विद्वजनांचा सहवास

तसा मी स्वतःला सामान्य माणूसच समजणारा. तरीही मला विद्वजनांचा सहवास लाभला. अनेक साहित्यिक खेळाडू, गायक, वादक अशा नाना प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना मी माझ्या घरी बोलावतो. नेम ड्रोपिंगचा आरोप नको म्हणून नावे घेत नाही पण खूपच कॄतार्थ वाटते आहे. कॉलेजमधे ज्या गायकाची मैफिल ऐकण्यासाठी थंडी पावसातुन मी जायचो आज तोच कलाकार माझ्या घरी छोटिशी मैफिल भरवतो तेव्हा उर अभिमानाने भरुन येतो. तुमच्यापेकी कितीजणांना असे भाग्य लाभले आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

चर्चाप्रस्ताव मांडताना प्रस्तावकाने याहून थोडी अधिक मेहनत घेणं अपेक्षित आहे. तुम्ही या विषयावर बराच विचार केलेला असण्याची शक्यता असेल. पण दुर्दैवाने तुमचे विचार पुढे येत नाहीत. अशा तोकड्या प्रस्तावामुळे विषयाचा आवाका, पातळी, चर्चेचे कारण काहीही समजत नाही. लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यातली माहिती विचारण्याआधी स्वतः किमान मेहेनत करणे आवश्यक आहे. त्याच्या अभावामुळे 'अमुक अमुक संदर्भात तुम्हाला काय वाटते' हा गळेपडूपणा वाटतो. त्यामुळे वाचकांचा लिहिण्याचा उत्साह कमी होतो.

तेव्हा चर्चाप्रस्ताव लिहिताना थोडी मेहेनत घ्या आणि तारतम्य बाळगा ही विनंती.

संदर्भ: http://www.aisiakshare.com/node/815#comment-10913

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमड्या लावण्यासाठी भिंत उपलब्ध करून देण्याइतपत प्रस्ताव असला तरी चालून जातंय असंच खालची भिंत पाहून वाटते...
भरपूर प्रतिसाद आलेले दिसताहेत Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एकतर, लोकांनी तुंबड्या लावल्या काय आणि हजामत केली काय, आपल्याला कूल पॉईंट्स मिळत नाहीत, लोकांना मिळतात. दुसरं म्हणजे लोकं एकदा-दोनदा येतीलही तुंबड्या किंवा हजामतीसाठी, फक्त भिंत उभी केली म्हणून रोजरोज भाव मिळत नाही.
याउप्पर "आम्ही उपेक्षित आहोत, लोकं आमचा मुद्दाम दुस्वास करतात" असली रडारडच करायची असेल तर असल्या अभिरडस्वातंत्र्याच्या आड मी येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही उपेक्षित आहोत, लोकं आमचा मुद्दाम दुस्वास करतात" असली रडारडच करायची असेल तर असल्या अभिरडस्वातंत्र्याच्या आड मी येणार नाही.

कशाला रडताय. आधी लोकशाहीचा गाजावाजा करायचा. नंतर गैरसोयीचे प्रतीसाद आले की सदस्याला प्रतिबंधित करायचे. बालीश प्रतीसादांना मात्र विनोदी, मार्मिक ठरवायचे. भंपकपणा बंद करा आधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही इनोदात म्हन्लो आन तुमी शिरेस्ली घेत्लंत व्हय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अरेच्चा! अभिरडस्वातंत्र्य असा एक नवा, तयार केलेला शब्द तुम्हाला विनोदी वाटला नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या. यात काय विशेष बापट. मलाही अशी अनेक भाग्ये लाभली आहेत. मी कॉलेजात असताना थंडीतुन दारु प्यायला जायचो. एकदा दारु ढोसली की लताआशा, किशोर, रफी, मन्नाडेपासुन किशोरी, कुमार, भीमण्णा सगळे पुढे मैफिलीला यायचे. घरी किंवा कुठेही. अजुनही येतात. कधी भेटता बापट. सगळ्यांशी भेट करवुन देइन तुमची. कृतकृत्य व्हाल. पुढचा आठवडाभर नीट झोप येणार नाही. करवटें बदलते रहे सारि रात हम होत राहील तुमचे. भेटा कधीतरी, भेटविन सगळ्यांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

तसा मी स्वतःला विद्वान माणूसच समजणारा. तरीही मला सामान्यजनांचा सहवास लाभला. अनेक वासू, टपोरी अशा नाना प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना मी माझ्या मठीत बोलावतो. नेम ड्रोपिंगचा आरोप नको म्हणून नावे घेत नाही पण खूपच कॄतार्थ वाटते आहे. कॉलेजमधे ज्या बेवड्याचा "तमाशा" बघायला थंडी पावसातुन मी जायचो आज तोच "कलाकार" माझ्या घरी छोटिशी मैफिल भरवतो तेव्हा उर अभिमानाने भरुन येतो!

