सामाजिक

नव्या दृष्टीकोनाच्या मिमचे लागणदार

Taxonomy upgrade extras: 

"डाऊन वुइथ नॉस्टॅल्जिया" वर विचार करता करता माझा मेंदू मिम्सच्या ( मराठी मनुके?) बाबतीत विचार करू लागला. ज्याप्रमाणे जनुके व्हायरससारखी असतात आणि स्वतःच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतात त्याप्रमाणे विचारांचे हे मिम्सही व्हायरससारखे असतात आणि एका डोक्यातून दुसर्‍या डोक्यात स्वतःच्या प्रतिकृती तयार करून स्वतःचे अस्तित्व टिकवू पाहतात.

वैद्यकात वस्तुनिष्ठता

Taxonomy upgrade extras: 

एकूण विज्ञानात, आणि विशेषतः वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते, असे लोक म्हणतात. याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर परंतु लोक असेही मानतात, की वैज्ञानिक-वैद्यकात वस्तुनिष्ठतेच्या अतिरेक होतो आहे आणि वैज्ञानिक-डॉक्टर बिगर-वस्तुनिष्ठ विधांच्या फायद्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वैज्ञानिक-वैद्य हे वस्तुनिष्ठतेमुळे अहंमन्य झाले आहे, असा विचार काही जणांच्या मनात येतो.

मला मात्र ही दुसरी बाब इतकी सोपी वाटत नाही. अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते आहे, असे मला वाटते.

आई, असं का ग केलंस?

Taxonomy upgrade extras: 

मित्रानो हे एका अतीशय संवेदनशील विषयावरचे काही मला वाचायला मिळाले.
एखाद्या जिव्हाळाच्या विषयावरचे हे लिखाण वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते.
ज्यानी हे मनोगत लिहिले त्याच्या भावना एखाद्या आईच्या/बापाच्या/सासू सासर्‍यांच्या पर्यन्त आपल्याला पोहोचवता आल्या तरी खूप काही मिळवले
खरेतर काही अपरीहार्य वैद्यकीय कारणामुळे होणारी भ्रूण हत्या सोडता सरसकट होणारी स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे.

मुल्ला नसीरुद्दीन

Taxonomy upgrade extras: 

काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्‍या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे. त्यातच कधी अद्वैतचे आजी आजोबा खाउ खायला बोलवत, गोष्टी सांगत, पुस्तके वाचायला देत.

.

Taxonomy upgrade extras: 

.

डाऊन वुइथ नॉस्टाल्जिया !

Taxonomy upgrade extras: 

"गेले ते दिन गेले ! किंवा 'काय घोर कलियुग आले' या दोन्ही वाक्यांमधे तसं काही तथ्य नाही. प्रत्येक काळाचं काही अधिक-उणं असतंच. पण ते दिसण्यासाठी भूतकाळात गाडलेली नजर वर्तमानाकडे वळवायला तर हवी. आपल्याकडे मात्र सगळे उमाळे-उसासे जुन्या काळासाठीच राखून ठेवणारी मंडळीच जास्त. त्यांच्यासाठी स्मरणरंजन हेच मनोरंजन ! पण कोणतीही रेकॉर्ड जेव्हा "गतस्मृतिंना उजाळा" देण्याकरताच बनवली जाते तेव्हा तिच्यात "गुणवत्तेशी अपरिहार्य तडजोड" केलेली असणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही "अहाहा, ओहोहो" करा हो , अशा रेकॉर्डीतून फक्त 'खरखरच' ऐकायला येते हे त्रिवार सत्य आहे. "

मराठीत अनुवादित आवडत्या कथा-कादंबर्‍या

Taxonomy upgrade extras: 

(मराठी वाचकांची आवड बदलली आहे का? या चर्चेतले रोचक अवांतर दुसर्‍या चर्चेसाठी वेगळे काढले आहे.)

अनुवादित पुस्तके वाचणे म्हणजे आवड बदलणे असे म्हणणे गैर आहे, उलटपक्षी एका नविन लिखाणाची भरच मराठित पडत आहे असे म्हंटले पाहिजे.

आवड बदलते आहे म्हणण्यापेक्षा आवड विस्तारत आहे असे म्हणणे उचित राहील काय?

शाळेची वेळ

Taxonomy upgrade extras: 

महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते.
विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात.
सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात.

शिरोरेखा

Taxonomy upgrade extras: 

जर तुम्ही तीसचाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मराठी पुस्तकाचं एखादं पान अाणि अलीकडच्या पुस्तकाचं पान पडताळून पाहिलं, तर एक फरक स्पष्ट जाणवतो. पूर्वी शब्दांवरची शिरोरेखा दोन अक्षरांमध्ये तोडली जात असे, तर अलीकडे ती एकसंध असते. हा फरक अर्थात typesetting संगणकांवर होत असल्यामुळे उद्भवलेला अाहे. नेटवर जिथेजिथे मराठी पहायला मिळतं, तिथे कुठेही शिरोरेखा तोडलेली मी पाहिलेली नाही, अाणि माझ्या समजुतीप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या कुठल्याही editor मध्ये ती तशी तोडण्याची सोय नाही.

लैंगिक उपासमार व गुन्हेगारी

Taxonomy upgrade extras: 

'आपल्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नवर्‍याला मारुन त्याच्या मांसाचा बायकोने कुर्मा बनवला' अशा आशयाची बातमी आजच्या "टाईम्स" मध्ये वाचली. 'सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार', 'दरोड्यादरम्यान साठ वर्षाच्या वृद्धेवर सामूहिक बलात्कार' अशा बातम्या बर्‍याच वेळा वाचनात येतात. पंधेर आणि कंपनीचे निठारी वासनाकांड कोण विसरेल? अशा लोकांना सरसकट 'लिंगपिसाट', 'कामपिसाट', 'वासनांध पशू' अशी निर्भत्सनावाचक विशेषणे लावली जातात.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक