मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५९

पत्रव्यवहारामधला कॉपीराईट कोणाकडे असतो?

समजा सु आणि जी या दोन व्यक्ती एकमेकांना पत्रं लिहितात. ही पत्रं काही काळानंतर छापण्यात कोणाला रस असेल तर ती छापण्याबद्दल हक्क कोणाकडे असतात; सु यांनी लिहिलेली पत्रं छापण्याबद्दल सु यांना अधिकार असतो का जी यांना मिळालेली पत्रं छापण्याचा जी यांना अधिकार असतो?

हे दोघे सामान्य नागरिक किंवा मैत्रीपूर्ण पत्रं लिहिणारे लोक आहेत. समजा हाच प्रश्न समजा एखाद्या आस्थापनेतले कोणी कर्मचारी आणि त्यांची तक्रार करणारे कोणी नागरिक असा असेल तर त्यात वेगळा कायदा असतो का त्या आस्थापनेला स्वतंत्र नियम ठरवता येतात? ही आस्थापना म्हणजे संरक्षण मंत्रालय आहे आणि उदाहरणार्थ पठाणकोटच्या तळावरचा हल्ला असं काही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं काही नाही असं समजू. समजा एखाद्या बँकेतली कर्ज मिळण्याची प्रक्रिया किंवा शाळेत प्रवेश मिळण्याची प्रकिया असं काही असेल.

जे नियम हाताने लिहिलेल्या पत्रांसाठी, छापून/प्रिंट करून पाठवलेल्या पत्रांसाठी असतात तेच इमेल्ससाठी असतात का? (यात अर्थातच सर्व्हर हॅक झाला, त्यातून कोणी पत्रं जाहीर केली असा एक प्रश्न येतो. पण हॅक करणं आणि परवानगीशिवाय भलत्यानेच पत्रं जाहीर करणं ही चोरी असं सध्या गृहित धरलंय.)

समजा सु आणि जी यांच्या पत्रांमध्ये, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचं पत्रं आपल्या शब्दांमध्ये लिहून जाहीर केलं, त्यात दुसऱ्या व्यक्तीला अर्धवट मजकूरामुळे आपली बदनामी होत्ये असं वाटलं तर कायदा मदतीला येऊ शकतो का? आस्थापनेचे कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांच्यात अशी परिस्थिती उद्भवली तर काय होतं?

field_vote: 
0
No votes yet

आनंदाला एकच चेहेरा असतो दु:खाला अनंत - या वाक्याचा अर्थ कोणी सांगेल का?
मला लागलेला अर्थ - आनंदाची अनुभूती सारखीच असते दु:ख मात्र - क्षुधा निवारण करण्यासाठी पैसे नसल्याचे दु:ख, मूल दगावल्याचे दु:ख, मानहानी चे दु:ख, प्रेमभंगाचे दु:ख, बेकारीचा घाला, अशी अन्य अनेक उदाहरणे देता येतील - अशा विविध अनुभूतींनी दु:ख सामोरे येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थेट उत्तर माहीती नाही. पण क्वोट देऊ शकतो.

“All happy families are alike; each unhappy family is unhappy in its own way.” ― Leo Tolstoy,

( अर्थात तुम्ही हा क्वोट आधी वाचलेला असण्याची दाट शक्यता आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय हाच "सुविचार" मला आठवत नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच सुविचार मी लग्नाच्या संदर्भात ऐकला होता. कुटुंबाच्या ठिकाणी लग्न शब्द.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जसे दु:खाचे अनेक प्रकार लिहिलेत तसेच आनंदाचेपण असतातच ना..
खाज आल्यावर खाजवल्याचा आनंद आणि विश्वचषक जिंकल्याचा आनंद सारखीच अनुभूती कशी देइल ? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा धागा वाचनमात्र केल्यास त्यातील मुक्ताफळांवर चर्चा/वाद कसा करावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अपेक्षा आहे की लेखक ते लेखन योग्य त्या (संकलीत) धाग्यांवर हलवतील. तसं झालं नाही आणि जर तो धागा 'फुसके बार' मालेतील असेल तर त्या धाग्याचा रेफरन्स देऊन (दुवा देऊन) फुसक्या बारांच्या संकलित धाग्यावर प्रतिसाद द्यावा

अन्यथा त्या धाग्याचा संदर्भ देऊन 'मनातील प्रश्न किंवा विचार' मालिकेतही चर्चा करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पिडांनी सही डीलीट केली आहे. त्यांची खव साफ केली आहे. लेखनसीमा लिहीले आहे. Sad
I only hope he hasn't left Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

affect आणि effect मध्ये घोळ बरेच लोक घालतात. मी तो घालत नाही अशा समजुतीत होते मी इतके दिवस. आज नेटफ्लिक्सवर हे वाक्य वाचलं.

Restricting data usage may effect video quality while watching Netflix.

वरील वाक्यात चुकीचा शब्द वापरला आहे असं माझं मत आहे. मी बरोबर आहे का त्या सायटीवर लिहिलेलं वाक्य?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१) मी तो घालत नाही अशा समजुतीत होतेतो मी इतके दिवस
२) त्या वाक्यात effect हा शब्द चूक असून affect हा शब्द असायला हवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अफेक्ट म्हणजे प्रादुर्भाव आणि इफेक्ट म्हणजे परिणाम हा अर्थ बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रादुर्भाव नाही. दोन्हीचा अर्थ परिणामच आहे. वापरात फरक आहे दोन्ही शब्दांच्या.

ननि, गब्बर-- धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इतक्या effective माहीतीनंतर माझे ग्रामर affect झाले नाही तर नवल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या वाक्यात affect हवे. परंतु effect हेसुद्धा (इतरत्र) क्रियापद असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राकु आणि ऐसी च्या संपादकांमधे चाललेल्या खेळामुळे चांदोबातल्या विक्रम वेताळ च्या गोष्टीं च्या सुरवातीच्या ओळींची आठवण झाली.

असे काहीतरी असायचे ना की राजानी आपला हट्ट सोडला नाही......

इथे राजा कोण आणि वेताळ कोण हेच कळेनासे झालय!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक वाचनमात्र लेखाखाली संपादक मंडळ आकडा देत असल्याने नेमक्या किती लेखांचा घडा भरल्यानंतर काय कारवाई करणार याची उत्सुकता अनिवार होत चालली आहे.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं ही संपादकीय गांधीगिरी आहे. नुसता नंबर दाखवायचा आणि वाचनमात्र करण्याव्यतिरिक्त इतर कारवाई करायची नाही. ज्याच्याविरुद्ध गांधीगिरी वापरतात त्याला थोडी फार जनाची नसेल तरी मनाची असते असे गृहीतक असते. राकु त्यात बसतात की नाही ते संपादक मंडळी पाहताहेत वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांनी पोस्ट्स 'वाचनमात्र' करण्याची शिक्षा दिलीच आहे. गांधीगिरीबद्दलची तुमची समजुत तरी काय आहे? बॅन केले नाही म्हणजे गांधीगिरी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचनमात्र ही शिक्षा कशी काय? आणि असली तरी तुम्हाला कशी काय?
तुम्हाला लिहायचं आहे आणि प्रत्येक वेळी नव्या धाग्यात. ते तुम्हाला करता येतंय. प्रतिक्रिया देणार्‍यांना ती देता येत नाहीय. त्यात तुमचे काय नुकसान?
म्हणून ही गांधीगिरीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणी देऊन समाधान झाले नाही.

अनु राव चे त्रिशतक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे अड्डा जमला आहे माहित नव्हते. असो.
साती,
तुमची प्रतिक्षा लवकरच संपेल. खालील धमकी पहा.
+++++++++++++
नुकत्याच टाकलेल्या फुसे बारच्या पोस्टनंतर मुक्तसुनीत यांच्यकडून खालील मेसेज आला आहे.
"

नमस्कार,
तुमच्या "फुसके बार" या लेखनप्रकाराच्या निमित्ताने तुमच्यात आणि "ऐसी अक्षरे"च्या संपादक सदस्यांमधे गेले अनेक आठवडे चालू असलेली चर्चा वाचत होतो.
या संदर्भात मी जे इथे लिहितो आहे तेही याआधी सांगून झालेलं आहेच. तरीही काही थोड्या गोष्टी सांगतो.
"ऐसी अक्षरे" सारख्या वेबसाईट्स ही एक प्रकारे सार्वजनिक स्पेस आहे. त्याची गल्लत आपली फेसबुक टाईमलाईन किंवा आपला ब्लॉग याच्याशी करू नये. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अमर्याद बँडविड्थ उपलब्ध आहे. "ऐसी अक्षरे" वर बँडविड्थवर बंधनं नाहीत हे खरं, परंतु ती वापरताना प्रत्येक सदस्याने विवेक बाळगावा - रीझनेबल वर्तन ठेवावं अशी अपेक्षा आहे. जी गोष्ट एक सर्वसामान्य सदस्य म्हणून तुम्हाला आपोआप कळायला हवी होती ती इथल्या संपादकांनी आणि सर्वसामान्य सदस्यांनी आडून आडून आणि मग थेटपणे - प्रसंगी कठोर शब्दांत - डझनावारी वेळा सांगून झालेली आहे.
फॉर द रेकॉर्ड , मी तेच इथे पुन्हा सांगतो. तुम्हाला जे अनेकानेक प्रश्न पडतात किंवा विचार येतात त्यांच्याकरता "मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार" हा विभाग आहेच. त्यात ते तुम्ही मनसोक्त रीत्या नोंदवावेत. त्यावर कसलंही बंधन नाही. मात्र प्रत्येक अशा विचाराकरता नवा धागाच उघडायला हवा हा तुमचा हट्ट बरोबर नाही. यापुढे तुम्ही उघडलेल्या नव्या धाग्याचं काय होईल त्याबद्दल तुम्हाला किंवा इतर कुणालाही कसलंही स्पष्टीकरण देण्याकरता इथले कुठलेही संपादक सदस्य बांधील असणार नाहीत.
इतक्या प्रचंड प्रमाणात दिलेल्या सूचनांनंतर, मित्रत्वाच्या सल्ल्यांनंतर तुम्हाला इतक्या प्रमाणातले नवनवे धागे काढायचे असतील तर त्या धाग्यांची योग्य रीतीने वासलात लागेल याची सूचना मी तुम्हाला देतो आहे.
धन्यवाद."
+++++++++++++++++
याला मी सविस्तार उत्तर दिले. मात्र सध्या काहीही पोस्ट करण्यात येणा-या अडचणींबद्दल मी काही वेळा लिहिले, त्याचप्रमाणे यावेळीही ते उत्तर पोस्ट झालेले दिसत नाही. आता सारे पुन्हा लिहिणे जीवावर आले आहे. तरी ते पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करतो.

'वासलात लावण्याची' धमकी देत आहात म्हणजे कदाचित संपादकांपैकी असाल असे वाटते.
आता मला वेगवेगळ्या पद्धतींनी समजावण्याबाबत. आलेला नवीन सदस्य इयत्ता पहिलीत किंवा नर्सरीतच असतो हा तुमचा समज आहे, हा माझा प्रश्न नाही.
माझे वर्तन रिझनेबलच आहे, तुम्ही दर्जाच्या भलत्याच कल्पना करून घेतल्यामुळे माझ्या मागे लागला आहात. इथल्या अनेक पोस्ट्स साधारण असतात, अनेक पोस्ट्सवरील कमेंट्सही तशाच साधारण असतात.
फुसके बार मध्ये आज टाकलेल्या पोस्टमध्ये एक छोटा तर एक दीर्घ मुद्दा आहे. त्यातला दीर्घ मुद्दा केवळ फुसके बार या सदराखाली टाकल्यामुळे तुम्ही तो वाचनमात्र केला. आधीही तसे झालेले आहे. तेव्हा तुम्ही इतके बायस्ड झालेला आहात आणि वर रिझनेबल होण्याची अपेक्षा माझ्याकडून बाळगत आहात.
माझेच नाव सगलीकडे दिसते हा कोल्हटकरांचा आक्षेप होता. त्यालाही मी सविस्तार उत्तर देत त्यांचे म्हणणे म्हणजे त्यांच्या समजुतीचा खेळ कसा आहे हे दाखवले होते.
आता तुम्ही बॅंडविड्थचा मुद्दा घेऊन आला आहात. हा मुद्दाही टिकणारा नाही हे तुम्हाला माहित नाही असे मी समजू का? या पोस्ट्स येथे टाकल्या काय आणि दुसरीकडे टाकल्या काय, त्याने बॅंडविड्थला काही फरक पडत नाही.
"तुम्हाला इतक्या प्रमाणातले नवनवे धागे काढायचे असतील तर त्या धाग्यांची योग्य रीतीने वासलात लागेल याची सूचना मी तुम्हाला देतो आहे." इतके धागे म्हणजे किती हो? छोटे विचार, मोठे विचार, छोटे प्रश्न, मोठे प्रश्न यात तुम्ही कसा फरक करता? ज्यांची निश्चित व्याख्या करता येत नाही अशा भाराभर कॅटॅगरी तुम्ही निर्माण करून ठेवल्यात, आणि हे येथेच टाकायला हवी अशी जबरदस्ती उलट माझ्यावरच करत अहात. तुमच्या या व्यक्तीसापेक्ष व निवडक प्रकारामुळेच तुम्ही मला याप्रकारे हरॅस करत आहात याची मीदेखील तुम्हाला कल्पना देतो आणि ही हरॅसमेंट ताबडतोब बंद करा हे शेवटचे सांगतो. तुम्ही अमुक करा म्हणून सांगितले आणिे मी ते भिका-याप्रमाणे ऐकले असे होणार नाही. सदस्यांना असे हरॅस करण्याऐवजी थोडी दिग्निटी द्या ही अपेक्षा वावगी आहे की काय?
यापुढे इथल्या मालक आहेत त्यांच्याशी मी अनेकदा संवाद साधलेला आहे, पुढेही करू सकतो. प्रत्येक वेळी नवीन सदस्याने माझ्याशी याबाबतीत संपर्क साधू नये. बाकी तुम्ही फार तर फार काय करू शकाल? आधी पोस्ट्स हलवत होता, आता पोस्ट्स वाचनमात्र करत आहात. आता काय पोस्ट टाकण्यापासूनच रोखू सकाल, टाकलेल्या पोस्ट्सच काढून टाकाल, माझे सदस्यत्व रद्द करू शकाल, एवढेच ना? इथले कोठलेही नियम मी तोडलेले नाहीत. माझ्या पोस्ट्स हलवण्याच्या, वाचनमात्र करण्याच्या प्रकाराबाबत मी काहीही करू शकत नाही, तरीही तुमचे धमक्या देणे काही थांबताना दिसत नाही, काय चालले आहे हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तर हे भारत-पाक सबंधांसारखं वाटतं. एक जण कुरापती काढत राहणार आणि दुसरा फार काही न करता 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर!' म्हणणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला वाटतं राकु बॅन होतील. कारण बॅन करायचे नाही असे जरी इथले धोरण असले तरी, अगदी हार्ड अँड फास्ट नियम नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली कुवत मध्यम आहे ; हे पचवणं थोडं अवघडच आहे; विशेषतः प्रामाणिक असाल तर.
कुवत मध्यम असणं म्हणजे काय --
आपण बुद्धीनं फार काही माठ नसलो तरी फार थोरही नाही, अगदिच सर्वसाधारण आहोत;
प्रयत्न केल्यावरही एका मर्यादेपलिकडे काही आपली उडी पोचत नाही.
फार काही तार्किकक्षमता आपल्या विकसित नाहित; कुठलंही विशेष कौशल्य नाही; कारकुनी कामं करतो झालं.
कलाक्षेत्रातल्या जाणीवा विकसित झाल्या नाहित; उपजत नव्हत्याच. काहींच्या मुद्दाम नंतर प्रयत्नपोरोवक विकसित होतात;
आपल्या त्याही नाहित. शारिरिक बाबतीतही आपण दुर्बळ वगैरे अगदिच नसलो तरी अगदिच अ‍ॅथलीट वा पैलवानही नाही.
आतापर्यंत फार काही भव्य दिव्य करता आलेलं नाही करिअरमध्ये.
"आजवर काही बनलो नाही, पण इथून पुढे होउ शकतो की अजून " असं म्हणावंसं वाटत नाही.
इथून पुढे काही करता येण्यासाठी जो पाया लागतो; तोही अजून बनलेला आहे; असंही नाही.
त्यामुळे इथून पुढेही काही होण्याच्या आशा नाहित.
म्हणजे करिअर खड्ड्यात गेलं ; बर्बाद झालो; असंही नाही. अगदिच सरासरीवर सगळं सुरु आहे.
अगदि कर्ज न घेता एकदम रोख, एकरकमी घरं बाइक्स घेतल्या; असं नाही; किम्वा कर्जच फेडता येत नाहिये असंही नाही.
फेडतोय आपलं कसंबसं सगळ्यांसारखच.
एक वाईट गोष्ट म्हणजे "अमक्या गोश्टीमुळे वाईट झालं; नैतर कुठच्या कुठं पोचलो असतो" हा बहाणा मारायचाही स्कोप नाही. Wink
खरं काय ते स्वतःला ठाउक असतच साला. पळणार कुठे ?
.
.
मिडिओक्रिसिटी का काय ते ह्यालाच म्हणतात का ?
.
.
अवांतर --
"नाही रे तू तसा बरा आहेस" हे कुणाकडून तरी ऐकून घ्यावं; म्हणून मुद्दाम स्वतःहून डायलॉगबाजी करतोय असं समजू नका प्लीझ.
मला खरोखर असं वाटतं आहे. त्यावरुन पुन्हा टॉण्ट / टोमणे नकोत ; किंवा सद्भावनेने का असेना; केलेले चुकीचे कौतुक नको.
मी बोलतो आहे ती वस्तुस्थिती आहे.
.
.
मिडिओक्रिसिटी मध्ये वाईट असं कुठे काय आहे ? फारसं नाहिच.
.
.
म्हंजे चांगलं - वाईट असं लेबल लावणं अवघड आहे.
मला आत्ता जे वाटतय ते पुन्हा सांगतो.
.
.
आपण फार काही कामगिरी केलेली नाही, फार काही कमावलंही नाही;
इथून पुढेही काही करण्याची शक्यता नाही; अशी जाणीव होते आहे.
.
.
अर्थात स्वतःत लै पोटेन्शियल होतं; आणि ते वाया घातलं; असं नाही.
.
.
हां पण गोष्ट वाटते. आपल्या पूर्वी खूप खूप पिढ्या होउन गेल्यात.
त्यांनी खूप खूप काही कमावलय, घोळ घातलेत; कष्ट केलेत; कित्येक बाबी अपघातानं शोधल्यात; कित्येकांनी उपजत गुण वापरुन खूप काही केलेलं आहे.
संघर्ष केलाय. हाणामार्‍या केल्यात. धीरानं वेळ सांभाळली आहे.
विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे. आपली जिंदगी म्हणजे ह्या सगळ्याचं तयार प्रॉडक्ट आपल्याला मिळालेलं.
.
.
आणि त्या काळात ज्यांनी भरीव वगैरे कामगिरी केली; त्यांनी सगळं चुकत धडपडत केलेलं; फारसं ब्याकग्राउंड नसताना; परिस्थिती अधिक अवघड असताना.
संगीतापासून ते इतिहास संशोधन, सगळिच दृश्य माध्यमं (चित्रकला, चित्रपट, पडदे, रचनाशास्त्र, शिल्पकला, मूर्तीकाम) , विविध कारागिरी, ललित्,वैचारिक,
लेखनकाम , अंक गणित ,बीज गणित, अमूर्त गणित, रसायन, भौतिकी..... अशी शेकडो हजारो शास्त्रं आहेत.
.
.
ह्या सगळ्यात अगदि पायोनियर म्हणवणार्‍यांना किंवा त्या पायोनियर्सच्या शिष्य म्हणवणार्‍यांना -- शास्त्र पुढे घेउन जायला जी माहिती उपलब्ध होती; ती फार फार थोडी होती. साधनं अति मर्यादित होती. आता औद्योगीकरण झालय; वस्तू उपलब्ध आहेत. चमत्कार वाटावा इतपत जग जोडलं गेलय. तुम्हाला कुतूहल असण्याचा अवकाश; पुढ्यात उत्तर हजर आहे. इंटरनेट आहे. तुमची पुरेशी पात्रता असेल; तर त्या त्या क्षेत्रातले जागतिक किर्तीचे नामवंत-- त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचू शकताय. भिंती ऑल्मोस्ट संपल्यात. आता हवी आहे फक्त पुरेशी क्षमता, किम्वा कुतूहल, किंवा सरावाची तयारी; इतर अडथळे ऑल्मोस्ट संपलेत.
.
.
भातखंड्यांना संगीतासाठी जे उपलब्ध होतं; त्यातलं खूपसं आपल्याला आहेच ध्वनिचित्रफिती रुपात. शिवाय भातखंड्यांना जागतिक संगीतातलं मिळालं नसेल; तितकं एक्स्पोजर आपल्याला आहे. एका क्लिकवर आपण चायनिज, रशियन, अरबी, इराणी, कुठल्याशा भागातले आदिवासी..... अशा सगळ्यांचं संगीत ऐकू शकतो. ह्यांचे विविध क्षेत्रातले कलाविष्कार पाहू शकतो. ह्यांच्याकडे परंपरेतून आलेलं ज्ञान घेउ शकतो.
.
.
पूर्वी दोन-तीन भाषा शिकणंही अवघड असेल. आता हव्या तितक्या भाषा निदान प्राथमिक पातळीवर तरी तुम्ही काही महिन्यात शिकू शकता.
लिखित, वाचिक माध्यमं उपलब्ध आहेत; ऑडिओ विडियो आहेत.
तुम्हाला मदत करण्यास गुरु/शिक्षक/रिसोर्सेस उपलब्ध आहेत.
.
.
हे असं सगळं उपलब्ध आहे. आणि मी काय करतोय ?
तसं फारसं काहिच नाही. मी वाईट , दुरित म्हणावं असं काहिच करत नाहीये.
इतरांना त्रास नाही; पण स्वतःही काही नाही.
.
.
शिकणं वगैरे सोडून द्या. मग मी निव्वळ विशुद्ध टैम्पास तरी करतोय का ?
म्हणजे धम्माल मस्ती, दंगा, इकडं तिकडं भटक्णं, थकेस्तोवर पार्ट्या वगैरे....
नोप्स.
.
.
अगणित अशी अवांतर वाचनाला पुस्तकं उपलब्ध आहेत.
.
.
कारकुनी जिंदगी आहे. हापिसात जातो आणि घरी येतो. ह्याशिवाय तसं मी काहिच करत नाहिये.
आणि करीनसं वाटतही नाहिये.
.
.
मला एकच कुतूहल आहे. इथून पुढे दुनिया कशी असेल ? मागच्या शतकभरात आणि त्यातही मागच्या दोनेक दशकात तूफानी बदल झालेला आहे.
पुढे नेमकं कय होणारेय ; ह्याबद्दल फारच कुतूहल आहे. त्या पुढच्या शतकभरातल्या घडामोडी पहायला तरी इथून पुढे शंभर वर्षांची जिंदगी हवी आहे.
मानवी संस्कृती सभ्यतेनं एकदम टॉप गिअर टाकलाय, पुढे ताटात अजून काय काय वाढून ठेवलं असेल ? क्लायमॅक्स अजून बाकी आहे.
सीट बेल्ट मी आवळून ठेवतोय.
.
.
एकूणात सध्याच्या परिस्थितीवरुन अंदाज बांधायचा ; ह्याच प्याटर्नमध्ये गोष्टी सुरु राहतील असं मानलं तर सरासरी भारतीय आयुष्यापेक्षा मला पंधरावीस वर्ष
जास्तच मिळणारेत. मी एकदम हेल्थ फ्रीक वगैरे झालो आतापासूनच तर एकशे तीस वगैरे वर्षेही जगेन बहुतेक.
पण शेवटची वर्षं अंगदुखी, सांधेदुखीनं खराब होतील; कदाचित आर्थिक चिंता सतावतील ; पण मी जास्त जगणार हे नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कित्तीतरी गोष्टी करून बघायला, करायला आवडतं
पण थोर्थोर लोकांप्रमाणे मी कोणत्याही "एका" गोष्टीसाठी माझे अख्खे आयुष्य जाऊदे एक वर्षही 'डेडिकेटेडली' मोजायला तयार नाही.
मला एका व्यक्तीमागे, कार्यामागे किंवा कशाही माझे माझे पूर्णपणाने असणेच जमत नाही. सगळ्यात इंटरेस्ट असतो मात्र त्यातली एकही गोष्ट माझी पॅशन नाही.

