बागकामप्रेमी ऐसीकर २०१५: धागा ८
आमच्या भेंडीला पहिलं अपत्य झालं :)
(फोटो लवकरच)
फायनली एकतरी फळभाजी कुंडीत फळली म्हणायची! नैतर आजवर मिरची, टोमॅटो, पावटे वगैरे फुलांपर्यंत पोचले नी मग पुढे सरकलेच नाहीत :(
पालेभाज्या मात्र झ्याक येतात ट्रेमध्ये
चंदन ब्रँड
चंदन नावाच्या ब्रँडखाली कलकत्ता पानाचे कुटलेले विडे तयार, व्यवस्थित पॅकिंगचे मिळतात. सर्वत्र मिळत असावेत. १८० रुपयांत १५ पॅक असतात. गोडाच्या बरोबरीने किंचित तिखट, मिरमिरीत चव असते. चुना असणार. बाकी गोडपणासाठी बडीशेप, थंडक, गुलकंद वगैरे किंवा यासमान नेहमीचे जिन्नस असतात. विड्याची तलफ कुटलेल्या पानावर भागायला हरकत नाही.
ऋ, मलाही माझी झाडं तितकीशी
ऋ, मलाही माझी झाडं तितकीशी लाभताहेत असं काही वाटत नाही. फुलं दोन-तीन महिन्यातून एकदाच येतात आणि बाकी वेळ मी त्यांचा फक्त पाणक्या झालेय . माझ्याकडे शेवंती, जुई, बटन गुलाब आणि चार पाकळ्यांच्या फुलाच्या गुच्छाचे , अशी एकूण चार झाडं आहेत. जुई आणि त्या चार पाकळ्याच्या झाडाला दोन महिन्यांपासून साधी एक कळीही दिसत नाहीय. रोपटी हिरवीगार आहेत हेच काय ते सुख. शेवंतीच्या कळ्यांची फुलं होण्याची गेले दोन आठवडे वाट पाहातेय, आणि गुलाबाला एकदाच्या कळ्या आल्या आहेत.
बादवे, मी दिवाळीत चार दिवस घरी नसताना एक प्रयोग केला. कुंडीत बाटली उलटी खूपसून त्यातलं पाणी आपण घरी नसताना झाडाला मिळावं, हे काही नीट साधलं नव्हतं. मग कुठेतरी केशाकर्षक पद्धतीने असं पाणी देण्याच्या सोयीबद्दल वाचलं होतं. त्यानुसार एका बादलीत पाणी घेऊन , कापडाच्या हलक्याशा ओल्या पट्ट्यांचे एक टोक बादलीच्या तळाशी आणि एक टोक कुंडीत झाडाच्या बुडाशी येईल असं ठेवून गेले होते. बादली कुंड्यांपेक्षा खालच्या पातळीवर होती. शेवंतीला जरा पाणी कमी पडलं की लगेच कोमेजते म्हणून शेजारणीकडे दिली होती. राहिलेल्या तीन झाडांनी मिळून एक लहानशी बादली पाणी बुधवार ते रविवार सकाळपर्यंत संपवलं होतं. आल्यानंतर पाहिलं तर माती हलकीशी ओलसर होती. आता कुठेही गेले तर झाडांची चिंता नाही. :-)
#कोणाकडून कलकत्ता विड्याच्या
#कोणाकडून कलकत्ता विड्याच्या पानांचं झाड मिळेल काय?--बनारसी पान. ते कोणाकडे नसतं.खरं म्हणजे बिहारमधून येतात. गाळाच्या जमीनीत वाढते. इकडे एक मघइ प्रकार आहे तो फारच कॅामन आहे.तो नाही।. # फुलं नाहीत/मस्त कलंदर.- -
झाडाची पिशवी मातीच्या गादीवर ठेवा. कुंडी प्लास्टीकची आहे/ असेल तर ती मातीवर बसवा.खाली बाहेर मुळं वाढतील.पांढरी केशमुळं आली की फुलं येतात. सदाफुलीवर प्रयोग करता येईल.
आभार! हल्ली पानपट्टीवर अतिशय
आभार!
हल्ली पानपट्टीवर अतिशय गचाळ पणे बांधलेली नी कसल्याशा रसात बुडबून देणारी तयार पानेच मिळातात. नवे/ताजे पान बांधायला फार कमी पानवाले उत्सुक असतात. त्यातल्या अर्ध्यांहून अधिकांना ते छानसे बांधताही येत नाही.
==
गाळाच्या जमिनीतील ही नागवेल इथे उगवण्यासाठी काय करावे लागेल. मुंबईत कलकत्ता/बनारसी पान हमखास मिळणारे काही पानवाले माहित होते.
इथे पुण्यात सगळाच नशीबाचा मामला :( मासे असोत नाहितर पान.. चांगल्या गोष्टींचं वाकडं दिसतंय इथे :प
पालेभाज्यांच्या बिया कुठे मिळतील?
औषधी रोपं असावीत म्हणून २-३ दिवस झाले शूर्पणखा, सर्पगंधा, पांढरी व निळी गोकर्ण, मेंदी, राम-कृष्ण-रुक्मिणी तुळस यांच्या बिया टाकल्या आहेत. पांढरी,जांभळी व लाल सदाफुली, ओवा, पानफुटी यांची रोपं आणून लावली आहेत. हे सर्व ओळखींच्याकडून मागून आणलेलं आहे.. विकत काहीच आणावं लागलं नाही.
कडीपत्त्याचं झाड खूपच उंच वाढत चाललं होतं आणि त्याच्या फांद्या हुकाच्या काठीने खेचूनही हाताशी येईना झाल्या होत्या म्हणून मग एक-दोन फांद्या ठेवून बाकी सर्व फांद्या उतरवून घेतल्या. आता हाताशी येईल अशा बेताने डवरेल असं करणार आहोत. कटाई केल्यावर इतके दिवस डवरलेल्या झाडाच्या ठिकाणी ओकाबोका बुंधा बघून रडूच कोसळलं मला. कुर्हाडीचे घाव घालून कटाई करून घेतल्याबद्दल कडीपत्त्याच्या झाडाची माफी मागितली मी आणि 'तू पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक सुरेख डवरणार आहेस अशी मला पक्की खात्री आहे. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तू अजिबात काळजी करू नकोस. तू आम्हाला सर्वांना खूपखूप हवा आहेस.' असं खूप काही बोलत असते अधनंमधनं मी त्याच्याशी. आता खूप सारे नवे कोवळे धुमार आलेत त्याला त्यामुळे खूप बरं वाटतंय. :) घरातल्या-बाहेरच्या सर्वांना देऊनही भरपूर कडीपत्ता शिल्लक राहिला आहे, जो नीट धुवून, निवडून लायब्ररीच्या खोलीत पसरून ठेवला आहे. थोड्या दिवसांत कडकडीत सुकला की पूड करून ठेवू म्हणजे मसाल्यासोबत तोही सर्रास वापरता येईल स्वयंपाकात.
तुटलेल्या प्लॅस्टीक बास्केटमध्ये बटाटे लावलेत. बटाट्याच्या फक्त कोंब आलेला भाग कापून घेऊन तेवढाच लावला, बाकी बटाटा स्वयंपाकात वापरला. मस्त धुमारे आले आहेत. धुमार्यांचे वरचे शेंडे खुडून टाकले जेणेकरून वर वाढण्याऐवजी रोपाने त्याची शक्ती मुळं वाढवण्यावर एकवटावी.
कांदे-बटाट्यांचं प्लॅस्टीकचं रॅक तुटलं तर त्याचे कप्पे वेगळे करून आजच त्यात मेथ्या आणि धणे पेरले आहेत. सोलून फीजमध्ये ठेवलेल्या लसूणाला कोंब आलेत म्हणून तेही एका चुटुकल्या कुंडीत खोचून ठेवले आहेत.
अरे हो, एक राहिलंच की सांगायचं. आजच लाल वेल्वेट रंगाच्या जास्वंदाच्या फुलाचं मुद्दामहून परागसिंचन केलं. कालच यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ पाहिला होता - सोप्पं वाटलं.. केलं. फुलाच्या ठिकाणी खुणेसाठी एक सुतळीचा तुकडाही अडकवून ठेवला आहे. आता बघुया किती यश येतं ते. काल तो व्हिडिओ पाहण्याअगोदरपर्यंत मला अजिबात माहिती नव्हतं की जास्वंदाला बियाही येतात ते! कायम फांदीच लावायची माहिती त्यामुळे असेल कदाचित. नविन काहितरी केलंय आज.
बाकी पालेभाज्यांच्या (शेपू, आंबटचुका, पालक, वगैरे) उत्तम बिया कुठे मिळू शकतील?
अरारा कढीलिंब तोडला? त्याच्या
अरारा कढीलिंब तोडला? त्याच्या फुलांवर खूप फुलपाखरे ( ब्लु जे येतात ) नंतर लाल फळांसाठी कोकीळ ,हळद्या येतात.
पालेभाजी बाजारात आली की त्यात कधीकधी मुळंवाली जुडी येते ती स्वच्छ धुवून विरळ लावा.बी वगैरेसाठी त्यातलीच तीन चार झाडे पाला न काढता वाढवा.त्याचेच बी खाली पडून कायमची भाजी होते.चवळी,माठ,चुका इत्यादी.पालकाचं बी लावा अथवा वरीलप्रमाणे.
भेंडी पाठोपाठ आमच्या
भेंडी पाठोपाठ आमच्या टोमॅटोलाही बाळ झालंय..
चला बरं झालं!
आता ऐसीवरच्या बायकांच्या आड्यन्सला रडावायला तो टोमॅटो हिरवा असतांनाच तोडून त्याची भाजी करू नका! त्याला पि़कू द्यात!
हिरवा टोमॅटो तोडून, त्याची भाजी खाऊन, इथल्या बायकामाणसांना रडवून, ढेकर द्यायचा म्हणजे पाऽऽऽप बघा!!!
:)
उन्हाळी पीक आवरलं.
