पुस्तक-प्रकाशनविषयक सल्ला.

येथील पुस्तकप्रेमी आणि चोखंदळ वाचकांकडून काही सल्ल्याची अपेक्षा आहे.

१) एखाद्या कॉफी-टेबल पुस्तकाला महाराष्ट्रात/भारतात कितपत मागणी असते? भाषा मराठी व/वा इंग्रजी. प्रकाशक मिळणे कितपत अवघड असते?
२) असे प्रकाशक कोण आहेत - प्रामुख्याने पुणे-मुंबई-महाराष्ट्रामध्ये.
३) पूर्ण पुस्तक मजकूर/फोटो/ले-आउट सह तयार करून दिले तर प्रकाशक मिळणे सोपे की अवघड?

येथे परदेशात बसून पुण्या-मुंबईतील प्रकाशक/पुस्तकविक्रेते/तत्सम अम्य व्यावसायिक ह्यांच्याशी चर्चा करता येत नसल्यामुळे येहेच काही मार्गदर्शन मिळते काय अशा अपेक्षेने ही चौकशी पाठवीत आहे.

ह्याविषयी काही सांगण्याजोगे असेल तर मला व्यनि केला तरी उत्तम.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रकाशनाचे हक्क त्यास विकणार असे गृहित धरले तर. तुम्हाला मिळणारा मोबदला हा तुम्ही अगोदर नाव कमवून असलात तर वाढतो. प्रकाशकांचा हे काम घेण्याचा उत्साह घेतलेला विषय ,इंग्रजी /मराठी माध्यम आणि लेखकाची बाजारातली चलती/मागणी यांवर कमी जास्त होतो.
जे पुस्तक तुम्हाला वाटते खूप चांगले आहे , चांगला मोबदला मिळायला हवा आणि अगोदर तुमच्या नावावर त्याच माध्यमात अनोळखी असेल तर एक दुसरे पुस्तक प्रकाशित करवून घ्या. मग हे अपेक्षित पुस्तक घेऊन प्रकाशकाकडे जा.

खूपखूप शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी मुद्रण व्यवसायात आहे, त्यानुसार लिहितोय.
१) एखाद्या कॉफी-टेबल पुस्तकाला महाराष्ट्रात/भारतात कितपत मागणी असते? भाषा मराठी व/वा इंग्रजी. प्रकाशक मिळणे कितपत अवघड असते?
बहुधा जास्त नाही. ४०-५० पुस्तके केली पण माझ्याकडे अद्याप एकही आलेले नाही. प्रोफेशनल प्रकाशक पुण्यामुंबईतच मिळू शकतात.
२) असे प्रकाशक कोण आहेत - प्रामुख्याने पुणे-मुंबई-महाराष्ट्रामध्ये.
कल्पना नाही जास्त. सोलापूरातील सांगू शकेन पण त्यांचा आवाका लहान आहे खूप.
३) पूर्ण पुस्तक मजकूर/फोटो/ले-आउट सह तयार करून दिले तर प्रकाशक मिळणे सोपे की अवघड?
अवघड आणि सोपेही. एकतर तसा लेआऊट / डमी बनवायला खर्च येतो बराच. तो प्रकाशकाला पसंत नाही पडला किंवा त्याला प्रकाशन अथवा विक्रीयोग्य नाही वाटला तर सगळेच बदलावे लागेल. सोपे यासाठी की तज्ञ माणसाकडून बनवून घेतल्यास प्रकाशकाला पूर्वकल्पना येऊ शकेल.
.
बाकी प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे एका ज्योतिषाच्या पुस्तक प्रकाशनाचा अनुभव पहा भाग १ ते ५ वेचून घ्या
https://suhasgokhale.wordpress.com/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. मी पूर्ण वाचून काढले आणि मुळापासून हादरलो. बापरे असंही असतं तर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या कॉफी-टेबल पुस्तकाला महाराष्ट्रात/भारतात कितपत मागणी असते?

माझ्या मते भारतात अशी पुस्तके लेखकानी स्वताच खर्च करुन छापायची असतात. लेखक खर्च करणार असेल तर भरपुर छापुन देणारे मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) एखाद्या कॉफी-टेबल पुस्तकाला महाराष्ट्रात/भारतात कितपत मागणी असते? भाषा मराठी व/वा इंग्रजी. प्रकाशक मिळणे कितपत अवघड असते?
विषय काय आहे त्यावर ते खरं तर अवलंबून आहे.

२) असे प्रकाशक कोण आहेत - प्रामुख्याने पुणे-मुंबई-महाराष्ट्रामध्ये.
भाषा मराठी की इंग्रजी आणि विषय कोणता त्यानुसार हे बदलेल. मराठीत ज्योत्स्ना प्रकाशन (गिरगांव, मुंबई आणि शनिवार पेठ, पुणे). त्यांच्या काही पुस्तकांच्या इंग्रजी आवृत्तीही ते काढतात. खप अर्थात विषयानुसार - उदा. चंद्रमोहन कुलकर्णी, दीनानाथ दलाल किंवा माधव सातवळेकर ह्यांच्या चित्रांची पुस्तकं किंवा संदेश भंडारे यांच्या फोटोंची पुस्तकं ('तमाशा - एक रांगडी गंमत; प्रकाशक : लोकवाङ्मय गृह) चांगल्यापैकी खपत असावीत.

३) पूर्ण पुस्तक मजकूर/फोटो/ले-आउट सह तयार करून दिले तर प्रकाशक मिळणे सोपे की अवघड?
हे सगळं करायची तुमची तयारी असली तर अर्थात प्रकाशकाची कटकट वाचते, पण मुळात विषय त्यांच्या मार्केटिंगच्या अंदाजानुसार त्यांना भुरळ पडणारा असावा लागेल. कारण, हे सगळं जर तुमचं तुम्हीच करणार असाल, तर प्रकाशकावर तुमचं अवलंबित्व हे मुख्यतः त्यांचं नाव / बाजारातली त्यांची पत अशा गोष्टींचा आणि त्यांच्या वितरणव्यवस्थेचा तुम्हाला होऊ शकणारा फायदा हे असायला हवं. अन्यथा तुम्ही आपलं आपणच छापखान्यातून पुस्तक छापूनही घेऊ शकता. पुण्या-मुंबईत हे सहज शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||