सल

आज आनंदी बाई खुपच गडबडीत होत्या. कारण त्यांच्या पिऊचा आज वाढदिवस होता. जोरात तयारी चालली होती. सुषमा त्यांना सूचना देत होती. घराची सजावट पूर्ण होत आली होती. तेव्हड्यात पिऊ धावत आली. आनंदी बाई ने तिला कडेवर उचलले. पिऊ लगेच त्यांना बिलगली. संध्याकाळी 6 ला कार्यक्रम सुरू झाला. सुषमा-अजय अगत्याने सगळी कडे लक्ष्य देत होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सोसायटीतील लहान मुले आणि मुली आली होती. केक कटिंग, गेम्स झाल्या नंतर छोटासा फराळ होता. आनंदी बाई किचन मध्ये काम करत ओळखीच्या लोकांना भेटत होत्या. पिऊचे सर्व आवडते लोक आनंदी बाईच्या सुध्दा आवडीचे होते. सगळे जण निघून गेल्या वर आनंदी बाई ने पिऊला गिफ्ट दिले. पिऊने गिफ्ट घेतले पण सुषमा नको म्हणत होती. पण आनंदी बाईच्या पिऊ वरच्या प्रेमामुळे सुषमाने जास्त आढावेढे घेतले नाहीत.

सुषमाला पिऊची जन्मवेळ आठवली. ५ वर्ष पूर्वी पिऊ जन्मली. सुषमा आणि अजय ला खुपच आनंद झाला. तिचा जन्म ८ महिन्यात झाल्यामुळे ती जन्मताच कृश होती. वजन कमी असल्या मुळे तिची खुप देखभाल घावी लागे. सुषमा नोकरी करत असल्या मुळे तिला एका पूर्ण वेळ दाईची खुपच आवश्यकता होती. मग तिने त्या दृष्टीने शोध घेतला. एका ओळखीच्या व्यक्तीने आनंदी बाईचे नाव सुचवले. पहिल्या भेटीतच त्यांनी छाप पाडली. वय वर्षे ४५.. नऊवारी नेसलेल्या.. कपाळी भला मोठं कुंकू.. चेहर्‍यावर स्मित हास्य.. राहणी अत्यंत साधी.. काही दिवसांतच पिऊ ला त्यांचा लळा लागला. त्या पिऊचे सगळे काही करायच्या. पिऊचा सुद्धा बाई वर खुप जीव आहे. बाई तिला दररोज गोष्टी सांगायच्या. पिऊ लहानपणी गोष्ट सांगितल्या शिवाय झोपत नसे. पिऊ आनंदीबाई ला मावशी म्हणत असे. पिऊ आई आणि मावशी सोडून कोणाकडे जात नसे. टापटीपपणा.. स्वछता.. स्वयंपाकाची आवड.. रोखठोक बोलणं.. चोख हिशोब.. आणि स्वाभिमानी... हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांच्या या गुणामुळे त्या घरच्या एक होऊन गेल्या. जवळच्या वस्तीतच त्यांच्या घर होत. सुषमा घर त्यांच्यावर सोपवून बिनधास्त ऑफिस च्या कामात लक्ष्य घालायची. आनंदी बाई अजय पुढे जास्त बोलत नसत. पण बोलका स्वभाव असल्या मुळे सुषमा ऑफिस हून परत आल्यावर त्या दिवसाभराचा व्रतांत सांगत. घरच्या सगळ्यांना त्यांचा स्वभाव माहीत होता. जसे-जसे पिऊ मोठी होत होती. तसे त्या स्वयंपाक करायला लागल्या. त्यांचा एकच दुर्गुण होता बाई जास्त स्वयंपाक शिजवत असत. पण स्वयंपाकाला खुपच छान चव असे. दर दिवाळी ला बाई सगळ्यांना त्याच्या घरी भोजनाचे आमंत्रण देत. सुषमा आणि अजय काही घरी येत नसत. पण बाई पिऊला त्यांच्या घरी घेऊन जात असत. घर छोटूस पण चकाचक,व्यवस्थित, टापटीप होत. कुठे जरासा कचरा म्हणून नव्हता. बाई पिऊला चांगली शिकवण देत असत. काही वर्षा नंतर पिऊचा भाऊ जन्माला. त्यांचे सुद्धा काम त्यांनी मन लावून केले. पण त्यांना जास्त काळजी पिऊची राहायची.

