बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - १

मागच्या वर्षीच्या चर्चेतून प्रेरणा घेवून मी ह्यावर्षी बागकाम ( मायक्रोस्केल वर ) चालू केलंय तर जरा अनुभवी बागकामकरांकडून मार्गदर्शनाची गरज आहे !

मायक्रोस्केल म्हणजे ३-४ च कुंड्या आहेत.
१. जागा - मी अपार्टमेंट मध्ये राहते तरीही जागा पुष्कळ आहे. मोठी बाल्कनी आणि दर्शनी भागात ( मुख्य दरवाजा उघडतो तेथे , जिना सुरु होण्याआधी ) पण जागा आहे . बागकाम कुंड्यातच करणार आहे
२. सूर्यप्रकाश - भरपूर ; दक्षिण दिशेला बाल्कनी आहे.
३. हवामान/ थंडी - मी सॅन डिएगो मध्ये राहते त्यामुळे थंडीचे दिवस फार कमी . हवामान उष्ण व कोरडे .
४. वेळ - इच्छा आहे पण सध्याच्या कामाचं आणि अभ्यासाचं स्वरूप पाहता रोज एक तास वगैरे वेळ देणं शक्य नाहीये . आठवड्यातून दोन दिवस, दोन-दोन तास बागकाम करू शकते .

सध्या तुळस , मोगरा , पुदिना आणि कोरफड आहे . पालक वगैरे लावायचा नाहीये कारण आमच्या ट्रेडर जोस मध्ये चांगला ऑर्गनिक पालक , बेसिल मिळते . कढीपत्ता लावायचा आहे पण मिळत नाहीये .
प्र. १- अजून कोणती झाडे लावता येतील ?
प्र. २ - आहे ह्या झाडांची काही विशेष काळजी घेण्याबाबत काही सूचना ?
प्र. ३ - मला लिंबूच झाड बनवायचय - बी पासून . काही सूचना, अनुभव ?

प्र. ४- कंपोस्ट विषयी - यंदाच्या भारत वारीत आई-बाबांना हे करताना पाहिलं - सगळा ओला कचरा एका बादलीत घालून त्याचं कंपोस्ट करतात. म्हणून मी पण इकडे येवून ( परत , छोट्या प्रमाणात ) हे चालू केलं . मेथी- पालकचे देठ , भेंडीची डोकी , केळ्याची, संत्र्याची , लिंबाची सालं आणि शिवाय पाला पाचोळा असं काय काय टाकतेय . पण १५ दिवस झाले तरी काही कुजतच नाहीये . उष्ण-कोरड्या हवेमुळे असेल का हे ?

ह्या संबंधात मी कंपोस्ट विषयी हा अदितीचा धागा आणि प्रियदर्शनी कर्वेंचे प्रतिसाद वाचले पण तरीही माझं काय चुकतंय ते कळेना . चांगलं (म्हणजे काय माहिती नाही ) कंपोस्ट बनल्यावर ते कुंड्यात घालून अजून झाडं लावायचा विचार आहे .

अजून सुचतील तसे प्रश्न विचारेन.

नेहमीच्या बागकामकरांचे अपडेट्स आणि नवीन प्रयोग वाचण्यासही उत्सुक आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

नवीन धागा चालू केलात हे ब्येष्ट झाले.
आमच्याकडे अपडेट्स म्हणावेत असे नाहीत. पालेभाज्यांच्या ट्रेमध्ये मेथी, पालक वगैरे अनेकदा लाऊन - खाऊन झाल्यावर यावेळी कोंब फुटलेला काहिसा नासका कांदा गंमत म्हणून पेरला तर त्यातून अतिशय उत्तम वासाची आणि भरपूर पात उगवली आहे. आता या विकांताला त्या पातीला स्वाहा करू

बाकी दोन टोमॅटो देऊन झाड झोपलं आहे महिने२ महिने. बहुदा थंडीमुळे असेल.

आता या मार्चमध्ये पुन्हा मिरच्यांचा प्रयोग (सालाबादप्रमाणे) करणार आहे. आशा आहे यंदा तरी यश येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घरच्या गच्चीतल्या झाडाचे पेरू खाल्ले. मस्तं होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्व प्रश्नाची उत्तरं लिहीन- कुंड्यांपासून कंपोस्टपर्यंत.
आवड,गरज,जागा आणि हवामान कळलं की काम सोपं होतं. शिवाय काही प्रयोगही करावेसे वाटतात प्रत्येकाला. लिंबाचे कलम वगैरे.एकेक घेऊ.
१) आयताकृती दोन इंची खोल,९इंच रुंद,१८इंच ट्रेमध्ये दोनदोन कुंड्या शक्यतो चौकोनी ठेवा.एक झाड पाणी पिणारे आणि दुसरे कमीवाले.एका कुंडीतून खाली आलेले पाणी दुसरे झाड घेईल,बाल्कनीत राड होत नाही.(synergy ?)
२)नवीन झाड =गवती/पाती चहा (लेमन ग्रासचा प्रकार)लावा.चहासाठी एक हिरवे पान पुरेल.दणकट झाड.हिरवं बेट तयार होईल.

*
३) लिंबाचे कलमच हवे.
४) कंपोस्ट खतावर वाढणारी झाडे म्हणजे वेलवर्गिय भाज्या- कारले,पडवळ , घेवडा इत्यादी हवे.चार प्रकारची खते असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४) कंपोस्ट खतावर वाढणारी झाडे म्हणजे वेलवर्गिय भाज्या- कारले,पडवळ , घेवडा इत्यादी हवे.चार प्रकारची खते असतात.

हे रोचक आहे. जरा तपशीलात लिहाल का प्लीज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ट्रे ची कल्पना छान आहे. आता ह्या शनिवारी ट्रे शोधणं आलं !

आम्ही दोघंही चहा पीत नाही पण घरात गवती चहाचं बेट आवडेल . प्रसंगी येणाऱ्या चहाबाज पाहुण्यांनाही.

लिंबुचं कलमच पाहिजे असं का बरं ?

धन्यवाद ! वेलवर्गिय भाज्यामध्ये भोपळा लावू शकेन फारतर… अगदी घराच्या बागेतले असले तरी पडवळ वगैरे नाही खाल्ले जाणार ! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

वेलवर्गिय भाज्यामध्ये भोपळा लावू शकेन फारतर… अगदी घराच्या बागेतले असले तरी पडवळ वगैरे नाही खाल्ले जाणार !

Biggrin
काकडीसुद्धा वेलवर्गीय असते. कलिंगडही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"चार प्रकारची खते असतात.
हे रोचक आहे. जरा तपशीलात लिहाल का प्लीज?"
लिहिणार आहे.एक दोन दिवसात इथेच.
युरिया,सुफला,अमो नाइट्रेट वगैरे अघोरी खते सोडून चार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंपोस्टमध्ये किडे दिसायला जरा जास्तच वेळ लागतोय असं वाटलं तर होम डीपोमधून 'कंपोस्ट स्टार्टर' आण. त्यातलं चमचाभर वापरलंस तरी पुरेल. हे वापरायची गरज आहेच असं नाही. कंपोस्टात भाज्या, फळांचे उरलेले भाग टाकल्यास पुरेसं बाष्प मिळतं, पण वाटल्यास एखादा खोका सपाट करून त्याचं झाकण बादलीच्या वर ठेव. माझा अंदाज, सध्याच्या तुमच्या हवेत अजून फारतर दोन आठवड्यांत किडे दिसतील. तोपर्यंत कदाचित कुजका वास येईल. पण झाकण ठेवून आणि बाल्कनीत कोपऱ्यात ती आरास ठेवली तर त्याचा त्रास कमी होईल. सुरुवात व्हायला वेळ लागते, पण तापमान वाढलं (आज तुमच्याकडे ८० फॅ+ असेल असं बघितलं; ते उत्तम) की कंपोस्ट व्हायला फार वेळ लागत नाही.

भरपूर उजेड असेल तर कुंडीत टोमॅटो लाव. टोमॅटोसाठी फार कष्ट पडत नाहीत. फार काटक झाड आहे ते. होम डीपो/लोव्जमधून सगळ्यात मोठी (बहुदा २० इंच), गोल कुंडी आण. त्यात बरीच माती घालावी लागेल. पण झाड टकाटक वाढेल. रोज पाणी घालायला जी काही दोन-चार मिनीटं लागतील तेवढाच वेळ घालवून पुरेल.

टोमॅटो हे प्रकरण किती काटक निघावं! मी गेल्या वर्षी एका कुंडीत टोमॅटो लावला होता. शेजारच्या कुंडीत भोपळी मिरची होती. टोमॅटोची कुंडी थोडी छोटी होती. ऑक्टोबरमध्ये कधीतरी लक्षात आलं की टोमॅटोच्या झाडाने मिरचीच्या कुंडीतही घरोबा केलाय. एक फांदी वाकून मिरचीच्या कुंडीच्या मातीपर्यंत पोहोचली आणि तिथे मुळं धरली. थंडी आल्यावर मी ह्या कुंड्या घरात आणल्या नाहीत. थंडीत खारींनी हल्ला करून मिरच्यांची पानं फस्त केली होती. मूळ कुंडीतला टोमॅटोही गेला. पण मिरचीच्या कुंडीतला टोमॅटो अजूनही शिल्लक आहे. आणि जानेवारीत बघितलं तर ह्या नव्या झाडाला काही फुलं आणि एक फळ धरलंय. (बरा अर्धा म्हणे "निरोध वापरला नाही की हे असंच व्हायचं.") अजूनही पहाटे बऱ्यापैकी थंडी असते, ३-४ से (३८-४० फॅ) पर्यंत; दुपारचं तापमान २० से च्या पुढे जायला आत्ताच सुरुवात झाल्ये. आता दोन बारके टोमॅटो दिसत आहेत. त्यांचं काय होतंय हे बघायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कंपोस्ट स्टार्टर हा एक पर्याय आहेच पण तो सर्वात शेवटी वापरू असं ठरवलंय .

पण झाकण ठेवून आणि बाल्कनीत कोपऱ्यात ती आरास ठेवली

अगदी अगदी डिट्टो असंच केलंय . पण कुजका वास अजिबातच येत नहिये. अर्थात वास घ्यायला घरी कोणी नसतंच म्हणा . पण सकाळ- संध्याकाळ दिवसभराचा पाला टाकायला जाते तेव्हा पण येत नाही वास.

भरपूर उजेड असेल तर कुंडीत टोमॅटो लाव. टोमॅटोसाठी फार कष्ट पडत नाहीत.

टोमॅटोची कोणती प्रजात ? होम डीपो मध्ये इतके प्रकार आहेत कि कोणता घेवू असं होतं !

अव्होकाडोच्या बिया आणि साली अजिबात जिरत नाहीत.

ह्या रविवारी फार्मर्स मार्केटमध्ये अगदी पातळ सालीचे अव्होकाडो मिळाले . खूपच चविष्ट होते . त्याची साल कुजेल असं वाटतंय . तर त्याच्या बिया पण ठेवल्यात, त्या पेरता येतील का ? गुगल वर फार काहीतरी विचित्र टोचे मारून पाण्यात ठेवा वगैरे सूचना आहेत. कोणी अव्होकाडोच झाड लावलय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

मी गेल्या वर्षी अर्ली गर्ल आणि बिग बाॅय आणले होते. मुलीला फार बिया आहेत. पण लवकर फळं धरली आणि हाच तो टोमॅटो टिकून राहिलाय. चेरी टोमॅटो खात असाल तर तो पण पहा. सहा तासांच्या वर ऊन येत असेल तर एका झाडालाच दोन माणसांना पुरून उरतील एवढे टोमॅटो येतील.

मिरची, वांगी खाणार असाल तर पहा. दिवसातून एकदा पाणी घालणं यापलिकडे काम नसतं. वांग्याला पोषण बरंच लागतं; सुरुवातीलाच कंपोस्ट आणून, घालून ठेव.

बेझिल खात असाल त्याची रोपं लाव. त्यालाही काही मेंटेनन्स नाही. ते तर दह्याच्या मोठ्या डब्यात किंवा दुधाच्या गॅलनमध्येही टकाटक वाढेल.

अळकुड्या पेरून अळूची पानं येतील. माझ्याकडे पाच अळकुड्या पेरल्या तर दोन आठवड्यांतून एकदा अळूची भाजी करण्याएवढी पानं येत होती भर उन्हाळ्यात. कोंब फुटेस्तोवर खारींपासून सांभाळ.

हे सगळं कुंड्यांमध्येही उगवता येतं. रोज पाणी घालणं एवढंच काम. अधूनमधून पीक घ्यायला वेळ घालवावा लागेल. पाणी हाताने घालायचं नसेल तर सोकर पाईप्स किंवा ड्रिप इरिगेशनचे नळ होम डिपोत मिळतात. त्याला टायमर लावायचा. वर थोडं मल्च करायचं, वाळकी पानं, काॅफीपूड किंवा गवताचं. म्हणजे पाणी कमी घालून पुरेल.

बाकी तुमच्याकडची हवा बघून माझीही अंमळ जळजळ होत्ये. रुचीने हा धागा निदान दोन महिने न उघडलेलाच बरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्ली गर्ल मिळाला/ मिळाली , लावला .

वेलवर्गीय काकडी -आमच्या होम डीपो मध्ये हे असं बी मिळालंय, ते खोचलंय मातीत. बघू उगवतं का.

k
ट्रे मात्र मिळाला नाही. आणि बालकनीत कमी-जास्त उन्हं येतात म्हणून कुंड्या विखरून ठेवल्यात (त्या त्या झाडांच्या गरजेनुसार ) ट्रे आणून त्यात सगळं ठेवायचं म्हटलं तर सगळ्या झाडांना सरसकट उन्हात / कमी उन्हात/ सावलीत ठेवावं लागेल म्हणून फार अट्टाहास केला नाही ट्रेचा.

मिरची मागच्या वर्षी बिया पेरल्या होत्या. फुटभर झाड आलं पण मिरच्या काही धरल्या नाहीत. मग कंटाळून त्याचा नाद सोडला, दिवाळीत किल्ला करायला माती कमी पडत होती तेव्हा त्या झाडाची काढून घेतली, अशा रीतीने मिरचीचा अंत झाल. अजून थोडं बी पडलंय … लावू कि नको विचार चाललाय.

अळूची पानं माहितीयेत. अळूकुड्या काय प्रकार असतो ? कुठे मिळतो ? काय नावाने मिळतो ? खारींचा धोका नाही.

बेसिल मी एकटीच खाते, कोथिंबीर लावायचा पण विचार आहे.

आणि हो , कंपोस्ट फायनली कुजलं Biggrin , दोन दिवस हिरव्या चहाचा चोथा टाकत होते आणि ऊन पण खूप होतं आमच्याकडे .
काळं -कुट्ट काही झालं नव्हतं पण मला धीर धरवेना म्हणून टोमॅटो आणि काकडीच्या कुंड्यांत खाली टाकलं थोडं -थोडं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

काकडीचं बी गंमतीशीर आहे. मी कधी लावली नाहीये काकडी. ह्या वर्षी प्रयोग करून बघायला हरकत नाही.

अळकुड्या म्हणजे अळूचे कंद, taro roots नावाने भारतीय दुकानात मिळेल कदाचित. ह्या अशा दिसतात अळकुड्या.
अळकुडी अळकुड्या
(आम्ही या उकडून, सोलून, मीठ लावून खातो. काही लोक भाजीसुद्धा करतात.)

मिरचीच्या बीची अडचण वाटत असेल तर होम डीपोमधून थेट रोपच आण. मी गेल्या वर्षी एक कुंडी आणली होती; त्यात चार रोपं मिळाली. साधारण एक डॉलरला एक रोप पडलं असेल.

दिवाळीत किल्ला करायला माती कमी पडत होती तेव्हा त्या झाडाची काढून घेतली

कल्पक आहात. किल्ला फटाके लावून फोडला नसाल तर पुन्हा माती वापरून पहा. हवं तर ही माती अळूला वापर; अळूला फार चांगली माती असायची गरज नसते. चहा/कॉफीचं मल्च कर फक्त.

---

आमच्याकडे आता आर्द्रता खरंच खूप कमी झाल्ये. सकाळी १० से (५० फॅ) च्या खाली तापमान उतरतं. दुपारी २२ से (७१ फॅ) पर्यंत आलं तर थंडी भरली, म्हणायची वेळ आहे. त्यामुळे पानगळीच्या सुमारास पेरलेल्या ट्यूलिप आणि हायसिंथच्या कंदांना आता फुटवे फुटले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बघते मिळतायत का अळकुड्या. अळूसाठी साधारण किती खोल कुंडी लागेल? किल्ल्याची माती काढून सक्युलंट झाडांसाठी वापरली. अळू पाणी खूप पितो का ?
थांकू गं ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

कुंडी खूप खोल असायची गरज नाही. सहा-आठ इंच खोली पुरेल. उजेडही खूप नसला (दिवसाला चार तासांपर्यंत) तरी चालेल. गरम हवा, थोडा सूर्यप्रकाश आणि ओली माती पाहिजे. दिवसातून एकदा पाणी पुरेल. मल्च कर, कागद, चहा, काॅफी, भाजी/गवताच्या काड्या कसलंतरी.

साधारण वीतभर अंतरावर कंद लावून चालतील. पानांची एकमेकांवर सावली येणार नाही अशा बेताने कुंडी फिरवून ठेवायची.

एका फुटव्याला तिसरं पान फुटलं की मी पहिलं पान काढते. दोन पानं असायची गरज नाही, एक पुरतं असं मी ऐकून आहे.

पानं काढलीस की भाजीच्या पाकृवरून युद्ध करू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गेल्या उन्हाळ्यात घर घेतल्यामुळे या वर्षी बागकामासाठी बरीच जास्त जागा आहे. निदान असं वाटू शकतं. पण मागीलदारी ओक आणि (फळं न धरणाऱ्या) पेअरची बरीच सावली पडते. टेक्सासात सावली काढून हौसेपुरती भाजी पिकवणं जीवावर येतं. पण घराच्या एका बाजूला किंचित उंच भिंत आहे. तिथे दुपारनंतर ऊन येतं. तिथली मूळची माती हलवली आहे. तिथे चांगली माती आणि कंपोस्ट आणून घालायचं आहे. मार्चमध्ये तिथे टोमॅटो, भोपळी मिरची आणि वांगं अशा भाज्या लावणार आहे.

टोमॅटोच्या बिया साधारण महिन्यापूर्वी घरातच पेरल्या आहेत. दुपारी तासभर खिडकीत ऊन येतं तिथे त्या होत्या. आता दुपारहून हवा बरी होते आणि मला वेळही आहे तर ती रोपं दुपारी बाहेरच्या उन्हात नेऊन वाढवणार आहे. मिरच्या आणि वांग्याची रोपं विकत आणायचा विचार आहे.

गेल्या उन्हाळ्यात सुरू केलेल्या कंपोस्टमध्ये थोडी माती, थोडे भाज्या-फळांचे अवशेष असं दिसतंय. कंपोस्टरला दोन खण आहेत; पैकी एका खणात आता भर घालत नाहीये. मार्चमध्ये पुन्हा बागकाम सुरू करेस्तोवर त्यातलं थोडं कंपोस्ट मिळेल अशी आशा आहे. अव्होकाडोच्या बिया आणि साली अजिबात जिरत नाहीत. त्यासाठी एखादा एल चीपो मिक्सर आणून ते सगळं, निदान अव्होकाडोच्या साली आणि इतर कचरा मिक्सरमधून काढून कंपोस्टात घालायचा बेत आहे. दर आठवड्याला (मांजराच्या लिटरसकट) दोन माणसांचा कचरा चार गॅलनच्या वर होत नाही (यात कपाचाही हातभार आहेच) याचा फारच आनंद होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुंड्याच्या तळाचे ट्रेज:-

ट्रे असे ठेवायचे की पुढचं झाड कमी उंच वाढणारं शक्यतो फुलझाड आणि ते बाल्कनीच्या बाहेरच्या दिशेने असावे.मागचे झाड आतल्या बाजुला आणि उंच वाढणारे वेल वगैरे ठेवावेत.मागे एकदा सांगितल्याप्रमाणे वेलाच्या कुंडीत तळाला असलेल्या भोकांना दोन नाइलोन दोय्रा बांधून मातीबाहेर येतील अशा ठेवाव्यात.प्रत्येक कुंडीत दोन दोय्रा.पुढे वेल भराभर वाढू लागले की या दोय्रा कामास येतात.आपल्या डोक्यापेक्षा थोडे उंचावर परंतु बाल्कनीच्या उघड्या सिलिंगपेक्षा एकदीड फुट खाली आडवी तार बांधून घ्यावी.या तारेस सर्व वेलांतील दोय्रा बांधता येतात.याप्रमाणे सर्व ट्रे ठेवले की पुढच्या बाजूस छोटी फुलझाडे आणि मागच्या घराकडच्या बाजूस वेलांचा हिरवा पडदा होतो.झाडे एकमेकांचे ऊन अडवत नाहीत.
बाजारात जे प्लास्टिक ट्रे मिळतात ते सर्व रंगीत असतात आणि घरात फ्रीज,डाइनिंग टेबलवर ठेवण्यासाठी असतात.हेच ट्रे झाडांसाठी वापरले तर दोन महिन्यांत उन्हातल्या अल्ट्रावाइलट किरणांनी चुरा होतो.गच्चीवर ठेवायच्या पाण्याच्या टाक्यांचे जे कार्बन ब्लॅक घातलेले जे टिकाऊ प्लास्टिक असते त्याचे ट्रे मिळाले तर उत्तम.गंडवण्याचा एक उपाय आहे सोपा.बाजारात प्लास्टिक शीट्सही मिळतात -पांढय्रा आणि काळ्या.त्यातली काळी शीट आणा. सहा इंचाचे पट्टे कापून त्याने ट्रेंच्या किनारी झाका.झाले काम.
ट्रेमध्ये तळाला अर्धाएक इंच मातीचा थर द्यायचा.कुंडीतले वाहिलेले पाणी ही माती शोषून घेते,बाहेर येणारी मुळेही वाढतात आणि सर्वात महत्त्वाचे साचलेले पाणी दिसत नाही त्यात डास वाढत नाहीत.इकडे नवीन मुंबईत नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी येऊन कुंड्यांतालचे ट्रे काढायला लावतात-डेंग्यू ताप डासांच्या वाढीने होतो. तर आपण असे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची.काही न्युट्रिअंट्स टाकली असतील तीही वाहून जात नाहीत.
(खतांचे बाकी आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचरट जी -

१. तुम्ही वापरुन फायदा झालेले कुठले मायक्रो न्युट्रीयंट आहे का?
२. सध्या टॉमॅटोला खुप फुल येतायत पण फळ फारच कमी धरतायत? ( एका वेळी फक्त ३ ) थंडीमुळे होत असेल का? कुठले औषध आहे का फलधारणे साठी?
३. टॉमॅटो ला कॅल्शीयल लागते, सगळीकडे अंड्याची टरफले टाका असे लिहीले आहे. अंडी खात नसल्यामुळे दुसरा काही पर्याय आहे का? कॅल्शीयम साठी खडु चालणार नाही का?
४. मागच्या महीन्यात भरपुर मिरच्या येऊन गेलेल्या रोपाला, आता खुप फुले येत आहेत पण एक पण मिरची होत नाहीये, काय करावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांद्याच्या सालींमध्ये कॅल्सियम असतं असं कुठेतरी वाचलं होतं. (कुठे ते अजिबात आठवत नाही. गूगलायचा आळस करत्ये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

३. टॉमॅटो ला कॅल्शीयल लागते, सगळीकडे अंड्याची टरफले टाका असे लिहीले आहे. अंडी खात नसल्यामुळे दुसरा काही पर्याय आहे का? कॅल्शीयम साठी खडु चालणार नाही का?

अंड्यातील बलक टाकून देऊन केवळ टरफले ठेवू शकता. काही लोक पिवळा बलक खात नाहीत. मात्र केवळ पांढऱ्या बलकाची अंडी मिळत नसल्याने त्यांना अंडी खाणे सोडलेले नाही. तेच तत्त्व इथे वापरता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युअरिआाचे पाणी फवारून पाहिलेलं.खरं म्हणजे अमोनिअम नाइट्रेट हवं.परंतू यांचा खरा उपयोग शोभेच्या झाडांवरच आहे.पाने टवटवीत दिसतात.सुफला वगैरेचे पाणी जमिनीत दिलं परंतू प्रमाण जपावं लागतं.पानं ,शेंडे जळतात.

#बरीचशी पिकं ही सिझनल असतात म्हणजे वाढ ,फुलं,फळं आणि बी करून साडेतीन महिन्यांनी वाळून जाणे.तर मिरची ,टमाटे यातच आले.बहर ओसरला की काढून टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युअरिआाचे पाणी फवारून पाहिलेलं.खरं म्हणजे अमोनिअम नाइट्रेट हवं.परंतू यांचा खरा उपयोग शोभेच्या झाडांवरच आहे.पाने टवटवीत दिसतात.सुफला वगैरेचे पाणी जमिनीत दिलं परंतू प्रमाण जपावं लागतं.पानं ,शेंडे जळतात.

#बरीचशी पिकं ही सिझनल असतात म्हणजे वाढ ,फुलं,फळं आणि बी करून साडेतीन महिन्यांनी वाळून जाणे.तर मिरची ,टमाटे यातच आले.बहर ओसरला की काढून टाका.

*****
भाजीसाठी आणलेला जरा पिकलेला टोमॅटो मातीत टाकला की भरपूर रोपे उगव तात.हीच एक महिन्याने उपटून एका कुंडीत तळाला शेणखताचा गोळा ठेवून वर माती पसरून तीन तीन रोपे लावा.भरमसाठ टोमॅटो लागतात.फुले येण्याचे कमी होऊन भर ओसरला की टोमॅटो मोठे झाल्यावर रोपे उपटा.ठेवून उपयोग नाही.

टोमॅटो,मिरची,वांगी,आणि झेंडूसाठी हीच पद्धत आणि शेणखतच लागते.वांग्याचे बी मात्र विकत आणावे लागते.भाजीत जून झालेले वांगे नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खते:
खतांच्या वर्णनात नेहमीच "चांगले कुजलेले" असे म्हटले जाते कारण झाडांची मुळे न कुजलेले प्राणी /वनस्पतींच्यातील उपयुक्त द्रव्य शोषू शकत नाहीत.
१) शेणखत
बाजारातून शेणखत आणल्यावर ते लगेच झाडाच्या बुंध्याशी घालू नये.एकतर त्यात कीटक असतात अथवा ते पूर्ण कुजलेले नसल्याची शक्यता असते.अशा खताने काही झाडे "जळतात" - त्यांचे कोवळे शेंडे व पाने काळी पडतात.तर आणलेले खत एका ट्रेमध्ये उघडे डोंगर करून ठेवायचे आणि त्यावर एखादे कापड/गोणपाट टाकून ओलसर ठेवायचे.साताठ दिवसात ते आतून कोमट झाले अथवा त्यातून शेणाचा वास आला तर ते पूर्ण कुजलेले नाही ही खूण आहे.शिवाय त्यात गोगलगायी असल्या - बारीक तांदळाएवढे शंख तर ते अजिबात घेऊ नका.शेण खाणारे काळे बिटल्स काही त्रास देत नाहीत.

यात नक्की काय असते?-या खतांतला गवताचा चोथा असतो तो मुख्यत: मातीस सैलसर ठेवतो,ओलावा धरला जातो,हवा खेळती राहते,काही उपयुक्त जंतू वाढतात आणि झाडांना मदत करतात.उपयुक्त द्रव्य नाइट्रोजन हा जास्तीत जास्त ०.५ टक्के असू शकतो.हे प्रमाणही दुभत्या गुरांच्या तबेल्यातल्या मिळणाय्रा शेणखतात असते.त्या गुरांना चांगला पौष्टिक खुराक/पेंड देतात म्हणून.रानोमाळ चरणाय्रा गुरांच्या शेणात फारच कमी नाइट्रोजन असतो.मात्र माती सैल करण्याची किमया असतेच.सावकाश अल्प प्रमाणात द्रव्य घेण्यास मदत करणे हेच मुख्य काम.त्यामुळे झाड टवटवीत दिसते,मुळांचा आवाका वाढतो विशेषत: पांढरी केशमुळे.

गरयुक्त फळभाजीस आणि झाडांच्या पूर्ववाढीस खत उपयोगी आहे.ज्यांची पाने उपयुक्त आहेतअशा बेझल,तुळस,क्रोटन्स झाडांना चांगले. रोपांच्या खोडापासून दूर कडेने द्या. बंगल्याजवळ लॅान अथवा पायवाटेच्या कडेने गवत असेल तर वर्षातून दोनदा शेणखत वरच्या वरच फेकावे.मोठा पाऊस संपल्यावर. शेणखत दिलेल्या झाडास कुंडीतून पाणी खाली वाहेल इतके पाणी द्यायचे नाही.

टोमॅटो,मिरची,वांगे,झेंडू शिवाय खास उपयोग मोगय्रासाठी होतो.थंडीमध्ये मोगरा सुप्तावस्थेत जातो.वसंता अगोदर तो जागा होतो. त्यावेळी रोपाभोवती असलेली माती काढून भरपूर शेणखत घाला.फक्त ओलसर राहील एवढेच पाणी द्या दोनवेळा. पंधरा दिवसांनी झाड अचानक वाढेल.मार्च महिन्याचा उन्हाचा तडका बसू लागला की कळ्या येतील.फुलांचा भर
बहर सप्टेंबरात ओसरेल.जाई ,जुई,चमेली, नागवेल (विड्याची पाने) यांस शेणखताचा फारसा उपयोग होत नाही.त्यांना नवीन माती बुडाशी घालावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचरटराव, तुम्हाला एक कडकडीत सॅल्युट!
नुसती माहिती असणं आणि ती अशी नेमक्या क्रमात, आत्मीयतेने आणि सगळ्यांना उपयुक्त ठरेल अशा साध्या पण स्पष्ट शब्दांत जालावर मराठीत उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या प्रतिसादांतून माहिती तर मिळतेच पण तुम्ही ती ज्या बारकाव्यांसह देता त्यामुळे माझ्यासारख्याला येणार्‍या लहानसहान शंकाही दूर होतात.

यातून दिसते ते तुमचे बागकामाबद्दलच निखळ प्रेम Smile

मनःपूर्वक आभार! असेच लिहित रहा. बरेच दिवस लिहायचे होते आज लिहिले इतकंच

---

या इथे एक पेरणी तक्ता आहे. त्यात "नॉर्थ" आणि "साउथ" इंडीया अशी विभागणी आहे. महाराष्ट्र (किमान पुणे) साउथ प्रमाणे चालत असेल असा अंदाज. तो बरोबर आहे का? वेळ होईल तेव्हा या तक्त्याकडे एक नजर टाकाल का?

अजून एका गोष्टीसाठी व्यनी टाकतोय. तो बघावा ही विनंती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके नंतर लिहितो व्यवस्थित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२) गांडूळखत/वर्मिकॅाम्पोस्ट

तयार खताचा हा आणखी एक प्रकार आहे.आपण अगोदर त्याचा वापर पाहणार आहोत.जर का उपयुक्त वाटलं तर ते कसं करायचं याची माहिती मिळवता येईल.vermicompost शोधल्यावर साइट्स दिसतील.त्याचे तयार ट्रे, जाळ्याही असतात.
बाजारात प्लास्टिकच्या पिशव्यात भरलेली काळसर तपकिरी मऊसर माती मिळते गांडूळखत म्हणून.साधारणपणे दहा ते चाळीस रु किलो असते.बाल्कनीतल्या जागेसाठी सहा महिन्याला दोन किलो खूप झाले.

गांडूळखत म्हणजे काय?/ गांडुंळांशी याचा काय संबंध आहे?/शेणखतापेक्षा वेगळे कसे?

पावसाळ्यात जमिनीवर दिसणारी(१) आणि शेतांमध्ये रात्री वर येऊन मातीच्या गोळ्या टाकणाय्रा गांडुंळांशिवाय(२) आणखी एक यांची जात(३) जमिनीवरच्या ओलसर पालापाचोळ्यात फिरते.सर्व गांडूळं कमी अधिक वेगात एकच काम करतात ते म्हणजे सडणारे पदार्थ खाऊन जगतात.न पचलेला जो भाग ते बाहेर टाकतात तो झाडांसाठी फारच उपयुक्त असतो.सडणाय्रा पदार्थातला 'सेल्यलोज' फोडून देतात आणि। हाच झाडांची मुळे लगेच घेऊ शकतात.त्यात गांडुळाच्या पोटातली पाचक द्रव्येही असतात.तर क्रमांक तीन यासाठी फारच कार्यक्षम असतात.शेणखतातून जी उपुक्त द्रव्ये झाडास मिळतात त्यापेक्षाही तिप्पट वेगाने शोषता येणारी या गांडुळखतांत असतात.

कोणत्या झाडांसाठी आणि किती?
ज्या झाडाची पाने आपण वापरतो उदा० पुदिना यासाठी हे उत्तम खत आहे.एका सात आठ इंच व्यासाच्या आणि एक दीड इंच उंचीच्या प्लास्टिक थाळीला दोय्रा बांधून टांगण्याची व्यवस्था करा आत मातीचा थर अंथरून त्यावर पाचसहा इंच रुंद आणि तीन चार इंच उंच गोल बोल/सपाट वाडगा ठेवा.यात बारीक माती आणि दोन मोठे चमचे गांडूळखत मिसळून भरा.खाली भोके हवीतच.पुदिना बाजारातून आणला की त्याचे तीन तीन इंचाचे पाचसहा शेंडे रोवून पाणी द्या.पंधरा दिवसांत पुदिना भराभर वाढेल.वाहिलेले पाणी खालची माती शोषेल,खाली सांडणार नाही.पाने खुडून थेट वापरता येतात.टांगले असल्याने इतर झाडांचे रोग वगैरे लागत नाहीत.दोन तासाचे ऊन खूप झाले.पानांचा मोठा आकार लहान होऊ लागला,लुसलशीतपणा कमी झाला, नवीन शेंडे बारीक आणि लांबुळके दिसू लागले ही गांडूळखताचा परिणाम संपल्याची खूण आहे.यातच खत घालण्यापेक्षा नवीनच कुंडी बनवावी.कुंडीसाठी आणि विशेषत: याप्रकारच्या रोपांसाठी नवीकोरी माती वापरावी अथवा अगोदरच्या टांगलेल्या कुंडीतीलच घ्यावी.खालच्या मोठ्या कुंड्यांतली काढलेली नको.

