Skip to main content

कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये पाच) - न आवडलेली जाहिरात

कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये पाच) ची एक जाहिरात बघण्यात येत आहे.
अतिशय घाणेरडी व घाणेरडे/त्याज्य संस्कार करु पहाणारि ही जाहिरात आहे असे माझे मत बनलेले आहे.
दोन मुली, पर्क्स खात असतात, एक कारवाला येऊन कार पार्क करतो. मुलिंना "काहितरी सुचते", त्या समोरच्या पाणीपुरीवाल्या भैय्याला त्या कारकडे लक्ष ठेवायला सांगतात, व बाजुला होतात. थोड्यावेळाने तो कारवाला येतो आत बसतो, भैय्याला ते दिसताच त्यास तो कारवाला चोर वाटतो व भैय्या त्याला धरतो, तेव्हा मुली येऊन भैयाला म्हणतात, भैय्या हे असे ठीक नाही, आम्ही फक्त कार कडे बघ असे सांगितले होते.

वर वर पहाता ही निरुपद्रवी वाटते. या जाहिरातीचे "टारगेट" प्रेक्षकवर्ग हा अल्पवयीन बालकेच आहेत. मोठ्यांना कदाचित यात "विशेष" वाटणारही नाही, कारण आपले मन व कातडी वाढलेल्या वयपरत्वे बरीचशी गेन्ड्याची झालेली असते.

पण प्रत्यक्षात जाहिरात बघणार्‍या अल्पवयीन प्रेक्षकांवर खोटे बोलणे, दुसर्‍याची फजिती करणे, खोटे बोलुनही त्यातुन सुटणे, या संस्कारांबरोबरच, छुपेपणे भैय्याचा चांगुलपणा वाया जाणे/जातो हा संस्कारही होतो आहे. भैय्याचा "लक्ष ठेवण्याचा" चांगुलपणा असा वाया जात असेल, तर एकतर असा चांगुलपणा कुणावर करूच नये हा संस्कार होतो. सर्रास गमती/मजे/करमणुकीखातर खोटे बोलून/दिशाभूल करुन दुसर्‍याची फजिती करुन परत त्याल्लाच मूर्खात काढण्याचा संस्कारही इथे होतो.

बर हे केल्याने वा करण्याकरता कॅडबरी पर्क्स खावे असा काही संदेश कॅडबरी कंपनीला द्यायचा आहे काय?

ही जाहिरात अजिबात आवडत नाही. मी व लिम्बी दोघे मिळून जाहिरातीच्या लेखकास/दिग्दर्शकास व कॅडबरी कंपनीस शब्दशः "शिव्या" घालतो व ते समोर आले तर मोजुन दहावीस पैजारा माराव्यात याबद्दल आमच्यात एकमत होते.

आपल्याला काय वाटते?

तिरशिंगराव Fri, 08/05/2015 - 13:21

In reply to by अंतराआनंद

खरं तर कॅडबरीच्या जाहीराती बर्‍याच चांगल्या असतात.
या वाक्याने आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वी जिन्याच्या पायर्‍यांवर बसून हात आणि तोंड चॉकलेटने बरबटलेली मोठी मुले दाखवली होती. ती जाहिरातही किळसवाणीच होती.

मेघना भुस्कुटे Fri, 08/05/2015 - 13:48

In reply to by तिरशिंगराव

अतिअवांतर: काहीही खाताना हात-तोंड बरबटवून खाणे म्हणजे प्रचंड मादक ही जी काही आचरट समजूत हल्ली बोकाळली आहे, तिचा यानिमित्ताने जळजळीत निषेध.

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 15:20

In reply to by मेघना भुस्कुटे

कत्रिनाच्या गुलाबी ओठांच्या कळ्यांवर आंब्याच्या रसांचे मोती यात समाविष्ट की वगळलेले? समाविष्ट असेल तर कडकडीत असहमती!

बाकी आमरस, ताक, कढी, आमटी वगैरे चमच्याने खाणार्‍यांना तो हाताने ओरपून/भूरके मारत खाताना चुकून कोपरापर्यंत ओघळ गेलाच तर तो चाटण्यात मजा आहे हेच (खरंतर हे हाताने खाण्यातही मजा आहे हेही कदाचित) पटणार नाही वगैरे आलेच!

