आंदोलक आणि भविष्य

बिपिन कार्यकर्ते यांच्या वांग-मराठवाडी धरणासंबंधीच्या लेखावरून मनात उठलेले फ़ुटकळ विचार.
------------------------------------------------------
या लेखाखालचा डिसक्लेमर जरूर पहावा.

अशा आंदोलनाची माहिती वाचताना नेहमी आंदोलकांची बाजू न्याय्य वाटते. (बहुतेक वेळा असतेच).

आंदोलक कसे उत्साहात आहेत आणि त्यांचा धीर कसा खचलेला नाही, किंवा आंदोलन करणार्‍यांना स्थानिक लोक कसे मदत करत आहेत, हे त्या आंदोलनाला मदत करणारे समाज सेवक नेहमी बाहेरच्यांना ठसवून देतात. जसे या लेखात नागपंचमीचा सण साजरा करणे वगैरे दाखवले आहे. तसेच हे नेते त्या प्रकल्पग्रस्तांना "कसे पुनर्वसन करत नाही तेच पाहू आपण !!! तुम्ही धीर सोडू नका म्हणजे झाले", असे सांगून त्यांचा निर्धार टिकवत असतात.

अशा प्रकारच्या उत्साहाचे वर्णन करून आणि त्याची प्रसिद्धी करून या एनजीओ त्या आंदोलकांसाठी फ़ायद्याच्या तडजोडीची शक्यता कदाचित धूसर करतात असे वाटते. ही वर्णने वाचून लोक भेटी द्यायला येतात. बाहेरून काही आर्थिक मदत मिळवतात. तेव्हा ते लढण्याचे पोश्चर टिकवून धरावे लागते. They are obliged - Forced to carry on struggle. ही मदत भरपूर असेल तर ठीक आहे. नसेल तर कुचंबणा होईल.

समजा आंदोलन यशस्वी झाले आणि त्यांचे पुनर्वसन झाले, मोबदला मिळाला तर तो मिळणारा मोबदला किती दिवस पुरणार आहे? कदाचित खूप काळ लढा दिल्यावर काही अपुरा मोबदला हाती पडू शकेल. त्या साठी आयुष्याची काही वर्षे वाया घालवणे व्यवहार्य आहे का?

दुसर्‍या बाजूस असे वर्षानुवर्षे चालणारे आंदोलन यशस्वी झाले नाही तर ? प्रकल्पग्रस्तांच्या हाती काय पडणार? प्रत्येक आंदोलन यशस्वी होतेच असे नाही. आंदोलनाला सहानुभूती असली तरी त्या प्रकल्पग्रस्तांखेरीज इतर लोकांचा सक्रिय पाठिंबा सातत्याने मिळत नाही. बाह्य लोक आणि मीडिया नव्या विषयाच्य मागे निघून जातात. शिवाय मीडिया आणि जनता केवळ न्याय अन्यायाच्या भूमिकेतून पाठिंबा देतात असे नाही. "What is in it for them" यावर त्यांच्या पाठिंब्याची शक्यता आणि इंटेन्सिटी ठरते. एकदा बाह्य लोकांचा उत्साह संपला की सरकारी यंत्रणा हळूहळू दडपशाही करून आंदोलन मोडून काढू शकतात. किंवा समांतर न्यायालयीन लढाईत न्यायालय हस्तक्षेपास नकार देऊ शकते.

आंदोलन कदाचित यशस्वी होणारही नाही अशी शक्यता आंदोलक किंवा पाठिंबा देणार्‍या एन जी ओ लक्षात घेतात का? अशा परिस्थितीत काय करावे याचा प्लॅन "बी" किंवा प्लॅन "सी" बनवण्याबाबत काही सल्ला पाठिंबा देणार्‍या एनजीओ देतात का? इथे पुन्हा प्रकल्प ग्रस्तांचा आणि आंदोलकांचा इंटरेस्ट एकच नसण्याचीही शक्यता असते. उदाहरणार्थ एखादी एनजीओ राजकीय हेतूंनी प्रेरित असेल तर त्यांचा प्लॅन बी आणि सी हा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने नसून त्या राजकीय हेतूच्या पूर्तीच्या दिशेने असू शकतो. [गुजरात दंगलग्रस्तांना न्याय मिळण्यापेक्षा मोदींना अडचणीत आणणे हा हेतू असू शकतो]. कुणाचा हेतू ब्लॅकमेलिंग करून पैसा कमावणे हा असू शकतो. तो साध्य झाला की नेते आणि सहानुभूतीदार प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडू शकतात. ती शक्यता प्रकल्पग्रस्त मनात घेतात का? की अंधविश्वास असतो?

या सर्व शक्यता प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू करताना किंवा सातत्याने विचारात घेतल्या पाहिजेत. "शेवटपर्यंत लढू, प्राण गेले तरी बेहत्तर" हा स्टॅण्ड जाहीरपणे घ्यायला हरकत नाही. पण प्रत्यक्षात प्राण देण्याची तयारी ठेवण्याऐवजी आपल्या आयुष्याची काही सोय करण्याची तयारी करून ठेवायला पाहिजे. निदान मुलांना शिक्षण देणे वगैरे सोयी करून ठेवायला हव्यात.

या विचारांचे कारण अर्थातच अयशस्वी लढ्याची पाहिलेली उदाहरणे आहेत. गिरणी संप हे एक मोठे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. नर्मदा आंदोलनाचे उदाहरण आहे. बिपिन कार्यकर्ते यांच्या लेखात "विकल्या गेलेल्या" स्थानिक नेत्याचा उल्लेख आहे. काही परिचितांची उदाहरणे पाहिली आहेत जिथे नोकरीच्या ठिकाणी युनियन न्याय मिळवून देईल अशा आशेने उदरनिर्वाहाचे पर्याय वेळीच शोधले गेले नाहीत.

ऐसीच्या सुजाण वाचकांना काय वाटते यावर चर्चा घडवण्याचा हेतू आहे.

डिसक्लेमर: या विचारांतून धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊ नये, त्यांना योग्य मोबदला मिळू नये किंवा त्यांनी आंदोलन करू नये असे काही दूरान्वयानेही सुचवायचा मुळीच हेतू नाही. किंवा अन्याय होत नसतो असेही सुचवण्याचा हेतू नाही. किंबहुना हा लेख बिपिन कार्यकर्त्यांच्या लेखाशी संबंधित नाही किंवा सध्या त्या धरणग्रस्तांच्या बाजूने लढणार्‍या एनजीओविषयी शंका घेण्यासाठी नाही. केवळ प्रकल्पग्रस्तांनी आपले आयुष्य पणाला लावताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या जेन्युइन सामाजिक संघटनांनी त्यांचे असे काउन्सेलिंग करायला हवे हे सांगण्याचाच हेतू आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (8 votes)

>>अशा प्रकारच्या उत्साहाचे वर्णन करून आणि त्याची प्रसिद्धी करून या एनजीओ त्या आंदोलकांसाठी फ़ायद्याच्या तडजोडीची शक्यता कदाचित धूसर करतात असे वाटते.<<