याचप्रमाणे बेझलचे शेंडे,कोथिंबिरीचा मुळाकडचा भाग रोवावा.धणे पेरून वाट पाहण्याची गरज नाही.अशा रोपांवर कोणतेही रासायनिक खत/किटकनाशक फवारू नका.किचिन गार्डन करण्याचा खरा उद्देश त्याने सफल होणार नाही.बय्राच सोसायटीत बाल्कनित बाग करणाय्रांची तक्रार असते वरून केस वगैरे टाकतात.अशा टांगलेल्या कुंड्या थोड्या आत असल्या तर स्वच्छ राहतात.
व्हर्बिना/फ्लॅाक्स सारख्या नाजूक फुलझाडांनाही उपयुक्त आहे.गुलाबाचे रोप आणल्यास प्रथम त्यावरचे सगळे गुलाब काढून टाकून हे खत देऊन झाड मोठे करून घ्या.नंतर कळ्या दिसू लागल्यावर बोनमिल वगैरे खते घ्यावी लागतात.
गांडूळखतातून कधीकधी गांडुंळांची अंडीही येतात त्यातून गांडूळे तयार होतात.घाबरण्याचे कारण नाही ती तुमच्या झाडास मदतच करतील.मोठ्या कुंडीत सोडा.
( हे खत कसे करायचे हा विषय मुद्दामहून घेतलेला नाही.जर दोन किलोभरच पुरणार असेल तर करण्याचा खटाटोप कशाला करायचा?मात्र विकत आणलेले लगेच वापरावे ,ठेवू नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेली दीड-दोन वर्षे आम्ही घरात वर्मीकॉम्पोस्ट बनवत आहोत. त्यासाठी खाली थोडी छिद्रे बनविलेला एक मोठा प्लॅस्टिकचा डबा, विकत मिळणारे वर्म्स (रेड रिगलर्स - आम्हाला हे मैत्रिणीने फुकटच दिले होते), वर्मसाठी कागद-पाचोळा इत्यादींचा बिछाना एवढेच साहित्य लागते आणि स्वयंपाकघरातून येणारे भाज्यांचे शेंडे-बुडखे, फळांची साले इत्यादी ओला कचरा बारीक चिरून किड्यांना खायला देता येतो. या किड्यांना खायला काही गोष्टी आवडत नाहीत, जसे की संत्र्याच्या किंवा लिंबाच्या साली, अव्होकाडोच्या साली किंवा खूप जास्त कठीण पदार्थ वगैरे, पण हे सारे हळूहळू अनुभवाने समजत जाते आणि आंतरजालावर याबद्दल खूप सारी माहिती आहे.
घरातल्या वापरात नसलेल्या बाथरूममध्ये हा डबा त्यावर एक प्लॅस्टिकचे अंथरूण पांघरून ठेवला आहे पण याचा वाईट वास अजिबात येत नाही फक्त त्यामुळे घरात चिलटे वाढू शकतात. चिलटे होऊ नयेत म्हणून आधी ओला कचरा पूर्ण फ्रीज करून (आमच्याकडे आठ महिने ते रात्री बाहेर ठेवल्यानेही साध्य होऊ शकते Lol मग तो पुन्हा वितळवून वर्म्सना खायला घालता येतो किंवा निदान ज्या फळांच्या सालींमुळे ही चिलटे येतात त्या केळ्यासारख्या सालीतरी आधी फ्रीज करून मग वापरता येतात. कॉम्पोस्टमधे फार पाणी घालून चालत नाही, ते थोडे कोरडेच रहावे म्हणून अधूनमधून त्यात थोडे कागदाचे तुकडे, पाचोळा वगैरे घालता येतो.
कॉम्पोस्ट तयार झाले की त्यातून किडे वेगळे करायचे काम थोडे कष्टाचे आहे पण त्यासाठी त्याचे छोटे ढीग बनवून मग ते सूर्यप्रकाशात ठेवणे आणि काही मिनिटांनी वरचे कॉम्पोस्ट काढून घेणे हे तंत्र वापरता येते. हे वर्म्स प्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी ढिगाच्या खाली जाऊन लपतात आणि मग वर फक्त कॉम्पोस्ट उरते. या कॉम्पोस्टचा झाडांच्या वाढीवर नक्की कसा परिणाम होतो हे मी फार सखोल अभ्यासले नाहीय पण मागल्या वर्षीच्या बागकामात या ऑर्गॅनिक कॉम्पोस्ट व्यतरिक्त कोणतेही रासायनिक खत वापरले नव्हते पण तरी बाग रसरशीत फुलली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची, प्रत्यक्ष अनुभवाचे टिपण फारच उपयोगी पडेल कोणी हे करणार असेल तर.काहींना ही गांडूळं संभाळायला जमणार नाही -जागेमुळे अथवा नावड म्हणून.मीसुद्धा हे केलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची, तुमच्या कंपोस्टाच्या आराशीचा फोटो दाखवता येईल काय? हे प्रकरण बाहेर उन्हात ठेवलेलं चालेल का? आमच्याकडे घरात ही आरास ठेवायला जागा नाही; पण आता बाहेर मार्च-एप्रिल छाप हवा आहे ... वश्या ऋतू आलाच आमच्याकडे म्हणायला हरकत नाही.

सध्या माझा कंपोस्टर भरत चाललाय. घरात एक प्लास्टिकचा टब सापडलाय त्यात सध्यापुरतं, मुख्य कंपोस्टरात व्यवस्थित माती दिसायला लागेस्तोवर, कंपोस्ट करता येईल.
बागेत सध्या भाज्यांच्या वाफ्यापर्यंत जाण्यासाठी फरशा टाकल्या आहेत. थोडा खड्डा खणून त्या फरशा जमिनीच्या पातळीलाच आणायचं काम सुरू आहे. खणताना रेड विगलर्स आणि गांडुळं सापडतात; ती उचलून कंपोस्टात टाकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक प्रदर्शनातला
कंपोस्टर गांडूळखत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिवाळ्यासाठी लावलेले मेथी आणि मोहरी (सरसोंका साग करण्यासाठी) भरभरून आल्येत.
आमच्या इथे स्प्रिंग आल्याने पीच आणि आलुबुखारांना भरभरून फुलं आलीयेत.
अंजीर, द्राक्षं आणि डाळिंबांना नवीन पालवी आलीये.
खास रुचीसाठी, मायर लेमन्सनी झाडं वाकून जमिनीला भिडताहेत! Smile थोड्या दिवसांतच काढावी लागणार आहेत...
नव्या फुलोर्‍याच्या सुगंधाने वातावरण बेधुंद होत आहे....
अजून तसं नवीन काही नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनवनच जणू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्यूलिपचं पहिलं फूल फुललं. ऊन आलं की फूल फुलतं, संध्याकाळी पुन्हा पाकळ्या मिटतात. ढगाळ हवा असताना पाकळ्या उघडतच नाहीत. याचा टाईम लॅप्स व्हीडीओ बनवला आणि बघितलं.

कालच बरीच पेरणी केली. सगळी रोपं विकत आणली. वांग्याच्या बिया पेरलेल्या त्या उगवल्याच नाहीत; बहुदा जुन्या असल्यामुळे असेल. तीन निरनिराळ्या प्रजातींची वांगी आणली आहेत. चेरी टोमॅटोच्या दोन प्रजाती (सुपर स्वीट १०० आणि एक हायब्रिड) आहेत. भोपळी मिरची (सहा) आणि तिखट सेरानो मिरची (एक) अशी रोपं लावली. पालक आणि लाल (भोपळी) मिरचीचे सिद्धीने दाखवल्येत तसे पॉड्स मिळाले; ते गंमत म्हणून लावले आहेत.

पेरलेले चार साधे टोमॅटो अजून जमिनीत लावायचे आहेत. बेझिल कालच पेरलं. घराच्या समोरच्या बाजूला झाडाचं एक आळं आहे. त्यात फुलझाडांच्या (अॅस्टर आणि लवेंडर) बिया विखरून देणार आहे. येतील तेवढी झाडं येतील. भरपूर झाडं आली तरीही तिथे बऱ्यापैकी जागा आहे.

बहुतेकशी झाडं आहेत तिथे दुपारनंतर ऊन येतं; पूर्ण दिवसभर ऊन असल्यास जेवढी फळं धरतील तेवढी मिळणार नाहीत असं वाटतंय. पण सध्या एवढंच शक्य आहे. ह्यांची प्रगती होईल तसे अपडेट्स इथे लिहीत जाईन.

परसबाग परस बाग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अंडी खाणारे ओळखीचे लोक असतील तर त्यांना टरफले मागू शकता.

अंड्याची टरफलं अगदीच मिळण्यासारखी नसतील किंवा हाताळायची नसतील तर शंख शिंपले स्वच्छ धूवून कुटून घालता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शोनू. शिंपल्यांची आयडीया चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्यापासून तीन दिवस डेल मार फेअरग्राऊंड्सवर (सॅन डिएगोच्या किंचित उत्तरेला) 'स्प्रिंग होम/गार्डन शो' आहे.

करिता माहितीस्तवः http://springhomegardenshow.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या वर्षीच्या टोमॅटोने शेजारच्या कुंडीत स्वतःचंच कलम केलं होतं. त्याला आता १० टोमॅटो लगडले आहेत.
टोमॅटो

ज्या मिरचीच्या कुंडीत त्याने घरोबा बनवला त्या मिरचीला गेल्या वर्षी फंगस लागलं होतं. कापून, फंजिसाईड मारून झाड टिकलं. ह्या वर्षी फार थंडी नव्हतीच, पण जी काही होती त्या थंडीत ते ही जगलं; खारींनी बरीच पानं फस्त केली होती. त्यालाही आधी पानांचे फुटवे आले आणि आता फुलं आणि दोन बाळ मिरच्या दिसताहेत. टोमॅटोमुळे मिरचीला फार ऊन मिळत नाहीये. कुंडी बऱ्याच पद्धतींनी फिरवून बघितली. पण तशीही ही दोन्ही झाडं बोनस आहेत. मिळेल ते मिळेल.

२० जानेवारीच्या आसपास टोमॅटोच्या बिया पेरल्या होत्या. चार झाडं आली. त्यांतल्या दोन झाडांना आता कळ्या लागल्या आहेत. काल होम डिपोमध्ये लोक बारकी बारकी टोमॅटोची रोपं विकत घेत होते ते बघून उगाच कॉलर ताठ केली. त्यांना एकेका रोपाला ३-४ डॉलर पडत असतील; मला एखाद डॉलरमध्ये चार रोपं मिळाली आणि महिन्याभरात फळंही मिळावीत.

सध्या भेंडीच्या बिया घरात लावून रोपं वाढवण्याचे प्रयोग सुरू आहे. सुरुवातीला पेरलेल्या सहा बियांपैकी फक्त दोनच उगवल्या आहेत; एक उगवलंय आणि दुसऱ्याचा कोंब दिसतोय. त्यानंतर आणखी चार बिया पेरल्या आहेत. भेंडीला बरीच उष्णता लागते जी आमच्याकडे असतेच. सध्या सकाळी बऱ्यापैकी गार असतं, त्यामुळे रोज भेंडी(!) आत-बाहेर करावं लागणारसं दिसतंय.

(फोटोचा दुवा दुरुस्त केला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान पण वरचा फोटो दिसत नाही.

ना एकेका रोपाला ३-४ डॉलर पडत असतील; मला एखाद डॉलरमध्ये चार रोपं मिळाली आणि महिन्याभरात फळंही मिळावीत.

आता पुढच्या खेपेस तो एखाद डॉलरही वाचव. आठवड्याच्या भाजीबाजारातून आणलेला किंव दारात लावलेला, आवडलेला आणि जरा जास्त पिकलेला टोमॅटो असेल तर तो खाताना त्याच्या थोड्या बिया गार पाण्यात टाकायच्या आणि स्वच्छ धुवायच्या. नंतर त्या एका थोड्या निथळून मग किचन टिश्यूवर खडखडीत वाळू द्यायच्या. असा बिया वाळविलेला टिश्यू पुढल्या वर्षी थेट पेरायचा (टिश्यू कॉम्पोस्ट होतो त्यामुळे बिया सोडवायची गरज नाही) माझ्याकडची गेल्या दोन वर्षांतली टोमॅटोची बहुसंख्य रोपे याच प्रकारच्या बियांनी तयार केलेली आहेत. कित्येकदा तर बाहेर कोठेही असतानाही जर एखाद्या वेगळ्या प्रकारचा टोमॅटो आवडला तर बिया तोंडातच थोड्या चोखून किंवा न धुता तश्याच टिश्यूवर टाकून आणायची सवय मुलीलाही जडली आहे आणि घरात शेकडो बिया साठल्या आहेत. सुदैवाने मुख्यतः अशा आणलेल्या बिया एयर्लूम प्रकारच्या (किंवा ओपन पॉलिनेटेड) असल्याने त्यांना पुढे फळ धरण्यात काहीच त्रास झालेला नाहीय. रोपे बनविताना थोडी जास्त बनवून मग मित्रमैत्रिणींना भेट द्यायची कल्पनाही यातूनच सुचली.
आपल्या स्वतःच्याच बागेतून मिळालेले बी असेल तर एका प्रकारे आपल्या हवामानात यशस्वी होण्याची त्या बीची पात्रता आपोआपच सिद्ध झालेली असते त्यामुळे त्याचा असाही उपयोग होतो. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या फुलांच्या, काही प्रकारच्या भाज्यांचे (वाटाणे-मटार, फरसबी वगैरे) बियाणे राखायचा अधिकाधिक प्रयत्न करत आहोत आणि हे अपेक्षेपेक्षा अधिक सोपे आहे असे लक्षात अले आहे. गेल्या वर्षीच्या घरच्या बीपासून त्यार केलेल्या एयर्लूम टोमॅटोचा फोटो.
119

आमच्याकडचा उन्हाळा अगदीच छोटा असल्याने अनेकदा टोमॅटो पिकायच्या आधीच थंडी पडायला लागते. अशावेळी ती टोमॅटो लगडलेली झाडे मुळापासून उपटून तळघरात उलटी टांगली की मग ते टोमॅटो सावकाश घरात पिकतात. त्यावेळी आमचे तळघर काहीसे असे दिसते Smile

017

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात ज्याला देशी टोम्याटो म्हणतात त्या वाणाचा हा टोम्याटो आहे काय? त्याला भोपळ्यागत जास्त वळ्या दिसताहेत म्हणून विचारले. नॉर्मली बाजारात असे टोमॅटो दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्वसाधारणपणे शेतीव्यवसायाचे औद्योगिकीकरण होऊन बीजकंपन्यांकडून संकरित बियाण्यांची विक्री होण्यापूर्वी परंपरेने चालत आलेल्या प्रजातींना एयर्लूम असे संबोधले जाते. त्या न्यायाने आपल्याकडे ज्या वाणांना 'देशी' म्हटले जाते ती बरीचशी एयर्लूमच असतात. या प्रकारच्या बियाण्यांत विशेषतः टोमॅटोत प्रचंड वैविध्य असते. लाल, हिरवे (पिकल्यावरही), पिवळे, केशरी असे निरनिराळे रंग, निरनिराळे आकार, अगदी गोडपासून आंबट ते तुरट चवी, गर आणि रस यांच्या पोतातला फरक असे अनेक वेगवेगळे फरक या बियाण्यांत असतात. त्या सगळ्या प्रकारांची व्यवस्थित वर्गवारी झाली आहे असे वाटत नाही कारण अनेकदा एकमेकांशी साधर्म्य असलेल्या जातींची ती ज्या घराण्यांकडून चालत आलेली आहेत त्याप्रमाणे नावे वेगवेगळी असून शकतात. माझ्या घरी हे बियाणे ज्या प्रकारे आले आणि आम्ही बिया साठविल्या त्याप्रकाराने काहीवेळा त्यांची नावे आम्हीच ठरवितो. जसे की फार्मर्स मार्केटचा पिवळा चेरी टोमॅटो (फामापिचे), भावनाने दिलेला इटालियन लांबुडका टोमॅटो (भाइलांटो), टेरीचा जर्मन लाल टोमॅटो (टेजलाटो), हिरवा झेब्रा टोमॅटो (हिझेटो) वगैरे. खालच्या फोटोत वेगवेगळे एयर्लूम टोमॅटो कापल्यावर कसे दिसतात त्याचे चित्र आहे (जालावरून साभार)
वरचा फोटो 'टेजलाटो' आहे असे वाटते.

एक सुंदर फोटो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा......

माहितीकरिता तर धन्यवादच, पण अस्सा सुंदर फोटो बघून डोळे निवले आणि त्यातल्या प्रत्येक टोम्याटोचा घास घेण्यासाठी भूक खवळली. एकच नंबर.

यांपैकी प्रत्येक टोम्याटोचे सार/रसम केल्यास कसा छान वेगवेगळा कलर येईल, आहाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यांपैकी प्रत्येक टोम्याटोचे सार/रसम केल्यास कसा छान वेगवेगळा कलर येईल, आहाहा.

तारा रे तारा! रस्सम ऐवजी कोशिंबीर हा विचार केला. रंगेबीरंगी कोशिंबीर/सलाड काय कातील दिसेल! अहाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सलाड तर इतकं भारी दिसेल की खावंच वाटणार नाही, बघतच रहावंसं वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रुचीचा आणि माझा एक जालीय मित्र दर वर्षी दोन महिने फक्त (स्वतः उगवलेले) टोमॅटोच खातो, आणि रंगीबेरंगी सॅलेड चे झकास फोटो टाकतो. यंदा घर बदलल्यामुळे तो काही लावणार नाहीये, आणि मलाच कसतरी वाटतंय.

गेल्या वर्षी लावलेले "गोल्डन जुबिली टोमॅटो":
Golden Jubilee Tomatoes

मधला "ग्रीन झेब्रा", आणि शेजारचे छोटे लाल "रोमा" टोमॅटो.
Zebra and Roma

(फोटोंचा साइझ कमी केला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोल्डन ज्युबिली मस्त दिसताहेत!

जालीय मित्र दर वर्षी दोन महिने फक्त (स्वतः उगवलेले) टोमॅटोच खातो

अहाहा! सुखी माणूस. बाकी हा वांग्यांचा फोटोही त्या मित्राला फारच आवडेल नाही!

मागल्या वर्षी जवळजवळ दोन महिने आम्हालाही बाहेरचे टोमॅटो फार आणावे लागले नव्हते पण ते उशीरा म्हणजे सप्टेंबर-आक्टोबर मधे. सगळे टोमॅटो पाडाला आलेले असतानाच थंडी पडायला लागली म्हणून मग झाडे उपटून आणि टोमॅटो खुडून घरात आणले आणि ते सगळे साधारण एकाच वेळेला पिकले. काही फ्रीजरमधे टाकलेले टोमॅटो अजूनही शिल्लक आहेत.

वांग्याबद्दल एक प्रश्न. गेल्या खेपेला तू दिलेल्या माहितीप्रमाणे वांग्याची झाडे तीन वर्षे टिकतात असे कळल्याने सिझन संपला तेंव्हा बागेतली चार सशक्त झाडे कुंडीत घालून घरात आणली आणि ती या उन्हाळ्यापर्यंत घरात जिवंत ठेवायचा प्लॅन होता. त्याप्रमाणे ती ठीकठाक राहिलीही आहेत पण घरात आणल्यावर त्यावरच्या काही बारीक हिरव्या किड्यांना (एफिड्स) इतर किड्यांपासून पूर्ण संरक्षण मिळाल्याने त्यात प्रचंड वाढ झाली. दर तीन-चार दिवसांनी लिंट रिमुव्हरने काढून झाडे स्वच्छ केली तरी हे किडे तिसर्या दिवशी पुन्हा हजर. कडुलिंबाचा फवारा, टोमॅटोच्या पानांचा काढा, आले-लसणाचा काढा कशाला कशाला दाद देत नाहीत हे किडे. आता बागेत थोडे लेडिबग्ज दिसायला लागलेत म्हणून दिवसा तापमान दहाच्या वर गेलं की झाडे बाहेर आणून ठेवतो आणि लेडिबग दिसला तर त्याला पकडून सक्तीने वांग्यावर सोडतो पण या किड्यांवर काही रामबाण उपाय आहे का?

asasa

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीन वर्षं बहुतेक इथल्या गरम हवामानातच टिकत असावे - थंड प्रदेशात आत नेऊनही, तेवढे ऊन न मिळता टिकेल की नाही शंका आहे. किडे सुद्धा त्यामुळेच सतत लागत असावेत.
सरळ जोरात पाण्याच्या फवार्‍याने मारून पाहिलंयस का? त्रासदायक आहे, पण लेडीबग्स नंतर तोच एक रामबाण उपाय आहे.
अगदी पूर्ण झाड त्यांनी झाकलं गेलं नसलं तर तसेच वेळोवेळी धुवून काढून उन्हात ठेवत जा. उन्हाने ऊब मिळून थोडे टवटवीत झाले की आपोआप कमी होतील. (शी सेड, होपेफुली....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एयर्लूम टोमॅटोचा फोटो सुंदर काढलाय. तुमची आरासपण मस्त दिसत्ये. टोमॅटो लटकवण्याची पद्धत आवडली. आम्हाला घरी अशी जागा शोधली पाहिजे. आमच्याकडेही तशी बऱ्यापैकी थंडी एरवी पडते आणि तेव्हा टोमॅटो लागलेले असतातच. (हे सगळं काम दिवाळी अंकाच्या वेळेसच आलं नाही तर बहुदा मी ही करेन.)

मी गेल्या वर्षी झेंडूची रोपं तयार करायचा प्रयत्न केला होता, पण तो फसला. काहीच उगवलं नाही. तुम्ही रोपं तयार करताना विशिष्ट माती वापरता का बागेत घालता तीच? मी सध्या कुंड्यांसाठी मिळते ती माती वापरते. त्याच मातीचा जो काही खर्च होईल तो.

(माझा फोटो आता दिसत असावा. गूगलने फार घोळ घातल्येत. आपल्याला जमलं नाही की दुसऱ्यावर खापर फोडून द्यायचं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

झेंडूची रोपं तयार करायचा प्रयत्न केला होता, पण तो फसला. काहीच उगवलं नाही.