उन्हाळी पीक आवरलं. हिरवे टोमॅटो काढले, थंडीमुळे झाडांचं लक्षण बरं नव्हतं. किलोभर टोमॅटो शेवटी मिळाले. शेवटच्या चार (भोपळी) मिरच्याही बारक्या आहेत.
हिवाळी पिकासाठी वाफा चुकीच्या ठिकाणी लावला. तिथे घराची सावली येते. तो ख्रिसमसात हलवणार आहे. जाने-फेब्रु. साठी पुन्हा पिकं काढून बघायचा विचार आहे.
खतं-पाण्याबद्दल :
घराच्या जुन्या मालकांनी एक रेन बॅरल दिलंय. त्या पिंपात ६० गॅलन (गुणिले ३.७५ लिटर) पाणी मावतं. त्यातून पाणी जोरात येत नाही, पण पाइप झाडांत सोडून देते. दहा मिनिटं जोरदार पाऊस झाला तर पिंप भरतं. आॅस्टिन मनपा पिंप विकत घ्यायला थोडे पैसेही देते.
आवारातली दोन झाडं पानगळीला प्रतिसाद देणारी आहेत. काही पानं टाकून दिली. आता काळ्या, प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पानं भरली आहेत. कंपोस्टरात तेवढी जागा नाही. त्या पिशव्यांमध्येच कंपोस्ट करून बघायचा विचार आहे. दोन वर्षं लागली तर तेवढी वाट बघायची.
(रुची : होय, आम्ही डिसेंबरात पानं गोळा करतो. कालच घरासमोरच्या झाडाचा खराटा दिसायला लागला.)
"ब्लू लाँग" वांगं. तीन
"ब्लू लाँग" वांगं. तीन रोपांना भरपूर वांगी लागलीयेत. काल लांब-लांब बारीक काप करून हलकेच तळून "बेगुन-भाजा" खाल्लं.
आदिवासी अमेरिकन लोक "तीन बहिणीं"ची शेती करत - कणीस, शेंगा आणि भोपळा (स्क्वॉश). तेच या मोठ्या पिशवीत करायचा प्रयत्न. थोडा फसला आहे बहुतेक, कारण भोपळा सर्वत्र फोफावून बाकीच्या झाडांवर सावली पाडतोय, आणि कणसाला फुलं फुटणार आहेत की नाही देव जाणे. पण भरपूर फरसबी मात्र लागलीय.
टोमॅटोंना फुलं पुष्कळ आहेत पण अजून फळ नाही. बटाटा का कोण जाणे, मध्येच मान टाकून मेला. पुन्हा लावलाय, पण फोटो दाखवण्याइतका नाही. बीट, राजगिरा, पालक, कोथिंबीर, मेथी वगैरे सगळे याच आठवड्यात पेरले, कारण आत्ताशी कुठे थोडं तापमान कमी होतंय इथे. थंडीच नाही मेली.
या वर्षी बरीच फुलझाडं लावलीयेत - झेंडू, पेटुनिया, पॅन्जी, मल्वा (रुचीकडून साभार!) कधी वाढून फुलं येतायत वाट बघतेय.
क्रिसमस ट्रीची एक
क्रिसमस ट्रीची एक डॅाक्युमेंट्री पाहिली.छोटी झाडं पाच सात वर्षांची उपटून विकतात पण किंमत परवडणाय्रांसाठी अठरा वीस वर्षांची पाचसात मिटर्स उंचीची कापून विकतात.ते घरात एका स्टँडवर बसवायचे आणि नंतर फेकून द्यायचे.
इकडे वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्या तोडण्यावरून सात पिढ्यांचा उद्धार करतात पर्यावरणवाले.
दोघांनाही धन्यवाद
हा त्या झाडाचा आज काढलेला फोटो. :)
पूर्वी कृत्रिम झाडं आणण्यात एक तोटा होता. खर्या पाईनच्या झाडांना एक प्रकारचा मंद सुगंध असतो. कृत्रिम झाड लावल्यावर तो मिळत नाही.
पण आता तो पाईनचा सुगंध देणार्या मेणबत्त्या निघाल्यात. त्या जाळल्या की तोच सुगंध घरभर दरवळतो.
मग झाडाला स्पर्श करेपर्यंत कळत देखील नाही की हे झाड कृत्रिम आहे ते!!!
:)
फोटो हाफिसातून दिसत नाहीये,
फोटो हाफिसातून दिसत नाहीये, त्यामुळे त्याबद्दल नंतर!
मात्र पाईनचा सुगंध मलाही आवडतो. आम्रिकेत असताना हाफिसात माझ्या क्युबच्या शेजारीच हे झाड असे. त्यानंतर तो वास पुन्हा मिळाला नव्हता
काही महिन्यांपलिकडेच इथे 'मोर' ने 'पाईन' च्या वासाचे "फिनाईल" आणले.. मोठ्या आशेने व आनंदात घेऊन आलो. पण छे! अगदीच भिकार वास निघाला. पाईनशी काहीच संबंध नसणारा! :(
पार्टी!!! कधी नि कुठे येऊ?
पार्टी!!! कधी नि कुठे येऊ? हवं तर बाळंतविडा घेऊन येते! ;-)