कोणत्याही आंदोलनाला ग्रस्त लोक सोडून इतरांचा पाठिंबा हवा असतो. अगदी गांधीजींच्या आंदोलनांतदेखील हा भाग होता. आंदोलनाला प्रसिद्धी मिळण्यासाठी अशा गोष्टी करणं अपरिहार्य आहे असं मग त्यामुळे वाटतं. खरी अडचण कुठे येते, तर वाटाघाटी करून, फायद्याची तडजोड करून आंदोलनाची यशस्वी सांगता करता येते आहे, अशी शक्यता दृष्टिपथात असतानाही आंदोलकांच्या नेतृत्वानं जर ती तडजोड स्वीकारली नाही तर. असे निर्णय घेताना नेतृत्व जर 'आंदोलन संपलं तर ग्रस्त लोकांचा प्रश्न संपेल, पण आपलं पुढे काय होणार' असा स्वार्थी विचार करू लागलं तर असा धोका संभवतो. किंवा फायद्याची तडजोड आवाक्यात आहे हे ओळखता येण्याएवढी समजच नसेल तरीही असा धोका संभवतो. पण या बाबी ग्रस्त लोकांना दरवेळी दिसतीलच असं नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती काहीशी 'इकडे आड तिकडे विहीर' अशी होऊ शकते याच्याशी सहमत आहे.

जाताजाता: नेतृत्वाला फायद्याच्या तडजोडीची समज नसण्याचं ताजं (पण प्रकल्पग्रस्तांविषयी नसलेलं) उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जींचा आधी प्रणव मुखर्जींना असलेला विरोध, आणि मग बंगाली जनतेचा त्यामुळे आपण रोष पत्करतो आहोत की काय, असं वाटल्यामुळे मारलेली कोलांटउडी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अतिशय योग्य प्रश्न आहेत. अशा आंदोलनांचा स्टॅटिस्टिकल (संख्याशास्त्रीय?) अभ्यास कोण करते का? आंदोलन कशाबद्दल आहे तो प्रश्न, किती लोक सामील आहेत, पुनर्वसन झाले का, राजकीय पक्षांची भूमिका काय होती ई ई. त्यावरून आंदोलकांना काही "डूज अ‍ॅण्ड डोण्ट्स" मिळाले तरी फायदा होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धरणग्रस्तांना सरकारने दिलेली ऑफर व त्यांच्या आजच्या मागण्या काय हेही (नक्की गाडे कुठे अडकले आहे) कळावे.
ह्या निमित्ताने पुनर्वसन, योग्य मोबदला म्हणजे नेमके काय यावरही खल व्हावा.
पुनर्वसन/मोबदला म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्यभराची जबाबदारी का?

प्रकल्पग्रस्त/ विस्थापितांना होणार्‍या त्रासाबद्दल नक्कीच वाईट वाटते, त्यांना रास्त मोबदला मिळावा हेही पटते पण एकीकडे सरकार म्हणजे आपण जनताच, आपल्याला प्रकल्प रखडण्यामुळे वाढणारा खर्च, तसेच पाणी/वीजेचा तुटवडा व न होणारा विकास/ ते नुकसान हेही बघायला हवेच. एक दिवस भारताचा ग्रीस झाला की सगळेच ग्रस्त होणार.

बाकी कोणी जाणकार लवासाबद्दल माहीती देउ शकेल काय? म्हणजे लवासाच्या आत नव्हे तर आजुबाजुला वस्ती व व्यवसाय वाढत आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्याही समस्येचे मुख्यत्वे दोन प्रकारचे परिणाम असतात – तात्कालिक आणि दूरगामी. धरण बांधल्याने किंवा अणुउर्जा प्रकल्प आल्याने काही लोकांचे लगेच नुकसान होणार असते तर काहींचे नंतर. आंदोलन घडत असताना या दुस-या प्रकारचे लोक स्वाभाविकपणे कुंपणावर असतात. या ‘बघ्या’ लोकांना सामावून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात काही हरकत नसावी. पण केवळ असे बाहेरचे लोक ‘बघायला’ येतात म्हणून कोणी जीवानिशी त्या आंदोलनात सामील होत असतील असे वाटत नाही. जे ज्या क्षणी त्यात सामील होतात; त्या क्षणापुरता त्यांचा सहभाग मनापासून असतो असे मानायला वाव आहे.

