सामाजिक

मराठी वाचकांची आवड बदलली आहे का?

Taxonomy upgrade extras: 

नुकत्याच एका मराठी पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. साधारण लाखभर पुस्तके प्रदर्शनात होती. फेर्‍या मारता मारता असे लक्षात येत होते की एकूणात कादंबर्‍यांची संख्या खूपच कमी आहे. बरीचशी पुस्तके ज्योतिष, आरोग्य, ललित, प्रवास, कविता, स्पर्धा परिक्षा, विज्ञान इ. विषयांचीच संबंधित होती. संयोजकांशी या विषयावर बोललो असता ते म्हणाले की हल्ली लोक कादंबर्‍या खूपच कमी वाचतात. कदाचित मराठीत समर्थ कादंबरीकारांची घटती संख्या याचाही हा परीणाम असावा.

फटके दिले पाहिजे'

Taxonomy upgrade extras: 

दारूड्यांना मंदिराबाहेर खांबाला बांधून फटके दिले पाहिजे'
या अण्णा हजारेंच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अण्णांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदविला आहे तर कॉंग्रेसने याला 'तालिबानी उपाय' असल्याचे म्हटले आहे.
...

1..दारुडा कोणाला म्हणावे?
२...ज्या स्त्रीया दारुड्या आहेत त्यांना पण फटक्यांची् शिक्क्षा देणार का?
३.. गटारी अमावास्येच्या दिवशी नेमके काय होईल?
४..मल्या..व दारु उत्पादक यांना किति फटके मारणार?
५..अण्णांचा आसुड..हि पुस्तिका निघणार का?

ऐसीवर वेगळे काय? - लेख काढला आहे.

Taxonomy upgrade extras: 

संकेतस्थळांवर जाहीर टिप्पणी करणे हे अयोग्य आणि घातक असू शकते याची पूर्ण कल्पना असताना असा प्रमाद माझ्या हातून कसा घडला असावा बरे असे वाटते. Wink तरीही, हा चर्चाप्रस्ताव संपादित करून मी झाल्या प्रमादाचे प्रायश्चित्त घेत आहे.

ही चर्चा उगीच पुन्हा वर आल्याचा खेद वाटतो. चर्चा अप्रकाशित करण्यास माझी ना नाही तरीही काही सदस्यांचे प्रतिसाद महत्त्वाचे वाटत असल्यास ती ठेवली तरीही माझी ना नाही. शक्य असल्यास ती दुसर्‍या पानावर ढकलावी ही विनंती.

पद्मभूषण रामचंद्र गुहा

Taxonomy upgrade extras: 

"इकॉलॉजी अँड इक्वुइटी" चे जुने गुहा आता राहिले नाहीत,"

तुम्हाला आवडलेली कोणतीही दोन पुस्तके

Taxonomy upgrade extras: 

ऐसी अक्षरे या मराठी संस्थळावर आल्यापासून आणि सदस्यांचे लेखन वाचताना असं वाटलं कि इथला सदस्य वाचनप्रेमी आहे. वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकाला कोणते ना कोणते एक पुस्तक सगळ्यात जास्त आवडतेच, मला आवडलेली दोन पुस्तके 'स्मृतिचित्रे' आणि 'बहार' अशी आहेत.
'स्मृतिचित्रे' अर्थातच लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र आहे, मी हे पुस्तक पहिल्यांदा नववीत असताना वाचले, फारसे काही कळले नाही पण काहीतरी वेगळे आहे असे त्यावेळी वाटल्याचे स्मरते. त्या नंतर अनेक पारायणे झाली या पुस्तकाची, आत्ता पर्यंत वाचलेल्या सगळ्या पुस्तकात मला सगळ्यात जास्त हे पुस्तक आवडते.

दिवाळी अंकांचा लेखाजोखा

Taxonomy upgrade extras: 

२०११ सालची दिवाळी आली आणि गेली. दिवाळीशी संबंधित उत्सवाइतकंच तिच्या सांस्कृतिक संदर्भाचंही महत्व वेगळं सांगायला नको. फटाके, कपडेलत्ते, फराळ, स्नेहसंमेलनं यांच्या जोडीने रांगोळी , संगीताच्या मैफली आणि अर्थातच दिवाळी अंक हे येणारच. प्रस्तुत लेखात यंदाच्या दिवाळी अंकांबद्दल जी मतेमतांतरे बनत आहेत त्याबद्दल बोलावे असे वाटले म्हणून हा लिखाणाचा प्रपंच.

मराठी आंतरजालावरही दिवाळी अंकांची परंपरा चांगलीच जोम धरते आहे. बहुतेक सर्व सुप्रसिद्ध मराठी स्थळांचे दिवाळी अंक प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत लेखात मात्र, अनेक दशकांची परंपरा असलेल्या छापील मराठी दिवाळी अंकांबद्दल थोडं बोलेन म्हणतो.

(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

Taxonomy upgrade extras: 

शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

एक हे विश्व, शून्य हे विश्व

Taxonomy upgrade extras: 

विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते.

शून्य
कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही.

दुसरं लग्न

Taxonomy upgrade extras: 

आपल्या आजूबाजूला बघितलं तर ज्या लोकांनी दुसरं लग्न केलंय (मग ते पहिल्या जोडीदाराशी फारकत घेऊन असो की जोडीदाराच्या पश्चात) त्या व्यक्तीविषयी/त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी आपलं मत त्या व्यक्तीची सर्वसाधारण पार्श्वभूमी बघून बनवतो. दुसऱ्या लग्नाचा निर्णय कितीही वैयक्तिक असो, लोकांची मते ही असतातच, आणि ती ते व्यक्तंही करतात. पुरुषाने पत्नी निवर्तल्यावर दुसरे लग्न करणे काही गैर मानले जायचे नाही (किंवा काही प्रसंगी दोन बायकाही असायच्या). पण विधवाविवाह मात्र सर्वमान्य नव्हता किंवा आताही तेवढा नाही. पण काळ बदलला आणि विधवाविवाहही व्हायला लागले.

‘..और हम कर भी क्या कर सकते है.?’

Taxonomy upgrade extras: 

भूका रहना आप के यहॉँ आजकल ‘फॅशनेबल’ हो गया, फास्ट इज अ‍ॅन इव्हेण्ट फॉर यू.! यहां जो सालोंसे ‘भूका’ है. उस को क्या फर्क पडता है.? यहॉँ वो इरॉम शर्मिला सालोंसे फास्ट कर रही है.उस को ग्लॅमर नहीं मिला.तो कॉमन मणिपूरी भूक से मर भी जाए.तो क्या बडी बात है.!’
-इम्फाळ मधे राहणारी केम लोटिंगबाम. सरकारी नोकरी करते. नवराही कमावता. कुठलंही मध्यमवर्गी कुटूंब असावं तसंच केमचं घर, पैसा आहे गाठीशी. पण त्याचा उपयोग काय.? तिच्या दोन वर्षाच्या मुलाला अस्थमा आहे. खोकून खोकून मुलाचा श्वास कोंडताना पाहण्यापलिकडे केमकडे दुसरा पर्याय नाही. इम्फाळमधे आजच्या घडीला तरी तिच्या लेकावर उपचार होऊ शकत नाहीत.
होणार कसा.?

पाने

Subscribe to RSS - सामाजिक