अय्यो! असं कसं झालं? झेंडूची रोपं यायला काहीच करावं लागत नाही खरं, वाळलेली फुलं साठवायची आणि पुढल्या वर्षी त्याच्या पाकळ्या गड्यातून उपसून साध्या कॉम्पोस्टमध्ये किंवा पॉटिंगसॉईलमधे पेरायच्या, सात-आठ दिवसांत उगवतात. पुन्हा प्रयोग करून पहा, फारच सोपं आहे ते प्रकरण. आमच्याकडे तर सध्या इतक्या फुलांच्या बिया साठल्या आहेत की नवरा आणि मुलगी त्याचे सीड-बॉम्ब बनवून जवळपासच्या रिकाम्या जागांत टाकून येणार म्हणताहेत, तेवढेच मधमाश्यांना अन्न!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे चिकार रानफुलं उगवतात; आत्ता सीझनच आहे. मी पण थोड्या बिया जमा करते, फुलं सुकायला लागली की. टेक्ससच्या ब्लूबॉनेटांना छान मंद, गोड सुगंध असतो.

झेंडूचं मलाही समजत नाहीये, काय बिनसलं ते. कदाचित मूळचा झेंडूही देशी वाणाचा नसेल. तो ही कदाचित ट्रीटेड प्रकारचा असेल. आता आणलेल्या झेंडूचं एक फूल आत्ता कोमेजलं आहे; त्यावर उन्हाळा सुरू व्हायच्या आतच प्रयोग सुरू करणार आहे.

ह्या वर्षी मला थोडा उशीरच झालाय. पण बिया विकत आणून फुलझाडं वाढवायचा प्रयत्न सुरू आहे. दरवर्षी लावावी लागतात अशा फुलझाडांवर फार पैसे खर्चायला जीवावर येतं. बियांपासून फुलझाडंही वाढवून समोरच्या बाजूला लावून द्यायची आणि समोरच्या घरातल्या आजीलाही काही रोपं द्यायचा विचार आहे. त्या बदल्यात तिच्याकडून बोगनवेल आणि गुलाबाची कलमं मिळतात का याची चाचपणी करणार आहे.

या बागकाम आणि कंपोस्टिंगमुळे आजूबाजूच्या लोकांशी बऱ्याच गप्पा व्हायला लागल्या आहेत. आमच्याकडे लाईव्ह ओक प्रकारचे वृक्ष असतात. वसंत ऋतू आला की त्यांची पानं गळतात; ही पानं काही केल्या कंपोस्ट होत नाहीत म्हणे. शिवाय भारंभार परागकणही गळतात. मी घरासमोरचे, रस्त्यावरचे परागकण उचलून पोतं भरलं. समोरची आजी ते बघत होती, म्हणाली, "महापालिकेचे लोक प्लास्टिकच्या पिशव्या नेणार नाहीत." मग तिला म्हटलं, "ते परागकणही कंपोस्ट होतात का याचा प्रयोग करणार आहे." मग एकदम खूष झाली. तिची बाग बघितली; तिला माझी झाडं दाखवली. आणखी काही फुलझाडं आणि ब्लूबेऱ्यांची दोन झुडपं लावायचा बेत आहे हे तिला सांगितलं. शेवटी तिला झाडावरची लाल स्ट्रॉबेरी तोडून दिली. आजी खूष! एक स्ट्रॉबेरी आणि अर्ध्या तासात आमची गट्टी जमली.

इथल्या रोचनाच्या धाग्यामुळेच मी दोन वर्षांपूर्वी बागकाम सुरू केलं. आत्ताच्या झेंडूच्या चर्चेवरून नवीन प्रयोग करायचीही कल्पना आली. बागकाम करताना वेळ चांगला जातो, व्यायाम होतो, मजा येते आणि शेजाऱ्यांशीही गप्पा मारायला उत्तम विषय मिळतो. कोण म्हणतं जालावरच्या चर्चांमधून काही निष्पन्न होत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना एकेका रोपाला ३-४ डॉलर पडत असतील; मला एखाद डॉलरमध्ये चार रोपं मिळाली आणि महिन्याभरात फळंही मिळावीत.
ग्रेट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्याकडे :

१. अर्ली गर्ल सुचवल्याबद्दल अदितीला खूप खूप धन्यवाद . मस्त उंच झालाय आणि भरपूर फुलं आली आहेत. एक-दोन फुलांच्या खाली छोटी छोटी फळं पण दिसू लागल्येत . मध्ये ( ३ आठवड्यांपूर्वी साधारण ) आमच्याकडे जर वादळ-वारा पाऊस झाला. सकाळी येवून बघितलं कि झाड पूर्णपणे वाकून (कोलमडून) जमिनीला टेकलं होतं . म्हणून मग परत तसं होवू नये ह्यासाठी एक दोरी बांधून घेतली .
a

२. वर जे काकडीचे पॉड दाखवले होते त्यातून आलेली ही झाडं. लवकरच मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करेन . काही सूचना ? उन्ह पाणी किती लागेल ? कंपोस्ट घालेनच . काकडीच्या कुंडीत सहज म्हणून मिरचीच्या बिया टाकल्या होत्या - त्यातून चिल्लीपिल्ली रोपं आली आहेत ती पण हलवावी म्हणते .
a2

३. उन्हात ठेवून पुदिन्याची पानं जळतायत असं जाणवलं म्हणून त्याला सावलीत हलवलं तर आता पानांवर पावडर पडल्यासारखी कीड दिसतेय . काय करू?
a3

४. कोरफड पण आणल्या-आणल्या जरा रुसला होता आता सावलीत ओके आहे .
a4

५. बाकी मोगऱ्याचा एक बहर येवून गेला आता कळ्या दिसत नाहीयेत . छाटणी करावी का?
अजून एक , त्या काकडीप्रमाणे वांग्याचे पॉड आणून पेरलंय. अजून काही उगवलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

हाथ मिलाओ, दोघींकडे अर्ली गर्ल आहे. टोमॅटो धरल्यावर, पूर्ण वाढून पिकायला खूप वेळ लागतो. मोसमाच्या सुरुवातीला टोमॅटो तयार होईस्तोवर अजिबात धीर धरवत नाही मला. दररोज सकाळी जाऊन टोमॅटो पिकल्येत का बघून येते मी.

बराच पाऊस पडणार असेल तर त्याआधी टोमॅटो आतल्या बाजूला सरकवून ठेव. आमच्याकडे कुंडीत पूर येऊन टोमॅटोची मुळं कुजून दोन टोमॅटो गेले. दुसरं, सगळ्या झाडांना कागद, वापरलेली कॉफीपूड, वाळकं गवत, गळलेली पानं यांपैकी कसलंतरी आच्छादन ठेव म्हणजे पाणी कमी लागेल.

आमच्याकडे कोरफडीला साधारण चार तास ऊन मिळत असेल. राक्षसी वाढली आहे. नंतर फोटो लावते. आणि वांग्याच्या बाबतीत समदुःखी. मी दह्याच्या डब्यात बिया पेरल्या होत्या. चारापैकी एकही उगवली नाही. मग वांग्याची रोपं विकतच आणली सरळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी पण रोज सकाळी जाऊन झाडांचा प्रोग्रेस बघते. अगदीच धीर धरवला नाही तर सरळ कच्च्या टोमॅटोची भिजवलेली मुगडाळ घालून कोशिंबीर करायची ! मी तसंही एकदा करणारच आहे ती . खूप दिवस झाले खाउन आणि इथे बाजारात कच्चे टोमॅटो मिळतच नाहीत .

बाकी पॉईण्ट्स नोटेड. वांग्याच्या पॉड मधून तीन चिंटू-पिंटू पानं वर आलीयेत कालच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

सिद्धी, टोमॅटोला दोरी बांधण्याऐवजी एखादी काठी किंवा बांबू का वापरत नाहीस? जसे टोमॅटो मोठे होतील तसे त्याच्या वजनाने फांद्या झुकायका लागतील आणि त्यांना जरा भक्कम आधाराची गरज लागेल. कुंडीतच एक काठी पुरून मग त्याला झाडाचे मुख्य खोड हलक्या दोरीने बांधायचे. दोरीऐवजी वायर टॅग्ज अधिक चांगले किंवा दुकानात टोमॅटो केजेसही मिळतात. दुसरे असे की टोमॅटोच्या झाडाला मुख्य खोड आणि फांद्यामधून येणार्या अधिकच्या फांद्या खुडल्या तर झाडाची वाढ फळ देणार्या फांद्यांवर केंद्रित होते. इथे चांगली माहिती आहे.

टोमॅटो केज असे दिसतात,
टोमॅटो केज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप धन्यवाद रुची.
तशी खोडाला एक काठी पण लावली आहे आधारासाठी. वरच्या फोटोत अशी एक नागमोडी काठी दिसत असेल खोडाच्या डावीकडे . अगदी खाली लाल दोरी बांधलेय काठी न खोड ह्यांना धरून.

पण ते सकर्स काढायच्या माहिती आणि दुव्यासाठी थांकू. आज काढले सगळे सकर्स, बरेच होते. त्यापैकी जे मोठे होते ते अशाच कुंडीत खोचून दिलेत , रुजतील का ?
smores मधले marshmallow भाजण्यासाठी वापरलेल्या काड्या बरयाच उरल्या आहेत त्यांच्या पासून काही diy केज बनवता येतंय का बघते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

माझ्याकडे चारापैकी एक रुजला होता. तुला किती यश मिळतंय ते कळव. यूट्यूबवर कोणत्याशा व्हीडीओत एका माणसाने ही पद्धत कलम करण्यासाठी दाखवली होती. तुझ्या अर्ली गर्ल टोमॅटोचं मोगऱ्यासारखं कलम करता आलं तर सीझन संपता संपता प्रयत्न करून पहा. त्याला अजून निदान तीन-चार महिने आहेत. माझ्याकडच्या अर्ली गर्लने गेल्यावर्षी स्वतःच असं कलम केलं.

मोगऱ्यासारखं कलम म्हणजे माहीत नसल्यास - बऱ्यापैकी वाढलेली, पण वाकवता येईल अशी कोवळी फांदी बघायची. ती न मोडता वाकवून फांदीचं टोक किंवा टोकाजवळचा भाग जमिनीत पुरायचा. तसा राहिला तर ठीक, नाहीतर जरा वजन ठेवायचं. काही दिवसांनी फांद्यामधून नवीन मुळं फुटतात. मग मूळ झाडापासून फांदी तोडून अलग करायची. हे नवीन कलम बनतं. लहानपणी हे शाळेत शिकल्यावर घरच्या मोगऱ्यावर बरेच प्रयोग केले होते. टोमॅटोने स्वतःच प्रात्यक्षिकातून हे शिकवलं. (ह्या अशा, गंमतीशीर गोष्टी दिसतात त्यामुळे बागकाम करायला मजा येते. आता रुचीच्या पद्धतीने टोमॅटोच्या बियाही वाढवून बघितल्या पाहिजेत.)

वांग्याच्या पानांबद्दल अभिनंदन. मला आत्ताच नव्या पेरलेल्या भेंडीच्या बियांना दोन फुटवे आलेले दिसत आहेत.