बाहेरून जाऊन आपण पाठिंबा का देतो? आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न त्या प्रभावित गटाच्या बाहेरचे लोक करत असतात; पण म्हणजे आम्ही सगळे काही त्यात (बरेचदा तो अन्याय असतो) सामील नाही हे सांगण्याची गरज त्या प्रभावित गटाच्या बाहेरच्या लोकांना वाटते. अनेकदा हे लोक सध्या ‘बाहेर’ असले तरी कधीतरी त्यातून गेलेले असतात किंवा आज आपण ‘सुपात’ आहोत पण काही नाही केले तर ‘जात्यात’ आपण भरडले जाऊ याची त्यांना जाणीव असते. आणि म्हणून ते ‘बघायला’ जातात, धीर द्यायला जातात, पाठिंबा द्यायला जातात. काही उगाच मिरवायला जात असतीलही, पण सगळे काही तसेच नसतात आणि ते काही दीर्घकाळ जात नाहीत.

कोणतेही आंदोलन एका सरळ रेषेत चालत नाही. परिस्थिती बदलते, प्रतिसाद बदलतात, धोरणं बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात.. हे सतत बदलत जाणा-या परिस्थितीचं भान ठेवून आंदोलन चालवावं लागतं. अनेकदा अतिशय निराशाजनक परिस्थितीत आणि दहशतीचा सामना करत आंदोलन चालवावं लागत. सामंजस्याने मार्ग निघण्याचा रस्ता बंद होतो तेव्हाच लोक साधारणपणे रस्त्यावर उतरतात – अगदी राजकीय आंदोलनातही हेच घडते. बहुतेकवेळा आंदोलनात पुढाकार घेणा-या नेतृत्वाला/ संघटनेला/ लोकांना किती ताणायचं याची जाणीव असते असे दिसून येते. बरीच आंदोलनं फसतात ती लोकांनी भाबडेपणाने सरकारवर, उद्योगसंस्थेवर, नेत्यांवर विश्वास ठेवल्याने आणि विश्वासघात झाल्याने. कधीकधी आंदोलनाचे नेतेच विरोधी गटाला आतून सामील असतात आणि स्वत:चा फायदा करून झाला की लोकांना वा-यावर सोडून देतात. त्यामुळे प्लॅन "बी" किंवा प्लॅन "सी" असतोच .. पण अनेकदा प्लॅन "सी" हाच अखेर प्लॅन "ए" होताना दिसतो.

अशा आंदोलनांची आपल्याला फार माहिती नसते (मलाही नाही ती) हे एक दुर्दैव आहे. अनेकदा ही माहिती आपण वाचलेल्या वर्तमानपत्रावर आधारित असते. स्वतंत्र भारतातील आंदोलनांबाबत कोणी लिहिले आहे का? ते वाचायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतंत्र भारतातील आंदोलनांबाबत कोणी लिहिले आहे का? ते वाचायला हवे.

+१ हेच्च विचारतो. असे पुस्तक -आढावा असल्यास वाचायला आवडेलच

बाकी, मुळ प्रस्तावातले प्रश्न केवळ मलाच पडत नसल्याचे बघुन मनातील खजीलता-बोच काहीशी कमी झाली. बाकी या विषयात अजिबातच माहिती नसल्याने सध्या (किबोर्डाऐवजी) तोंडावर बोट Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नागरी निवारा परिषदेच्या संकेतस्थळावर मिळू शकते. पण अर्थातच ती नि:पक्षपाती असेलच असे नाही. महाराष्ट्रातील मुख्य आंदोलनांचे संकलन आणि त्याचे समीक्षण असलेले पुस्तक असेल का ते माहित नाही.