तुमच्यापेकी कितीजणांना असे भाग्य लाभले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लई भारी ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ह्या. यात काय विशेष बापट. मलाही अशी अनेक भाग्ये लाभली आहेत. मी कॉलेजात असताना थंडीतुन दारु प्यायला जायचो. एकदा दारु ढोसली की लताआशा, किशोर, रफी, मन्नाडेपासुन किशोरी, कुमार, भीमण्णा सगळे पुढे मैफिलीला यायचे. घरी किंवा कुठेही. अजुनही येतात. कधी भेटता बापट. सगळ्यांशी भेट करवुन देइन तुमची. कृतकृत्य व्हाल. पुढचा आठवडाभर नीट झोप येणार नाही. करवटें बदलते रहे सारि रात हम होत राहील तुमचे. भेटा कधीतरी, भेटविन सगळ्यांना.

या माझ्या प्रतीसादात तुम्ही सुरेख मजेदार, गमतीदार बदल केले आहेत. (खरे तर माझा दडविलेला प्रतीसाद वर यावा म्हणून हे सगळे.) लई भारी. (मी लई भारी म्हटले आहे तुमच्या प्रतीसादाला म्हणून तो विनोदीही ठरतो.) माझा प्रतीसाद तीन-साडेतीन टक्केंसाठी होता. तुमचा प्रतीसाद मात्र अधिक व्यापक ऑडियन्ससाठी आहे. (आता तीन-साडे तीन टक्के इथे कुठून आले हे मात्र विचारू नका.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

तसा मी स्वतःला पापभिरू माणूसच समजणारा. तरीही मला देवतासमान जनांचा सहवास लाभला. विविध प्रदेशातील, खेड्यापाड्यातील अनेक बापू, बाबा, बुवा, महाराज, ताई, माई, माँ, आचार्य, भगवान, अशा अनेक प्रसिद्ध 'परमेश्वरा'समान व्यक्तिमत्वांना मी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भेटलो. कृतार्थ झालो. माझ्या सर्व ऐहिक व 'पारमार्थिक' समस्या दूर झाल्या. (भरपूर पैसे ओतून!) मी त्यांना कधी कधी माझ्या झोपडीवजा बंगल्यात बोलावतो. (व आता बंगला विकून जेमतेम जगण्याची वेळ आली आहे!) त्यांच्या शेकडो भक्तगणासोबत ते माझ्या घरी येऊन मला आशिर्वाद देत होते. नेम ड्रोपिंगचा आरोप नको म्हणून नावे घेत नाही पण खूपच कॄतार्थ वाटते आहे. हे सर्व इतक्या कमी काळात भरपूर श्रीमंत झालेले बघून व त्यांचे एकेक 'प्रताप' ऐकून अभिमानाने उर भरुन येतो! (मी स्वत:च त्यांच्या पंक्तीत जावून का बसलो नाही याबद्दल काही वेळा हळहळही वाटते!)

तुमच्यापेकी कितीजणांना असे भाग्य (की दुर्भाग्य!) लाभले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या पेक्षा त्या विद्वज्जनांपैकी एखाद्याची हृद्य आठवण किंवा चालू फॅशनप्रमाणे 'त्यांचे पाय कसे मातीचेच होते' हे सांगणारा किस्सा असता तर बरे वाटले असते.
असो.
आमच्या घरी असे कोणी विद्वज्जन येत नाहीत आणि आम्हीही कोणाला बोलवायला जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बापट, तुम्ही सुधारणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या. यात काय विशेष. मलाही अशी अनेक भाग्ये लाभली आहेत.
मी वासरू असताना मराठी आंतरजालावर जायचो.
तिथे पुष्कळ माजलेले रेडे आणि म्हशी यायच्या.
नवनवे मुखवटे घालून चिखलात लोळायला.
अजुनही येतात. ह्या काय.
आज त्यांना पहातो तेव्हा उर अभिमानाने भरुन येतो.
तुमच्यापेकी कितीजणांना असे भाग्य लाभले आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.