१९६६), पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (१९८७), मराठी गज़लकार भाऊसाहेब पाटणकर (१९९७), सिनेदिग्दर्शक बासू भट्टाचार्य (१९९७), 'इंटिग्रेटेड सर्किट'साठी नोबेल पुरस्कार मिळवणारा जॅक किल्बी (२००५), अभिनेते चंद्रकांत गोखले (२००८)

---

जागतिक स्वच्छता दिवस
आंतरराष्ट्रीय निर्वासित दिन

स्वातंत्र्यदिन: माली, सेनेगल (१९६०)

१७२६ : यॉर्कशायरमधील बिव्हर्ली या गावी पहिल्या अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली.
१७५६ : कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटिश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद्दौलाने ब्रिटिश सैनिकांना तुरुंगात डांबले ('ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'). जागेअभावी आणि हवेअभावी चेंगरून सुमारे १०० सैनिक मरण पावले असा अंदाज आहे.
१७८२ : अमेरिकेच्या कॉँग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
१७८९ : पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी 'टेनिस कोर्टवरील शपथ' घेतली व फ्रेंच राज्यक्रांतीला बळ दिले.
१८४० : तारायंत्राचे पेटंट सॅम्युअल मोर्सला मिळाले.
१८९४ : अलेक्झांडर येरसँने प्लेगच्या जीवाणूंचा (येर्सिनिआ पेस्टिस) शोध लावला.
१८९९ : श्री.रघुनाथ परांजपे यांनी केंब्रिज विद्यापीठात गणिताच्या परीक्षेत वर्गात पहिले येऊन सिनियर रँगलर होण्याचा बहुमान पटकावला.
१८७७ : व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) सुरू झाले.
१८७७ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
१९२१ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना.
१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
१९९७ : मुलींची पहिली सैनिकी शाळा पुण्यात.
२००३ : विकीमिडीया फाऊंडेशनची स्थापना.
२०१२ : मुंबईत मंत्रालयात तीन मजल्यांना आग; दोन मृत्युमुखी.

२१ जून
जन्मदिवस: नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८६१), तत्त्वज्ञ, कादंबरीकार जॉं-पॉल सार्त्र (१९०५), ग्रंथालय चळवळीचे जनक वासुदेव कोल्हटकर (१९२२), कवी, कथाकार, अनुवादक सदानंद रेगे (१९२३)
पुण्यस्मरण: कादंबरीकार नाथमाधव (१९२८), अभिनेता अरूण सरनाईक (१९८४), कॅ. वासुदेव बेलवलकर (२०००), अर्थशास्त्रज्ञ आबिद हुसैन (२०१२)

---

उत्तरगोलार्धातील सर्वात मोठा दिवस - विष्टंभ
जागतिक संगीत दिन, योग दिन
१६७४ : 'श्री शिवराजभूषण' या काव्याचे लेखन कवी भूषण यांनी पूर्ण केले.
१९३४ : पुण्यात म. गांधींच्या हस्ते 'हिंदी प्रचार संघ' या संस्थेची स्थापना.
१९४८ : सी. राजगोपालचारी यांची पहिले (आणि एकमेव) एतद्देशीय गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९४८ : शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
१९५० : स्थानबद्धतेमागची कारणे न्यायालयाला न सांगण्याची बंदी घालणारे कलम रद्द.
१९८९ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून वैध ठरवली.
२००१ : नव्या सहस्रकातील पहिले सूर्यग्रहण.
२००२ : भारताने 'नाग' या रणगाडाविरोधी अस्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
२००४ : स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.

२२ जून
जन्मदिवस: अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अ‍ॅब्रायस्ते पेरी (१५१७), अभिनेता बाबुराव पेंढारकर (१८९६), महानुभाव पंथाचे अभ्यासक डॉ. वि.भि. कोलते (१९०८), अभिनेता अमरीश पुरी (१९३२), क्रिकेटपटू वामन कुमार (१९३५), लेखक महादेव मोरे (१९३९), इराणी नवप्रवाहाचा प्रणेता चित्रपटदिग्दर्शक अब्बास किआरोस्तामी (१९४०), अभिनेत्री मेरील स्ट्रीप (१९४९), कादंबरीकार डॅन ब्राऊन (१९६४)
पुण्यस्मरण: नानासाहेब पेशवे (१७६१), अभिनेता, नर्तक, गायक व संगीतकार फ्रेड अस्टेअर (१९८७), चेरेंकॉव्ह प्रारणाचे स्पष्टीकरण देणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता इलिया फ्रांक (१९९०), अर्थशास्त्रज्ञ डॉ. अरुण घोष (२००१)

---

१६३३ : सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पृथ्वी असल्याचे गॅलिलेओने पोपच्या दबावाखाली कबूल केले.
१७५७ : प्लासीची लढाई सुरू.
१७७२ : एखाद्या गुलामाने इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर त्याला स्वतंत्र नागरिक समजण्यात येऊ लागले.
१८९७ : चाफेकर बंधूंनी रँड व आयर्स्ट यांच्यावर गोळ्या घालून त्यांना ठार केले.
१९३३ : हिटलरने सोशल डेमोक्रॅटिक पार्टीसह इतर पक्षांवर बंदी घातली. नाझी अधिपत्याखालील जर्मन राष्ट्र एकपक्षीय झाले.
१९४० : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'फॉरवर्ड ब्लॉक' पक्षाची स्थापना केली.
१९७६ : कॅनडामध्ये मृत्यूदंडावर बंदी
१९७८ : प्लूटोचा जुळा ग्रह / उपग्रह शॅरनचा शोध लागला.

२३ जून
जन्मदिवस : गणितज्ञ टॉलेमी (इ.स.पू. ४७), पहिला सेक्सॉलॉजिस्ट आल्फ्रेड किन्सी (१८९४), क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद (१९०६), गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ ॲलन ट्यूरिंग (१९१२), अभिनेता रहमान (१९२१), नृत्य, नाट्य व सिनेदिग्दर्शक बॉब फॉस (१९२७), 'बीटल्स'मधला गिटारवादक स्टुअर्ट सटक्लीफ (१९४०), इंटरनेटच्या जनकांपैकी एक व्हिंट सर्फ (१९४३), अभिनेता राज बब्बर (१९५२), संगीतकार यान तिअरसॉं (१९७०), फुटबॉलपटू झिनेदीन झिदान (१९७२)
पुण्यस्मरण: मासिक मनोरंजनचे संपादक का.र.मित्र (१९२०), राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी (१९८०), गंधर्वयुगातले ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे (१९८२), लेखक हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय (१९९०), आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल (२०१२)
---
१७५७ : प्लासीची लढाई इंग्रज जिंकले - इंग्रजी अंमल भारतात सुरू
१८९४ : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.
१९२७ : भारतीय नभोवाणीची स्थ‌ापना; महिन्याभराने मुंबईत सुरुवात.
१९५६ : गमाल नासर इजिप्तच्या अध्यक्षपदी विराजमान.
१९६० : अमेरिकन 'फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन'ने 'एनव्हॉईड' या तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळीला जगात प्रथम मान्यता दिली.
१९६१ : अंटार्क्टिका खंडाला शस्त्रास्त्रहीन ठेवणारा आणि तिथे शांततापूर्ण संशोधन करण्याला संमती देणारा अंटार्क्टिक करार अंमलात आला.
१९६९ : आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे विकण्याचा निर्णय आयबीएम कंपनीने घेतला. सॉफ्टवेअर व्यवसायाचा जन्म झाला.
१९९३ : नवऱ्याने बलात्कार केल्यामुळे लॉरेना बॉबिट हिने त्याचे लिंग छाटून टाकले.

२४ जून
जन्मदिवस : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (१८६३), क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर (१८६९), रविकिरण मंडळाच्या संस्थापकांपैकी एक श्री.बा.रानडे (१८९२), गायक पं. ओंकारनाथ ठाकूर (१८९७), पहिली महिला वैमानिक अमेलिया एअरहार्ट (१८९८), बंगाली कवी काझी नझरूल इस्लाम (१८९९), नटवर्य नानासाहेब फाटक (१८९९), कथकली नर्तक गुरू गोपीनाथन् (१९०८), स्थिरस्थिती सिद्धांताचे जनक फ्रेड हॉयल (१९१५), तमिळ लेखक कवियरासू कण्णदासन (१९२७), टाऊ लेप्टॉन हा मूलभूत कण शोधणारा नोबेलविजेता मार्टिन पर्ल (१९२७), लोकनेत्या मृणाल गोरे (१९२८), लेखिका अनिता देसाई (१९३७)
पुण्यस्मरण : लेखक, समीक्षक माधव गोपाळ देशमुख (१९७१), ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही (१९९७)

---

स्वातंत्र्यदिन : थायलंड

१७९३ : फ्रान्समध्ये पहिली प्रजासत्ताक घटना अंमलात आली.
१८१२ : नेपोलियनच्या सैन्याचे रशियावर आक्रमण. अनेक महिन्यांनंतर आणि लाखो सैनिक मेल्यानंतर अखेर नेपोलियनला हार पत्करावी लागली.
१८४६ : अदोल्फ सॉ याने सॅक्सोफोनचे पेटंट घेतले.
१८८१ : हेन्री ड्रेपर यांनी (टेबुट) धूमकेतूची प्रथमच छायाचित्रे घेतली.
१९१८ : पहिली 'एअरमेल' पाठवली गेली.
१९३९ : सयामने आपले नाव बदलून थायलंड केले.
१९६१ : HF२४ हे पहिले भारतीय बनावटीचे ध्वनीवेगाने उडणारे विमान तयार झाले.
१९७८ : 'तीन पैशाचा तमाशा' नाटकाचा पहिला प्रयोग.
१९८६ : केंद्र सरकारच्या चाकरीत असलेल्या अविवाहित स्त्रियांनाही प्रसूतीची रजा देण्याचा सरकारचा निर्णय.
१९९६ : मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला.
२००१ : आयएनएस विराट ही विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल.
२०२२ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा हक्क घटनादत्त नसल्याचा निर्णय देत १९७३ सालचा रो वि. वेड निर्णय रद्द केला.

२५ जून
जन्मदिवस : लेखक जॉर्ज ऑर्वेल (१९०३), अणूकेंद्राचे शेल-मॉडेल सुचवणारा नोबेलविजेता हान्स येन्सन (१९०७), संगीतकार मदन मोहन (१९२४), पंतप्रधान व्ही. पी. सिंग (१९३१), लेखक व संशोधक सदानंद मोरे (१९५२), अभिनेत्री करिश्मा कपूर (१९७४), अभिनेता आफताब शिवदासानी (१९७८)
पुण्यस्मरण : कवी, इतिहासाभ्यासक सत्येंद्रनाथ दत्त (१९२२), किसान चळवळीचे नेते समाजसुधारक सहजानंद सरस्वती (१९५०), रासायनिक खत उद्योगाचे शिल्पकार गोविंद पांडुरंग काणे (१९९१), अणुभंजनाचा पहिला प्रयोग करणारा नोबेलविजेता अर्नस्ट वॉल्टन (१९९५), समुद्रसंशोधक व ऑस्करविजेता सिनेदिग्दर्शक जॅक-इव्ह कूस्तो (१९९७), गायक, नर्तक मायकल जॅक्सन (२००९)
---
स्वातंत्र्य दिन : मोझांबिक (१९७५), स्लोव्हेनिया, क्रोएशिया (१९९१)
१७४० - बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवेपदी विराजमान.
१९३५ - भारताचा पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू.
१९४७ - 'ॲन फ्रँकची डायरी' प्रकाशित झाली.
१९५० - उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण. हे युद्ध १९५३पर्यंत चालले. २० लाख मृत. शीतयुद्धादरम्यानचा महत्त्वाचा संघर्ष. अद्यापही दोन देशांत डी-मिलिटराइझ्ड झोन.
१९६७ - कृत्रिम उपग्रहाद्वारे पहिला सार्वजनिक कार्यक्रम प्रक्षेपित.
१९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७८ - 'समलैंगिक स्वातंत्र्य दिन परेड'मध्ये सर्वप्रथम सप्तरंगी झेंडा झळकला.
१९८३ - भारताने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक जिंकला.

२६ जून
जन्मदिवस: खगोलनिरीक्षक चार्ल मेसीए (१७३०), कवी, चित्रकार ब्रानवेल ब्रॉंटे (१८१७), भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड केल्व्हिन (१८२४), गायिका गौहर जान (१८७३), दलितोद्धारक राजर्षी शाहू महाराज (१८७४), गायक व अभिनेता बालगंधर्व (१८८८), नोबेलविजेती लेखिका पर्ल बक (१८९२), हस्तलिखितांचे संशोधक व सूचिकार सदाशिव कात्रे (१९०४), लेखिका कमलाबाई टिळक (१९०५), कवी शंकर रामाणी (१९२३), लेखिका इंद्रायणी सावकार (१९३४)
पुण्यस्मरण: यांत्रिक चरख्याचे जनक सॅम्युएल क्रॉम्प्टन (१९२७), रसायनशास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे (१९४४), विचारवंत भास्करराव जाधव (१९५०), लेखक व कथाकथनकार व. पु. काळे (२००१), चित्रपटनिर्माता यश जोहर (२००४), क्रिकेटपटू एकनाथ सोलकर (२००५)

---

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन

स्वातंत्र्यदिन : सोमालिया, मादागास्कर (१९६०)

१८१९ - सायकलचे पेटंट देण्यात आले.
१९०६ - पहिली ग्रां प्री मोटरशर्यत फ्रान्समध्ये झाली.
१९४५ - संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
१९४८ - विल्यम शॉकलीने पहिल्या बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरसाठी पेटंट दाखल केले.
१९६८ - पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन.
१९७४ - भारतातील नागपूरजवळील कोराडी येथे सर्वात मोठय़ा औष्णिक वीजकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ.
१९७५ - राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करणारा वटहुकूम जारी केला.
१९७७ - एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम संपन्न.
१९७९ - मुष्टीयोद्धा मोहम्मद अली याने निवृत्ती घोषित केली.
१९८० - भारतीय शास्त्रज्ञांना बंगालच्या उपसागरात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध लागला.
१९९७ : 'हॅरी पॉटर' पुस्तकमालिकेचा पहिला भाग प्रकाशित.
१९९९ - अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.
२००० - पहिले मानवी जनुकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे जाहीर झाले.
२०१५ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर समलिंगी व्यक्तींचा विवाहाचा हक्क मान्य केला.
२७ जून
जन्मदिवस: लेखक बंकिमचंद्र चटर्जी (१८३८), होमरूल लीगचा संस्थापक चार्ल्स पार्नेल (१८४६), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१८६४), अंधत्व आणि मूकबधिरपणा या वैगुण्यांवर मात करणाऱ्या हेलन केलर (१८८०), कादंबरीकार, पत्रकार एल्या एरेबबुर्क (१८९१), क्रिकेटपटू खंडेराव रांगणेकर (१९१७), संगीतकार आर.डी.बर्मन (१९३९), सिनेदिग्दर्शक क्रिस्तॉफ किस्लोव्हस्की (१९४१), धावपटू पी. टी. उषा (१९६४), अभिनेता टोबी मग्वायर (१९७५)
पुण्यस्मरण: पंजाबचा सिंह महाराज रणजितसिंग (१८३९), गांधीवादी नेते होमी जे. एच. तल्यारखान (१९९८), अभिनेता जॅक लेमन (२००१), फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (२००८)

---

स्वातंत्र्यदिन : जिबुटी (१९७७)

१९५४ : सोवियत संघातील ओब्निन्स्क येथे जगातील पहिले अणुविद्युत केंद्र सुरू.
१९५७ : धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो, हे दाखवणारं संशोधन प्रकाशित.
१९६६ : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद चिघळून कर्नाटकात मोठी दंगल.
१९६७ : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू
२०१३ : नासाने सौर अभ्यासासाठी इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ अवकाशात पाठवला.

२८ जून

जन्मदिवस : चित्रकार पीटर पॉल रूबेन्स (१५७७), तत्त्ववेत्ता जाँ-जाक रुसो (१७१२), अणुकेंद्राचे शेल-मॉडेल सुचवणारी नोबेलविजेती मरिया गेपर्ट-मेयर (१९०६), पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव (१९२१), अभिनेता मेल ब्रूक्स (१९२६), ओझोन आणि क्लोरोफ्लुरोकार्बन यांच्यावर संशोधन करणारा नोबेलविजेता फ्रँक शेरवूड रोलँड (१९२७), लेखक, समीक्षक गंगाधर पानतावणे (१९३७), अभिनेता जॉन कुसॅक (१९६६)

पुण्यस्मरण : आधुनिक भारताच्या उभारणी, नियोजन, पंचवार्षिक योजनांमध्ये मोठा सहभाग असणारे सांख्यिकीशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबीस (१९७२), व्हायोलिनवादक, गायक गजाननराव जोशी (१९८७), ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ (१९९९)
---
१९१४ : ऑस्ट्रियाच्या साम्राज्याचा वारस आर्चड्यूक फर्डिनांड याची सपत्नीक हत्या. पहिल्या महायुद्धाचा भडका ह्या घटनेतून उडाला.
१९१९ : व्हर्सॉयचा तह करून जर्मनीने शरणागती पत्करली. पहिले महायुद्ध समाप्त.
१९२६ : ग्यटिलेब डेमलर आणि कार्ल बेंझ यांनी आपल्या कंपन्या एकत्र करून मर्सिडीझ-बेंझची सुरूवात केली.
१९६७ : इस्राएलने जेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.
१९६९ : स्टोनवॉल दंगलींमुळे अमेरिकेत समलैंगिक हक्क चळवळीला सुरुवात.
१९९७ : मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबित.
२००४ : इराकवर आक्रमणानंतर अमेरिकेने सत्ता इराकी लोकांच्या हातात दिली.
२००५ : कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा मिळाली.
२००९ : महिलांची पहिली चँपियन्स चॅलेंजर कप हॉकी स्पर्धा भारतीय संघाने बलाढ्य बेल्जियमचा पराभव करून जिंकली.

२९ जून
जन्मदिवस: जहाजांसाठी प्रॉपेलर बनवणारा जोसेफ रेसेल (१७९३), नाटककार व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१), आधुनिक भारताच्या उभारणी, नियोजन, पंचवार्षिक योजनांमध्ये मोठा सहभाग असणारे सांख्यिकीशास्त्रज्ञ पी.सी. महालनोबिस (१८९३), अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता कमलाकर सारंग (१९३४), अर्थतज्ञ ए. के. शिव कुमार (१९५६)
पुण्यस्मरण: आधुनिक चित्रकार पॉल क्ली (१९४०), प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, स्वातंत्र्यसैनिक दामोदर धर्मानंद कोसंबी (१९६६), ऐतिहासिक कादंबरीकार कॅ. वासुदेव श्री. बेलवलकर (२०००), अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न (२००३), गायिका वीणा सहस्रबुद्धे (२०१६), चित्रकार व कलासैद्धांतिक के.जी. सुब्रह्मण्यन (२०१६)

---

स्वातंत्र्यदिन : सेशल्स (१९७६)

१९७५ : स्टीव्ह वोझनियाकने पहिल्या ॲपल-१ संगणकाची चाचणी केली.
२००६ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने ग्वांटानामो बे मधल्या कैद्यांवर खटले भरण्याला कायदेबाह्य ठरवलं.
२००७ : पहिला आयफोन बाजारात आला.

३० जून
जन्मदिवस : पेटीट इस्पितळाची सुरुवात करणारे, व्हीजेटीआयला जागा देणारे देणगीदार व्यावसायिक दिनशॉ मानेकजी पेटीट (१८२३), देशभक्त, लेखक नीलमणी फुकन (१८८०), अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विचारवंत हॅरल्ड लास्की (१८९३), नोबेलविजेता लेखक चेस्लाव मिलोश (१९११), पेशीकेंद्रातल्या आम्लांवर संशोधन करणारा नोबेलविजेता पॉल बर्ग (१९२६), संगीत दिग्दर्शक कल्याणजी (१९२८), रसायनशास्त्रज्ञ सी.एन.आर. राव (१९३४), सिनेदिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (१९४३), मुष्टियोद्धा माईक टायसन (१९६६), क्रिकेटपटू सनत जयसूर्य (१९६९), क्रिकेटपटू दोड्डा गणेश (१९७३), जलतरणपटू मायकेल फेल्प्स (१९८५)
पुण्यस्मरण: कॉंग्रेसचे संस्थापक, ब्रिटिश संसदेमध्ये भारतीयांचे प्रतिनिधी दादाभाई नौरोजी (१९१७), सिनेदिग्दर्शक पुडोव्हकिन (१९५३), नाटककार, कवी बाळ कोल्हटकर (१९९४), नर्तकी व नृत्यदिग्दर्शिका पिना बॉश (२००९)

---

स्वातंत्र्यदिन : कॉंगो (१९६०)

१८५५ : जमीनदारीविरोधात आणि ब्रिटिश सत्तेविरोधात संथाळांचा उठाव.
१९०५ - अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
१९१४ - म. गांधींना द. आफ्रिकेतील भारतीयांच्या हक्कांसाठीच्या लढ्यात प्रथम अटक.
१९३४ - 'नाइट ऑफ द लाँग नाइव्ह्ज' : हिटलरने आपल्या किमान ८५ राजकीय प्रतिस्पर्ध्यांना ठार केले.
१९३६ - 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी प्रकाशित.
१९३७ - '९९९' ही जगातली पहिली आपत्कालीन दूरध्वनी सेवा लंडनमध्ये सुरू झाली.
१९४४ - 'रामशास्त्री' चित्रपट प्रदर्शित झाला.
१९७२ - UTC मध्ये पहिला लीप सेकंद आला.
१९८६ - प्रौढांमधल्या परस्परसंमतीने ठेवलेल्या समलैंगिक संबंधांना अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता.
१९९७ - हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
२००५ - स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मान्यता.