संपादक: लिंक सुधारली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

रोचक लेखन आहे. लेखकाच्या नावामुळे रोचकतेत भर पडली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख रोचक आहे, पण आंदोलन करणारे व्यवहारी(विवेकी!!) असतील तर ते मुळात आंदोलन करतीलच का? असा प्रश्न पडतो, पण आंधळेपणाने आंदोलन करण्याबाबत विचार केला पाहिजे, पण तो विचार आंदोलनाच्या फलिताबद्दल असावा, त्याच्या दिशेबद्दल असावा असे वाटते,

आंदोलनाबद्दल काही रोचक वाचन-

The importance of protest appears in the confusion of powers which protest action (often!!) achieves. Protest action is at its core the spontaneous empowerment of the powerless, making it possible communicate things and issues which otherwise would not be communicated. It may be more important to reveal something about decision-makers than proposing policies or solutions.--Jón Ólafsson

Protest can be the expression of value commitments, but it may also be a formative event, through which new ideas and values come into being. Moreover activism may also serve to entrench values - create convictions which then shape future action. The protester who partici- pates in a relatively peaceful protest against e.g. an environmental policy and is beaten up by police is not unlikely, by this experience, to go through a transformation of values. To such a person the experience may be revelatory - he or she may come to see the authorities as not only misled and misinformed but as deliberately conducting mistaken policies for some secondary purpose. This reaction forces him think more and deeper about his own values, which may lead to their becoming even stronger than before, or to their transformation. -Jón Ólafsson

When there are rational grounds for an opinion, people are content to set them forth and wait for them to operate. In such cases, people do not hold their opinions with passion; they hold them calmly, and set forth their reasons quietly. The opinions that are held with passion are always those for which no good ground exists; indeed, the passion is the measure of the holder’s lack of rational conviction.- Bertrand Russell

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा आंदोलन यशस्वी झाले आणि त्यांचे पुनर्वसन झाले, मोबदला मिळाला तर तो मिळणारा मोबदला किती दिवस पुरणार आहे? कदाचित खूप काळ लढा दिल्यावर काही अपुरा मोबदला हाती पडू शकेल. त्या साठी आयुष्याची काही वर्षे वाया घालवणे व्यवहार्य आहे का?

दुसर्‍या बाजूस असे वर्षानुवर्षे चालणारे आंदोलन यशस्वी झाले नाही तर ? प्रकल्पग्रस्तांच्या हाती काय पडणार?

प्रकल्पग्रस्त विस्थापितांना उपलब्ध असलेली रोजगाराची साधने मर्यादीत असतील, असा अंदाज आहे. या साधनांवरच गदा येत असल्याने आंदोलनात सर्वस्व झोकून देण्याची प्रेरणा मिळत असावी. रोजगाराच्या साधनांवर गदा येत नसल्याने काही आंदोलनांत आपण म्हणता तसा विचार करून लोकांचा सहभाग हळू हळू फिका पडत असावा. उदा. अण्णांची आंदोलने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एनडीए किंवा तत्सम सैनिकी अधिकारीपदांसाठीच्या मुलाखतीत एक प्रश्न विचारला जातो म्हणे.
"जर तू नि:शस्त्र असशील आणि चार सशस्त्र गुंडांनी अडवून तुझ्याकडून तुझं पैशाचं पाकीट मागितलं तर काय करशील?"
व्यवहारी लोक विचार करतात जीवापेक्षा पैसे मोठे नाहीत शिवाय सूज्ञ माघार वगैरे. "देऊन टाकीन."
पुढचा प्रश्न असतो "पाकीट मिळाल्यावर त्यांनी तुझ्या अंगावरचे सगळे कपडे मागितले तर काय करशील?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पुढचा प्रश्न असतो "पाकीट मिळाल्यावर त्यांनी तुझ्या अंगावरचे सगळे कपडे मागितले तर काय करशील?"<<

सुज्ञपणा सांगतो "काहीच मिळणार नाही" हे उत्तम उत्तर आहे. पुढे काय प्रश्न विचारणार? सुज्ञ ह्यासाठी कारण ह्याप्रश्नानंतर गुंड किंवा प्रश्नकर्ता पाजी आहे हे लक्षात येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0