मग मी अनेक गोष्टी करत असलो तरी कोणत्याही एका बाबतीत माझ्याकडून काहीही थोर्थोर घडण्याची कुवत नाही - शक्यता नाही
मात्र मी स्वतःला मिडीऑकर अजिबात समजत नाही. आणि मी तुला जितका ओळखतो तुलाही मी मिडीऑकर म्हणणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आय ॲम मडियॉकर बाय चॉईस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि मी तुला जितका ओळखतो तुलाही मी मिडीऑकर म्हणणार नाही

+१

मन, तू जे मनातील छोटे मोठे प्रश्न लिहीतोस त्यात अजिबात अभिनिवेश नसतो की कृत्रिमता नसते. एक सहजता, साधेपण, उस्फूर्तता असते. म्हणजे अन्य कलाकृती व तुझे विचार यांची तुलना मी हाटेलातील सजवलेला पदार्थ व घरगुती साधेपणाने रांधुन वाढलेला वरण - तूप - भात अशी करेन. आता इतकी सहज वाचकांना सामील करुन घेण्याची हातोटी असलेल्या तुला, मला तरी मिडीऑकर म्हणवत नाही.
.
आता अशा कॉम्प्लिमेन्टस (स्तुतीपर शब्द) मिळाल्याने, तू हा 'मिडीऑकर' विषयच मूळात काढल्याबद्दल लाजणार्/ओशाळणार हे मला माहीते. पण आता खरं आहे ते आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग मी अनेक गोष्टी करत असलो तरी कोणत्याही एका बाबतीत माझ्याकडून काहीही थोर्थोर घडण्याची कुवत नाही - शक्यता नाही>>

हे माझ्या बाबतीत,
+१.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाता येता एखादी फर्मास चहाची टपरी लागली की पावलं आपोआप तिकडे वळतात. चांगला वाफाळता गरम झकास ' कटिंग चाय ' घशाखाली उतरल्यावर कसं एकदम फ्रेश वाटतं. शिवाय माझ्या मनात ह्या स्वतः कश्ट करुन कमावणार्या लोकांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. हे कष्ट करतात. सरकारक्डे डोळे लावून बसत नाहित. परिस्थिती गरिबीची असली तरी चोर्‍या करीत फिरत नाहित. कश्ट / काम करुन पैसे मिळवू पाहताहेत. आपण एक घोट चहा घेतल्यानं ह्यांना तेवढाच हातभार; असं मला वआटतं.
.
.
पण स्साला... एक लोच्याय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१
काय

बाकी आम्ही जेव्हा म्हणतो की ज्यांना सहजशक्य आहे त्यांनी सोहळा करून लग्ने करावीत ते मात्र कोणाला पटत नाय Sad Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोच्या असाय की...
ह्यांच्या गाड्या असतात फुटपाथवर. फुटपाथ काही ह्यांचा नसतो.
ह्यांच्या गाड्यांमुळे चालणयची जागा अडते. सरळ चालत येणारा माणूस मग नाइलाजाने सहजच फुटपाथ सोडून मुख्य रस्त्यावरुन चालायला लागतो.
मग कधी त्याला रस्त्यावरच्या वाहनाची धडक लागते; कुणी झटकन् कट मारुन जातं, कधी कुरबुरी होतात; कधी क्वचित जीवघेणा अपघातही होतो.
.
.
हे सगळं कशासाठी तर त्या टपरीवाल्यानं, हातगाडीवाल्यानं जागा अडवलिये म्हणून.
.
.
मग ह्यांना सजा झाली पाहिजे असं वाटतं.
.
.
म्हणजे कौतुकही वाटत असतं; आणी त्याच वेळी ह्यांना कडक सजा झाली पाहिजे असंही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

शिवाय माझ्या मनात ह्या स्वतः कश्ट करुन कमावणार्या लोकांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे. हे कष्ट करतात. सरकारक्डे डोळे लावून बसत नाहित. परिस्थिती गरिबीची असली तरी चोर्‍या करीत फिरत नाहित. कश्ट / काम करुन पैसे मिळवू पाहताहेत. आपण एक घोट चहा घेतल्यानं ह्यांना तेवढाच हातभार; असं मला वआटतं.

शॉल्लेट.

माझ्या मनात तुझ्यासारख्या लोकांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे, मनोबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंकी इयर सुरु झालेलं दिसतय. आम्हा रॅट लोकांकरता उत्तम असणारे Smile
ड्रॅगन करताही.
कारण या तीघांचं त्रिकुट असतं.
___
सॉरी ८ फेब्रुवारीला सुरु होतय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंकी ईयर सुरु झाले... मग ट्रंप प्रेसिडेंट - निदान नॉमिनी तरी होणार की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL हाहाहा कसला सिक्सर ठोकलात अतिश जी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशजी! मला क्षणभर खरोखर वाटले की कोणी अतिश म्हणून ऐसीवर अवतरले की काय?
मी याला बेस्ट शॉर्ट्फॉर्म ऑव्ह द डीकेड असे सन्मानित करीत आहे. (२६ जन्युअरी उलटून गेला म्हणून काय झाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile हा पूर्वी मी वापरलाय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंकी ईयर सुरु झाले... मग ट्रंप प्रेसिडेंट - निदान नॉमिनी तरी होणार की काय?

हान तेजामारी ... क्या ब्बात है !!!

( मेरा अज़्म इतना बलंद है के पराये शोलों का डर नहीं .... मुझे ख़ौफ़ आतिश-ए-गुल से है, ये कहीं चमन को जला न दे - हा शेर उगीचच आठवला. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेरा अज़्म इतना बलंद है के पराये शोलों का डर नहीं .... मुझे ख़ौफ़ आतिश-ए-गुल से है, ये कहीं चमन को जला न दे

आहाहा! मस्त! आता कोणीतरी येऊन विचारु नका मला नक्की काय समजलं तेजायला. गेल्या वेळी अज्ञान पार उघडं पडलेल< माझं - मोती 'खराबोमे' मिले वाल्या शेराबद्दल बोलतेय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरं आहे का ?

"The greatest shortcoming of the human race is our inability to understand the exponential function." - Prof. Al Bartlett

संदर्भ - Prof. Al Bartlett's lecture (Audio)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राकुंच्या धाग्यातल्या काही फुसक्या बारांबाबत........
>>सत्तेच्या हव्यासापोटी राजकारणाचे गुन्हेगारीकरण, उघडउघड भ्रष्टीकरण करण्याचे अपश्रेय त्यांना न दिले जाता ७१च्या बांगलादेश निर्मितीचे श्रेय मात्र त्यांना आवर्जून दिले जाते व पुढे त्यांच्या झालेल्या हत्येला बलिदानाचा मुलामा देण्याचेच काम केले जाते.

मला वाटते सर्व जाणते लोक लोकशाही संस्थांच्या खच्चीकरणाबद्दल त्यांना दोष देतातच.

>> खरे तर ७१च्या घटनांबद्दल त्यांचे कौतुक आहेच, परंतु तेव्हा शास्त्री किंवा त्यांच्यासारखे कोणी जरी पंतप्रधान असते, तरी तेच निष्पन्न झाले असते यावर दुमत होईल का?

रा कु असे सुचवत आहेत - ७१च्या वेळी सैन्य इतके प्रबळ होते की कोणीही नेता असता तरी हाच निकाल आला असता. हाच न्याय १९४७/४८, १९६२, १९९९ ला लावता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

योगयोगाने ही कमेंट दिसली. कदाचित ते धागे वाचनमात्र केले गेल्याने येथे केली असेल. तसेही इथल्या एका संपादक सदस्यांनी यापुढे या पोस्ट्ची 'वासलात लावण्याची' धमकी दिली आहे. त्याला त्याच पोस्टवर मी सविस्तार उत्तरही दिले आहे. परंतु यापुढे या पोस्ट टाकण्यावरच बंदी येईल असे वाटते.
आता कमेंटकडे.
७१चे युद्ध आपण ठरवून केले, इंदिरा गांधींनी प्रथम तुद्धाचा विषय काढला तेव्हा अाता लगेच लढलो तर आपण निश्चित हरू असे स्वत: माणेकशॉ यांनी त्यांना सांगितले होते, व युद्धसज्ज होण्यास अवधी मागितला होता.
४७-४८साली युनोच्या प्रेमामुळे घात झाला व नंतर ६२साली सैन्याच्या तयारीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. ही देशाच्या नेत्ृत्वाची चूक समजायला हवी. त्याविरूद्ध ७१प्रमाणे कारगिलच्या वेळीही कोणतेही सरकार असते तरी फरक पडला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योगायोग कारण तुम्ही वाचण्यापेक्षा कदाचित प्रसवण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले असेल.
.
खफवरती ही चक्कर मारा. गप्पागप्पात, आबांनी तुमच्या अ‍ॅमेझॉन्/फ्लिपकार्ट तोट्यात जाते प्रश्नावर भरपूर व माहीतीपूर्ण लिहीले आहे.-

आदूबाळ
शुक्रवार, 29/01/2016 - 08:47

फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील वगैरे "मार्केटप्लेस मॉडेल" राबवतात. म्हणजे ते विविध विक्रेत्यांना एक बाजारपेठेचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात.

कल्पना करा, की उद्या म० फुले मंडई (पक्षी: ताजी भाजी विक्रीचा प्लॅटफॉर्म) प्रायव्हेटाईज झाली आणि मनोबाने चालवायला घेतली. मंडईचा चालक/मालक म्हणून मनोबाचं जमाखर्च पत्रक कसं दिसेल:

जमा
अ. गाळ्यांची पागडी (पक्षी: बाजारपेठेत विक्री करायची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मनोबाने विक्रेत्याकडून घेतलेले पैसे. फ्लिपकार्टच्या भाषेत "लिस्टिंग फीज")
आ. गाळ्याचं भाडं

आता होतं असं, की विक्रेता म्हणतो की बाबा मनोबा, तू तो नया हय. उद्या पागडी+भाडं घेऊन मला त्यावरचे रिटर्न्स मिळाले नाहीत तर? त्यापेक्षा मी असं करतो, तुझ्या मंडईत काहीतरी विकतो, आणि त्यातले दोन टक्के तू घे (कमिशन). तुझी मंडई चांगली असेल, त्यात खूप ग्राहक आले आणि खूप खरेदी केली, तर पागडीभाडं सहज सुटेल.

खर्च
आता मनोबावर

इ. मंडई बांधणं आणि त्यात नवनव्या सुविधा आणणं
ई. मंडई चालवणं

याव्यतिरिक्त इतरही खर्च येऊन पडले. उदा:

उ. जाहिरात (जास्तीत जास्त ग्राहक यावेत म्हणून, आणि इतर मंडयांत ग्राहक जाऊ नयेत म्हणून)
ऊ. क्वालिटी कंट्रोल (कारण भाजी खराब निघाली तर म० फुले मंडईचं -पर्यायाने मनोबाचं नाव बद्दू होईल)
ए. या सर्व गोष्टी करण्यासाठी हुश्शार माणसं नेमणं, कारण मनोबा सगळं एकटाच करू शकत नाही (माझं लिंक्डिन प्रोफाईल अद्ययावत आहे. जस्ट टेलिंग (डोळा मारत) )

आता होतं असं, की खर्च सुरुवातीलाच उभे राहतात, आणि कमी करणं शक्य नसतं. कारण मनोबाचा स्पर्धकही तेच करत असतो. काही "छुपे खर्च" असतात - म्हणजे जिथे तो खर्च खर्चात दिसण्याऐवजी "जमा कमी होणे" या स्वरूपात दिसतो. (उदा० शुचि अध्यात्मिक प्रकाशनाचे आदूबाळलीळामृत हे लोकप्रिय पुस्तक फक्त मनोबांच्या मंडईत विकण्यासाठी शुचि प्रकाशन कमी कमिशनमध्ये दाबतं.)

या सगळ्याचा परिणाम होतो - आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या. अशा वेळेला कंपन्या "दिवट्या चिरंजीवांचा एकमेव आसरा - बाबा बँक" यांच्याकडे पैसे मागण्यासाठी जातात. आता अ‍ॅमेझॉनचे बाबा मोठी मालदार पार्टी आहे. त्यामुळे काय हरकत नाय. फ्लिपकार्टला एकच बाबा नसल्याने त्यांनी सावत्रबाबांचा एक संघ उभा केला आहे (प्रायव्हेट ईक्विटी इन्व्हेस्टर्स).

----

हे प्रकरण फक्त ऑनलाईन रीटेलर्सपुरतंच मर्यादित नसतं. सुपरमार्केटांनाही याच चक्रातून जावं लागतं. उदा० बिग बझार. अशा कंपन्यांसाठी मैलाचा पहिला दगड म्हणजे कॅश प्रॉफिटमध्ये येणे (म्हणजे घसारा सोडून नफा मिळणे. अगदी सोप्या शब्दात - १ जानेवारीला १०० रुपये टाकले तर ३१ डिसेंबरच्या पार्टीला कमीतकमी चखणा तरी आणता आला पाहिजे). पुस्तकी नफा (बुक प्रॉफिट) त्यापुढची गोष्ट, आणि स्वतःच्या पैशांनी भांडवली खर्च करता येणे हे तर गुलबकावलीचं फूल.

त्यामुळे - अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टाने तोटा दाखवावा यात नवल काही नाही. "ज्यांचं बिझिनेस मॉडेल सस्टेनेबल नसतं ते तोट्यात जातात" हे खरं असलं तरी व्यत्यास खरा नाही.

मग प्रश्न असा येतो, की किती वर्षं तोट्यात राहतील, आणि कधी फायद्यात जातील? याबद्दल काही इकॉनोमेट्रिक मॉडेल्स आहेत, पण त्यातून येणारे निष्कर्ष आणि सारसबागेबाहेरच्या पोपटाने दिलेले निष्कर्ष यात "निष्कर्ष" या अंगाने फारसा फरक नाही (गुणात्मक फरक अर्थातच आहे.)

माझं यावरचं मत असं आहे, की जोपर्यंत प्रायव्हेट ईक्विटी इन्व्हेस्टर गुंतवणूक करायला तयार आहेत, तोपर्यंत चिंता करायचं कारण नाही. (कारण त्यांनाच त्यांच्या पैशाची जास्त काळजी!) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कंपन्या लांबलचक तोटा असताना शेअर मार्केटात लिस्ट होणं कठीण आहे. आणि आपण प्रायव्हेट ईक्विटी इन्व्हेस्टर नाही. आपले चार चव्वल अडकलेले नाहीत. त्यामुळे आपली भूमिका लांबसडक खरड लिहिण्याइतपत मर्यादित आहे. (डोळा मारत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मासे निवडताना डोळ्याचा किंवा तोंडाचा भाग दाबून पहाणे, भेंडी निवडताना, शेंडे मोडून ती कोवळीच आहे ना याची खातरजमा करणे - हे "हाताळण्याचे" प्रकार कितपत योग्य वाटतात. मला जाम अयोग्य आणि जंतूप्रदूषण करणारे, मागे गर्दीचा खोळंबा करणारे व मासे-भेंडी व तत्सम विक्रीमालाची वाट लावणारे वाटतात. ही माझी पेट पीव्ह आहे म्हटले तरी चालेल.
.
पण मग चांगले उत्पादन निवडण्याचा मार्गदेखील तर दिसत नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर एका कवितेबद्दल कोणीतरी अशा अनुरोधात म्हटले होते की - अशा पिळून पिळून दु:खाला ऊत आणणार्‍या कविता/ मेसेज फॉरवर्ड्स इतके झालेत की खर्‍या दु:खाबद्दल असेंवेदनशीलता निर्माण होइल की काय अशी भीती वाटते.
.
ते खरेही आहे पूर्वी जे बौद्धिक, भावनिक आनंद क्वचित तसेच प्रयत्नपूर्वक मिळत असत ते आता पैशाला पाचरीच असे स्वस्तच झालेले नाहीत तर विनासायासही मिळू लागले आहेत. उदा - एखादा सुविचार पूर्वी ज्या बौद्धिक उत्कटतेने आवडे तो आता तसा रोमांचक वाटतच नाही. का तर कीवर्डस टाकून तसे किंवा अधिक परीणामकारक ५६ सुविचार गुडरीडस वरती सापडतात. पूर्वी मस्त शेर वाचला की धुंद वाटे, मूड एलव्हेट होत असे, आता रेख्ता वर जा "केंकुले पेचाँ" शब्द टाका "सय्याद", "तूर" शब्द टाका तसे १०० उत्तम-मध्यम-कनिष्ठ शेर सापडतील. त्याने एकंदर गोडी गेलीये, नंबनेस आला आहे.
.
म्हणजे थोडक्यात तुलना करायची झाली तर कष्ट करुन पैसे मिळवुन थोडीफार चैन करणं आणि थोडीफार असली तरी त्या चैनीमुळे अमाप आनंद मिळणं विरुद्ध एखाद्या बड्या बापाच्या मुला/मुलीला गडगंज संपत्ती हाताशी असणं आणि त्यामुळे ओ येणं - अशी काहीही परिस्थिती आहे.
.
एखादा खाद्यपदार्थ बासुंदी म्हणा रोजच ऊठसूठ मिळू लागली तर शिसारी येईल असे वाटते.
.
की आपणच (मी) म्हातारे झालोय नकळे. म्हणजे अतिपरिचयाने बौद्धिक, भावनिक खरं तर अति व सहजतेने उपलब्ध असलेल्या पॉर्नमुळे लैंगिकही उत्तेजना नंब (बधीर) झालीये? सतत आणि हवे एतेव्हा चुटकीसरशी उत्तेजना मेंदूस मिळून आता उत्तेजना (बौद्धिक, भावनिक) यायचीच बंद झालेय? सर्वांनाच हे होतं का की पूर्वी ज्या कवितेच्या वाचनाने मूड एकदम ताजातवाना होत असे तो आताशा होत नाही. मिपावर कोणीतरी एका धाग्यात म्हटले आहे - इतकाअ तोचतोचपणा आला आहे की "आज कुछ तूफानी कर जाये" ची सुरसुरीच येत नाही तर ती गरज होऊन बसली आहे.
.
अर्थात अगदीच काही डोक्यावरुन पाणी गेलेले नाही, अजुनही काही गुड ओल्ड आनंद टिकून आहेत जसे मित्राने केलेल्या विनोदावर येणारे उस्फुर्त हसू, एखादा विचार अन्य कोणाच्या विचारांशी रेझोनेट झाल्याने मिळणारा आनंद. पण एकंदर ग्लोबलायझेशन व तदनुषंगिक आलेल्या माहीतीच्या स्फोटामुळे (की व्हाइसे व्हर्सा?) एकंदर उस्फुर्ततेवर घाला आलेला आहे हे खरे आहे.
.
एक झेन गोष्ट वाचली होती. एक अनंत ग्रंथ वाचलेला, प्रकांडपंडीत एका झेन मास्टरकडे जाऊन म्हणतो मला ज्ञान द्या. झेन मास्टर काहीच बोलत नाही फक्त एक चहाची किटली मागवतो व त्या पंडीताला चहा ऑफर करतो. झेनगुरु कपात चहा ओततो, कप अर्धा भरतो-पूर्ण भरतो तरी तो ओततच रहातो इतका की शेवटी चहा कपातून ऊतू जाऊ लागतो. तेव्हा पंडीत म्हणतो - बास! बास! चहा वाया चालला आहे, ऊतू चालला आहे. यावर झेनगुरु म्हणतो - जर तुला ज्ञानहवे असेल तर अशा रिकाम्या कपप्रमाणे ये. आत्ता तू या भरुन ऊतू चाललेल्या कपाप्रमाणे आहेस, मी काय तुला ज्ञान देणार अन तू काय ते ग्रहण करणार? आत्ता तू रिसेप्टीव्हच नाहीस. जागाच नाही तुझ्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मी कितीही सांगितलं तर पटणार नाही. विशेषतः गब्बरला तर नाहिच पटणार.
मी आताच एक सुंदर ....निखळ नितांत सुंदर मुलगी पाहिली.
मधुबालेहून सुंदर.
हो. पुन्हा सांगतो. मधुबालेच्या सर्वात सुम्दर फोटोत ती दिसत असेल ना, त्याहून अधिक सुंदर.
.
.
मी शिरेसली सांगतो आहे.
.
.
इथे " नॅचरल्स " नावाची मोठी आइस्क्रीम चेन आहे. जरा महागडी आणि पॉश असते . ( सी सी डी सारखं वातावरण असतं.) पण तिथली आइस्क्रीम्स भन्नाट असतात. काही कारणानं तिथं गेलो होतो. (खरं तर त्याच्या शेजारच्या "गणेश भेळ " ला जायचं होतं.) तिथे ही नितांत सुंदर स्त्री नजरेस पडली. तिच्यावर नजर खिळून राहिल आणि तिला कदाचित ते विचित्र वाटेल, संकोच वाटेल ; म्हणून मुद्दाम प्रयत्न पूर्वक इकडं तिकडं पहावं लागत होतं.
.
.
जबरदस्त गोरापान रंग. हार्ड कोअर काश्मिरी नैतर जम्मुचे नैतर उत्तर पंजाबतले लोक असतात ना, तसा गोरा. पण त्याहूनही खरं तर खूप खूप भारी. लाल चुटुक ओठ. बरोब्बर गोल चेहरा. पण त्यातही थोडी मानवी गोलाई चेहर्‍यावर. अगदिच गोल गरगरित असला तर जरा भंकस वाटतो. तर सांगायचं म्हणजे बरोब्बर हवा तितकाच गोल; हनुवटीपाशी किंचित निमुळता. साधे सरळ निरागस दोळे. टोकदार नाक. आणि चेहर्‍यावर मेकपचा एक थेंबही नाही. फाउंडेशन वगैरे असेल तर सहज जाणवून येतं राव. हिचं तसं काहीही नव्हतं. लिपस्टिकही नसावच.
.
.
आणि चेहर्‍यावर खूच साधे सरळ शालीन, ग्रेसफुल भाव.
.
.
कोजागिरीचं निरलस मधाळ शीतल दूध असतं ना, तसं.
.
.
भारतात अजून समोरच्या व्यक्तीच्या सौंदर्यास दाद देणं उचित दिसत नाही. नाहीतर ग्यारंटेड बोललो असतो. कौतुक केलं असतं.
.
.
ती अतिबारिक नव्हती. फार जाडही नाही. नेमका अचूक, शोभेलसा बांधा होता. आणि चेहर्‍यावरुनच आरोग्य दिसतं म्हणतात व्यक्तीचं. तसा आरोग्याचा तजेलाही होता चेहर्‍यावर. डोळ्यात निरागसता आणि हसू. आणि सहज नजरानजर झालेल्या मलाही तिने दोन मिनिटात नजरेनं खलास केलं. तिनं सहजच पाहिलं. पण त्यात खूपच साधेपणा , निरागसता होती. ती माझ्याकडे पहात नव्हती ते ठाउक होतं. माझ्या मागच्या काउंटरकडे ती पहात होती. पण....
पण...
तेवढ्या दोन घटकांत नुसत्या नजरेतनच जे काय आम्ही बोल्लो असू ते भन्नाट होतं.
.
.
म्हणजे ...
मी तो असा सगळा प्रकार इतक्या जवळून पाहून जरा गोंधळून गेलो होतो; ते तिला समजत असावं. तिला ह्या गोंधळलेल्या लोकांची सवयही असावी. तिने नजरानजर झाल्यावर एक हल्कसं, कळत-नकळत स्माइल दिलं. म्हणजे "हो, मला समजतय" अशा अर्थाचं ; ओळखीचं, प्रसन्न असं जे स्माइल देतो ना, तसं हसू होतं चेहर्‍यावर.
किंवा एखादे डॉक्टर बावचळलेल्या पेशण्टला धीर द्यायला जे धीराचं, पण प्रसन्न स्मित आणतात ना चेहर्‍यावर तसं. किंवा एखादी स्त्री चिमुकल्या पोराला थोपटताना असतं ना ते तसलं स्मित. मी गोंधळलोय, हे तिला समजलं असावं असं मला वाटलं. मी अलगद काउंटरवरुन बाजूला झालो...तरंगत.
.
.
बायको शेजारीच होती. काय प्रकार होतोय ; त्याचा तिला अंदाज होताच. बाजूला झाल्यावर मी जरा खजील झाल्यासारखा होतो. बायकोनं सहज कोपरानं टोकलं आणि हल्कासा हिसका देउन पुढे नेलं. बहुतेक "चल्ता है बॉस" असं तिला ते कोपरानं धक्का देउन म्हणायचं असावं.
.
.
मी तरंगतोही आहे, गोम्धळलोही आहे आणि थोडा खजीलही आहे.
.
.
प्रॉब्लेम असाय की शब्द कमी पडताहेत. एखादी गोष्ट कितीही छान असली, तरी किती छान म्हणता यावं, ह्यावर आम आदमीला मर्यादा येतात.विशेषण्म फारशी आठवत नाहित नि सुचतही नाहित चटकन. तुम्ही सेशेल्स, लक्षद्वीप अशा एकाहून एक भारी ठिकाणी गेलात, अगदि जिथे फार कमी दाटी आहे, आणि एकदम स्वच्छता आहे; तर त्या ठिकाणांचं वर्णन करताना "निळाशार समुद्र" इतकच करावं लागतं. तो प्रकार नक्की किती मधाळ, मायावी, हरखून जावा असा आहे; हे प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजतं. तो स्वर्गीय अनुभव असतो.
.
.
अगदि फक्कड जमलेल्या पुरणाच्या पोळीलाही फक्त "गोड" म्हटलं तर तो त्या पोळीचा अपमान असायला हवा. नुसतीच गोड चव घ्यायची असेल तर माणूस चमचाभर साखर खाउन खुश होइल. पण पुरणाच्या पोळीत त्या चमचाभर साखरेच्या गोडव्याहून जास्त काहीतरी असतं. तो साखरेचा/गुळाचा गोडवा, हा एकूण चवीचा फक्त एक सबसेट/भाग असतो.
.
.
शब्द खूप कमी पडतात राव.
मी आत्ता तरंगतोही आहे, गोम्धळलोही आहे आणि थोडा खजीलही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे मनोगत. पण तितकंसं निरागस नसावं. नाहीतर तरंगलां नसतां.
आणि एव्हढी स्पेस कशाला? तरंगायला? स्पेसमध्ये अधिक तरंगायला आणि भटकताना हरवायला होईल ना.
(बादवे, प्रतिसाद खरोखरी आवडला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हा पुरुषांना असं झटझट कोणी आवडतं कसं रे? Sad
आम्हाला (मला + अनेक स्त्रियांना) तरी आधी ती व्यक्ती कळावी लागते, मग तिने अनेक अपेक्षा पूर्ण केल्या तर ती बेदमच आवडू लागते ROFL पण असं चट की पट होत नाही. लोणच्यासारखं आकर्षण मुरावं लागतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुम्हा पुरुषांना असं झटझट कोणी आवडतं कसं रे?

सांगणार होतो. पण जौन्द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ती कुठे आवडलीय? तिचं सौंदर्य आवडलंय फक्त.
एखाद्याचं अक्षर छान असतं आनि ते आवडतं म्हणून ती व्यक्ति आवडली असं होतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile खरे आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मी कितीही सांगितलं तर पटणार नाही. विशेषतः गब्बरला तर नाहिच पटणार.
मी आताच एक सुंदर ....निखळ नितांत सुंदर मुलगी पाहिली.
मधुबालेहून सुंदर.
हो. पुन्हा सांगतो. मधुबालेच्या सर्वात सुम्दर फोटोत ती दिसत असेल ना, त्याहून अधिक सुंदर.

मनोबा, आजपासून तुझी माझी दुष्मनी सुरु !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मधुबालेच्या सर्वात सुम्दर फोटोत ती दिसत असेल ना, त्याहून अधिक सुंदर.

याबाबत मजनूची गोष्ट सांगितली जाते. लैलाच्या प्रेमात वेडा झालेल्या मजनूला पाहून तिथल्या राजाने "ही लैला आहे तरी कोण?" असे म्हणून लैलाला हजर करण्याची आज्ञा केली. तिला हजर केल्यावर राजाला ती अगदीच सामान्य रूपाची वाटली. त्याने मजनूला तसे विचारले. तेव्हा मजनूने तो प्रसिद्ध ड्वायलाक ऐकवला. "लैला को देखो मजनू की नजर से".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्याने मजनूला तसे विचारले. तेव्हा मजनूने तो प्रसिद्ध ड्वायलाक ऐकवला. "लैला को देखो मजनू की नजर से".

मजनू हिंदी बोलत असे, याबद्दल कल्पना नव्हती. रोचक माहिती! धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हे आणि सिंह आणि गेला बाजार वेताळ जर मराठी, इंग्रजी, ग्रीक सौंस्क्रूत, हिंदी अशा अनेक भाषांमधून बोलू शकतात तर मजनूनेच काय घोडे मारले.
शिवाय दोन शक्यता आहेत.
१. कदाचित राजाने त्याला हिंदीतून विचारले असेल. म्हणून मजनूने हिंदीतून उत्तर दिले असेल. आम्ही तर लैलाला हिंदीतून गाणे म्हणताना पाहिले आहे.

२. पूर्वी अरबस्तानात हिंदू संस्क्रुती नांदत असल्याने अरबस्तानची राष्ट्रभाषा हिंदीच असण्याची शक्यता आहे.

पु. ना. थत्ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काय ओ हे ? ते गाणं आधीच कैच्याकै होतं (मदनमोहन चं संगीत असलं म्हणून काय झालं ?) ... आणि त्याला झंकार बीट्स लावल्यामुळे आणखीनच असह्य झालेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुसके बार ३१ जानेवारी मध्ये एक जोक आलेला आहे तो कोणत्या सदरात घालायला हवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्हाला तो आवडला असेल तर जरूर त्यांच्या फुसके बार संकलनात चिकटवा. मुळात लेखकानेच हे करणं अपेक्षित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मनमोहनसरकारच्यावेळी भारताच्या बलुचीस्तानमधील कारवायांचा पाकिस्तानने उल्लेख केला, परंतु हे प्रकरण थोडक्यावर थांबले. तरीही पाकिस्तानकडून त्याचा मधूनमधून उल्लेख होतोच.

पाकिस्तान आपल्याकडे जे प्रकार उघडपणे करतो, तसेच प्रकार भारत पाकिस्तानमध्ये करताना दिसत नाही.

ही दोन वाक्ये परस्परविसंगत वाटत नाहीत? भारत पाकिस्तानमध्ये हे प्रकार करताना दिसत नाही हेच कदाचित भारताचे यश आहे. हल्ली डोमेस्टिक कन्झम्प्शनसाठी काही विधाने करून डिंग मारण्याची फॅशन आहे. तसा वायफळपणा तर पाकिस्तानसुद्धा (अलिकडे) करत नाही. आणि जगात तर तशी फॅशन नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाकिस्तानचा आपल्या अंतर्गत बाबतीतील सहभाग स्पष्ट दिसतो. आपण बलुच-सिंध चळवळींच्याबाबतीत तेवढ्या प्रमाणात करत नाही किंवा जवळजवळकरतच नाही असे म्हणायचे आहे. नाहीतरी आपण भोगतोच आहोत, तेव्हा थेट युद्ध न करता (त्यांचीही हीच स्ट्रॅटेजी आहे) पाकिस्तान अस्थिर करायचे हे उघडपणे का करत नाहित, किंवा केले तर काय परिणाम होतील हा प्रश्न विचारला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत पाकिस्तानमध्ये हे प्रकार करताना दिसत नाही हेच कदाचित भारताचे यश आहे

http://www.aisiakshare.com/node/300 ह्या धाग्यावरचा एक किस्सा आठवला.

गोष्ट३:-
मुल्ला जी आपल्या झोपडीवजा घराबाहेर शिळ्यापोळीचे तुकडे टाकत असताना शेजार्‍याने कुतुहलाने विचारले:-
शेजारी:- "काय हुजूर काय हे काय चाल्लय?"
मुल्ला:- (स्थिर चित्त)"काही नाही. इकडे वाघ फिरकू नये म्हणून शिळ्या पोळिचे तुकडे टाकतोय."
शेजारी:- "अरे पण ह्या इलाख्यात कुठे वाघ आहेत?"
मुल्ला:- (विजयी स्वरात)"तेच तर म्हणतोय. बघ माझा इलाज कस्ला यशस्वी झालाय!"
.
.
"काम इतक्या सफाइने केले की त्याचा पुरावाच उरला नाही " हा युक्तीवाद असाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

अपेक्षा बहुधा "शंभर सैनिकांची पलटण रणभेरी वाजवत सीमापार जावी आणि त्या पलटणीच्या अग्रभागी भारताचे पंप्र/संरक्षण मंत्री शंख वाजवत रथावर स्वार असावेत" अशी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

संदर्भ - फुसकेबार ३१ जानेवारी (http://aisiakshare.com/node/4824)- ८) पुण्याचे भूषण – एम. प्रकाश सर
.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये सर बराच काळ अध्यापक होते. माझ्या सुदैवाने ३ वर्षे माझे शिक्षक होते. सर गणित विषयाला फक्त समर्पितच नव्हते तर त्यांच्या शिकवण्यात, विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करण्याची जादू होती. असे शिक्षक पूर्वीही कधी भेटले नव्हते ना परत भेटतील. गणिती वर्तुळात सरांच्या ओळखी नक्की असणार. तेव्हा दर शनिवारी , कॉलेज सुटल्यावर गणित विषयातील पाहुण्यास बोलावुन , गणिती प्रमेय, माहीती आदि विषयाचे सेशन फर्ग्युसनमध्ये होत असे. सरांचा त्यात पुढाकार असावा.
सरांचा तास इतका आवडे. वेड्यासारखा आवडे. अनेकांना गणित विषय आवडतही असेल पण ती पॅशन विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची हातोटी केवळ एम प्रकाश सरांमध्येच होती. एम प्रकाश आणि आचार्य माझे आवडते २ शिक्षक.
.
मी जेव्हा एम एस्सी करायला आय आय टी त गेले त्याच अगदी त्याच वर्षी सर तिथेच पी एच डी करायला जॉइन झाले होते. पुढे काही कारणांनी त्यांनी पी एच डी पर्स्यु केली नाही.
.
या सरांमुळे आणि आचार्य सरांमुळे मला गणिताची गोडी लागली. दोघेही दुर्मिळ शिक्षक आहेत. गणिताचा तास फर्ग्युसन इतका नंतर कुठेच आवडला नाही.
.
राजेशजी, डॉक्युमेन्ट्री फार आवडली. लिन्कडिन वरती शेअर केली आहे. आपले खरच खूप आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. त्यांना पद्मसन्मान मिळण्यासाठी काही करता आले तर जरूर करायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राकु तुमचा. धागा "सुम्मडीमे" वाचनमात्र झालाय. मी प्रतिसाद दिला पण तो उमटलाच नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतर त्यांनी आयाय्टी प्रवेश परीक्षेचे क्लासेस सुरु केले. तिथे विद्यार्थ्यांना १२-१२ तास शिकवणीच्या नावाखाली डांबून ठेवणे, मुले आणि पालक यांचे प्रच्छन्न अपमान करणे असेही बरेच उद्योग केले. यावर 'म्हातारा चळलाय' एवढीच प्रतिक्रिया त्या क्षेत्रात काम करणार्‍या एका परिचितांनी व्यक्त केली होती हे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पालकांना आणि मुलांना कोणी सक्ती केली होती का त्यांचा क्लास लावायची.? आणि आय आय टीत १२ तास काय रात्रीचा दिवस केला तरच प्रवेश मिळत असावा. जे यशाच्या ध्येयाने झपाटले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी/पालकांनी जायच च नाही त्यांच्याकडे.

