'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा - निकाल

कथालेखन स्पर्धा

स्पर्धेसाठी तीन कथा आल्या. त्या तीनही कथांमध्ये भारांच्या लिखाणाचे तीन वेगवेगळे पैलू उजळले गेले. 'जगज्जेता रोबर पुन्हा जग जिंकल्याचा दावा करतो'मध्ये काहीशा बालसुलभ चमत्कृतीपूर्ण लेखनाचा आविष्कार दिसून येतो. या विज्ञानकथेत काहीसा विक्षिप्त वैज्ञानिक आपल्या बुद्धीचातुर्याने नासालाही जमणार नाही अशा यानाची उभारणी करतो आणि वाचकाला जवळच्या ताऱ्याची सैर घडवून आणतो. सोबत बालवाचकाला भावेल, पोसेल असा संदेशही देतो. 'डिस्नेलॅंडमध्ये फाफे' या कथेत आपला लाडका फास्टर फेणे एका अद्भुतरम्य, नव्या जगात जातो. फाफेच्या कथांप्रमाणे इथेही त्याचा चाणाक्षपणा आणि हजरजबाबीपणा दिसून येतो. अचानक पळवल्या गेलेल्या मुलीला तो झटकन शोधून काढतो आणि गुन्हेगारांवर आधुनिक उपकरणं वापरून मात करतो. तिसऱ्या कथेत - 'फास्टर फेणे रिटर्न्स - फेसबुकवरून ब्लॅकमेलिंग'मध्ये - फास्टर फेणे येतो तो केवळ मार्गदर्शक म्हणून. एक त्याच्यासारखीच तुडतुडीत मुलगी आपल्या बहिणीला ब्लॅकमेल करणाराला धडा शिकवते.

डावं उजवं ठरवताना भारांच्या शैलीशी, त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीशी, त्यांच्या व्यक्तिरेखांशी किती साम्य साधलं गेलं आहे याचा प्रथमतः विचार केला गेला. या बाबतीत तीनही कथा जवळपास सारख्या आहेत. दुसरा निकष असा होता की या कथा म्हणून किती रंजक आहेत आणि किती कौशल्याने रचलेल्या आहेत. 'रोबर..' आणि 'डिस्नेलॅंडमध्ये फाफे' या दोन्ही कथा काहीशा त्रोटक वाटल्या. याउलट 'फास्टर फेणे रिटर्न्स...' अधिक नीटसपणे रंगवलेली आहे. तसंच आधुनिक काळातला गुन्हा सोडवताना फास्टर फेणेचा तल्लखपणा दाखवणारी आधुनिक मुलगी दाखवणंही कल्पक वाटलं. 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये मुन्नाभाईला महात्मा गांधी दिसतात, पण इतरांना कोणाला ते दिसत नाहीत. हे अर्थातच त्याच्या अंतर्मनावर झालेल्या परिणामाचं प्रतीक आहे. कर्ता करवता तोच आहे. हेच याही कथेत दाखवलं आहे. त्यामुळे फाफेचा आधुनिक जगातला नवीन अवतार येणारी 'आआ' निश्चितच भावते.

यामुळे लेखनस्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 'फास्टर फेणे रिटर्न्स - फेसबुकवरून ब्लॅकमेलिंग' या कथेसाठी फ्रेंक उर्फ फ्रेंडली कवडे यांना देण्यात येत आहे. विजेती कथा विशेषांकात सामील करून घेतली आहे. सर्व स्पर्धकांचे आभार.

प्रश्नमंजूषा

या स्पर्धेत अनेकांनी भाग घेऊन आपलं भारांच्या लेखनाविषयीचं ज्ञान आजमावून बघितलं.
आदूबाळ यांना सर्वाधिक म्हणजे ९०% गुण मिळाले, पण त्यांनी प्रश्न काढण्यासाठी मदत केलेली असल्यामुळे या स्पर्धेसाठी त्यांचा विचार केलेला नाही.
त्यानंतर शहराजाद यांना सर्वाधिक म्हणजे ७६% गुण पडले, पण त्यांनी स्पर्धेतून अंग काढून घेतलेलं असल्यामुळे क्रमवारी पुढीलप्रमाणे.

प्रथम क्रमांक - परी ७२%
द्वितीय/तृतीय क्रमांक - सविता नेने ६९%
द्वितीय/तृतीय क्रमांक - देवदत्त ६९%
द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी बरोबरी झाल्याने दोघांना ती दोन बक्षिसं समसमान वाटण्यात येतील

स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांचे आभार. पण इथे इतर काही नावं नमूद करणं आवश्यक आहे.

सर्वप्रथम, या स्पर्धेची मूळ कल्पना ऋषिकेशची. त्यानेच मग स्पर्धेचा आराखडा, विषय ठरवणे, त्यासंबंधित घोषणा करणे इ. सर्व महत्त्वाच्या गोष्टी करून 'ऐसी'बाहेरही ही स्पर्धा पोहोचवण्यात पुढाकार घेतला. प्रश्नमंजूषेसाठी प्रश्न काढले त्या - आदूबाळ, अस्वल, मेघना, राजेश हे ऐसीकर तसंच विनीत बेरी हे ऐसीबाह्य मित्र - या सर्वांचे आभार मानणं आवश्यक आहे. विशेष आभार अदितीचे, तिने आयत्या वेळी प्रश्नमंजूषेसाठी योग्य ते तांत्रिक सहकार्य केल्यामुळे प्रश्नांची उत्तरं आपोआप तपासली जाऊन ताबडतोब स्कोअर्स मिळणं शक्य झालं.

लेखनस्पर्धा व प्रश्नमंजूषा संयुक्त विजेतेपद

कुलस्य

पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे आणि ज्यांनी ही स्पर्धा सफल व्हावी यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे आभार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! संकल्पना म्हणून हा विशेषांक प्रकार फारच आवडला.
बाकीचं सविस्तर सवडीनं सांगावं म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परीक्षकांचे आभार! लैच आनंदा झाला. Biggrin Biggrin :beer: Angel Smile
स्पर्धा तर होतेच, पण भारांप्रमाणेच लहान मुलांसाठी अजून खूप लिहा मित्रांनो, ते अधिक योग्य ठरेल.
- भारा आजोबांचा पणतू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या स्पर्धेतील बाकी दोन्ही कथा नुकत्याच वाचल्या. दोन्ही आवडल्या. फेसबूक वरुन ब्लॅकमेल ची कथा खूपच आवडली. अगदी खिळवून ठेवणारी आणि नव्या काळाशी सुसंगत होती. हार्दिक अभिनंदन 'फ्रेंक' !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संयुक्त विजेतेपद दिल्याबद्दल परीक्षकांचे आणि सर्व वाचकांचे आभार. या स्पर्धेच्या निमित्ताने बर्‍याच वर्षापासूनची इच्छा पूर्ण झाली. खूप आनंद झाला Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन.
आता यावर एक सविस्तर पोस्ट फेसबुकवर करायला हवी. हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे आहे! अनेक आभार!

आम्ही या अंकाची माहिती लोकांपर्यंत पोचवायचा शक्य तितका प्रयत्न करतो आहोतच.
ऐसीच्या सदस्यांनीही आपापल्या परीने जितके शक्य होईल तितके आपापल्या फेसबुक व अन्य सोशल मिडीया, परिचित, इतर संस्थळे इथे या अंकाबद्द्ल माहिती पोचवली तर हा अंक अधिकाअधिक लोकांपर्यंत जाण्यास मदतच होईल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आधीच अंक लाइक + शेअर केलेला आहे. पण थोडं पब्लिक वगळता, फेसबुकचा आड्यन्स माहीते कशा थिल्लर पोस्टसनाच लाइक देतो ते ;). अर्थात माझी निरीक्षण हे सर्वांचे निरीक्षण असेलच असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन Smile कवडे यांची कथा छानच होती.

- चिव चिव चिमा Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! उत्तम संकल्पना व सादरीकरणासाठी ऐसीच्या संपादकमंडळाचे व इतर सहकार्‍यांचे अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0