सामाजिक

अनुकंपा

Taxonomy upgrade extras: 

या धाग्यावरून चर्चा इथे हलवली आहे.

श्री.गुगळे यानी प्रस्तुत केलेल्या धाग्यातील मुख्य विषयाशी नव्हे तर त्या अनुषंगाने प्रकट झालेल्या काही प्रतिसादातील भावना आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यावर हा प्रतिसाद देत आहे :

१. श्री.आडकित्ता : "सरकारी नोकरांनी स्वतः करता तयार केलेल्या अनेक 'अ‍ॅडाप्टेशन्स' पैकी ते अनुकंपा एक. अनुकंपेचा निषेध!"

भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही.

Taxonomy upgrade extras: 

देशापुढील अनेक समस्यासह, भ्रष्टाचार, महागाईसारखे अनिर्णीत आणि अनियंत्रित प्रश्नांमुळे समाजात सतत रोष वाढत चालला आहे; पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून झटपट पैसा मिळवण्याची स्पर्धा दिसून येत आहे. आर्थिक धोरणे पूर्वी सामाजिकतेवर आधारित होती, आता त्यांचे लक्ष्य बदलले आहे. सामाजिकतेऐवजी भांडवल उभारणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक समतेच्या उद्देशाने आखण्यात येणा-या मोठमोठय़ा योजनांनासुद्धा भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने त्यांचे लाभ अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. मोठय़ा संख्येने जागृत होणा-या समाजाला, तरुणवर्गाला या उणिवा आणि चलाखी चटक्न कळते.

शिव्या

Taxonomy upgrade extras: 

काही कारणा निमीत्ताने एस.टी. महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागला होता, भर दूपारी शिवाजीनगर स्थानकावरच बसमधे चढ्लो, बस तशी रीकामी होती व सूटायला बराच वेळ होता, माझ्या मागे हिरव्या रंगाची सूरेख साडी नेसलेली हसतमूख स्त्रि तीच्या नवर्‍यासोबत प्रसन्न चेहर्‍याने बसली होती. सोबतच मांडीवर काही महीन्याच एक मूलही झोपी गेलं होत. जोडपं एखाद्या तालूक्यात राहणारं वाटत होतं. नवरोबा शांत गंभीर पण चेहर्‍यावर सहजभाव ठेऊन निवांत बसले होते एकूणच जोडपं सूशील वाटत होतं, जोपर्यंत त्या स्त्रिने मोबाइल उचलला न्हवता... जसा फोन तीने तोंडाला लावला, सूरूवातच दरडावणीच्या सूरात केली....

Dual SIM मदत/सल्ला हवाय....

Taxonomy upgrade extras: 

एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?

१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)

२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्‍या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.

बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसादांना मिळणाऱ्या श्रेणी आणि आता धाग्यांनाही मूल्य देता येणं या सुविधांवर अनेक मतमतांतरं वाचतो आहे. मराठी आंतरजालावर याविषयी अजूनही चर्चा होत राहणार हेही जवळपास निश्चित आहे. कोणतीही गुणवत्तानिर्देशक व्यवस्था ही अधिकाधिक निर्दोष कशी करता येईल हा प्रश्न कठीण आहे. गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं. बुकर पारितोषिकाच्या निमित्तानं नुकतंच उठलेलं वादळ मला या निमित्तानं आठवलं. त्याचा हा थोडक्यात परिचय. त्या अनुषंगानं साहित्यिक दर्जाविषयी चर्चा होऊ शकते किंवा धागे आणि प्रतिसादांच्या श्रेणी यांवरही काही मुद्दे मांडले जाऊ शकतात.

..

Taxonomy upgrade extras: 

धन्यवाद......

आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?

Taxonomy upgrade extras: 

आभासी दुनिया ही काही नवीन कल्पना नाही. लहानपणी मायावी राक्षस, सुंदर पर्‍या, चेटकिणी आणि जादुगार यांच्या सोबतीने आपण या दुनियेत प्रवेश करतो. पुढे जसजसे मोठे होतो, तसतसे आपल्याला दोन्हीतल्या फरकाची जाणीव होते, आणि वास्तव व आभास यांच्यातली सीमारेखा आपण आपल्यापुरती निश्चित करतो ...किंवा करायचो असे म्हणूया. आंतरजाल आणि फेसबुक यांमुळे वाढत्या वयातली नवीन आभासी दुनिया तयार होत आहे. या दुनियेत प्रत्येकजण जादुगार आहे, स्वता:चे व्यंग, वय, दोष लपवून स्वता:हाला हवे तसे रंगवून स्वता:ची विक्री करण्याचे स्वातंत्र आहे. शिवाय ही जादू वापरून, मैत्री एकदम जोडता किंवा तोडताही येते.

.

Taxonomy upgrade extras: 

.

खालपासून वरपर्यंत!

Taxonomy upgrade extras: 

या संस्थळावर सदस्य झाल्यापासून सगळं नवंनवंच वाटतंय.
काही धाग्यांवर प्रतिसाद वरपासून खालपर्यंत दिसतायत तर काही धाग्यांवर ते खालपासून वरपर्यंत.
आम्ही तर बुवा सेटिंगच्या टॅबला हातपण लावला नाही
ही नेमकी काय भानगड?

नविन प्रतिसाद पहिल्यांदा वाचताना त्या अगोदरचा प्रतिसाद कळलाच नसल्याने कन्फ्यूजन होतंय बाई.
कुणी कोडे माझे उकलील का?

उदा.

"सुगरण"वर प्रतिसाद खालून वर (वेळेनुसार)

जायला हवे (Score:2)
क्रेमर

विकतचे दुखणे

Taxonomy upgrade extras: 

कालच माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. गेल्या शुक्रवारीतिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.
पोटावर सबंध बँडेज बांधले होते.स्कर्ट्वर रक्ताचे डाग दिसत होते. डॉक्टरांनी तिला दिवसा अर्धा तास झोप आणि ५ मिनीटे चालणे असा दिनक्रम सांगीतला होता. बरंएवढच नाही तर रात्रीकरता - अँटीबायोटीक, झोपेची गोळी, पेनकिलर प्रिस्क्राइब केल्या होत्या. तरीदेखील उलटीसदृश भावना झाल्यास अजून काही गोळ्या दिल्या होत्या. एक तर झोपेची गोळी अ‍ॅडीक्टीव्ह असते. Sad

पाने

Subscribe to RSS - सामाजिक