सामाजिक

ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न

Taxonomy upgrade extras: 

आजकाल ब्राह्मण समाजातील उपवर मुलांचा प्रश्न अतिशय जटील बनला आहे . सु(?)शिक्षित ब्राह्मण तरुणी या जातीपाती चा विचार न करता सर्रास आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करत आहेत. व संस्कारांच्या ओझ्याने वाकलेल्या ब्राह्मण तरुणांना लग्नाला मुली मिळत नसल्याने अविवाहित प्रौढ तरुणांची संख्या वाढत चालली आहे।

त्यात या तरुणांनी आंतरजातीय विवाह करायचे ठरवले तर मुली ना अपेक्षित असणारा स्मार्टनेस ब्राह्मण मुलात आढळत नाही . याचे कारण काय असावे ?

भारत २०११ जनगणना - विदा कुठे आहे?

Taxonomy upgrade extras: 

भारतात २०११ साली जनगणना झाली पण यातील धार्मिक विदा प्रसिद्ध केला गेला नाही. हा विदा कुठे मिळेल हे कुणी सांगू शकेल का?
दुवा http://censusindia.gov.in/Census_And_You/religion.aspx येथे फक्त २००१ चा विदाच मिळतो.
२०११ चा इतर विदा मिळतो पण धार्मिक विदा मिळाला नाही.

विदा पाहण्यासाठी इतर कोणता दुवा आहे का?

घासकडवी - नगरीनिरंजन पैज

Taxonomy upgrade extras: 

(ही बातमी वाचलीत का धाग्यावर पीक ऑइल विषयीची चर्चा फारच गमतीदार व्हायला लागली म्हणून हा स्वतंत्र धागा बनवला आहे. ऐसी अक्षरे या माध्यमातून सदस्यांनी एकमेकांशी पैसे लावून पैजा लावणे योग्य नाही. पण ही पैज एक चर्चा म्हणून महत्त्वाची वाटते.)

मुद्दा असा आहे की 'पीक ऑइल' मध्ये तेल संपणार, ऊर्जा संपणार आणि त्यामुळे प्रचंड उत्पात होणार असं अनेक जण अनेक वर्षं ओरडत आहेत.

पीक ऑईल म्हणजे तेल संपणार असे कोणीही म्हणत नाही पण पीक ऑईल थियरिस्ट्सना सरसकट दुर्लक्षित ठेवण्यासाठी अशी मतं वापरली जातात.

ऑफीसातील समस्या

Taxonomy upgrade extras: 

खरं तर ही समस्या मांडताना लाजच वाटते आहे.
ऑफीसमध्ये दर महीन्याला वाढदिवस साजरे होतात. डिसेंबर मध्ये माझा होता. जवळ जवळ अख्खा डिसेंबर मी मेलची वाट पहात होते की आज नाही उद्या साजरा होइल.
शेवटचा आठवडा (गेला) मी रजेवर गेले. अन त्या महीन्याचे वाढदिवस साजरे केले गेले.

मिनीमम वेज ( किमान वेतन)

Taxonomy upgrade extras: 

सध्या गाजत असलेल्या देवयानी खोब्रगडे प्रकरणात एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतो तो म्हंजे ‘किमान वेतन ‘ अर्थात ‘मिनीमम वेज’. इथे मी ‘मिनीमम वेज’ संधर्भात काही तांत्रिक मुद्दे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा लेख तीन भागात विभागला आहे. प्रथम विभागात किमान वेतनाला विरोध का आहे ते समजावून घेऊया आणि दुसर्या भागात त्याचा समर्थन करणारी बाजू पाहूयात. तिसऱ्या भागात दोन्ही बाजू विचारात घेऊन याची भारतातल्या घरकाम करणाऱ्या कामगानबद्दल काही उपाय निघतील का ते पाहूयात.

भाग १ -

निर्भया - दिल्ली आणि मुंबई नंतर सगळं शांत शांत का ?

Taxonomy upgrade extras: 

निर्भया बलात्कार प्रकरण खूपच वाईट होतं. या प्रकरणात मेडीया एक झाला होता आणि देशभर, नव्हे जगभरात रान पेटवलं होतं. पुढे खटला चालला, वेगवान चालला, तावातावाने चर्चा झाल्या...

पुढे काय ?

पुढे मुंबईची केस घडली. मग पुन्हा तोच घटनाक्रम.

निर्भया आणि मुंबईची घटना या दरम्यान देशभरात सगळंच आलबेल होतं का ? निभयाच्या आधी आणि मुंबईच्या नंतरही आता सगळं काही ठीक चालू आहे का ? जर निर्भयाची केस दिलीत न घडता अन्यत्र घडली असती तर त्या घटनेला इतकंच महत्व दिलं गेलं असतं का ? त्यातून ती गरीब किंवा दलित समाजातील मुलगी असती तर अशीच आग लागली असती का ?

श्री. मकरंद साठे यांच्या Identity च्या संदर्भातील मांडणी बाबत पडलेले काही प्रश्न.

Taxonomy upgrade extras: 

सर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करतो.
1-
खालील निबंधातील निवडलेला भाग ( मात्र जसा आहे तसा साठेंच्याच शब्दात) हा श्री. मकरंद साठे यांच्या सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण या अत्यंत प्रगल्भ अशा निबंधा चा एक लहानसा भाग मात्र आहे.पुर्ण पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते विकत घेउन एकवेळ जरुर वाचावे अशी आग्रहाची विनंती.
2-

पुरोगामी मराठा

Taxonomy upgrade extras: 

आमच्या वस्तीतला धोन्नाना कायम म्हणायचा , खरं बामन परवडले पण मराठा नकू , आज पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मराठा तरुणांची मते पाहून मला धोन्नानाच्या बोलण्यात तथ्य जाणवते. लाखावर उत्पन्न घेणारा उसलावा शेतकरी ज्याच्या घरीदारी टयाकटर बुलट दुध डेरी पंचायत समिती सक्रीय सहभाग इतियादी..! त्याच्या आंदोलनासाठी डोळ्यात पाणी आणणारे पुरोगामी मराठा तरुण लाखावर इनकम कमावणारा उसलाव्या रानात मजुरी करणाऱ्याला काय किती देतो याचा विचार करत नाहीत. त्यांची वास्तपुस्त करताना दिसत नाहीत .

परदेशातील भारतिय

Taxonomy upgrade extras: 

परवाचीच गोष्ट मी ज्या स्पीच क्लबमध्ये जाते तेथिल एका गोर्‍या बाईने एक "काल्पनिक" गोष्ट सांगीतली. तिला पूर्वीचा काळ रेखाटण्याची असाइनमेन्ट होती.या कथेत तिने स्वतःचे नाव गुंफले होते व ते संपूर्ण स्पीच "विचक्राफ्ट अर्थात चेटूकविद्या" या विषयाला वाहीलेले होते. "चेटूकविद्येच्या आरोपावरुन स्त्रियांना देण्यात येणारा मृत्यूदंड" ही अघोरी पद्धत पूर्वी कशी बोकाळलेली होती अन त्याविरुद्ध कोणी काय कार्य केले अशा स्वरुपाचे ते रोचक स्पीच होते.मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे त्या बाईने "इन्डियन स्लेव्ह" टुटूबा म्हणून केलेला उल्लेख.

लहान मुलांशी निगडीत प्रश्न

Taxonomy upgrade extras: 

परवा ईशान्यला (वय वर्षे ६) एका संमारंभानिमित्त एका फार्महाउसवर घेऊन गेलो होतो. तिथे त्याला बुजगावणे दाखवले. कितीतरी वेळ तो त्याच्याशी खेळत होता. तिथे लावलेले मुळा, कांदा, लसूण, कोबी, इ इ दाखवले. मग परत येताना मॉल मधे गेलो. तिथे एक अतिशय उंच टप्पा खाणारा चेंडू घेऊन दिला. गेमच्या तीन सीडी घेतल्या. 365 stories of animals/faries/ghosts/bedtime/mythology अशी १०-१२ पुस्तकांची सीरीज आहे. त्यातली तीन पुस्तकं उचलली. त्यातली माहिती आणि चित्रं अत्यंत गोड! मला एक dvd player घ्यायचा होता. म्हणून जंबोच्या दुकानात गेलो. Electronics च्या दुकानात ईशान्य पेटूनच उठतो.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक