छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..

खरं तर नवं आव्हान देण्यासाठी विचार करायला फारसा वेळ नाही आहे पण हे सुदैवाने चटकन सुचलं.

'थोडासा रूमानी हो जाएँ' या कमलेश पांडे लिखित चित्रपटात श्री. धृष्टद्युम्नपद्मनाभप्रजापतिनीळकंठधूमकेतू बारिशकर यांचा पुढील संवाद ऐका -
.

(https://youtu.be/LytifZOOENw)

पावसाची नि पर्यायाने पाण्याची विविध रुपं अतिशय नज़ाकतीत बयाँ केली आहेत.
.
या वेळच्या आव्हानात तुमच्या कल्पनेतले, पाहण्यातले पाण्याचे वेगवेगळे ढंग नि रुपं, त्याच्या अस्तित्त्वाचे नि नसल्याचे परिणाम छायाचित्रात टिपायचे आहेत.
.
या निमित्ताने आरती प्रभूंची एक कविता आठवल्याशिवाय राहत नाही -

शेजारचा नाला, येता पावसाळा
थोर बळावला घरीदारी

संसार जाहला एक भातुकली
जळी तरंगली मांडावळ

खाटेवर आम्ही बैसलों बापुडे
पोर होड्या सोडी खिदळत

माय म्हणे मला, "बरे झाले झिला,
आळशाला झाला गंगालाभ."

बाईल हांसून, "मरतील.." म्हणे
".. पाण्यात ढेकूणे आयतीच."

मी मला म्हणालो, "पाण्यातले घर
नक्की मिळणार समुद्राला..."

पोर पाठ करी - 'समुद्राची जेंव्हा
वाफ होते तेंव्हा - ढग बने...'

-----------------------------------------------------------------------
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २८ जून २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दलचे मार्गदर्शन या धाग्यावर आहे.
--------

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पाणीच पाणी - बा. भ. बोरकर
तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास कविता. बोरकरांच्या कविता फारशा वाचलेल्या नाहीयेत, आता वाचायला हव्या. बादवे, 'लै भारी' अशी श्रेणी का नाहीये?

अवांतरः ऐसीवर पुढील श्रेण्या असत्या तर फार मजा आली असती
१. लै भारी
२. घंटा!!
३. कै च्या कै
४. असो
५. बरं मग?
६. बकीजालोक्या (बच्चे की जान लोगे क्या?)
७. बस्कर्पग्लेरुलायेगाक्या
अस्तु. इतके अवांतर पुरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादवे, 'लै भारी' अशी श्रेणी का नाहीये?

अ व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन!!!!
कदाचित श्रेणीकर्ते पुणेकर असावेत!!!
Smile
(भागो, पुणेकर आया!!!!)

बाकी बोरकरांच्या कविता गायल्या (किंवा गुणगुणल्या, डिपेंडिंग ऑन युवर आवाज!) तर त्या एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात!!!
भटा, तुला गायला हरकत नाही!!!!! काय मस्त आवाज आहे मेल्याचा!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.
पिंक फ्लेमिंगोज (मेनेसोटा झू)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो नाही पण हे पेन्टिंग इथे डकवायचा मोह आवरला नाही -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिचार्‍या नानाला पोटासाठी काय काय बकवास करावी लागली!!!!
फोटो नंतर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्यालिफोर्न्यवाश्यांना पाणी हा विषय देऊन जखमेवर मीठच चोळलं म्हणायचं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पानी पानी रे, खारे पानी रे, नैनों में भर जा, नीँदे ख़ाली कर जा... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पाणी, आपणां सर्वांचं!! ओरेगॉन ब्लॅक सॅन्ड बीच!!
DSC_0114

हे पाणी, त्याच्या नैसर्गिक मालकांचं! सान दियागो सी वर्ल्ड!!
DSC_0418

आणि हे पाणी! माझ्या वारसाचा बाप का माल!!! नीट पोहायचं सोडून गाणं बोंबलतोय शिंचा, "लंडन ब्रीज इज फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन!!!!!" Smile
DSC_0481

कॅमेरा: निक्कॉन डीएसेलार, लेन्सः जी काय त्याच्याबरोबर येते ती! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचा फोटो आवडला. विशेषतः टिप्पणी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नीट पोहायचं सोडून गाणं बोंबलतोय शिंचा, "लंडन ब्रीज इज फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन, फॉलिंग डाऊन!!!!!"

लंडन ब्रिजवर असताना पुलाचं फॉलिंग डाऊन व्हायला लागलं तर असेच हात-पाय मारावे लागतील. तेव्हा तुमची तक्रार योग्यच आहे; त्याने गाणं म्हणायचं सोडून नीट पोहायला शिकलंच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खिडकीच्या गजांवर लटकणारे थेंब,
गवताच्या पात्यांवर चकाकणारे थेंब…
खूप भिजल्याचा मार खाऊन
ओलेत्यानेच डोळ्यांमधून ओघळणारे थेंब…

(टीप: दंव हे शीर्षक दिले तरी कृपया या पोस्टीस "दवणीय" म्हणू नये… Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

विषय आवडला! नि विषयाची मांडणीही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटोंवर क्लिक केल्यास मोठ्या आकारातले फोटो दिसतील.

१. रेघा

२. दुष्काळ

(हा फोटो थोडा हलला/डीफोकस झाला आहे. पण २८ जूनच्या आत पुन्हा हा फोटो काढायची संधी मिळेल का नाही माहीत नाही, म्हणून.)

आणि हा स्पर्धेसाठी नाही. आधी एका फोटोस्पर्धेत दाखवून झाला आहे. पण मला आवडतो म्हणून पुन्हा एकदा.

(जुने फोटो बघताना लक्षात आलं, तलावात टाकलेल्या निर्माल्याचे फोटो काढायचे राहिले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिला फोटो आवडला. दुसरा नीटसा कळला नाही. विशेषतः दुष्काळ का म्हटलं आहे ते कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोंवर क्लिक करून मोठा फोटो बघता येईल.

दुसऱ्या फोटोत पिवळं पान आहे, दुष्काळामुळे आलेला पिवळा रंग. आता पाऊस आला तरी त्या पानासाठी उशीर झालाय. (ओला दुष्काळ असेल तर पाण्यामुळेच ते पान मरायला टेकलंय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्यवस्थापन : दुरुस्त केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग!!! काय रंग आहे. वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिसला ब्वा!!!

Nikon D5100
50 mm prime with micro extension tube

Exif details:
f/5.6
1/100 Sec.
ISO 800
@50 mm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छायाचित्र दिसत नाही.

'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दलचे मार्गदर्शन या धाग्यावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादक, कृपया हा फोटो डिलीट करावा. एकच फोटो तांत्रिक गोंधळामुळे दोनदा पोस्ट झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो पहिला- रस्त्यावरचं पाणी

फोटो दुसरा- भूतानमधली पारो नदी- अगदी थंड थंड पाण्यात जाण्याचा केलेला अट्टाहास फळाला आला

फोटो तिसरा- फेसाळत्या पाण्यासोबतचं दगडी पाणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धुक्याचं पांघरुण घेत असलेलं प्रौढ पाणी

नाजूक फुलावरलं नाजूक पाणी

पाण्याशी पंगा घेणारे दगड की दगडांवर खवळलेलं पाणी?

भवतालचा रंग आपलासा करणारं पाणी

पंचमहाभूतामधील एक: पाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा:! पहिला फोटो मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शेवटचा फोटो खास आवडला - धोम धरणाचा आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र स्पर्धेसाठी नाही.

Camera: Motorola XT1032, ISO: 125, Exposure: 1/508 s, Aperture: 2.4, Focal Length: 4mm, Flash Used: No

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.ते पाणी आता स्क्रीनवर टप-टप गळेल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाण्याच्या द्रवावस्थेखेरीज इतर अवस्था टिपण्याचे प्रयत्न स्पर्धेत दिसले नाहीत म्हणून थोडा अपेक्षाभंग झाला.
मुळापासून यांचे दंव, ३_१४ विक्षिप्त अदिती यांचे 'रेघा'
अमोघ यांचा दंव , मनमानसी यांचे रस्त्यावरचं पाणी आणि अंतराआनंद यांचे धुक्याचं पांघरुण घेत असलेलं प्रौढ पाणी ही विशेष आवडली.
या वेळी विश्लेषण, स्पष्टीकरण द्यायला वेळ नसल्याने निकाल थोडक्यात जाहीत करतो आहे.