मी marshmallow चा काड्या मुद्दाम घेऊन आल्ये. त्याची ग्रिड बनवून थंडीच्या मोसमात मटारला आधार द्यायचा विचार आहे. टोमॅटोचा पिंजरा मटारला पुरत नाही. अधिक 'दाट' आधार, पण कमी वजन घेणारा असेल तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थंड प्रदेशात हे गोगलगायींचे शंख नसतील पण इकडे असतात मातीत.एक मेली तरी शंभर अंडी पोटात( शंखात) ठेवून मरते.डोळ्यांना दिसणारी अतिशय बारीक अंडी ओलावा मिळताच फुगतात आणि गोगलगायींची फौज जमिनीतले सर्व मुळांचे शें मुळांचे शेंडे खाते.बी उगवत नाही.मोठ्यातमोठी गोगलगाय तांदुळाऐवढी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांवर उपाय नाही.अधूनमधून मातीवर लक्ष ठेवणे.नर्सरीतून आणलेल्या रोपाच्या मातीतूनही अंडी येतात.ती माती फेकून फक्त रोप घ्यायचे मुळे धुऊन.फ्युरान ,कॅलोमेल ही रासायनिक किटकनाशके कोणी सुचवली तरी अजिबात वापरू नये.तुमच्या पाण्याच्या जागी पोहोचतात आणि मासे मरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप दिवसांनी बागकामाच्या धाग्यावर पुन्हा हजर! यंदा आमच्या घरमालकिणीने वेली चढवण्याबद्दल खूपच चिडचिड केल्यामुळे आमचे उन्हाळ्याचे बागकाम ठप आहे. एकच "बॉर्बोटी" (चवळीसारखी) शेंगाची वेल आहे.
borboti

गेल्या वर्षी लावलेली वांगी अजून जोरात आहेतः
vangi

पपईला फुलं फुटताहेत. फळ धरतंय की नाही पहायचे आहे:
papaya

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुलाचा रंग कसला मस्त आहे ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझीच आठवण येत होती या धाग्यावर.

वांगी बघून जळजळ झाली आणि भूकही लागली. पपई कुंडीत लावल्येस का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वच फोटो नेहमीप्रमाणे सुंदर आहेत.
फोटोत पपईचे फीमेल झाड आहे. मेल झाडही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पपईत मेलफीमेल कसं ओळखायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

झाडावर फुलं असतील आलेली तर सोपं आहे ओळखणं. फीमेल फुलं फोटोत आहेत तशी खोडालगत एक-एक असतात. मेल फुलं दांड्यांवर गुच्छाने येतात आणि झुंबरासारखी लोंबतात. फुलं/कळ्या नसताना काय खूण असते झाडावर मेल फीमेल ओळखण्यासाठी याची कल्पना नाही. बियाही सगळ्या सारख्याच दिसतात त्यामुळे बहुदा त्यावरूनही अवघड असावं किंवा शक्य नसावं (जर मेल की फीमेल हे नंतर वाढ होतनाच कधीतरी ठरत असल्यास).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. इतःपर घरी जाईन तेव्हा चेकवीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही! हे एकच आहे. तेही आपोआप आलेलं आहे, बहुतेक खाताना पोरांनी बी फेकली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अर्ली गर्ल' टोमॅटोला वेगवेगळ्या आकाराची आणि वयाची एकंदर १९ फळं (एकसमयावच्छेदेकरून) धरलेली आहेत. त्यांतले तीन टोमॅटो पूर्ण आकाराचे वाढलेले (घोडे) आहेत. ते पिकेस्तोवर झाडावर ठेवू का काढून घेऊ? झाडावर पिकवलेले बरे असतात असं वाटतंय म्हणून काढवत नाहीत, काढले तर घरातही पिकतील आणि नवीन फळं चटचट धरतील, अशी द्विधा झाल्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिकेस्तोवर झाडावर ठेवलेस तर बरे, पाडाला लागले असतील तर घरातही पिकतील पण एवढी घाई कशाला? घरच्या झाडांचे सुख झाडावरून उतरवलेले फळ लगेच खाण्यात असते, मग राहू देत की पिकेस्तोवर झाडावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या करें, कंट्रोल नहीं होता.

पिकायला आलेल्या फळांच्या शेजारी ठेवून टोमॅटो लवकर पिकतील आणि मग घरचे टोमॅटो खाल्ले याचं आत्मिक समाधान मिळेल ... असो. असो. ठेवते सगळे झाडावरच. तसंही पक्षी किंवा खारींचा उपद्रव अजूनही होत नाहीये.

---

काल रात्री जोरदार वारा सुटला होता; त्यात टोमॅटोची ही कुंडी आडवी झाली आणि एक मोठा वाढलेला टोमॅटो खाली आला. कुंडीतली दोन्ही झाडं व्यवस्थित दिसत आहेत. काल संध्याकाळीच या झाडाला २० टोमॅटो लागल्याचे मोजले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कंपोस्ट बद्दल माहिती हवी आहे

फक्त भाज्यांची देठे ,फळांच्या साली ,चहाचा चोथा आणि माती असं टाकून खत बनेल का ? गांडूळ लागतातच का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पाहा. उपयुक्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद मेघना .. पण remix पावडर आहे यात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रीमिक्स लागतेच असं नाही. ज्यांना सुकी पानं सहज गोळा करता येत नाहीत त्यांच्या साठी ती पावडर उपयुक्त आहे. नाहीतर ओला कचरा आणि सुकी पानं, पुठ्ठा, वगैरेंचे मिश्रण योग्य प्रमाणात असले, आणि नियमितपणे ढवळले, तर दीड-दोन महिन्यात सहज खत तयार होते. (कोरड्या हवेत १:१, दमट हवेत १:२-३).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद रोचना ..करून बघते आणि कळवते ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वर्षी पुन्हा नव्या दमाने मिरची पेरत आहे. यंदा तरी किमान दोनचार मिरच्या तरी येऊ द्येत रे म्हाराजा!

बादवे, रोपं आली की त्यांना उन किती लागते? सावलीत ठेवावीत किंवा कसं? आणि खतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वादळामुळे झाडावरून खाली आलेल्या टोमॅटोच्या आत्म्याला अंड्याच्या आत्म्यासकट मुक्ती दिली गेली. कच्चा टोमॅटो चांगला लागला.

आमलेट ऑमलेट

गेल्या वर्षीच्या वाचलेल्या मिरचीला धरलेल्या मिरच्या चांगल्याच मोठ्या होत आहेत. झाडासोबत आलेला कच्चा चेरी टोमॅटो एकतरी का होईना, पिकायला सुरुवात झाली. आज रात्री कोशिंबीर पार्टी.

मिरची भोपळी ढब्बू चेरी टोमॅटो

ऋ, मिरचीला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो. माझ्याकडे एकाच कुंडीत टोमॅटो आणि मिरची आहेत. सध्या साधारण २० टोमॅटो, ८-१० टोमॅटोची फुलं, ५ मिरच्या आणि ४-५ मिरचीची फुलं दिसत आहेत. ह्या कुंडीत मी साधारण ओंजळभर सेंद्रिय पोटॅसियम आणि तीन ओंजळी कंपोस्ट घातलं होतं. ही कुंडी दिवसभर (साधारण ८-४) उन्हात असते. सगळी फळं तुकतुकीत दिसत आहेत. पानांवरही पिवळा रंग वगैरे काही नाही.

मध्ये स्ट्रॉबेरीची पानं थोडी पिवळी दिसायला लागली होती; त्यातही ओंजळभर कंपोस्ट घातलं. पिवळी पानं गळली आणि ताजी, तुकतुकीत हिरवी पानं आली. पण आता स्ट्रॉबेऱ्या कमी झाल्यात. तेवढ्यापुरती ऊर्जा जीव वाचवण्याकडे गेली त्यामुळे फळं धरली नसणार. आता पुन्हा फळं धरायला लागली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अल् निन्योच्या प्रतापामुळे महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना आमच्या प्रांतात मात्र यावर्षी वसंताचे आगमन फारच लवकर झाले आहे. एरवी मेच्या दुसर्या आठवड्यापर्यंत मोठ्या झाडांना पानेही आलेली नसतात पण यावर्षीमात्र वेळापत्रक एक महिना अलिकडे सरकलेले दिसते आहे. बर्फ नाही आणि पाऊसही नाही म्हणजे नंतर दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्भवणार आहेच पण सध्या मात्र वंसताच्या लवकर आगमनाने चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या आहेत. मोठ्या झाडांना पाने आली आहेत, पेरिनियल्स जमीनीतून डोके वर उचलत आहेत, फळझाडांना फुले आली आहेत आणि इकडेतिकडे भुंगे, फुलपाखरे बागडताना पाहून समाधान वाटतेय. अजूनही रात्रीचे किमान तापमान दोन-चार डिग्रीं. सेल्सियसवरच असते आणि एखाद्या सकाळी हलके फ्रॉस्टही दिसते पण तरी कमाल तापमान पंधरा-वीस डीग्री सेल्सियस असल्याने झाडे अधीरपणे आणि आशावादीपणे भराभर वाढताहेत. बादत्या तापमानाचा फायदा घेऊन या वीकान्ताला घरासमोर एक मोठा प्लँटर बांधला, त्यात माती भरली, इतर प्लॅंटरमधे कॉम्पोस्टची भर घातली आणि आता काही बिया थेट जमीनीत पेरायला बाग सज्ज आहे. केल, पालक, बीट, गाजरे, चार्ड, मटार इत्यादी भाज्या फ्रॉस्टहार्डी असल्याने इतक्यातच जमीनीत पेरता याव्यात, अर्थात नंतर हवामान फिरले तर हृदयभंगाची तयारी ठेऊनच! महिनाभरापूर्वी घरात लावलेल्या टोमॅटोची रोपे पाच-दहा इंचाची झाली आहेत. इतरही काही रोपे घरातच सुरू केली आहेत आणि काही पुढल्या काही दिवसांत करणार आहे पण मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार वांगी-टोमॅटो वगळता इतर रोपे फार आधी सुरू करून उपयोग नसतो कारण जूनशिवाय बरीचशी रोपे बाहेर लावताच येत नाहीत.

बागेत कामे खूप आहेत आणि वीकान्ताला अंग मोडून पाच-सहा तास काम करावे लागते पण ती कामे करणे हे फारच आनंददायी प्रकरण आहे. काल असंच दिवसभर काम केल्यावर आमच्या कम्युनिटी गार्डनमधलं हे बहरलेलं पेयरचं झाड पाहिलं आणि थकवा कुठल्या कुठे पळून गेला.

IMG_0088

आमच्या परसात दोन भले थोरले वृक्ष आहेत, एक विपिंग विलो आणि दुसरा स्प्रूस. या विपिंग विलोवर लावलेल्या बर्ड हाऊसमधे दरवर्षी काही 'चिकडी' संसार मांडतात. गेल्या काही दिवसांत काही उच्छुक भाडेकरू घर पहायला येताना दिसताहेत. त्यातला पुरुष, मादीचे या घरट्याकडे लक्ष वेधून "आती क्या खंडाला?" गुणगुणताना दिसला की मोठी मौज वाटते. खालचा फोटो मागच्या वर्षीचा आहे कारण यावर्षी विलोला अजून इतकी भरभरून पाने आलेली नाहीत पण एका आठवड्यांत दृष्य असेच दिसेल.

051

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यातला पुरुष, मादीचे या घरट्याकडे लक्ष वेधून "आती क्या खंडाला?" गुणगुणताना दिसला की मोठी मौज वाटते.

सॉलिड्ड!! Smile
कालच आमच्या गॅलरीत एक रानचिमणी येऊन देखरेख करुन गेली. आम्ही आता बर्ड हाऊस सदृष थाळीत मूगाची डाळ व रवा ठेवायला सुरुवात केलेली आहे. रॉबिन्स्च्या जोड्या दिसू लागल्या आहेत. भलतेच धिटुकले आणि चौकस असतात हे रॉबिन स्पेशली नर.
थंड झुळूक जरा सुसह्य होऊ लागली आहे. कालच उन्हाळ्याचे कपडे काढले व हिवाळ्याचे बंद करुन टाकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाग उपडेट्स छान.

'चिकडी' म्हण़़जे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://images.fineartamerica.com/images-medium-large-5/3-chickadees-on-a-snowy-day-peg-runyan.jpg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Awww .ते किती cute आहेत ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय चिकाडी येडी दिसते. आमच्याकडे बर्फाच्या दिवसात पाहील्या आहेत. एकदम टुण्टुण उड्या मारणारा व स्वच्छंद पक्षी आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा, काय गोंडस आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे इवलेसे चिकडी पक्षी बर्याच वेगवेगळ्या रंगांचे असतात आणि त्यांचं डोकं त्यांच्या शरीराच्या मानाने बरंच मोठं असतं. त्यांना चिकडी हे नाव त्यांच्या हाकेमुळे मि़ळालेलं आहे, "चीSSकडीSS...चीSSकडीSS" अशा हाका मारून गप्पा हाकणारे हे पक्षी बागेत छान जान आणतात पण अनेकदा पहाटे-पहाटे त्यांची प्रणयाराधनं सुरु झाली की झोपेचं पार खोबरं होतं. खालच्या चित्रफीतीत त्यांचे अनेक बोल साठविलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आवाज आहेत चिकडीचे. पक्ष्यांचे आवाज आपल्या स्वरांमध्ये भाषांतरित केले की वेगळेच वाटतात.
"वेगवेगळ्या रंगांचे असतात" म्हणजे पक्ष्या-पक्ष्यात रंग/रंगांचे पॅटर्न वेगळे असतात का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्ष्यांचे आवाज आपल्या स्वरांमध्ये भाषांतरित केले की वेगळेच वाटतात

म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL हाहाहा
अगं चिव चिव असा शब्द वेगळा असतो अन आवाज वेगळा असतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खंडाला मस्तच.टोमॅटोची मुक्ती आवडली.चानचान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन वर्षांपूर्वी ही कोरफड आणली होती, तेव्हा छोट्या कुंडीत होती आणि तिला १०-१२ पानं होती. गेल्या वर्षी ही या, थोड्या मोठ्या कुंडीत लावली; जूनपासून दिवसातून ३ तासतरी कडक ऊन मिळतंय. तर ही बया राक्षसी वाढली आहे. मुळाशी दोन नवे फुटवे आले आहेत. शनिवार-रविवारमध्ये ते सुट्टे करून शेजारच्या मैत्रिणीला देणार आहे. तिच्याकडची कोरफड दोन वर्षांपूर्वी अतिथंडीने मेली म्हणून तिला नवीन हवीच होती. मला एवढी कोरफड ठेवून काही फायदा नाही. केस फार भुरभुरीत झाले की मी केसांना कोरफडीचा गर लावते, केस मऊ होतात, पण चिकट, तेलकट होत नाहीत. मुख्य म्हणजे वाऱ्यावर नको त्या दिशांना पळायचा प्रयत्न करत नाहीत. पण त्यासाठी मी बाजारातूनच जेल आणते. घरची कोरफड फक्त हौसेखातर.

कोरफड

अॅस्टरच्या बिया उगवून आल्या आहेत. काही बाहेर लावल्या आहेत, काही कुंडीत. किती आणि कशा वाढतात ते बघायचं. दारात चिकार फुलं फुलली तर फुलपाखरं येतील आणि आमच्या भुरट्या मांजरीची करमणूक होईल असा विचार आहे. त्यामुळे आता फुलझाडं वाढवण्यावरही भर देत्ये. शेजाऱ्याच्या आवारात प्रायव्हसीसाठी अशोकाच्या आकाराची, पण निराळीच झाडं आहेत. त्यांच्या पायाशी गवत फार वाढलेलं नाही. तिथे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सगळा वेळ ऊन येतं. त्याचं लक्ष नसताना जरा वाढलेली फुलझाडं तिथे लावून द्यायचा माझा चोरटा बेत आहे. (शेजाऱ्याला मराठी समजत नाही; त्यामुळे तो ऐसीवर आला तरी हरकत नाही.)

रुचीचा फोटो बघून आठवलं, आमचं बर्डफीडही भरायला झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मध्ये १ महिना बागेकडे दुर्लक्ष झालं परिणाम : पुदिन्यावरचा पावडर चा रोग टोमाटोवर पण पडला आणि फांद्यांमागून फांद्या पिवळ्या , निस्तेज होवून मरु लागल्या . अर्ली गर्ल ची फळं पिकायला वेळ लागतो म्हणून मी जर निर्धास्त होते पण ह्या रोगामुळे कदाचित फळं पण पिकेनात . मग एके रविवारी खडबडून जागी झाले आणि नवऱ्याला होम डीपो मध्ये पिटाळला . यथावकाश (म्हणजे त्याच दिवशी ) मिराकल ग्रो च्या कीडनाशकाची फवारणी झाली . ह्या घटनेला १० दिवस होवून गेलेत आणि रोग बर्यापैकी आटोक्यात आलाय . माझ्या झाडाचा पहिला टोमाटो पिकला !

हे सर्व चालू असताना काकडीचा वेल मस्त मजेत वाढत होता . पिवळी फुलं आणि त्यांच्या मागेच मिरची च्या आकाराच्या काकड्या होत्या . त्यापैकी २ काकड्या बर्यापैकी मोठ्या झाल्यात पण अजून त्यावर बारीक काटे आहेत , म्हणून काटे जाण्याची वाट बघतोय . विसेक तरी काकड्या आहेत झाडाला.

अजून २० मिनिटं झोप नाही आली तर हे फोटो अपलोड करायचा विचार करेन नाहीतर उद्या किंवा परवा !

वांगं आणि मिरच्या मंदगतीने वाढतायत .
रुचीने अन अदितीने सांगितल्याप्रमाणे टोमाटोच्या मेन झाडाचे सकर्स काढून कुंड्यात पेरले होते त्यापैकी एक जगला आणि वाढतोय . नुकतंच त्याला त्याच्या स्वतंत्र कुंडीत हलवलय .

सध्या मी कंपोस्ट ची एक वेगळी पद्धत सुरु केलीये त्याबद्दल पण नंतर लिहिते .

फोटो:
पहिला टोमटो:
tm

काकडीच फूलः
kf

काकाड्या:
k

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

कोरफडीचा महिनाभर जुना फोटो बघून आठवलं. कोरफडीला नऊ पोरं झाली. ती सगळी शेजाऱ्यापाजाऱ्यांत वाटून टाकली. दोन शेजारी विन्मुख परतले म्हणून कोरफडीला पुन्हा उन्हातच ठेवून दिल्ये. (मांजरीचं पोरं काढणं सर्जिकली बंद केलं पण कोरफडीचं सुरू ठेवलंय.)

अर्ली गर्लची फळं रवाळ आहेत. सूप वगैरे करायला चांगली. (गेल्या वर्षीची पोत आणि चव कशी होती ते विसरलेच होते.) सध्या दोन लाल टोमॅटो झाडावर आहेत; खायला वेळ लागेल म्हणून तिथेच ठेवल्येत. बियांपासून पेरलेल्या टोमॅटोंना फळं धरली आहेत. अजून ३-४ आठवड्यांत बहुतेक खाण्यायोग्य होतील.

एक वांगं धरल्यासारखं वाटतंय. परागीभवनासाठी कष्ट केले; बरीच फुलं गळून झाली. घरच्या मिरच्याही येत आहेत. त्यांचा खाण्यालायक भाग मांसल नसून फारच नाजूक आणि पातळ आहे. म्हणून फारतर तेलात परतून किंवा कच्चाच खाऊन टाकते. चेरी टमेटो आठवड्याला दोन या गतीने मिळायला लागल्येत.

भेंडी जमिनीत आणि कुंड्यांत लावल्ये. कधी वाढत्ये आणि कधी खायला मिळत्ये बघू, भेंडी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक वांगं धरल्यासारखं वाटतंय. परागीभवनासाठी कष्ट केले

तू ते ब्रशने का काय परागीभवन मॅन्युअली करत होतीस ना Smile प्रचंड चिकाटी ब्वॉ. त्या वांग्यालाच संतती वाढविण्याचे कष्ट नकोयत तर तू कशाला भरीस पाडत होतीस? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वांग्यालाच संतती वाढविण्याचे कष्ट नकोयत तर तू कशाला भरीस पाडत होतीस?

वैराग्य म्हणजे काही थोर आहे असं मी मानत नाही. म्हणून वैरागी लोकांच्या आत्म्याचं काहीही झालं तरी चालेल, पण शारीरिक गरजा निर्माण करून, त्यांना चावटपणा करायला भरीस पाडायचं, म्हणजे आपला चावटपणा नॉर्मल समजला जातो. शिवाय लोकांची पोरं कापून खायला मला आवडतात ना!

ब्रशने परागीभवन करत होते. त्यामुळे पोर धरलं का नाही, माहीत नाही. किमान मी अंधश्रद्धेने व्रत सुरू ठेवेन. त्यासाठी चिकाटी वगैरे काही नाही. सध्या पाऊस पडत नाहीये आणि ऊन तापायला सुरुवात झाल्ये. त्यामुळे पाणी घालायला रोज जावंच लागतं; मग मध्येच कुंचला फिरवून येते. चित्रं काढायला जमणार नाहीत तर किमान हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण शारीरिक गरजा निर्माण करून, त्यांना चावटपणा करायला भरीस पाडायचं, म्हणजे आपला चावटपणा नॉर्मल समजला जातो.

ए काय हे! अव्वा ऐसीवर असं बोललेलं (व्यनिव्यतिरिक्त बर्का!) चालतं ? Wink शी! बाई मला नाही आवडत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगं, आपण बायकांनी बोललेलं चालतं. पुरुष माणसं आहेतच मग नंतर रीतभात सांभाळायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL खरय पुरुषांनी मर्यादेचं उल्लंघन करणं म्हणजे बलात्कारी स्त्रियांना निमंत्रणच की. पुरुषजातीनं कसं चारचौघात सांभाळून. शालीन रहावं.
___
सॉरी बागेत तण माजायला नको. खफवर चर्चा करु. तू सांगायच्या आधीच मी समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्याचेही असे ब्रशाने परागीभवन की काय ते नि मॅन्युअली की काय ते करता आल्यास बहार यावी, अशी एक रम्य कल्पना तूर्तास मन:पटलावर तरळत आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्याचसाठी वापरल्या जाणार्‍या ब्रशाला (की मच्छरदाणीला? Wink )टेस्ट ट्युब म्हणतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्याने शारीरिक गरजा निर्माण कशा काय होतील ब्वॉ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टर्की बेस्टर पद्धत ऐकली नाहीत काय कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रशमुळे काही भावना उत्पन्न होतील तशा ह्या पद्धतीत निर्माण होतील काय, याबद्दल शंका आहे.

असो. वांग्याच्या झाडाला एक वांगं धरल्यासारखं दिसतंय, त्यांची तब्येत बरी दिसत्ये. एका एक मिमीच्या पोराने मान टाकली. आणखी सेंद्रीय खत घालून पाहते, काही फरक पडला तर पडला. फुलंही चिक्कार गळत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉरी बागेत तण माजायला नको. खफवर चर्चा करु.
फारच विचारीपणा.आणि अगोदरची "शारीरिक गरजा निर्माण ---" खफवरती असतं तर दोन दिवस धुडगुस झाला असता.

मिरचांपेक्षा आलं लसुण लावणं उपयुक्त आहे.रोगबिग नाही आणि मरत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रशने परागीभवन करायचं जमतंय तर वांगी टोमॅटो मिरची यांची यांची तीनतीन रोपं एका मच्छरदाणीत लावून पाहा.. बरेच रोग आटोक्यात राहातात.उजेड कमी झाला तरच बुरशी वाढते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!