===

कारमधील दोन चालकांच्या ओठाखालील कॅडबरीच्या डागाचा उपयोग केलेली अ‍ॅडही मला आवडली. अजिबातच किळस बिळस वाटली नै!

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 15:24

In reply to by ऋषिकेश

कत्रिनाच्या गुलाबी ओठांच्या कळ्यांवर आंब्याच्या रसांचे मोती यात समाविष्ट की वगळलेले? समाविष्ट असेल तर कडकडीत असहमती!

असहमतीदेखील निषेधासारखीच असावी हे बाकी रोचक आहे.

बाकी आमरस, ताक, कढी, आमटी वगैरे चमच्याने खाणार्‍यांना तो हाताने ओरपून/भूरके मारत खाताना चुकून कोपरापर्यंत ओघळ गेलाच तर तो चाटण्यात मजा आहे हेच (खरंतर हे हाताने खाण्यातही मजा आहे हेही कदाचित) पटणार नाही वगैरे आलेच!

कडकडीत(?) असहमती. हाताने खाल्ल्यास ओघळ अन तोही कोपरापर्यंत वगैरे येऊ देणे हे क्रमप्राप्त तर आजिबातच नाही.

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 15:29

In reply to by बॅटमॅन

हाताने खाल्ल्यास ओघळ अन तोही कोपरापर्यंत वगैरे येऊ देणे हे क्रमप्राप्त तर आजिबातच नाही

ब्रह्मानंदी टाळी (नी भूक) लागल्यावर कसला ओघळ नी कसलं काय.. खाणं चविष्ट लागलं की दे हाण तिच्या फुल्या फुल्या फुल्या! :P

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 15:39

In reply to by बॅटमॅन

नसेल काहिंचा त्या टप्प्याला पोचूनही ओघळ वगैरे निघत! पण म्हणून ओघळ किळसवाणा! छे छे!
उलट तल्लीन होऊन खाणार्‍याचा चुकून निघालेला ओघळ किळसवाणा वाटणे अगदीच "मेजावर जेवणार्‍या" फिरंग्यांचा दृष्टीकोन वाटतो! :P

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 15:44

In reply to by ऋषिकेश

उलट तल्लीन होऊन खाणार्‍याचा चुकून निघालेला ओघळ किळसवाणा वाटणे अगदीच "मेजावर जेवणार्‍या" फिरंग्यांचा दृष्टीकोन वाटतो!

तेच तर, मुळात हाताने खाणे म्हणजे ओघळपाघळादि कशाचेही समर्थन करणे हेही अंमळ अतिच वाटते.

बाकी हे फिरंगीही गेल्या काही शे वर्षांतच चमचे वगैरे वापरू लागले आहेत. अगोदर तेही फुल हातानेच लेगपीस चापत असत. अन वर तोंड करून जगाला शहाणपणा शिकवतात *****.

मेघना भुस्कुटे Fri, 08/05/2015 - 16:09

In reply to by बॅटमॅन

बाप रे! इथे रामायण घडून गेलं की.

बादवे, मला कशाचीही ऑब्जेक्टिवली किळसबिळस वाटत नाही. (हे वाक्य मराठीत शिवून मिळेल काय?) पण ’बरबटवून = (आपोआप) मादक’ या समजुतीला तळतळून विरोध आहे.

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 16:21

In reply to by मेघना भुस्कुटे

’बरबटवून = (आपोआप) मादक’ या समजुतीला तळतळून विरोध आहे.

बरबटणे म्हणजे सो कॉल्ड उत्फुल्ल उन्मुक्त आणि म्हणून मादक अशी अडाणचोट समजूत आहे ती.

'न'वी बाजू Fri, 08/05/2015 - 16:28

In reply to by बॅटमॅन

तळतळून विरोध

येथे 'तळतळून' हा 'नाचनाचुनी अति मी दमले'मधील 'नाचनाचुनी'सारखा काही प्रकार आहे काय?

इन विच केस, रिझल्टण्ट विरोध हा साजूक तुपातला, की डालड्यातला?

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 16:31

In reply to by 'न'वी बाजू

नेमकी अशीच काहीशी शंका मलादेखील आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 08/05/2015 - 16:43

In reply to by बॅटमॅन

या शब्दाबद्दल संभाव्य प्रतिसादाची अपेक्षा होतीच. ’तळतळाटा’मधून कातरून काढलेला शब्द आहे तो. फार नेमका आहे असं नव्हे, पण चूष म्हणून वापरला. (आता ’चूष’बद्दल! लगे रहो...)

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 16:46

In reply to by बॅटमॅन

खिक्!

ओघळ वगैरे बघून किळसवगैरे कोणी व्यक्त केली की डोळ्यापुढे साराभाई व्हर्सेस साराभाई मधील मधील रत्ना पाठक-शहाच आठवते! या अशा गोष्टींना "इट्स सो मिडलक्लास!" म्हणत स्नॉब करणारी थोर्थोर अ‍ॅक्टिंग तीच करू जाणे!

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 15:27

In reply to by 'न'वी बाजू

होय, काही झैराती आहेत खर्‍या तशा. कोपरापर्यंत रसगुल्ल्याचा ओघळणारा पाक चाटून खाणारी एक हावरट कुरंगनयना एका जाहिरातीत दिसली होती. तिचे कुरंगनयनत्व तत्क्षणी रासभजघनमंडळी गेले.

(स्वगतः सटवे, काय दुष्काळातनं आलीस की काय?)

अत्रस्थांच्या दुटप्पी प्राकृतद्वेषापोटी हा शब्द वापरावा लागला.

'न'वी बाजू Fri, 08/05/2015 - 15:51

In reply to by बॅटमॅन

(झैरात पाहिलेली नसल्याकारणाने मादकत्वाबाबत वा त्याच्या अभावाबाबत काही टिप्पणी करणे असंभव आहे, ते एक असो, पण...)

'कुरंग' बोले तो? कृपया प्राकृतात प्रतिपादावे, जेणेकरोन अस्मादिकांस आकलन संभवावे.

(अतिअवांतर: अत्रस्थांचा द्विमुखी प्राकृतद्वेष माहिषयोनीप्रति मार्गक्रमण करता झाला.)

..........

(किंवा, आमचे बॉर्न-अँड-ब्रॉट-अप-इन-कोल्हापूर दिवंगत उपयुक्त पशुवर्य प्रतिपादत, त्यानुसार, "लोक तोंडानेही बोलतात नि गां*नेही बोलतात." सबब, त्याची - बोले तो, लोकांची अ‍ॅज़ वेल अ‍ॅज़ लोकापवादाची - रवानगी सुयोग्य गन्तव्यस्थानीच करणे इष्ट नव्हे काय?)

बॅटमॅन Fri, 08/05/2015 - 15:54

In reply to by 'न'वी बाजू

कुरंग = हरीण.

http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+kuran…

बाकी करवीरप्रांतीची शिवीपरंपरा अतिशय महान, समृद्ध आणि उत्तरोत्तर वर्धिष्णू आहे हे खरेच. आमचे तीर्थरूपही काही खास वेळी तिथले वाक्प्रचार वापरीत तेव्हा लै मज्जा येत असे.

'न'वी बाजू Fri, 08/05/2015 - 15:59

In reply to by बॅटमॅन

कुरंग = हरीण.

आभार.

बाकी करवीरप्रांतीची शिवीपरंपरा अतिशय महान, समृद्ध आणि उत्तरोत्तर वर्धिष्णू आहे हे खरेच.

अगदी!

ऋषिकेश Fri, 08/05/2015 - 15:32

In reply to by 'न'वी बाजू

अहो नबा,
कुठल्याही रसाला मादकता चिकटवली जात नाही (नसावी असा अंदाज).
त्याची कन्सिस्टन्सी "चोष्य" ;) कॅटेगरीत असणारे द्राव लागतात. आमरस, मध, साखरेचा पाक वगैरे.

वर चर्चा चाललेल्या 'सिल्क' प्रकारातून 'स्रवणारा' द्राव हा तसाच असतो. खाताना लई गुदगुल्या होत्यात! :)

'न'वी बाजू Fri, 08/05/2015 - 16:00

In reply to by ऋषिकेश

त्याची कन्सिस्टन्सी "चोष्य" ;) कॅटेगरीत असणारे द्राव लागतात. आमरस, मध, साखरेचा पाक वगैरे.

(सोदाहरण) स्पष्टीकरणाबद्दल आभारी आहे.

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 17:02

In reply to by मेघना भुस्कुटे

अतिअवांतर: काहीही खाताना हात-तोंड बरबटवून खाणे म्हणजे प्रचंड मादक ही जी काही आचरट समजूत हल्ली बोकाळली आहे, तिचा यानिमित्ताने जळजळीत निषेध.

म्हणजे काय माणसाने कधी बार्बेक्यू रिब्ज़१अ, झालेच तर बफेलो विंग्ज़१ब वगैरे खाऊच नयेत की काय?

("तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा"च्या चालीवर:) तुम्ही मला हात नि तोंड न बरबटवता उपरनिर्दिष्ट चिजा खाणारा मनुष्य दाखवा, मी तुम्हाला ओला न होता पोहोणारा मनुष्य दाखवेन. (जाऊ दे. आणखीही उपमा - घाणेरड्याघाणेरड्या - सुचल्या होत्या, पण हात आवरता घेतला, नि ओले न होता पोहोण्यावर भागवले.)

'मादक' वगैरे दावाच नाही. नाइलाजाचे बारसे राष्ट्रपित्यावरून करण्याचा मामला आहे.

असो. तमाम विश्व कढी-वरणभात-भेंडीची भाजी एवढ्यावरच आपला आहार सीमित करीत नाही, एवढेच सुचवून आपली रजा घेतो.

..........

१अ, ब हाताशी भरपूर टिश्यू असल्याखेरीज न खाण्याच्या चिजा.

किंवा उप्पीट, सांजा, झालेच तर कांदेपोहे, यांपैकी हे जे काही असेल ते.

याकरिता मराठीत 'अपरिहार्यता' असा एक शब्द आहे.

वास्तविक, मला स्वतःला बार्बेक्यू रिब्ज़ हा प्रकार मुळीच आवडत नाही. मात्र, त्याचा संबंध हाततोंड बरबटण्याशी नसून, बार्बेक्यू सॉस नावाच्या प्रकाराची चव न आवडण्याशी आहे. बफेलो विंग्ज़ आवडतात; मात्र, ते आवर्जून मागवून खाण्याची वेळ तुलनेने बरीच कमी येते. असो.

नितिन थत्ते Sat, 09/05/2015 - 18:18

In reply to by 'न'वी बाजू

>>बफेलो विंग्ज़ आवडतात

म्हैशींना पंख असतात हे नव्यानेच कळले. अर्थात आम्हाला माहिती नव्हते म्हणजे म्हैशींना पंख नसतात असे नव्हे हे मान्यच आहे. :)

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 19:54

In reply to by नितिन थत्ते

कोंबडीस जर वक्षस्थळे असू शकतात, तर म्हैशीस पंख का असू नयेत?

असो. प्रस्तुत "पंख" वस्तुतः कोंबडीचेच असतात, परंतु ते ज्या लाल तिखटजाळ सॉसमध्ये घोळवलेले असतात, त्याचा उगम म्हैसनामक गावातून असल्याने त्यास म्हैशीचे पंख म्हणतात, इतकेच. ("पुण्याची मिसळ" किंवा "चितळेंची बाकरवडी"प्रमाणे. अधिक माहितीकरिता: दुवा.)

(अतिअवांतर: तसेही, अमेरिकेत ज्यास सामान्यतः नुसतेच "बफेलो" म्हणून संबोधतात, तो प्राणी म्हैस नसून भलताच कोणी असतो, आणि बर्‍यापैकी रानटी असतो. मराठीत त्यास "गवा" म्हणून संबोधतात बहुधा - चूभूद्याघ्या. "आपल्या" म्हशीस "वॉटर बफेलो" म्हणून वेगळे संबोधावे लागते, अन्यथा विपरीत अर्थबोध होतो. अर्थात, "आपली" म्हैस - याला आमच्या अमेरिकन मराठीत "पाणगवा" म्हणावे काय? - हा प्राणी आमचे येथे बहुधा अभावानेच आढळत असावा - पुन्हा चूभूद्याघ्या.)