त्या क्षेत्रात काम करणार्‍या एका परिचितांनी

जळणारे आणि काड्या सारणारे अनेक असतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला शत्रु हे असतातच.
.
आपण माझा प्रतिसाद वैयक्तिक घेणार नाही अशी आशा करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोट्यासारख्या ठिकाणी आयआयटीसारख्या परीक्षांची तयारीही घोटूनघोटून करता येते हे सिद्ध झालेले आहे.
पालकांचा अपमान म्हणजे काय माहित नाही. माझ्या पाहण्यात/ऐकण्यात तरी तसे नाही.
म्हटले तर एम. प्रकाश सर आयआयटीपेक्षाही वरच्या स्तराची तयारी करून घेऊ शकतात, आणि ते विशेष आहे हे सांगायचे आहे. या क्लिमध्येही तीमुले गेल्या कत्येक वर्षात त्यांनी सिनेमपाहिलेला नाही असे सांगतातच की. याचा अर्थ ती दु:खी आहेत असे अजिबात नाही. त्यांना तेवढे झटून काही करायचे नाही त्यांना त्यात डांबून ठेवले जाते असे वाटते. शिवाय कोटासारख्या ठिकाणीही सर्जनशीलतेला फार वाव नसल्याने तेथे मुलांना डांबून ठेवले जाते असे तुम्ही नक्की म्हणू शकता.
इथले वातावरण पूर्णपणे वेगळे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना तेवढे झटून काही करायचे नाही त्यांना त्यात डांबून ठेवले जाते असे वाटते.

हे सरसकटीकरण बाकी झकास आहे! तुम्हांला डांबून घातले गेल्यासारखे वाटते? मग तुम्हांलाच काही झटून करायची इच्छा नाही. आळशी कुणीकडचे.

(आता याची थोडी वेगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करून बघू. "ज्यांना लिहिण्यावाचण्यातून होणार्‍या संवादापेक्षा आपली मनमानी करण्यातच रस आहे, त्यांनाच संस्थळाच्या क्षुल्लक व्यवस्थेमुळे आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कोंडमारा होतो असे वाटते.")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहो, कुठून कुठे गेलात तुम्ही? कमाल आहे तुमची. येथे या पोर्टलचा कोठे संबंध आला?
तुम्हाला थेट दुसरे टोक गाठायलाच आवडते असे दिसते. कारण "तुम्हांला डांबून घातले गेल्यासारखे वाटते? मग तुम्हांलाच काही झटून करायची इच्छा नाही. आळशी कुणीकडचे." असा व्यत्यास काढलात तुम्ही. बारावीनंतर जे करायचे त्यासाठी तुम्ही तो क्लास लावलात. त्याचा आनंद लुटू शकला नाहीत, तुमची तेवढी झेप नसेल, तेवढे कष्ट करायची तुमची तयारी नसेल तर तो दोष तुमचा, तुमच्या पालकांचा की क्लासवाल्याचा? क्लासवाले पाट्या न टाकता खरोखर चांगले शिकवतात हे ग्ृहित धरले आहे आणि हे या क्लासच्याबाबतीत तरी खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात हल्ला करणारा एखादा दहशतवादी परकीय नागरीक असेल तर त्याला जास्त कठोर शिक्षा असावी का ? (त्याच जागी जर तो भारतीय नागरिक असेल तर त्याच्यापेक्षा) ?

एका बाजूला भारतीय सरकारने भारतीय नागरिकास प्रेफरन्शियल ट्रीटमेंट द्यावी अशी अपेक्षा असते. ज्याचा अर्थ असा की एकाच गुन्ह्यासाठी भारतीय नागरीकास कमी शिक्षा असावी. दुसर्‍या बाजूला भारतीय नागरिकाने भारताशी जास्त निष्ठा बाळगण्याची अपेक्षा आहे. भारतीय नागरिकाने दहशतवादी कारवाया केल्या (असे सिद्ध झाले असेल तर) असतील तर ते treason असते. परकीय नागरिकाच्या बाबतीत तसे नसते.

( एनाराय लोकांनी ..... जास्ती शहाणपणा.... More loyal than the king .... करू नये. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसाबच्या बाबतीत जी न्यायालयीन प्रोसेस पाळली गेली त्याची आवश्यकता नव्हती असे माझे मत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आदूबाळ मी पूर्वी आपल्याला विचारलेले की यु ट्युबच्या कशा प्रकारच्या व्हिडीओआधी कशा प्रकारची जाहीरात लावायची व प्रेक्षक खेचायचे त्याचे तंत्र असते का? त्यावर तुम्ही म्हणाला होता की "फॉरेस्ट-सर्च अल्गॉरिदम" का काहीतरी असतं. त्याची जमेल तेवढी माहीती द्या की. उदा - मी "ए शमा मुझे फूंक दे" गाणं ऐकतेय आणि या सुमधुर गाण्याआधी लागणार्‍या जाहीरातीदेखील अतिशय गोड, सुमधुर आहेत . इतक्या की मी जाहीरात पूर्ण ऐकते आहे. स्किप करत नाही.
.
हे गाणं माझ्यासारख्या ऑडीयन्सला आवडत असेल तर त्यांना अमक्या प्रकारच्या जाहीराती आकर्षक वाटतील असा निष्कर्ष - योगायोग आहे की धूर्त्/कॅल्क्युलेटेड निर्णय? असा निर्णय कोणी घेतला की त्या व्हिडीओ खालच्या "sonorous" वगैरे कमेंटस स्कॅन करुन घेतला गेला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिग डेटा आणि रँडम फॉरेस्ट पद्धत वापरून कंपन्या आपला अल्गोरिदम बनवतात. अर्थातच तो कंपनी स्पेसिफिक आणि गुप्त असतो.

रँडम फॉरेस्ट या विषयावर Breiman (2003) असं सायटेशन असलेला एक पेपर आहे. (त्यातले टेक्निकल डीटेल समजायला माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त पात्र आहात. मला कळलेलं ते असं: विविध व्हेरियेबल्स रँडमली वापरून भरपूर डिसिजन ट्रीज बनवतात. मग टेस्ट डेटाही रँडमली वापरून त्या डिसीजन ट्रीज टेस्ट करतात. कुठल्या डिसिजन ट्रीज जास्त अचूक रिझल्ट देतात [हिरव्या होतात] ते समजून घेतात. मग हिरव्या ट्रीज या त्या डेटासाठी योग्य आहे असा निर्णय घेता येतो.)

तुम्ही म्हणताय ते गाणं, त्याखालच्या कॉमेंट्स, आधी/नंतर वाजवलेली गाणी, ते गाणं ज्या प्लेलिस्टमध्ये आहे ती प्लेलिस्ट, हे व असे अनेक व्हेरियेबल्स निर्माण केले असतील. तुम्ही आणि तुमच्यासारखे युजर्स हा डेटा. त्यामुळे तुम्हाला आकर्षक वाटणाऱ्या जाहिराती येणं योगायोग नक्की नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सॉलिड इन्टरेस्टिंग आहे. सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद. पेपर गुगल करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांताबाई ...............
बाणूबाया ....../......
पोपट पिसाटला ............
नागाच्या पिल्लाला ..........
ही पोळी साजूक तुपातळी ....
जपून दांडा धार ...
आणि काय काय ?
तर.........
तुझ्या आयची ......?

हेच का ते मराठी फिल्म म्युजिक ?
श्रीनिवास खळे , सुधीर फडके , दत्ता डावजेकर ,जयवंत कुलकर्णी आणि इतर नामवंत दिग्गजांनी ज्या उंचीवर नेवून ठेवले होते ...

तो दर्जा ... तो लेवहल नक्की किती खाली आणावं याला काही मर्यादा ?

की फक्त डीजे मध्ये वाजते एवढीच गाण्याची पातळी?

दिङ्मूढ उ.ख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

तुम्ही शब्द आणि संगीत यांच्यात गल्लत तर करत नाही आहात? बाकी मतभेद नंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उठी उठी गोपाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील ओळींच्या सोबत वाचल्याने आता या ओळीही अश्लील वाटत आहेत. :D.
असो अश्लील विनोदांमुळे सेन्सार बोर्ड सर्टिफिकेट देत नसल्याने दादा कोंडक्यांनी 'ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले' हे गाणेही अश्लील असल्याचे पटवून दिले होते म्हणे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हीच केली सारी किमया
कृतार्थ झाली माझी काया!

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

दादा कोंडके यांना सलाम. या दृष्टीने गाणं वाचलं तर भयंकर अर्थ निघू शकतो!

