सामाजिक

जय भिम कॉम्रेड – सरकार किंवा समाजावर टीका का हवी?

Taxonomy upgrade extras: 

(हा धागा एका चित्रपटाबद्दल सांगतो, पण त्याची समीक्षा करणं हा माझा हेतू नाही. तर चित्रपटात मांडलेले मुद्दे काय आहेत ते सांगणं एवढाच या धाग्याचा हेतू आहे. असे मुद्दे मांडणं लोकशाहीत का आवश्यक आहे हे त्याद्वारे स्पष्ट होईल अशी आशा आहे.)

एखादा ज्वलंत किंवा सनसनाटी विषय घेऊन माहितीपटाच्या (डॉक्युमेंटरी) माध्यमातून त्यावर काहीतरी धारदार म्हणणं हे आनंद पटवर्धन यांनी गेली अनेक वर्षं सातत्यानं केलं आहे. त्यांच्या ‘जय भिम कॉम्रेड’ या ताज्या चित्रपटाचं हेच स्वरूप आहे. १९९७मध्ये मुंबईच्या रमाबाई आंबेडकर नगरात जो पोलीस गोळीबार झाला त्या घटनेला केंद्रस्थानी घेऊन एकंदर दलितांच्या स्थितीविषयी यात भाष्य केलेलं आहे.

इंटरनेटवरच्या पॉर्न साईट बघुन आपण काय साधतो?

Taxonomy upgrade extras: 

मी इंटरनेटवरच्या अनेक पॉर्न साईट बघतो आणि मला प्रश्न पडतो की ज्याचा आपल्या आयुष्याशी यत्किंचितही संबंध नाही अशा साईट बघुन आपण काय साधतो?

प्रेयर्स फॉर बॉबी

Taxonomy upgrade extras: 

तीन चार वर्षापूर्वी शिक्षणानिमित्य पुण्याला जावून राहण्याचा योग आला, नवीन बरेच मित्र मिळाले. आत्ता मी पुण्यात नसतानाही हे मित्र कायम फोनवरून, ईमेलवरून संपर्कात असतात, त्यापैकी एका मित्राच्या बाबतीत अतर्क्य घडले, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. वास्तविक मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला चांगला ओळखतो. उच्चशिक्षित कुटुंब त्याचे. लगेच मी पुण्याला गेलो आणि तिथे कळले की ह्या मित्राला लग्नाचा घरी आग्रह झाला तेंव्हा त्याने असे केले. त्याला काय वाटते त्याची त्याने आई वडिलांना अगोदरच कल्पना दिली होती पण ते ऐकून वडिलांना धक्का आणि आई संतापली होती.

वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवता-वाढवता येईल?

Taxonomy upgrade extras: 

आज भारतीय विज्ञान दिवस. सी व्ही रामन यांनी याच दिवशी आपला शोध जाहीर केला होता त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.

एन आर आय मराठी लोक

Taxonomy upgrade extras: 

माझ्या मैत्रिनिने मला या साइतचा पत्ता दिला म्हणून मी इथे आले. सुरवातीला मराठि लिहिण्याच्या प्रयत्न केला पण जमले नाहि. हळुहळु शिकेन असे वाटते.

मी गेली काही वर्शे अमेरिकेत रहाते. या साइतवर ज्या प्रकारची चर्चा वाचन वगेरे गोष्टिन्वर केली जाते ते पाहुन आनन्द झाला. इथल्या चर्चेमुळे नवी पुस्तके कळली.

कलेतील कर्मठपणा

Taxonomy upgrade extras: 

(अस्ताद नावाचे वस्ताद या धाग्यावरच्या प्रतिसादांमधून चर्चा 'कलेतील कर्मठपणा' या विषयाकडे वळलेली दिसली. महत्त्वाचा व रोचक विषय असल्याने ती चर्चा वेगळी काढलेली आहे. चर्चेची सुरूवात नृत्यावरून झालेली असली तरी नव्याजुन्याची सांगड इतरही कलाप्रकारांमध्ये कमीजास्त दिसते का? त्या विशिष्ट प्रकाराला ती स्थिती पोषक/मारक आहे का? अशी चर्चा अपेक्षित आहे - ऐसीअक्षरे)

नवीन विषयाला हात घातल्याबद्द्ल आणि ऐसीअक्षरेच्या वाचकांना देबूजींची ओळख करून दिल्याबद्द्ल घन्यवाद!

पालकनीती कशासाठी? - एक भूमिका

Taxonomy upgrade extras: 

पंचवीस वर्षांपूर्वी ‘पालकनीती’ हे मासिक डॉ. संजीवनी कुलकर्णी यांनी पुण्यातून चालू केले. त्या वेळीच्या अंकामध्ये त्यांनी मांडलेली ‘पालकत्वा’ची भूमिका आजही तितकीच ताजी आहे... त्यांचा मूळ लेख तसाच्या तसा इथे देत आहे...अधिक लेखांसाठी पहा -- http://www.palakneeti.org/

------------------------------------------------------------------------------------
एखादी कल्पना मनात उपजते तेव्हा त्याचं तात्कालिक असं एखादं कारण असतं आणि ही विचारांची वाटचाल मात्र फार आधीपासून सुरू होती असं लक्षात येतं.

फिल्मफेयर अॅवार्ड (?)

Taxonomy upgrade extras: 

जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि डर्टी पिक्चरला मिळालेले (फिल्मफेयर) अॅवार्ड –
रणबीर कपूर आणि विद्या बालनला अनुक्रमे बेस्ट अॅक्टर (रॉकस्टार) आणि बेस्ट अॅक्ट्रेस (डर्टी पिक्चर) अॅवार्ड मिळाले.
बेस्ट फिल्म - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट डायरेक्टर – झोया अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट डायलाॅग – फरहान अख्तर - जिंदगी ना मिलेगी दोबारा
बेस्ट मुझिक – ए आर रेहमान - रॉकस्टार
बेस्ट स्टोरी – आय एम कलाम
लाइफ टाईम अचीव्हमेंट अॅवार्ड – अरुणा इराणी

माहितीवजा पुस्तकांची मराठीमधली बाजारपेठ

Taxonomy upgrade extras: 

"अलिकडे काय वाचलं" ? किंवा "अलिकडे काय पाहिलं ?" यांसारख्या धाग्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद अर्थातच या विषयांच्या लोकप्रियतेची ग्वाही देणारा आहे. आपण सर्व काही ना काही अधून मधून पहात/वाचत असतोच. एकंदर या धाग्याचा एक उपयोग नवनवी पुस्तके आणि विषय यांची माहिती होण्यासाठी आहे त्याच प्रमाणे , "अलिकडे लोक काय वाचतात ?" या प्रश्नाचे - त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या वाचकवर्गापुरते - उत्तर मिळण्यासाठीही करता येऊ शकेलच.

सरकारी हस्तक्षेप

Taxonomy upgrade extras: 

सरकारचा आपल्या आयुष्यात किती हस्तक्षेप असावा असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडत नाही. नशीबाने आपल्यापैकी बरेच लोकं कागदोपत्री भारतीय आहेत असं अनेकदा वाटतं. देशाबाहेर पडले नसते तर याची कल्पनाच आली नसती. पाश्चात्य देशात मिळणारं व्यक्तीस्वातंत्र्य भारतापेक्षा बरंच जास्त असतं यात मला फारशी शंका नाही. पण सरकार आपल्या रोजच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करतं? आणि कोणत्या गोष्टींना हस्तक्षेप म्हणावा आणि कोणत्या गोष्टींना शिस्त?

पाने

Subscribe to RSS - सामाजिक