अंतराआनंद Sat, 09/05/2015 - 11:02

In reply to by तिरशिंगराव

मी "कुछ मीठा हो जाये" या थीम च्या जैराती म्हणतेय. त्या सिल्कच्या नाही. त्या हात तोंड बरबटून सिल्क खाणार्^या नृत्यांगना वा ईतर कोण कोण अगदी घाणेरड्या वाटतात. अगदी दुष्काळातून आल्यासारखं खातात. हल्लीची केक तोंडाला फासायची रीतही तशीच ओंगळ्वाणी.

बॅटमॅन Sat, 09/05/2015 - 13:59

In reply to by अंतराआनंद

मी "कुछ मीठा हो जाये" या थीम च्या जैराती म्हणतेय. त्या सिल्कच्या नाही. त्या हात तोंड बरबटून सिल्क खाणार्^या नृत्यांगना वा ईतर कोण कोण अगदी घाणेरड्या वाटतात. अगदी दुष्काळातून आल्यासारखं खातात.

अगदी अगदी!

हल्लीची केक तोंडाला फासायची रीतही तशीच ओंगळ्वाणी.

सहमत- बड्डे बॉयला लाथा घालायची पद्धत मात्र खूप भारी आहे (स्वतःचा वाढदिवस नसतो तेव्हाच). केक फासणे सोडा, होस्टेलमध्ये वाढदिवसाला अख्खी जन्ता जमायची तेव्हा केकचा तुकडा मिळावा म्हणून जी कै झुंबड उडायची ती म्हणजे थेट त्या एप माकडांच्या दमदम उत्सवासारखीच.

(होस्टेलमधील अटेंड केलेल्या यच्चयावत् बड्डेमध्ये केक मिळण्याचे अखंड रेकॉर्ड मिरवणारा) बॅटमॅन.

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 15:52

In reply to by अंतराआनंद

हल्लीची केक तोंडाला फासायची रीतही तशीच ओंगळ्वाणी.

ओंगळवाणी ऑर नॉट, पण "हल्लीची"?

कदाचित तुम्हाला हल्ली माहीत पडली म्हणून उगाच कायपण?

बॅटमॅन Sat, 09/05/2015 - 16:22

In reply to by 'न'वी बाजू

हम्म, तुमच्या वेळीही असेच होते हे माहिती नव्हते. बाकी जी पी एल अर्थात जघनचुंबक लत्ताचिकित्सा तुमचे वेळीदेखील होत असेलच मग, नै का?

'न'वी बाजू Sat, 09/05/2015 - 17:03

In reply to by बॅटमॅन

जीपीएल (आम्ही यास 'बड्डे बम्प्स' म्हणून संबोधत असू) आम्ही हॉष्टेलात असताना (सर्का तीसएक वर्षांपूर्वी) चांगलीच प्रचलित होती. (चार जणांनी हातापायांस धरून झोपाळा बनवायचा आणि उर्वरितांनी पार्श्वभागावर दणदणीत लाथा घालत सुटायचे. आणि नक्की आठवत नाही, परंतु जितकी वर्षे पूर्ण झाली, तितक्या लाथा (प्रत्येकाकडून), असा काही हिशेब असावा. (चूभूद्याघ्या.))

तोंडाला केक फासण्याची प्रथा मात्र आम्हांस तुलनेने अलिकडे (सर्का बावीसएक वर्षांपूर्वी) माहीत पडली, त्यामुळे तिच्या अ‍ॅण्टीक्विटीबद्दल खात्रीलायक भाष्य करू शकत नाही, परंतु आम्हांस एखादी गोष्ट सर्वात उशिरा माहीत पडते, या न्यायाने ही प्रथा बहुधा त्याहूनही जुनी असावी, असा कयास आहे.

असो.

बॅटमॅन Sun, 10/05/2015 - 07:34

In reply to by 'न'वी बाजू

आम्हीही तेच संबोधतो. काही उत्तरभारतीयांकडूनच जीपीएल प्रथम ऐकले. बाकी बड्डे बंप्सची प्रोसीजर सेम टु सेम. पण लाथांचे प्रमाण कै ठरलेले नसे.