(अर्थफोड केली तर दत्तगुरू माझं श्वान करतील...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जितकं वाचलेलं आठवतं त्यानुसार कोंडके यांच्या 'चंदनाच्या पाटावर' या गाण्यातील 'तुला पाहून माझी कळी लई खुलते' ही ओळ अश्लील आहे त्यामुळे ती काढून टाका असा आग्रह सेन्सॉर बोर्डावरील शांता शेळके, वंदना विटणकर वगैरेंनी धरला होता. ROFL त्याला प्रत्युत्तर म्हणून दत्तगुरु दिसले हे भक्तीगीतही अश्लीलच आहे याचे संदर्भासहित स्पष्टीकरण दादा कोंडके यांनी दिले.

बाकी चर्चाप्रस्तावातील या गाण्यांमध्ये वावगं काय आहे बॉ? डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा ठीक आहे पण गाणी चांगली ठेकेदार आहेत. थत्तेचाचांनी मस्त उदाहरण दिले होते 'गवतात शिरुन गंमत करु' आणि 'मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही दोन्ही गाणी एकच भावना दर्शवतात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गवतात शिरुन गंमत करु' आणि 'मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' ही दोन्ही गाणी एकच भावना दर्शवतात. (डोळा मारत)

फरक असलाच तर तो हायजीनचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खर्‍याखुर्‍या गवतात शिरलं (नॅचरल ग्रास बेड)की हायजीनचा प्रश्न दिसतो आणि तेच फुलांच्या आराशीखाली झाकलेला बिछाना ( फ्लॉवरबेड) बनविला की हायजीनचा प्रश्न येत नाही ! लोक हायजीनबद्दलचा हा दुटप्पीपणा कधी सोडणार आहेत?

मूळात एक्सचेंज ऑफ बॉडीफ्ल्युईडस हेच हायली अनहायजेनिक आहे. मग ते गवतात असो की ढगात!

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक्सचेंज ऑफ बॉडीफ्ल्युईडस ही मजेची व्याख्या अतिशय मर्यादित असून, हे पुरुषांनी पसरवलेलं मर्यादामिथक आहे; एवढं बोलून मी थंड घेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(खरं तर म्हणजे च्या पुढे प्रश्नचिह्न हवं , पण अजून एक फाऊल होऊ नये म्हणून उद्गारचिह्न टाकलंय)

अहो 'मर्यादामिथक' म्हणजे काय?
'एक्सचेंज ऑफ बॉडी फ्लूईडस' इतकाच गवतातल्या गोष्टीचा अर्थ घेतल्यास तो तितका पार्टच अनहायजेनिक म्हणायचा आहे.
बाकी सगळं हायजेनिक.
असो, ते सगळं बोलायला दुसरा धागा काढून द्या.
मोठ्यामोठ्या प्रतिसादांचे स्वतःच नवे धागे काढायचे आणि छोट्या छोट्या धाग्यांचे प्रतिसाद करून टाकायचे ही काय पद्धत तुमची?

आणि यातच राघुंनापण उत्तर देत्येय, बेळगावी मिळणार नाही!

(बाकी मोठमोठ्या संस्कृत शब्दांची भाजी करून फोडणी द्यायला मराठी क्रीयापदे चालतात पण इंग्रजी शब्दांच्या भाजीत टाकली की तिखट लागतात काय तुम्हाला?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी मोठमोठ्या संस्कृत शब्दांची भाजी करून फोडणी द्यायला मराठी क्रीयापदे चालतात पण इंग्रजी शब्दांच्या भाजीत टाकली की तिखट लागतात काय तुम्हाला?

टाळ्यांचा कडकडाट! :D>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> एक्सचेंज ऑफ बॉडीफ्ल्युईडस ही मजेची व्याख्या अतिशय मर्यादित असून, हे पुरुषांनी पसरवलेलं मर्यादामिथक आहे; एवढं बोलून मी थंड घेते. <<

मला पडलेला एक प्रश्न : मी गायीचं दूध प्यालं तर ते 'एक्सचेंज ऑफ बॉडीफ्ल्युईडस' होईल का? आणि गोमूत्र प्यालं तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण हा छोटा प्रश्न नसल्याने येथे न विचारता वेगळा धागा काढावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही पुरेशी चर्चा तर करा - धागा वेगळा काढला जाईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चर्चा करण्यापूर्वीच हा मोठा प्रश्न आहे हे मी सर्टिफाय केलं ना !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गायीचं दूध प्यायलात तर ते ट्रान्सफर ऑफ बॉडी फ्लूईड होईल!
आय मीन 'एक्सचेंज' होण्याकरिता तुम्ही गाईला तुमचं काय एक्सचेंजमध्ये देताय?

(बचा ले रे देवा!)

आता हे ट्रान्सफर ऑफ बॉडी फ्लूईड ही हायजेनिक व्हावे म्हणून 'पास्चरायजेशन आणि /किंवा बॉईलिंग ' या गोष्टी आपण शोधून काढल्या आहेत.

(तळटीप- आम्हा डॉक्टरांच्या देवाच्या 'एस्कुलॅपियस' ची सात मुलं आहेत. पैकी हायजिया आणि पॅनाशिया या दोन महत्त्वाच्या! त्या आमच्या मेडीसीनच्या चिह्नात पण आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> 'एक्सचेंज' होण्याकरिता तुम्ही गाईला तुमचं काय एक्सचेंजमध्ये देताय? <<

मी भय्याला पैसे देतो. (कॅश म्हणजे लिक्विड अ‍ॅसेट्स ना.) मग गायीला जे द्यायचं ते भय्या देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण यात तुमच्यात आणि गायीत काहीच डायरेक्ट बॉडी फ्लुईड एक्सचेंज झालं नाही.
भय्याला तुम्ही लिक्विड कॅश तुमच्या शरीरातून काढून दिली आणि ती त्याने गायीकडे पोचती केली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे बुवा तुम्ही खुसपटं काढताहात. पैसा आमच्या घामातून मिळाला आहे (कधी कधी त्यासाठी अश्रूही गाळतो आम्ही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तर हे गाईसाठी हायजेनिक आहे, तुमच्यासाठी नाही!
तुम्हाला गायीचे कुठलेही फ्लुईड हायजिनीक पद्धतीने शुद्ध करूनच तुमच्या शरीरात घ्यावे लागणार.

( इंडियन गायीच्या पोटात असलेल्या ३४ कोटी देवांत आमची 'हायजिआ' नाही. )

बाकी तुमचा घाम गाईला डायरेक्टली दिलात तर ते गाईसाठी अतिअनहायजेनिक आहे आणि अश्रू दिलेत तर रिलेटीवली कमी अनहायजेनिक असे विविध अभ्यास सूचवितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेडिसिनचे चिह्न कोणते? ते दोन सापवाले का?

ते पाहून मला कॉर्क स्क्रू आठवतो.

Corkscrew

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मूळात एक्सचेंज ऑफ बॉडीफ्ल्युईडस हेच हायली अनहायजेनिक आहे.

आमच्या लाडक्या शरीरद्रवदेवघेवीला नावं ठेवल्याबद्दल तुमचा जाहीर निषेध. आणि लोकांचा असल्या भलत्यासलत्या गोष्टीवर विश्वास बसावा म्हणून ते इंग्लिशमध्ये लिहायचं आणि मधूनच मराठी क्रियापदं वगैरे पेरायची ही युक्ती चांगलीच परिचयाची आहे. शिव्याही द्या, पण मराठीत! हे ऐकलं नाही होय तुम्ही? लोकांची दिशाभूल करायचं थांबवा आणि हो, ते बेळगाव देऊन टाका महाराष्ट्राला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जैन लोक उघड्या पायांनी देरासर( त्यांचे प्रार्थना देऊळ)मध्ये जातात कित्येक वर्षे.पण काही रस्ते इतके घाण आहेत की त्यावरून जाणे फारच आरोग्यघातक आहे.डोंगरातल्या अथवा गावातल्या शिवारात ती जंतुसंसर्गाची घाण नसते.आणि झाली तर सूर्याच्या उन्हात नष्ट होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा भाषावार रचना झाली राज्यांची तेव्हाच इंग्रजीचं महत्त्व भयानक वाढलं.त्याचवेळी शाळांतून शेजारच्या दोन राज्यांच्या भाषा शिकण्याची सक्ती करायला हवी होती.महाराष्ट्रात कानडी+ गुजराथी,कर्नाटकात मराठी अधिक मल्याळम वगैरे.
शिवाय एकमेकांचे सांस्कृतिक देवाणघेवाण सोहळे दरवर्षी आयोजित केले असते तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेव्हा भाषावार रचना झाली राज्यांची तेव्हाच इंग्रजीचं महत्त्व भयानक वाढलं

असहमत. भाषावार प्रांतरचना ५०-६० च्या दशकांत झाली. इंग्रजीचं महत्त्व त्याच्या १००-१५० वर्षे आधीच वाढलेले होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या एरियात चोर्‍यांचं प्रमाण वाधत असल्याच्या तक्रारी यायला लागल्या ; की पोलिसांची गस्त वाढवली जाते.
कित्येकदा ह्यानंतरही प्रमाण काही लागलिच कमी होत नाही.
.
.
आता नेमकं ह्यादरम्यान (पोलिसांची गस्त वाढलेली असण्याच्या दरम्यान ) एखादा नवा माणूस त्या एरियात रहायला आला;
आणि त्यानं दावा केला की "इथे पोलिसांची लक्षणीय उपस्थिती आहे; आणि चोरी खूप आहे.
मी मागेही एका एरियात पोलिसांची वाढलेली गस्त आणि चोरीचं वाढलेलं प्रमाण पाहिलेलं आहे.
निष्कर्श असा की ; पोलिस वाढले तर चोर्‍अय वाढतात.
"
तर काय वाटेल ?
कॉज- इफेक्टची गल्लत होतिये का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"इंग्रजीचं महत्त्व त्याच्या १००-१५० वर्षे आधीच वाढलेले होते"
होय.परंतू नंतरचा मुद्दा करता आला असता दोन भाषांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0