मुळापासून व अमोघ यांची चित्रे तांत्रिकदृष्ट्या उत्तम आहेत. ती शुभेच्छाप्रत्रांवर छापण्यास योग्य अशी वाटतात. पण म्हणूनच त्यांच्या गुळगुळीतपणामुळे मला ती प्रथम क्रमांकासाठी योग्य वाटली नाहीत (कृ. हलके घ्यावे). मला थोडा कच्चेपणा अधिक भावतो नि तसाच अपेक्षित होता जो अदिती, मनमानसी नि अंतराआनंद यांच्या उल्लेखलेल्या चित्रांत आहे. मनमानसी यांचे चित्र 'आये कुछ अब्र' या नंदन यांच्या मागील एका आव्हानासाठी अधिक उत्तम ठरले असते. अदितींच्या चित्रातली विरोधी गंमत आवडली.

या तिनही चित्रांत, अंतराआनंद यांनी दिलेले चित्र पाहताच 'पाणी' हाच शब्द डोक्यात येतो. तसेच पाण्याची दोन रुपं - जमिनीवरचं नि हवेत तरंगणारं - अशी दोन्ही एकाच चित्रात सामावली आहेत. चित्र पाहताच चालून थकलेले, तापलेले पायाचे तळवे या पाण्यात सोडून बसायचा मोह होतो. चित्रात कॉन्ट्रास्ट वाढवून अधिक चांगले दिसेल असे वाटते.
याच चित्राला प्रथम क्रमांक बहाल करण्यात येत आहे. अभिनंदन !

पुढील आव्हान अंतराआनंद यांनी द्यावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निकाल आवडला. पाण्याच्या द्रवावास्थेखेरीज इतर अवस्था टिपण्याचे प्रयत्न इथे टाकू की नको याबद्दल साशंक होतो. पण आता तुम्ही म्हटलेच आहे तर काही फोटो रसग्रहणासाठी देण्याचा मोह आवरत नाही. गेल्या हिवाळ्यात मिन्नेसोटा राज्याच्या उत्तरेला सुपिरियर सरोवराच्या काठाशी काही दिवस गेलो होतो तेव्हा फक्त बर्फाचीच काही अप्रतिम रूपं पाहायला मिळाली. या सहलीविषयी सविस्तर लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी या पाणीदार विषयाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतो. Smile

१. अर्धवट गोठलेला सुपिरियर चा काठ आणि पार्श्वभूमीवर दिसणारे "Grand Marais" नावाचे डिसेंबरच्या थंडीत जवळपास निर्मनुष्य असलेले गाव…

२. बर्फरुपी रत्नांनी वेढलेलं बाकडं…

३. सरोवराच्या लाटा किनाऱ्यावर आदळल्या की त्यांतून उडणारे तुषार लगतच्या झुडूपांवर जाऊन पडतात आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीत त्या फांद्यांना बिलगून नैसर्गिक जिवंत शिल्प तयार करतात. बर्फाचं हे असं रुप मी तरी पहिल्यांदाच पाहिलं…

४. जी गत किनाऱ्यावरच्या झुडुपांची तीच गत तिथल्या दगडांची…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


या सहलीविषयी सविस्तर लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी या पाणीदार विषयाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतो.


मुळापासून तुम्हाला विनंती, कृपया ह्या सहली विषयी लिहा. मी लेक-सुपेरियर ला दोनदा भेट दिली आहे त्यामुळे एक वेगळा आपलेपणा आहे त्या जागेबद्दल. त्या लेक बद्दल आणि जागे बद्दल बरंच काही अंतरजालावर लिहीलेलं आहेच पण ते लिखाण थोडफार विकीछाप म्हणता यावं अश्या पध्दतीचं आहे. पण आपल्या माणसाने त्या जागेबद्दल काही लिहीलेलं वाचायला फार आवडेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निकाल आवडला.

अंतरातैंचे अभिनंदन! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंतराचे अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनंदन आणि नवीन विषयाच्या प्रतिक्षेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत
(+ किंचित उत्खनन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल हे चित्र टिपताना या धाग्याची आठवण झाली -

फाटकाजवळ हा दिवा होता, त्यात पावसाच्या पाण्याचे थेंब नाचत होते. त्यांच्या रेषा दिव्याच्या प्रकाशात उठून दिसत होत्या. तेवढ्यात जवळच्या सिगारेटचा धूर त्यात मिसळला. शेगडीवरच्या वाफेचा भास झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त कॅप्चर, ह्या गाण्यातली 'नूर की बूँद है, सदियों से बहा करती है' ओळ आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वेगळंच गाणं सुचलं - पानी में आग लगेगी, पत्थर भी पिघल जाएगा, देखो.....!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0