धर्मराजमुटके Thu, 07/05/2015 - 10:24

त्यात काय ? अहो ती जाहिरात आलिया भट्ट चा आय. क्यू. लक्षात घेऊन बनविली आहे. लहान मुलेही ती फारशी मनावर घेत नाहीत.
मी माझ्या पाच वर्षाच्या मुलाला ती जाहिरात पाहिल्यावर विचारले की अरे हे बरोबर आहे काय ? तर तो मलाच बोलला, 'अरे बाबा, ती तर फक्त अ‍ॅडव्हरटाईज हाय. त्यात सगळं खोटं खोटं दाखवतात'.
त्याचे हे ज्ञान आतून आलेले आहे. आम्ही सांगीतलेले नाही. म्हणजे टीव्हीवरील डेटॉल कुल साबणाची जाहिरात पाहून त्याने तो साबण आणायला लावला. पण जेव्हा त्याने त्या साबणाने आंघोळ केली तेव्हा त्याला अजिबातच कुल जाणवले नाही. त्यामुळे आजकालची लहान मुलेदेखील आपल्यापेक्षा हुशार असतात असे म्हणायला वाव आहे.
तीच बाब कॅडबरी सिल्क ची. ती खुपच घान लागते असे त्याचे मत. त्याच्या भाषेत सांगायचे झाले तर गळगळीत लागते. आता कॅडबरी डेअरी मिल्क सोडून इतर चॉकलेटला हात लावत नाही.

रेड बुल Thu, 07/05/2015 - 10:32

In reply to by धर्मराजमुटके

सिल्क नावातच गळगळीत झुळझुळीतपणा आहे नाही का ? जरा मोठा होउद्या त्याला... सिल्क शिवाय इतर काही चाखणार नाही. एक वय असतं विशीष्ट आवडी निवडींच :) बाकी प्रत्येक गोष्ट मानवी मनावर जाणते अजाणते परीणांम घडवत असतेच त्यामुळे भलेही आपल्या मुलाचे कौतुक आहे पण जरा कमकुवत मन असणर्‍या लोकांना उगाच्च टीवीवर दाखवतात तसे वागायची उर्मी निर्माण होत नसावी असे मानणे. अर्थात मी प्रतिसादाचा सुर फार गंभीर करत नाहीये तरीही. मला ती जाहीरात पटली नाहीइतकेच नमुदवेन.

ऋता Thu, 07/05/2015 - 11:01

ही जाहिरात अजिबात आवडली नव्हती. पण तसे बघितले तर बॉलिवुडमध्ये ह्याच प्रतीचा विनोद सर्रास असतो त्यामुळे ही त्यापेक्षा वेगळी नाही वाटली. हल्लीच एक जुने रणधीर कपूरचे गाणे पाहिले त्यात तो आणि इतर कॉलेजकुमार बाईक्स चालवत गाणं म्हणत जात असतात. त्यात उगाचच एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाणीपुरी (वा तत्सम काही) विकणार्‍याला त्रास देतात- त्याला छतावरच उचलून ठेव, त्याची गाडी उलटीपालटी कर- असे दाखवले आहे. हे एक उदाहरण झालं पण असे सीन असतात जुन्या आणि नव्या सिनेमात. त्यामुळे ह्या जाहिरातीने काही नवीन नीचतम पातळी गाठली असे वाटले नाही.

वामन देशमुख Sat, 09/05/2015 - 15:45

काय काय तरी वादावं माणसानं!
(शहाणे लोक सांगून गेले आहेत- तोंड आहे म्हणून वादु नये आणि *न्ड आहे म्हणून पादू नये! )

ॲमी Sat, 09/05/2015 - 16:06

ओके. मी गेली १५ वर्ष TV पाहत नाहीय पण ती सिल्कची नृत्यांगनांची अॅड पाहिल्याचे लक्षात आहे. डिटेल्स आता नीट आठवत नाही पण इथल्या चर्चेवरून वाटतय की ती मादक किंवा ओंगळवाणी असण्यापेक्षा पॉर्निश आहे का?

limbutimbu Sat, 09/05/2015 - 17:40

आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे आभार.
आवडलेल्या/न आवडलेल्या जाहिरातींबद्दल एकच सर्वसमावेशक धागा काढावा काय? किंवा असाच धागा आधीच अस्तित्वात आहे काय?