आधी पिऊ एकटीच असल्या मुळे तीच घरची लाडकी होती. पिऊला लहान भाऊ झाल्या नंतर सगळी जण त्यांचा लाड करायची. पिऊ ला असे वाटायचे कि आपल्याला कोणीच लाड नाही करत. पिऊ मग आशाळभूत नजरेने आनंदीबाई कडे बघायची आणि तिला असे वाटायचे कि आनंदी मावशीच माझी आहे बाकी कुणी नाही. बाई आणि पिऊ मधले नाते खुप सुंदर आहे. पिऊ शाळेतून आली की लगेच मावशी ला बिलगायची. बाई तिला झोपतो वेळेस गोष्ट सांगत. पिऊला ती खरंच वाटायची. आनंदी बाईच्या घरी कोणी नव्हता. त्या एकटाच राहत असत. लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती. काही वर्षापूर्वी नवरा वारला होता. एक मुलगा होता. पण त्याने दुसरीकडे बिर्‍हाड थाटले होते. नवऱ्यासाठी बाई खुप झिजल्या पण त्यांना संसाराच्या अर्ध्या वाटेवरच सोडून तो निघून गेला. पण बाई काही आयुष्यावर कधी नाराज नव्हत्या. येणारा दिवस स्वःकष्टाने रेटायचा आणि हसून आनंद वाटायचा हेच त्यांचे जीवनाचे तत्व होते. बाईना मुलीची खुप आवड होती. त्यांना मुलगी झाले नाही याचे दुख होते पण नाराजी नव्हती.

अजय-सुषमाची प्रगती होत गेली. घरात बरेचं माणसे आली. ड्राँयवर , धुणे वाली, आणि दुसरे लोकांचे येणे-जाणे वाढले. एक दिवस घरात चोरी झाली. अजय ने घरी काम करणाऱ्या सगळ्याची झाडा झडती घेतली. त्यात आनंदी बाई सुद्धा होत्या. आनंदी बाईला घरात कुठे काय आहे हे सगळे माहीत होते. चोरी करणारा २ दिवसा नंतर मुद्देमाला सोबत पकडला गेला. पण दोन दिवस पर्यंत घरात संशयाचे गढूळ वातावरण होते. अशोक ड्राँयवर ने चोरी केली होती. आनंदी बाई स्वाभिमानी होत्या. त्यांना या गोष्टीचे वाईट वाटले. 9 वर्ष त्यांनी या घरात काम केले होते. तरी अजय ने त्यांची झाडाझडती घेऊन चौकशी करावी त्यामुळे बाई ला दु:ख झाले. झाल्या प्रकाराने आनंदी बाईचा स्वाभिमान दुखावला गेला होता. बाईला चौकशीचे काही वाटले नाही. पण अविश्वास आणि संशय दाखवल्या बद्दल वाईट वाटले. आनंदी बाई ने सुषमा ला सांगून काम बंद केले. सुषमा ने बाईला खुप समजावून सांगीतले. तरी पण हिशोब केल्या नंतर त्या दुसर्‍या महिन्या पासून त्यांनी काम बंद केले. त्यामुळे पिऊ ला खुप वाईट वाटले. पिऊ ला सतत त्यांची आठवण व्हायची. पिऊ आई ला म्हणायची मावशी कुठे आहेत, तिला मावशीशी भेटायचे आहे. पण संपर्क तुटला होता.

बाईने घर सोडल्या नंतर पिऊची त्यांना खुप आठवण यायची. अजय-सुषमा ला आपण चुक केली आहे असे वाटायचे पण ते कधी बोलत नसत. यथावकाश पिऊ मोठी होऊन तिचे लग्न झाले. आनंदी बाई ने शहरातले घर सोडून नवीन ठिकाणी जाऊन राहिल्या. पण वय झाल्यावर त्यांची देखभाल करायला कोणी नव्हते. त्यांना आत्ता वृद्ध आश्रमात राहावे लागणार होते. त्यांनी जीवनाची पूर्ण कमाई बँक मध्ये ठेवली आणि आश्रमात राहण्यासाठी जाणार होत्या. तेव्हा त्यांना पिऊ भेटली. पिऊ त्यांना घरी घेऊन आली. जुना आठवणी जाग्या झाल्या. पहिल्यांदा बाई तिथे राहण्यास राजी नव्हत्या. मग पिऊ ने आनंदी बाईला हट्टाने आपल्या कडेच ठेवून घेतल. यथावकाश तिला मुलगा झाला. आनंदी बाईनी नवीन बाळाचे सर्व काही केले. पिऊच्या सगळ्या सासरच्या लोकांनाही बाईच्या चांगल्या स्वभावामुळे आपलंस केल. पिऊच्या घरी बाई रमल्या. मात्र आनंदी बाईच्या मनात एकच सल होती. सुषमाचे काम सोडते वेळेस स्वाभिमान बाजूला सोडून जर बाई सुषमा कडेच काम करत असत्या तर पिऊचा जास्त सहवास मिळाला असता.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा आवडली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुचि!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0